Friday, 3 January 2025

कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार

  

कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार

-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

 

मुंबई,दि. 2 : कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून ज्याठिकाणी अडचणी आहेत. तेथे समन्वयाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्रालयीन दालनात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी म्हणाले कीअपुर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.सुरु असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यात यावी. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकारी यांनी दक्ष रहावे. प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मंत्री श्री महाजन यांनी महामंडळाच्या भविष्यकालीन प्रकल्पांचाही सविस्तर आढावा घेतला.

यावेळी सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे,कोकण पाटबंधारे  विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोलेसहसचिव तथा मुख्य अभियंता अभय पाठकसंजिव टाटूप्रसाद नार्वेकरमिलिंद नाईकयांच्यासह महामंडळाचे व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे प्रकल्पाविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi