Monday, 13 January 2025

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करावे

 पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार

पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करावे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

 

मुंबईदि.१३ : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकासआणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतीलकेंद्र व राज्य  शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला.

यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाईराज्यमंत्री  इंद्रनील नाईकमुख्य सचिव सुजाता सौनिक,पर्यटन  विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीशासनाकडून  अनुदानित  प्रकल्पामध्ये  नाशिक येथील राम - काल पथ विकाससिंधुदुर्गातील मालवण येथील  पाण्याखालील  सागरी पर्यटनाचा अनुभवस्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासअजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे. स्वदेश दर्शन २.० अंतर्गत अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटन आकर्षणासाठी उपक्रम राबविण्या संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणेशिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणेपंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांसाठी सल्लागार नेमून ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

पर्यटन विभागाने ३१ मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्रकृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र ,साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्रकॅराव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्रआई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणीपर्यटन व्हिलाची नोंदणीपर्यटन अपार्टमेंटची नोंदणी प्रमाणपत्रहोम स्टेच नोंदणी प्रमाणपत्रव्यवसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

 नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना

पाच लाखांची मदत जाहीर

 

मुंबई, दि. १३ : नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.


भवताल मासिक : जानेवारी २०२५सं

 भवताल मासिक : जानेवारी २०२५


नमस्कार.
‘भवताल मासिका’चा जानेवारी २०२५ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

नवीन व्याघ्र प्रकल्प... आता नकोत?
• नितीन काकोडकर

कबुतरांचा वावर... आरोग्यासाठी धोक्‍याची घंटा !
• गिरीश जठार

सावधान, थंडीत वाढतोय वॉकिंग न्युमोनियाचा धोका !
• डॉ. कस्तुरी जोशी-नवरे 

‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ वनस्पती प्रजातीचा शोध !
• डॉ. कुमार विनोद छोटुपुरी गोसावी

शंभर वर्षांपूर्वी पुण्यातील बिबट्याचा वावर !
• डॉ. संजीव बा. नलावडे

याशिवाय,
• भवताल बुलेटिन
• इको अपडेट्स

...
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. आपल्या संपर्कात मासिकासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

मासिकाच्या नावनोंदणीसाठी लिंकः

(आपण 'भवताल मासिका'ची रु. ७९० इतकी वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला त्याचा दर्जा टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी बँकेचे तपशील:
AC name: Bhavatal Foundation
AC no: 033805009849
IFS Code: ICIC0000338

(वर्गणी भरण्यासाठी सोबत अॅटॅचमेंटमध्ये QR code शेअर केला आहे.)

• संपादक

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी

 सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

 

मुंबईदि. १३ – दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

   सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला, त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीसमृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे ॲग्रो हबमॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभे करावेत. या ठिकाणी सर्व-सोयी सुविधा उभारण्यात याव्यात. या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

    पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीशेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी. राज्यातील चारही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टिक  हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय असून त्यासाठी जास्त मागणीही आहे. त्यामुळे कांदा चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान दोनशे ते अडीचशे एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे.

राज्यातील १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांचे एक ते अडीच कोटीअडीच कोटी ते पाच कोटीपाच ते दहा कोटीदहा ते पंचवीस कोटी असे उपवर्गिकरण करणार. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जाभूरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या ४५ दिवसात त्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही श्री. देवरा यांनी यावेळी सांगितले.

    बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेपर्यटन मंत्री शंभूराज देसाईसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेराज्यमंत्री इंद्रनील नाईकमेघना साकोरे – बोर्डीकरमुख्य सचिव सुजाता सौनिकपणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिवअपर मुख्य सचिवसचिव उपस्थित होते.

००००

-li.आनंदी°पहाट.il-

 🚩⚜️🚩🔆🕉️🔆🚩⚜️🚩

        

     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

        

        *उत्तरायणाच्या स्वागताची*

                 *आज भोगी*         


🌹⚜️🚩🔆🌞🔆🚩⚜️🌹

       

        *भारतीय ऋषींनी आकाश निरीक्षण करुन आमच्यासाठी खगोलशास्त्र सांगणारे पंचांग निर्माण केलेय. त्याप्रमाणे आमचे सणवार साजरे होतात.*

        *आंग्ल नववर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. देशातील विविध प्रदेशात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आणि प्रांतपद्धती.. परंपरेने उत्साहानं याचे स्वागत होते.*

        *धनुर्मास संपल्याने उद्या सूर्य मकर राशीत प्रवेश करणार. उद्यापासून शुभकाळ समजल्या जाणाऱ्या उत्तरायणाचा प्रारंभ होणार. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस उद्या सुरु होणार. पृथ्वी तिच्या अक्षापासून सूर्यापासून सर्वात दूर झुकणार. सूर्य उत्तर गोलार्धाकडे जाणार. यामुळे उद्यापासून दिवस मोठा तर रात्र लहान होणार. हा अत्यंत शुभकाळ समजला जातो. म्हणूनच आज सगळे त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आज त्रिदिवसीय संक्रांतीचा पहिला दिवस अर्थात भोगी.*

        *भारतीय संस्कृतीने जीवनावश्यक योग्य आहाराला धर्मभावनेची जोड दिली आहे. बदलत्या ऋतूमानाचा सकारात्मक परिमाणकारक आहार सणावेळी सांगितला आहे.*

