Wednesday, 1 January 2025

महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी

 महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास एक खिडकीद्वारे ऑनलाईन परवानगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील 100 दिवसांमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

 

 

मुंबईदि. 30 : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्ष  सोहळ्याचे विशेष आयोजन करून त्यांचे कार्य सर्व शाळामहाविद्यालयांपर्यत पोहोचण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून त्यांच्या जीवन कार्यावर एका चांगल्या व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी. या चित्रपटासाठी  शासनाकडून अनुदान देण्यात येईल. मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. ‘हर घर संविधान’ अंतर्गत प्रत्येक घरात संविधान पोहचले पाहिजेअशाही सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलारग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव संजय सेठीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव रणजितसिंह देओलप्रधान सचिव एकनाथ डवलेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीसचिव विरेंद्र सिंहसचिव रविंद्र सिंहपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री

मुंबई  गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्रीप्राधान्याने पूर्ण होत करणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई दि. 31 : राज्यात स्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री श्री. भोसले म्हणाले कीराज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असूनचुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री श्री. भोसले यांनी केला.

०००

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार

 ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार

 

मुंबईदि. ३१ : येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी, या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरअण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलआमदार सचिन कांबळे-पाटीलश्री. गोरे यांच्या पत्नी सानिया गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणालेग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासविषयक विविध संकल्पना राबवून विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून राज्याला प्रथमच २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून कामे चालू करण्यात येतील. तसेच प्रधानमंत्री यांची महत्वाकांक्षी लखपती दीदी योजना १०० दिवसात राबविण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दीदी करणार असल्याचेही श्री. गोरे यांनी सांगितले.

0000

जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा

 जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. ३१ :- जल जीवन मिशन  योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक असण्यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर पूर्ण करून योजना संपूर्ण सोलरायझेशनवर आणावीअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेजलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास वीजेबरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी  विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावीअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा  व स्वच्छता विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटसामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळपाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकरसहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईकमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तामुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव संजय खंदारेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीसामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया

 प्रगतीशील महाराष्ट्रगतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कष्टकरीशेतकऱ्यांसह सर्वांना घेणार सोबत

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्या नागरिकांना शुभेच्छा

 

मुंबईदि. 31 :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही...अशी प्रतिज्ञा करूयाएकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरीशेतकरीकामगारासह सर्वांचीच साथ लाभेलअसा विश्वास देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, 'येणारे वर्ष सुखसमाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहोहीच मनोकामना. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखालील महाराष्ट्राला आधुनिकीकरणाच्या या युगात जगातील सर्वोत्तम राज्य म्हणून अग्रेसर ठेवायचे आहे. आपल्या कष्टकरीशेतकरीकामगारांच्या राबणाऱ्या आणि कला-क्रीडा-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील सर्जक हातांनी या राज्याच्या वैभवात भरच घातली आहे. हा लौकिक आपल्याला वाढवायचा आहे. शेती-माती व सिंचनशिक्षणआरोग्यउद्योग- ऊर्जामाहिती तंत्रज्ञान ते नवनव्या औद्योगिक क्रांती यांना पादाक्रांत करायचे आहे. यासाठी राज्यातील शांतता-सलोखापरस्पर स्नेहआदरभाव वृद्धिंगत होईल. पर्यावरण आणि जल-जंगल-जमीन यांचं जतन-संवर्धन होईलअसे प्रयत्न करायचे आहेत. हा संकल्प घेऊन वाटचाल करायची आहेत्यासाठी नववर्ष चैतन्यदायी ठरेल. सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या नवसंकल्पना घेऊन येईल. यातून आपला महाराष्ट्र आता थांबणार नाहीहा यत्न पूर्णत्वास जाईल. अशी मनोकामना करतो. तशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोअसे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शुभेच्छा देऊन सगळ्यांचे नववर्षाभिनंदन केले आहे.

००००

 


वाचन संस्कृती वाढवण्यासाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम

 वाचन संस्कृती वाढवण्यासाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचाउपक्रम

मुंबईदि. 31 तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान "वाचन संकल्प महाराष्ट्राचाहा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च  तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहेहा उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.

            या उपक्रमांतर्गत दि. 30 डिसेंबर रोजी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा  मान्यवर लेखकांच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 1 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान राज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबई येथे शालेय  महाविद्यालयीन विद्यार्थीग्रंथालयातील वाचक यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके वाचन करण्याचा सामहिक उपक्रमविद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण  पुस्तक कथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेतसेच मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ग्रथालय भेट  सामहिक ग्रंथ वाचन कार्यक्रममहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन कौशल्य कार्यशाळाविद्यार्थी - लेखक परीसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन रण्यात आले

Featured post

Lakshvedhi