🚩🛕🚩🔆🕉️🔆🚩🛕🚩
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*१/२*
*अयोध्या नगरीतून*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*ऐतिहासिक क्षणाच्या वर्षपूर्तीची*
*‼️जय श्रीराम‼️*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌹⚜️🚩🔆🛕🔆🚩⚜️🌹
*राम म्हणता रामची होइजे ।*
*पदी बैसोनि पदवी घेइजे ॥*
*ऐसें सुख वचनी आहे ।*
*विश्वासे अनुभव पाहे ॥*
*राम रसाचिये चवी ।*
*आन रस रुचती केवी ॥*
*तुका म्हणे चाखोनि सांगे ।*
*मज अनुभव आहे अंगे ॥*
*.... जगदगुरु संत तुकाराम*
*रामनामाचा महिमा असा की, नाम घेता घेता मन निष्पाप, निर्मळ.. पवित्र होत जीवनात क्रांती घडते. सुखच सुख अनुभवता येते. या रामनाम रसाची चवच तशी आहे. एकदा रामनाम रस चाखून बघा. मग राम नाम घेता घेता एकदिवस रामनाम घेणारा रामाच्या पदाला पोहोचतो असे या रामनामाचे सामर्थ्य आहे असे संत तुकोबा म्हणतात.*
*आज पौष शुक्ल व्दादशी. हा दिवस भरतभूचा अविस्मरणीय हर्षाचा दिवस. मागील वर्षी याच तिथीला अयोध्येतील जिर्णोद्धार मंदिरात श्री रामलल्लांंच्या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली. देशात दिवे लावून दिवाळी साजरी झाली. तो भव्यदिव्य सोहळा जगाने अनुभवला*
*आज भक्त मनाने पुन्हा त्रेतायुगात जाणार. आज श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना वर्षपुर्तीनिमित्याने अयोध्या येथे त्रिदिवसीय कार्यक्रम संपन्न होत आहेत. तर देशविदेशातील रामभक्त रामभक्तीचा आनंद लुटणार आहेत.*
*प्रभू श्रीराम चरित्र हे सर्वांसाठी आदर्श. भारतीयांचे जीवन रामाने व्यापलेय. जन्मभर प्रभू रामाची साथ असते. पहाट होते तो असतो रामप्रहर.. जगण्यातील स्वारस्थ्य.. आनंद म्हणजे राम. आणि जीवनात शेवटीही साथ देतो तो राम.*
*चरितं रघुनाथस्य*
*शतकोटिप्रविस्तरम् ।*
*एकैकमक्षरं पुंसां*
*महापातकनाशनम् ॥*
*श्री राम नामाचा हा अगाध महिमा. हे राम नामाचे सामर्थ्य भगवान शंकरानी वर्णन केलेय की, रामनाम हे विष्णू सहस्त्रनामाच्या बरोबरीचे आहे.*
*यामुळेच आज भक्त रामनाम जप करणार.. किमान तीन वेळा रामरक्षा पठण करणार.*
*आज स्वप्नपुर्ती सोहळ्याच्या वर्षपूर्तीला पुन्हा अयोध्या नगरी सजलीय. श्री राम लल्ला दर्शनाचा आनंद भक्तांची मर्मबंध ठेव ठरत आहे.*
*आपल्या सुखी जीवनासाठी श्रीरामांचे आभार मानत म्हणतात..*
*धर्माच्या करिता आम्हांस*
*जगती रामाने धाडीयले ॥*
*ऐसे जाणुनि राम भक्ती*
*करण्या ऐश्वर्य हे लाभले ॥*
🚩⚜️🚩⚜️🛕⚜️🚩⚜️🚩
*फुले प्रीतिची आनंदाच्या*
*अश्रूंनीं भिजली*
*श्रीरामाच्या पूजेसाठी आज*
*अयोध्या सजली सजली*
*गुढ्या पताका तोरण साजे*
*रूपे घेती अवयव माझे*
*अभंग नौबत कंठामधुनी*
*दाही दिशा गाजली*
*पंचप्राण हे लावून ज्योती*
*सर्वांगाने करिन आरती*
*भावभक्तीची टाळमंजिरी,*
*तालावर वाजली*
*सर्वस्वाच्या नैवेद्यानें*
*एकरूप हो दोन जीवनें*
*तुझ्या कृपेची अमृतवेली,*
*मनोमनी रुजली*
🌹⚜️🌹🔆🛕🔆🌹⚜️🌹
*गीत : जगदीश खेबूडकर* ✍️
*संगीत : दत्ता डावजेकर*
*स्वर : आशा भोसले*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-११.०१.२०२५-*
🌻⚜️🌹🔆🛕🔆🌹⚜️🌻
No comments:
Post a Comment