        *भोग अर्थातच उपभोग घेणे हे पण जीवनातील अत्यावश्यक कर्मच. हा भोग निरामय आरोग्यासाठी उत्तम  गोष्टींचा, आहाराचा घेणे म्हणजे यज्ञकर्मच.*        

        *शरीरास थंडीच्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी राजाने पिकविलेल्या आयुर्वेदीय महत्त्व लाभलेल्या सर्वच शेंगावर्गीय भाज्या (भोगीची भाजी ) आज केली जाणार.  तृणधान्याचेही महत्त्व आज जगाला पटलेय. पण आम्ही हजारो वर्षे याचाच वापर करतोय. मग आज तिळ लावलेली बाजरीची भाकरी.. खिचडी.. लोणी असा घरोघरीचा सकस आहार लाभणार.*              

        *इंद्रदेवाने वरुण देवाकडे "आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात उदंड पिके येवू दे.. मानव तसेच प्राणीमात्रांची तहानभूक भागू दे" अशी प्रार्थना केली होती. तसेच दरवर्षी घडते. भरपूर पिके येतात. देश अन्नधान्यांच्या.. पाण्याचा बाबतीत स्वयंपूर्ण आहे. म्हणूनच हा शेतकरी बांधवांचा तर आवडता सण. लोक त्यामुळे आज आनंदाचे प्रतिक असलेल्या इंद्रदेवाचे पूजन करुन कृतज्ञता व्यक्त करतात.*

        *भोगी असल्यामुळे आज महिलावर्गाचे पहाटेच अभ्यंगस्नान झालेय. संक्रांत स्वागतासाठी दारासमोर गोमयाचा सडा घालून सुंदर रंगीबेरंगी रांगोळी रेखाटलेल्या आहेत. आज जगात अनेकांना जमिनीवर बसताही येत नाही, तिथे खाली बसून रांगोळी रेखाटन हा एकाग्रतेचाही परंपरेचा घरगुती व्यायामच. महिला वर्ग नवनवीन पारंपारिक वस्त्रे परिधान करून उत्साहाने.. आनंदाने पूजेसाठी सज्ज आहेत.*

       *या संक्रांत सणाचे नाव भलेही प्रत्येक प्रांतात वेगवेगळे असले तरीही देशभर लोकांना निसर्गकृपेचा रुचकर पौष्टिक आहार मिळणार.*

        *मग भक्त मन आपल्या आराध्याला या उत्तरायणाच्या स्वागतासाठी उठा.. सिद्ध व्हा म्हणून साद घालत आहे.*

        

⚜️🌸🎶🔆🌺🔆🎶🌸⚜️


  *उठ झाला प्रातःकाल,*

  *तुझे गोपाल आले, वननिळा*

  *पूर्व दिशे उदेला भानू,*

  *आला उदयाचळा*


  *प्राणीमात्र पशू पक्षी,*

  *विश्रांत वृक्षी, अपुल्या स्थळी*

  *निद्रा सारून जागृत होती*

  *पंचउषःकाळी*


  *रावे मयुरे, हंस साळ्या,*

  *सुस्वर मुख कमळी*

  *सद्भावे तुज ध्याती गाती*

  *स्वमुखे नामावळी*


  *कनकाचे घट शिरी,*

  *यमुना तिरी, जाती जळा*

  *पूर्व दिशे उदेला भानू,*

  *आला उदयाचळा*


🌺🎶🌸🎼🚩🎼🌸🎶🌺


  *गीत : शाहीर परशराम*  ✍

  *संगीत : वसंत पवार*

  *स्वर : पं. वसंतराव देशपांडे*

  *चित्रपट : शाहीर परशुराम*

  *(१९६१)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१३.०१.२०२५-*


🌻🌸☘🎼🌻🎼☘🌸🌻

Sunday, 12 January 2025

खो-खो विश्वचषक-२०२५ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

 खो-खो विश्वचषक-२०२५ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

 

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्णयामुळे 'खो-खोला पाठबळ

 

मुंबई,दि. 12 :- खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित "खो-खो विश्वचषक-2025" या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी विशेष बाब म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निर्देशानुसार याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे दि. 13 ते 19 जानेवारी, 2025 या कालावधीत आयोजित    "खो-खो विश्वचषक-2025" या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी हा निधी मंजूर केला आहे. यामुळे खो-खो खेळाला पाठबळ मिळाले आहे. खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष बाब म्हणून तातडीने शासन निर्णय निर्गमित केला असल्याने खो-खो खेळाला पाठबळ मिळाले आहे.


विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक

 विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे                             केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक

 

दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी  राज्यातील अधिकाऱ्यांचे घेतले मार्गदर्शन

 

मुंबई,दि.11 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आमंत्रण दिले होते. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी 9 जानेवारी रोजी नवी दिल्लीत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुंबईचे महापालिका आयुक्त आणि मुंबई शहर व उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मतदान केंद्र व्यवस्थापनतेथील पायाभूत सुविधा आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्याचे अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी समाज माध्यमांचा उपयोग आणि माध्यम देखरेख आणि नियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी राज्याच्या कामकाजाची माहिती दिल्लीतील अधिकाऱ्यांना दिली. या कार्यशाळेला दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर. एलिस वाझविविध जिल्हा निवडणूक अधिकारीरिटर्निंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पीआयबीच्या मुंबई च्या उपसंचालक जयदेव पुजारीआकाशवाणीचे वृत्त संपादक जीवन भावसार,मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाज माध्यम तज्ञ पल्लवी जाधव यावेळी उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi