Wednesday, 1 January 2025

महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास ‘एक खिडकी’द्वारे ऑनलाईन परवानगी

 महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यास एक खिडकीद्वारे ऑनलाईन परवानगी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील 100 दिवसांमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

 

 

मुंबईदि. 30 : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. हा विभाग सॉफ्ट पॉवर म्हणून काम करतो. कुठल्याही निर्मात्याला महाराष्ट्रात चित्रीकरण करण्यासाठी एक खिडकीद्वारे तात्काळ ऑनलाईन परवानगी देण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्ष  सोहळ्याचे विशेष आयोजन करून त्यांचे कार्य सर्व शाळामहाविद्यालयांपर्यत पोहोचण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून त्यांच्या जीवन कार्यावर एका चांगल्या व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती करण्यात यावी. या चित्रपटासाठी  शासनाकडून अनुदान देण्यात येईल. मराठी चित्रपटाचे सर्व चलछायाचित्रण मोठ्या प्रमाणात गोरेगाव येथील चित्रनगरीत व्हावे यासाठी आकारण्यात येणारे दर कमी करावे. ‘हर घर संविधान’ अंतर्गत प्रत्येक घरात संविधान पोहचले पाहिजेअशाही सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलारग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव संजय सेठीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव रणजितसिंह देओलप्रधान सचिव एकनाथ डवलेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीसचिव विरेंद्र सिंहसचिव रविंद्र सिंहपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi