Wednesday, 8 January 2025

भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा* *पिढी-गुणसुत्र आणि नातं*

 *भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा* 

*पिढी-गुणसुत्र आणि नातं*


1) नवरा बायको --- पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई  50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसुत्रे share करतात.

3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात.

4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात.

5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात.

6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात.

7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात.


म्हणून मुळ पुरुष, जोडप्यापासून  सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते. 


*आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.*


तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि *सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात !*


*खरंच आपले पुर्वज किती ज्ञानी होते याचा आपल्याला अभिमान पाहिजे*


*सात पिढ्यांचा उल्लेख नेहमी केला जातो पण त्याच्या मागचे कारण आज समजले.*👌🏻

अग्रेषित

भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा

 *भारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण* फ्रिजमधील वस्तू लवकर वापरून संपवा


◆ *फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध..?*

पण आहे. 

◆ दुधापासुन दही  

◆ बटर पर्यंत 

◆ साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ,

◆ पोहे, 

◆ रवा, 

◆ लोणचे, 

◆ पापड, 

◆ मसाले, 

◆ सुकामेवा, 

◆ भाजीपाला 

जे असेल ते 

*कोंबा फ्रीजमध्ये,* 

ही महिलांची वृत्ती.

इतकंच नाही तर अर्धवट खाल्लेली फळ, 

◆ कालची शिल्लक राहिलेली 

■ डाळ, 

■ भाजी, 

■ चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली  

■ मसालावाटण, 

■ सर्वप्रकारची कडधान्ये, 

■ वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, 

■ उरलेली शितपेये,  

■ मिठाया, 

एक ना धड भाराभर वस्तू!


या सर्व वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये सुखाचा संसार करत आहेत, असा तुमचा गैरसमज आहे.  

पण कॕन्सरचे विषाणू येथेच तयार होत आहेत. 

अर्थाअर्थी काहीच संबंध दिसत नाही. 

पण *१००० व्यक्तींचा* अभ्यास केल्यावर हे दिसून आले की, यातील *५३८ जणांना कॅन्सरची लागण* झाली असून, यात *स्त्रियांचं प्रमाण अधिक* आहे

आणि आश्चर्य म्हणजे या *५३८ ठिकाणी वर उल्लेख केल्याप्रमाणे फ्रीजमध्ये सुखाचा संसार* चालू होता.


■ फ्रीज खचाखच भरण्यापेक्षा, *लागते तेवढेच आणा.*


■ इडली, डोसा, 

■ वडा सांबरच पीठ आणा ताज ताज  करण्यापुरतं.. 

आठ आठ दिवसाच नाही. 


■ चणा डाळीचं पीठ, 

■ जोंधळा पीठ, 

■ कडधान्ये यांना फार लवकरच कीड लागते. आणतानाच कमी आणून उन्हात वाळवून ठेवा.


फळभाज्या, पालेभाज्या दोन दिवसांत संपेल एवढीच आणा. 


दूध ४८ तासांत वापरून शिल्लक राहिलेलं फेकून द्या. ! ठेवू नका.


*साभार : डॉ. मकरंद करमरकर*

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई


*एक विनंती हा मेसेज प्रत्येक  घरात व घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोंचवा.*


 आपल्या माता भगिनी चे आयुष्य वाढवा🙏🏻

Tuesday, 7 January 2025

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

 माजी सैनिकांच्या कल्याणासाठी योजना प्रभावीपणे राबवणार

माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या योजनांचा आढावा घेवून आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

माजी सैनिक कल्याण महामंडळाची माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण महामंडळाचे सचिव  डॉ.प्रशांत नारनवरे  उपस्थित होते.

    मंत्री श्री. देसाई म्हणाले की,माजी सैनिक कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनास्वयंरोजगाराच्या योजनांसाठी नव्याने आवश्यक तिथे सुधारणा करण्याबाबत सर्व योजनांचा आढावा घ्यावा. माजी सैनिकांसाठी आलेला शंभर टक्के निधी खर्च करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही मंत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना भारतीय सैन्यदलांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या संचालक मंडळाची रचनाकार्ये आणि जबाबदाऱ्याउपलब्धीकार्यालयीन मनुष्यबळ यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

****

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

 गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

-         क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

·         द्रोणाचार्यअर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

 

            मुंबईदि. 7 : खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे क्रीडायुवक कल्याणअल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

            मंत्रालयातील दालनात श्री.भरणे यांनी विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरक्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणेसहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते.

