Friday, 3 January 2025

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावली बैठक

 मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावली बैठक

मुंबईदि. 2 : मुंबई शहर व परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीपर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेतसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 6 जानेवारी रोजी मंत्रालय येथे ही बैठक होणार आहे.

प्रदूषण कमी करणे यासह प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाच्या विविध उपाययोजना या विषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

०००००

कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार

  

कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार

-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

 

मुंबई,दि. 2 : कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून ज्याठिकाणी अडचणी आहेत. तेथे समन्वयाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्रालयीन दालनात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी म्हणाले कीअपुर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.सुरु असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यात यावी. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकारी यांनी दक्ष रहावे. प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मंत्री श्री महाजन यांनी महामंडळाच्या भविष्यकालीन प्रकल्पांचाही सविस्तर आढावा घेतला.

यावेळी सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे,कोकण पाटबंधारे  विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेसहसचिव तथा मुख्य अभियंता अभय पाठकसंजिव टाटूप्रसाद नार्वेकरमिलिंद नाईकयांच्यासह महामंडळाचे व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे प्रकल्पाविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

००००

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वीकारला पदभार

 राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वीकारला पदभार

 

मुंबई, दि. 2 : नगर विकास, परिवहनसामाजिक न्यायवैद्यकीय शिक्षणअल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात विभागांचा पदभार स्वीकारला.

सर्व संबंधित विभागाचा आढावा घेवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आणि त्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासंदर्भात कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही  राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.


इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा तसेच दुग्धविकास

 इतर मागास बहुजन कल्याणअपारंपरिक ऊर्जा तसेच दुग्धविकास

 मंत्री अतुल सावे यांनी स्वीकारला विभागाचा पदभार

 

मुंबईदि. २:  इतर मागास बहुजन कल्याणअपारंपरिक ऊर्जा तसेच दुग्धविकास विभाग मंत्री अतुल सावे यांनी विभागाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच श्री.सावे यांनी अपारंपरिक ऊर्जा विभागाचा आढावा घेतला.

मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्री. सावे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

अपारंपरिक ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. पुढील शंभर दिवसांत या योजनांना गती देण्यात येईलअसेही अपारंपरिक ऊर्जामंत्री श्री.सावे यांनी सांगितले. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000


ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठ्याच्या योजनांना गती देणार

 ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठ्याच्या योजनांना गती देणार

- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबईदि. 2 : पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार श्री.पाटील यांनी स्वीकारला.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या विभागाच्या योजना यापूर्वीही प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून प्रगतीपथावरील योजनांसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात येईल. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन विविध कामांना गती देणार आहे. विभागाच्या माध्यमातून पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००




महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय

 महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

 

 मुंबई, दि. 2 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ साजरा करण्यात आला. पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले. गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरमुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीसेवानिवृत्त अधिकारीपोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले कीमागील काही वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षानक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षायुवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. यामध्ये महिलांची वाढती संख्या ही उल्लेखनीय बाब आहे. महाराष्ट्र पोलीस हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या अद्वितीय समर्पणशौर्य आणि उत्कृष्टतेसाठी ओळखले जातात. या जबरदस्त दलाने दहशतवादी हल्लेसंघटित गुन्हेटोळी युद्धे आणि बॉम्बस्फोट अशा असंख्य आव्हानांना सामोरे जात त्यांचा यशस्वी सामना केला असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले.

मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांना पकडून देण्यासाठी गोळ्या झेललेल्या तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले. अशा शौर्यांच्या माध्यमातून भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा संदेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. एक गुन्हेगार पुढे टोळीचे रूप धारण करू शकतोत्यामुळे अनधिकृत शस्त्रेअमली पदार्थ यांना पायबंद घालून महाराष्ट्र पोलीस गुन्हेगारी नष्ट करेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

   2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातोअशी माहिती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी प्रास्ताविकाद्वारे दिली. भयमुक्त वातावरण ठेवून सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. 

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.  संचलनामध्ये राज्य राखीव पोलीस बल पथकमुंबई पोलीस सशस्त्र दल पथकमुंबई पोलीस महिला पथकठाणे शहर- लोहमार्ग पोलीस पथकमुंबई पोलीस दंगल नियत्रंण पथक तसेच निशान टोळी सहभागी झाले होते. यावेळी विशेष संचलन आणि हर्ष परेड सादर करण्यात आली. तसेच पाईप बँड आणि सायलेंट आर्म ड्रिल ची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.  यावेळी महासंचालकांनी राज्यपालांना स्मृतिचिन्ह प्रदान केले.

००००


 

Maha Governor attends State Police Day Raising function

 

Mumbai Dated 2 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan attended the Maharashtra Police Raising Day function organised by Maharashtra Police at the State Reserve Police Force Ground at Goregaon Mumbai on Tuesday (2 Jan).

 

Director General of Police Rashmi Shukla, Mumbai Commissioner of Police Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, police jawans and their family members were present.

 

Earlier the Governor inspected the Ceremonial Parade and accepted the salute presented by the marching columns of State Police.

 

The Maharashtra Police Foundation Day is celebrated on 2 January to commemorate the presentation of the State Police Flag by then Prime Minister of India Pt Jawaharlal Nehru to Maharashtra Police on 2 January 1961.

0000


 


 


Thursday, 2 January 2025

व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणार, ई-कॅबिनेटचेही सूतोवाच

 व्यक्तीला आधारतसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी

सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणारई-कॅबिनेटचेही सूतोवाच

मुंबईदि. 2 :- आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतोतसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते.

अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकासकामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आधार क्रमांकामुळे जसे अनेक बोगस लाभार्थी आणि तीच ती नावे वगळली गेलीतसेच या निर्णयामुळे त्याच त्या विकासकामांची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. यातून विकासकामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावीयासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावाअशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे कोणत्या भागातकोणत्या कामाचे नियोजन केले आहे आणि नेमके कोठेकोणत्या प्रकल्पाची गरज आहेहे एकत्रितपणे एका डॅशबोर्डवर उपलब्ध असेल. त्यामुळे नेमक्या कोणत्या प्रकल्पाची कुठे गरज आहेहे सुद्धा सहजतेने कळेल. यातून संतुलित विकास साधता येईल आणि निधीश्रमशक्ती याचा सुयोग्य वापर होईल. ही माहिती पीएम गतिशक्ती पोर्टलग्रामविकास पोर्टलमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर  (एमआरसॅक) इत्यादींशी एकिकृत असेल. याचे प्रारूप निश्चित करण्यासाठी एक समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केली. यात नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवराप्रधान सचिव (व्यय) सौरभ विजयग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेनाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा समावेश आहे. या समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाला सादर करायचा आहेअसे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

याचप्रमाणे राज्यातील सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे सर्व विकास महामंडळाच्या सर्व योजना एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे 'इज ऑफ लिव्हिंग'चा उद्देश साध्य होणार आहेशिवाय सर्व समाजघटकांना एकाच ठिकाणी सर्व योजना आणि त्याचे लाभ घेता येणार आहेत. याचे प्रारूप निश्चित करण्यासाठी सुद्धा 4 अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. यात नगरविकास-1 चे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ताउच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगीग्रामविकास सचिव विजय वाघमारेपुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांचा समावेश आहे. यांनाही राज्य मंत्रिमंडळाला आपला अहवाल सादर करायचा आहे.

याच बैठकीत 'ई ऑफिस'च्या धर्तीवर 'ई-कॅबिनेट'चे सूतोवाच करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा हा टॅबच्या माध्यमातून हाताळण्यात यावायातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपले जाईलही त्यामागची भावना आहे.

००००

Featured post

Lakshvedhi