Monday, 30 December 2024

T N शेषन, का दर्द

 


दरवर्षी आम्ही जी करतो ती उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा दहा एप्रिल ला आहे.

 दरवर्षी आम्ही जी करतो ती उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा दहा एप्रिल ला आहे. 


म्हणजे आधी दहा एप्रिल ला उत्तरवाहिणी नर्मदा परिक्रमा व नंतर २६ मे २०२५ ला समुद्र पंचक्रोशी परिक्रमा येत आहे.


इच्छुक साधकसंख्या समजली कि मग कुणीतरी उत्साही व अनुभवी साधक पुढाकार घेउन सारे नियोजन करतील.

समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा!*

 *समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा!*

(येती सोमवती अमावास्या २६ मे २०२५ ला आहे, या दिवशी आपण ही समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा आपल्याकडून करवून घेण्याची प्रार्थना मैय्याला करत आहोत! तरी इच्छूक नर्मदाभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा!)


नर्मदामाईची परिक्रमा हा एक अपूर्व सोहळाच असतो. अनेक जण ही परिक्रमा करतात. ती जिथे रत्नसागराला (अरबी समुद्र) मिळते तेथील काही तीर्थांच्या दर्शनाचा लाभ सर्व भक्तांना होणार आहे. दक्षिण किनाऱ्यावरील श्री कोटेश्वर आणि श्री विमलेश्वर यांचं दर्शन झालं. भरुच जवळच्या हांसोट जवळचा हा संपूर्ण परिसर म्हणजे नर्मदा माईचा विशाल त्रिभुज प्रदेशच आहे. याच दोन ठिकाणी ती दक्षिण बाजूने सागर विलीन होते. तेथील दर्शन झाल्यावर एक अपूर्व योग जुळून येतो तो योग असतो, नर्मदा पंचक्रोशी परिक्रमा करण्याचा. ही परिक्रमा सोमवती अमावास्येला हजारो भक्त वर्षानुवर्षे करत आली आहेत! 


येती सोमवती अमावास्या २६ मे २०२५ ला आहे, या दिवशी आपण ही समुद्र पंचक्रोशी नर्मदा परिक्रमा आपल्याकडून करवून घेण्याची प्रार्थना मैय्याला करत आहोत! तरी इच्छूक नर्मदाभक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा!


ह्या परिक्रमेला हिंदीमध्ये 'समुद्र पंचकोशी परिक्रमा' म्हणतात. उत्तरेत विविध तीर्थक्षेत्रांमध्ये पंचकोशी परिक्रमा केल्या जातात. तशी ही समुद्र पंचक्रोशी परिक्रमा! नर्मदा मैय्या सागराला मिळते तेथील उत्तर किनाऱ्यावर ही परिक्रमा केली जाते. पंचक्रोशी म्हणजे पाच कोसांचा परिसर! एक कोस म्हणजे दोन मैल किंवा ३.१२ किलोमीटर. म्हणजेच ही परिक्रमा साधारणपणे १५.०६ किलोमीटर परिसरात होते. येत ढोबळमानाने, ती २० किलोमीटर आहे. ती चालत किंवा वाहनाने करता येते. मी वाहनाने केली. ती जवळपास २५ किलोमीटर होते.


गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील वागरा तालुक्यातील या पंचक्रोशी परिक्रमा मार्गात दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन आल्यामुळे तिथल्या गावांमध्ये एकसंधता आली आहे. या मार्गात मुख्यत्वे पाच गावे आहेत. दहेज, अंभेटा, जागेश्वर, लुवारा आणि लखीगाम ही ती गावे. 


या समुद्र पंचक्रोशी परिक्रमेला 'नवनाथ परिक्रमा' असंही म्हणतात. या मार्गावर महादेवाची नऊ स्थाने असल्याने हे नाव प्रचलित आहे. प्रत्येक स्थान विशिष्ट आहे. त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यांची स्थापना देव आणि ऋषींच्या हस्ते झाली आहे. आजवर तेथे हजारो अनुष्ठाने झाली आहेत. तिथल्या अनेक कहाण्या आहेत. सर्व मंदिरे प्राचीन असल्याचे अनेक पुरावे आहेत. शासनाने रस्ते जोडणी उत्तम केली आहे. शिवाय मंदिर  परिसर कात टाकत आहेत. त्यामुळे यात्रा सुफळ संपूर्ण होते.


*गुढार्थ:* पंचक्रोशी अथवा पंचकोशीचा अर्थ स्थूलातील तीर्थयात्रेचा किंवा अंतराचा नसून ही सूक्ष्मातील पंचकोश यात्रा आहे, ही अध्यात्मिक विकासयात्रा, अंतरातील यात्रा आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश असा साधनामार्ग प्रवास करायचा आहे. या अशा यात्रेतून आम्हाला बाहेरचे भटकणे थांबवून अंतरानंदात स्थिर व्हायचे आहे, हा अनंरानंद प्रवास आहे. याला किती दिवस लागतील ते आपापल्या स्थितीवर, प्रयत्नांवर, साधनेवर आणि भगवत्कृपेवर अवलंबून आहे. या अशा यात्रेतून आमचे संसारमागणे थांबवून कुठेतरी आतला प्रवास सुरू करायचा आहे. ही सिद्धस्थाने आपले भगवद्प्रेम वाढवून पंचकोशीच्या अंतर्प्रवासात मदत करतात.


*समुद्र पंचक्रोशी अथवा नवनाथ यात्रा क्रम:*

*(१) मीठीतलाई गोलकुंड, भीमनाथ*¹ तीर्थ (परशुराम संकल्प स्थान)*


*(२) हरीधाम तीर्थ, जमदग्नी तपोभुमी (मार्कंडेश्वर, शुकेश्वर):* श्री हरि महाराज आश्रम या सुंदर ठिकाणी हे मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी हे शिवलिङ्ग स्थापित केलं आहे. हरि महाराज आश्रमात राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणि पुरातन हवेली प्रमाणे रचना आहे. इथे काही लोक गुजरात मधील विविध ठिकाणांहून नियमित सेवेसाठी येत असतात.


*(३) परशुराम तीर्थ:* या मार्गावरील अति-प्राचीन स्थळ! स्वतः भगवान परशुराम यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. इतक्या शतकांच्या गाळात भर पडून पडून आता जमीन मंदिराच्या शिखराला भिडली आहे. साहजिकच दर्शन घ्यायचं असेल तर खाली उतरून जावं लागतं. मंदिराचं बांधकाम साधं आहे. पुजारी सभामंडपातच राहतात. आलेल्या सर्वांची बडदास्त ठेवतात. नियमित भोजन प्रसाद देतात. आजूबाजूचे रहिवासी सुद्धा खूप सेवाभावी आहेत. या ठिकाणी शेकडो संत महंत साधना करून गेले असल्याने साधकांसाठी ही योग्य अशी जागा आहे.


*(४) लोटणेश्वर, समुद्र व रेवा संगम स्थान, लख्खाबावा (लक्ष्मणगिरी महाराज) समाधी:* या परिक्रमा मार्गावर पांडव येऊन गेल्याचे काही दाखले आहेत. त्यापैकी ही एक जागा आहे. भीमाने तप करून सिद्धी मिळवली ती ही जागा असं काही लोक सांगतात. साक्षात नंदिकेश्वर यांनी हे शिवलिङ्ग स्थापन केलं आहे. त्याचं रक्षण व्हावं म्हणून भीमाने त्यावर लोटा ठेवला होता म्हणून लोटेश्वर असे नाव पडले. काही लोक त्याला लुटणेश्वर देखील म्हणतात. या शिवलिङ्गाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा आकार. नंदिकेश्वरांनी जिथे पाय ठेवला तिथेच हे शिवलिङ्ग तयार झालं. त्यामुळे त्याचा आकार गायीच्या खुरांसारखा आहे. त्यामुळे लोक त्याला 'गाय नी खरी' (खुर) शिवलिङ्ग सुद्धा म्हणतात. हे देखील प्राचीन स्थळ असल्यानं आपल्याला जमिनीत उतरून जावं लागतं.


*श्री लखाबावा दादा मंदिर:* लोटेश्वर महादेव प्रांगणातच येथील प्रसिद्ध सिद्धपुरुष श्री लखाबावा दादा यांचं समाधी स्थळ आहे. नर्मदाभक्त आणि सिद्धी प्राप्त असलेले हे प्राचिनकालीन स्थानिक कोळी समाजातील संत पुरुष आहेत. निपुत्रिक आणि व्यावसायिक अडचणी असलेल्या लोकांना इथे प्रचिती येत असल्याने नवस फेडणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. समाधीवर शिवलिङ्ग स्थापित असून गाभाऱ्याच्या दरवाजावर लखाबावा दादा यांचं 'स्थान' आहे. खूप वेगळी अशी ही जागा आहे. (काही मराठी लोक - विशेषतः काही मराठी युट्युबर परिक्रमावासी, बाबांच्या नावाचा उच्चार लख्खाबाबा करतात पण तो तसा नसून लखाबावा दादा असाच करावा असं स्थानिकांनी आवर्जून सांगितलं!) जवळच लखाबावा दादांच्या गुरूंची समाधी देखील आहे. मंदिर प्रांगण नीटनेटकं आहे. सर्व सोयीसुविधा आहेत. जवळच लखाबावा दादांचे तळे आहे. त्याला साधारणपणे वर्षभर पाणी असतं.


*(५) भूतनाथ*²-कुंडनाथ*³-तुंडनाथ*⁴:* येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश लिङ्ग स्वरूपात स्थापित आहेत.  त्यांची स्थापना महादेवांनी केली आहे. जवळच श्री सिकोतर माता मंदिर आहे. मंदिराजवळ दाट बाभळीचं वन आहे. भीमाने बाण मारून तयार केलेलं बाणेश्वर कुंड आणि शिवलिङ्ग आहे. पुरातन कालीन स्मशान आहे. दाट झाडी असल्याने व आजूबाजूला औद्योगिक क्षेत्र झाल्याने हा जंगल भाग निलगायी, साप, तरस, कोल्हे आणि शेकडो पक्षी यांचा अधिवास झाला आहे. सोबतीला अनेक साप आणि शेकडो मोर आहेत. दानशूर गुजराती समाजाच्या उपक्रमांमुळे सहज अन्न उपलब्ध होत असल्याने अक्षरशः मयूर-वन आहे की काय असं वाटावं इतके मोर इथे आहेत. लोकांसाठी अन्न दान नियमितपणे सुरू असतं. अनेक तंत्र साधक इथे मुक्कामाला असतात अशी माहिती मिळाली. सेवेसाठी वडोदरा (बडोदा) आणि भरुचहून अनेक जण नेहमी येतात. 


