Saturday, 11 January 2025

जैन पाठशाळांना अनुदान, विहार धाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय

 जैन पाठशाळांना अनुदान, विहार धाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय


महामंडळाच्या योजनांसाठी सहकार्य करू - मंत्री दत्तात्रय भरणे


मुंबई ः जैन धार्मिक ट्रस्ट च्या वतीने चालवण्यात येणार्‍या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना व जैन साधु-साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहारधाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसर्‍या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यक मंत्री नाम. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्री दालनात संपन्न झालेल्या बैठकीची माहीती देताना ते बोलत होते. या बैठकीस अल्पसंख्यक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, उपसचिव मो.बा.ताशिलदार, जैन महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनिल पाटणी, व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम, विशेष निमंत्रित संदीप भंडारी, जयेश ओसवाल, नीरव देढीया यांच्यासह उपसचिव विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळातुन राबवावयाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन, व्यापार, उद्योग , शेती कर्ज, महिला बचतगट अर्थसहाय्य, गृह कर्ज, विधवा पेन्शन या योजना एप्रिल 2025 पासून सुरू करण्यासाठी अतिरीक्त निधि ची मागणी केली. अल्पसंख्यक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळाच्या योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन देऊन अतिरीक्त निधि उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे बैठक आयोजित करू असे सांगितले.
जैन मंदीर, स्थानक, संघ या नोंदणीकृत संस्थाद्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात अशा पाठशालामध्ये जैन विद्यार्थी, जैन महिला शिक्षण घेतात त्यांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या प्राकृत भाषेचे, संस्कृत भाषेचे तसेच संगणक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्याचा तसेच पूर्णपणे पायी विहार (यात्रा) करणार्‍या जैन साधू साध्वींना त्यांच्या यात्रा मार्गात सोय नसलेल्या ठिकाणी विहारधाम निर्माण करताना ते प्राधान्याने सरकारी, निमसरकारी शाळांच्या क्षेत्रात उभारले जातील त्यामुळे या सुविधांचा शाळांसाठी सुध्दा उपयोग होईल असाही निर्णय घेण्यात आल्याची माहीती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
अल्पसंख्यक मंत्रालयाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या गतीशील कामकाजासाठी मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली.
व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम यांनी सभा संचलन व आभारप्रदर्शन केले.

फोटो कॅप्शन ः जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसर्‍या संचालक मंडळ सभेत मार्गदर्शन करताना मंत्री नाम. दत्तात्रय भरणे, अध्यक्ष ललित गांधी, सचिव रूपेश जयवंशी व इतर मान्यवर

पौष शुक्ल द्वादशी, आजच्याच शुभ मुहूर्तावर

 पौष शुक्ल द्वादशी, आजच्याच शुभ मुहूर्तावर ५०० वर्षांचे स्वप्न साकार झाले, ज्या राम मंदिराच्या मुक्ततेचा ध्यास मनाला लागला होता तो पुर्ण झाला, आपण भाग्यवान आहोत आयोध्येत आपल्या समोर श्रीरामाचे मंदिर प्रत्यक्षात उभा राहिले आणि प्राणप्रतिष्ठा झाली, आज प्रथम वर्षपूर्तीचा दिवस, सर्वांना हार्दिक शुभेच्छा 


 


🙏 *🚩जय श्रीराम l 🚩*🙏

मेयो' व 'मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे

 मेयोव 'मेडिकलमधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश

 

नागपूरदि. 11 : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) याबाब विश्वासार्हता अधिक असून. येथील वैद्यकीय सेवा-सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे आराखड्यानुसार कालमर्यादेत पूर्ण करावीतअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल)  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटकेमोहन मतेआशीष देशमुखवैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारेमहानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरीवैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवालेअधिष्ठाता डॉ. रवी चव्हाणडॉ. राज गजभियेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

देखरेखीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम

मेयो आणि मेडिकलची प्रगतीपथावरील कामेसद्यस्थितीअडी-अडचणीकामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.  तसेच येथील वीजेची गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस सौर ऊर्जेवर असावा. सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा. उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतीमधील प्रसाधनगृहांची देखभाल योग्य प्रकारे व्हावी यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना ही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

 

 

मेयो आणि मेडिकल येथे सुरू असलेल्या कामांचा एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री  श्री फडणवीस सांगितले.


रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे है,

 रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है,

जो पेड़ हमने लगाया पहले,

उसी का फल हम अब पा रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


इसी धरा से शरीर पाए,

इसी धरा में फिर सब समाए,

है सत्य नियम यही धरा का,

है सत्य नियम यही धरा का,

एक आ रहे है एक जा रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


जिन्होने भेजा जगत में जाना,

तय कर दिया लौट के फिर से आना,

जो भेजने वाले है यहाँ पे,

जो भेजने वाले है यहाँ पे,

वही तो वापस बुला रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


बैठे है जो धान की बालियो में,

समाए मेहंदी की लालियो में,

हर डाल हर पत्ते में समाकर,

हर डाल हर पत्ते में समाकर,

गुल रंग बिरंगे खिला रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है,

जो पेड़ हमने लगाया पहले,

उसी का फल हम अब पा रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


महिलांच्या राक्षणार्थ दामिनी


 