            क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणाले कीक्रीडायुवक कल्याण विभागअल्पसंख्याकऔकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठीच्या  कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याची ग्वाही श्री.भरणे यांनी यावेळी दिली.

क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

            यावेळी जलतरण क्रीडा प्रकारात योगदान देणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांना केंद्र शासनाच्यावतीने अर्जुन (जीवन गौरव) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रीडा मंत्री श्री. भरणे यांनी  सन्मानित केले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक  दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कारगोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिल्लारी यांना अर्जुन पुरस्कार, शूटींग क्रीडा प्रकारात स्वप्निल कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री. भरणे यांनी सन्मानित केले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवित देशाबरोबर राज्याचे नाव उज्ज्वल करावेअशी अपेक्षा व्यक्त करीत श्री. भरणे यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

०००

गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यासाठी पारदर्शक निवड प्रणाली राबवावी

 गुणवत्तापूर्ण शिक्षक निवडण्यासाठी 

पारदर्शक निवड प्रणाली राबवावी

- राज्यपाल

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ

 

मुंबई, दि. ७ : विद्यादान हे पवित्र कार्य आहे. महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या आधारे शिक्षकांची निवड करण्यासाठी पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याबाबत आपण आग्रही असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. 

            स्थापनेचे १६८ वे वर्ष साजरे करीत असलेल्या मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह येथे संपन्न झालात्यावेळी राज्यपाल बोलत होते. 

शिक्षकांची निवड करताना एक सामायिक परीक्षा देखील घेतली जावी या संदर्भात विचारविनिमय सुरु असल्याचे राज्यपालांनी सांगितले. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करावेते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एक महिन्यात दीक्षांत समारंभ आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पदवी लगेचच मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असले पाहिजे असे सांगताना विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना न करता आपल्या गतीने शिकत राहिले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आरोग्यासाठी व्यायाम व चालणे या सवयी लावून घेतल्या पाहिजे व अमली पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

            दीक्षान्त समारंभाला सुरुवातीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील व कौशल्यरोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर हे समारंभाचे विशेष अतिथी होते. अमेरिकेच्या सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलोमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णीप्र. कुलगुरू डॉ. अजय भामरेविविध विद्याशाखांचे अधिष्ठाताप्राचार्य आणि स्नातक उपस्थित होते.

दीक्षान्त समारंभामध्ये १,६४४६५ स्नातकांना पदव्या४०१ स्नातकांना पी.एचडी. तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

नवेगावबांध व चांदपूर पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेलमी

 नवेगावबांध व चांदपूर पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमटीडीसीच्या नवेगावबांध व चांदपूर पर्यटक निवासाचे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईदि. 7 : विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यामधे एमटीडीसीचे नवेगावबांध व भंडारा जिल्ह्यातील चांदपूर पर्यटक निवास पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मंत्रालय येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नवेगाव बांध व चांदपूर पर्यटक निवासाचा लोकार्पण सोहळा आभासी पद्धतीने झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजपर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय  संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.

नवेगाव बांध - एक आदर्श पर्यटनस्थळ

गोंदियापासून 65 कि.मी.वर नवेगावबांध येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. वनश्रीने नटलेल्या या उद्यानाचा परिसर 165 चौ.कि.मी. आहे. येथील तलाव व वनक्षेत्र पक्षांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे सैबेरियासारख्या अतिदूर प्रदेशातून येणारे पक्षी विशिष्ट हंगामात दरवर्षी येतात. नवेगांवबांध हा तलाव 11 वर्ग कि.मी. परिसरात पसरलेला आहे.

नवेगावबांध सर्वसोयीसुविधा युक्त पर्यटक निवास

नवेगावबांध या पर्यटनस्थळी पर्यटकांना राहण्याकरिता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून रु. 21.00 कोटीच्या निधीतून उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे.  येथे व्हीआयपी सूटडिलक्स सूटस्टॅंडर्ड सूट आणि 8 बेडेड डॉर्मिटरीउपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. येथे एकूण १८ सुट डिलक्स२ लेडीज डॉरमेटरी सुट, जेन्ट्स डॉरमेटरी  १ सूट१ चेंजींग रूम१ मॅनेजर रूम१ वेटींग रूम आहे.

चांदपूर पर्यटक निवासाचे लोकार्पण

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चांदपूर पर्यटक निवास हे पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील चांदपूर हे एक अत्यंत निसर्गरम्य आणि धार्मीक पर्यटन स्थळ आहे.चांदपूर या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्याकरीता महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून रु. 11.00 कोटीच्या निधीतुन उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केलेले आहे. येथे डीलक्स सुटस्डॉरमेंटरीउपहारगृह आणि मनोरंजनासाठी स्विमींगपूल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. अशा एकूण २४ रूम आहेत.

चांदपूर लगत पर्यटन स्थळे

गायमुख येथे अंबागड टेकडीवरील प्राचीन शिवमंदिर प्रसिध्द आहे. आंबागड किल्ला हा  भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असणारा सातपुडा पर्वत श्रणीतील डोंगरावर असलेला किल्ला आहे.  बावनथडी नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या ईशान्य सरहद्दीवरून जाणारी आणि गोंदिया जिल्हा व भंडारा जिल्हा या जिल्ह्यांतून वाहणारी नदी आहे. बावनथडी प्रकल्प (राजीवसागर) नावाचे धरण आहे. चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेलेधापेवाडा हे सुंदर लोकप्रिय गाव असून पर्यटकांचे आकर्षण आहे. 

एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

 एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी


सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन


 


मुंबई, दि. ७ : एच.एम.पी.व्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.


पत्रकार परिषदेला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विभागाचे सचिव डॉ निपुण विनायक, सचिव नवीन सोना, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित होते.


 केंद्र शासनाच्या याबाबतीत येत असलेल्या दिशा निर्देश आणि मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या आजाराबाबत कोणीही अफवा पसरवू नये. नागरिकांनी वस्तुस्थिती लक्षात घेत अफवांवर विश्वास ठेवू नये. लहान मुले, वयोवृद्ध, दुर्धर आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. आजाराच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाचे संपूर्ण पथक कार्यरत असून लवकरच विशिष्ट कार्यपद्धती जाहीर करण्यात येईल. राज्यात आरोग्य विभागाची चांगली व्यवस्था असून यंत्रणा सज्ज आहेत. असे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.


या आजाराबाबत आरोग्य विभागाचे सचिव डॉ निपुण विनायक म्हणाले, सध्या चीनमध्ये श्वसनविषयक आजाराच्या विषाणूबाबत समाजमाध्यमावर माहिती येत आहे. चीनमध्ये हिवाळी वातावरणामुळे श्वसन संसर्गाची वाढ अनैसर्गिक नाही. इन्फ्ल्यूंझा, आर. एस. व्ही, एचएमपीव्ही (Human Meta Pneumo Virus) यासारखे विषाणू कारणीभूत आहेत. हे विषाणू भारतासह जगामध्ये पहिल्यापासून प्रचलित आहे.


एचएमपीव्ही हा साधारणतः सौम्य आजार आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे असतात. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना आजाराचा जास्त धोका असू शकतो. हा एक हंगामी रोग आहे, जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो. सद्यस्थितीत भारतामध्ये श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवाढीमध्ये वाढ आढळून आलेली नसून या स्थितीला काळजीचे कारण नाही. सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधीसाठा आहे. या आजाराला कारणीभूत असलेल्या विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे येथे करण्यात येत आहे.


या आजारावर लक्षणाधारीत सहायक उपचार करण्यात येतो. या आजारावर प्रतिजैविके (antibiotics) अनावश्यक असुन कुठलीही लस किंवा उपयुक्त अशी अँन्टीव्हायरल (antiviral) औषधी नाहीत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


आजाराबाबत पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागानेही खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय श्वसनाचे संसर्ग वाढू नये, यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 


नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासुन बचाव करण्यासाठी ही काळजी घ्यावी


*जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून ठेवा


*आपले हात वारंवार धुवा.


*ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.


*भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक खावे


*संक्रमण कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा व कार्यालये इ. ठिकाणी हवा खेळती असावी.


*हस्तांदोलन टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर टाळावा.


*आजारी लोकांशी जवळचा संपर्क नसावा.


*डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.


*सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.


*डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळावे.


*सर्दी व खोकला झाल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

Featured post

Lakshvedhi