*अयोध्या नगरीतून

 🚩🛕🚩🔆🕉️🔆🚩🛕🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                        *१/२*


             *अयोध्या नगरीतून*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

   *ऐतिहासिक क्षणाच्या वर्षपूर्तीची*

             *‼️जय श्रीराम‼️*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🌹⚜️🚩🔆🛕🔆🚩⚜️🌹   


    *राम म्हणता रामची होइजे ।*

    *पदी बैसोनि पदवी घेइजे ॥*

    *ऐसें सुख वचनी आहे ।*

    *विश्वासे अनुभव पाहे ॥*

    *राम रसाचिये चवी ।*

    *आन रस रुचती केवी ॥*

    *तुका म्हणे चाखोनि सांगे ।*

    *मज अनुभव आहे अंगे ॥*

    *.... जगदगुरु संत तुकाराम*

        *रामनामाचा महिमा असा की, नाम घेता घेता मन निष्पाप, निर्मळ.. पवित्र होत जीवनात क्रांती घडते. सुखच सुख अनुभवता येते. या रामनाम रसाची चवच तशी आहे. एकदा रामनाम रस चाखून बघा. मग राम नाम घेता घेता एकदिवस रामनाम घेणारा रामाच्या पदाला पोहोचतो असे या रामनामाचे सामर्थ्य आहे असे संत तुकोबा म्हणतात.*

        *आज पौष शुक्ल व्दादशी. हा दिवस भरतभूचा अविस्मरणीय हर्षाचा दिवस. मागील वर्षी याच तिथीला अयोध्येतील जिर्णोद्धार मंदिरात श्री रामलल्लांंच्या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली. देशात दिवे लावून दिवाळी साजरी झाली. तो भव्यदिव्य सोहळा जगाने  अनुभवला*  

        *आज भक्त मनाने पुन्हा त्रेतायुगात जाणार. आज श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना  वर्षपुर्तीनिमित्याने अयोध्या येथे त्रिदिवसीय कार्यक्रम संपन्न होत आहेत. तर देशविदेशातील रामभक्त रामभक्तीचा आनंद लुटणार  आहेत.*  

        *प्रभू श्रीराम चरित्र हे सर्वांसाठी आदर्श. भारतीयांचे जीवन रामाने व्यापलेय. जन्मभर प्रभू रामाची साथ असते. पहाट होते तो असतो रामप्रहर.. जगण्यातील स्वारस्थ्य.. आनंद म्हणजे राम. आणि जीवनात शेवटीही साथ देतो तो राम.*

    *चरितं रघुनाथस्य*

    *शतकोटिप्रविस्तरम्‌ ।*

    *एकैकमक्षरं पुंसां*

    *महापातकनाशनम्‌ ॥*

        *श्री राम नामाचा हा अगाध महिमा. हे राम नामाचे सामर्थ्य भगवान शंकरानी  वर्णन केलेय की, रामनाम हे विष्णू सहस्त्रनामाच्या बरोबरीचे आहे.*

        *यामुळेच आज भक्त रामनाम जप करणार.. किमान तीन वेळा रामरक्षा पठण करणार.*

        *आज स्वप्नपुर्ती सोहळ्याच्या वर्षपूर्तीला पुन्हा अयोध्या नगरी सजलीय. श्री राम लल्ला दर्शनाचा आनंद भक्तांची मर्मबंध ठेव ठरत आहे.*

        *आपल्या सुखी जीवनासाठी श्रीरामांचे आभार मानत म्हणतात..*

    *धर्माच्या करिता आम्हांस*

    *जगती रामाने धाडीयले ॥* 

    *ऐसे जाणुनि राम भक्ती*

    *करण्या ऐश्वर्य हे लाभले ॥*


🚩⚜️🚩⚜️🛕⚜️🚩⚜️🚩


  *फुले प्रीतिची आनंदाच्या*

  *अश्रूंनीं भिजली*

  *श्रीरामाच्या पूजेसाठी आज*

  *अयोध्या सजली सजली*


  *गुढ्या पताका तोरण साजे*

  *रूपे घेती अवयव माझे*

  *अभंग नौबत कंठामधुनी*

  *दाही दिशा गाजली*


  *पंचप्राण हे लावून ज्योती*

  *सर्वांगाने करिन आरती*

  *भावभक्तीची टाळमंजिरी,*

  *तालावर वाजली* 


  *सर्वस्वाच्या नैवेद्यानें* 

  *एकरूप हो दोन जीवनें*

  *तुझ्या कृपेची अमृतवेली,*

  *मनोमनी रुजली*


🌹⚜️🌹🔆🛕🔆🌹⚜️🌹


  *गीत : जगदीश खेबूडकर*  ✍️

  *संगीत : दत्ता डावजेकर*

  *स्वर : आशा भोसले*


  🎼🎶🎼🎶🎼  🎧


  *!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-११.०१.२०२५-*


🌻⚜️🌹🔆🛕🔆🌹⚜️🌻

बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन

 बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन

 

मुंबईदि. 10 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतीलअसे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्यशिक्षकविद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.

00000           

 

Featured post

Lakshvedhi