*(६) मोक्षतीर्थ अथवा मोखडेश्वर अर्थात मोक्षनाथ*⁵:* हे दिव्य क्षेत्र शक्ती स्थापित असून त्यांस श्री मनकामेश्वर महादेव मंदिर असंही संबोधलं जातं. मुख्य मंदिराचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. प्रांगणात नर्मदा मैय्याचं देखणं मंदिर आहे.


*(७) दुधेश्वर, दुधनाथ*⁶, दाहेजग्राम:* हे शिवलिङ्ग दधिची ऋषींनी स्थापन केलं आहे. दधिची ऋषींची तपोभूमी म्हणून दाधिच गावाचे कालांतरानं 'दहेज' नामाभिधान झालं. मंदिर प्रांगण अतिशय देखणं आहे. गाभाऱ्यात गेल्यावर उज्जैनच्या महाकालेश्वर महादेवाची आठवण यावी, अशी एकंदर रचना आहे. इथे नित्य स्वरूपात विविध अनुष्ठाने होत असल्यानं त्यासाठी एक वेगळा हॉल आणि पुजाऱ्यांची- भाविकांची निवास व्यवस्था चांगली आहे. अंगणात पक्ष्यांच्या राहण्याची सुंदर सोय केलीय.


*(८) नीलकंठेश्वर, दाहेजग्राम:* दहेज गावाच्या दिशेनं निघाल्यावर अगदी मुख्य हमरस्त्यावर दिसणारं हे मंदिर नीलकंठ महादेव स्थापित आहे. सध्या इथेही जीर्णोद्धार जोरात सुरू आहे. हे शिवलिङ्ग बाणलिङ्ग स्वरूप आहे. प्रांगणात बेल, वड आणि पिंपळ वृक्ष आहेत.  निवास आणि पूजन व्यवस्था आहे.


*(९) चंद्रमौलेश्वर, अंबेठाग्राम अर्थात उमियानाथ*⁷:* अंभेटा गावातील श्री कृष्णानंद आश्रमाच्या सात्त्विक आणि देखण्या प्रांगणात हे मंदिर आहे. देवळापासून रेवा संगम जवळ असल्यानं परिक्रमावासियांच्या निवासाची सुंदर व्यवस्था इथे आहे. महादेवाजवळ माता आशापुरा, श्री उमियानाथ, नर्मदा मैय्या आणि कालभैरव मंदिरे आहेत. येथून जवळच एक तलाव आहे.


*(१०) सिगनाथ*⁸, सुवाग्राम*


*(११) जागेश्वर अर्थात जागनाथ*⁹ मीठीतलाई गोलकुंड:* जागेश्वर गावाचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेलं हे जागनाथ महादेव मंदिर आहे. मंदिर प्रांगण खूप मोठं आहे. व्यवस्था उत्तमच आहे. देवळात गणपती, हनुमान, कालिका, सरस्वती, दुर्गा विग्रह आहेत. गावकऱ्यांच्या उपक्रमांसाठी आणि परिक्रमावासियांच्या व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. महंत वृक्षप्रेमी आहेत; त्यामुळे असंख्य फुलझाडं उत्तमरित्या सांभाळली आहेत. वैयक्तिक अनुष्ठाने आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी निवास आहेत.


जागेश्वर जवळच *मिठीतलाई* आहे. याच ठिकाणी परिक्रमावासी रेवा संगम पार करून उत्तर तटावर उतरतात. सध्या गुजरात शासनातर्फे परिक्रमावासियांना तटावर येणं सोपं व्हावं म्हणून विशाल जेट्टी बांधली जात आहे. या जेट्टीजवळ दहेज-घोघा (भावनगर) रो-रो फेरी सर्व्हिस जेट्टी आहे. दक्षिण गुजरात मधून सौराष्ट्रात जाण्याचा जवळचा मार्ग यामुळे उपलब्ध झाला आहे. मिठीतलाई मध्ये मोठा आश्रम असून उत्तम निवास व्यवस्था आहे. नर्मदा मैय्याचं मोठं मंदिर आहे.


*तर अशी नऊ महादेव (नवनाथ*) स्थाने झाली की आपली समुद्र पंचक्रोशी परिक्रमा पूर्ण झाली!* 


सोबत हा यात्राक्रम सुंदर व योग्य अशा पौराणिक माहितीसह दोन भागात देत आहे, जो यात्रा करण्यापूर्व नर्मदाभक्तांनी अवश्य जाणून घ्यावा.


(१) https://youtu.be/tlu-AvHDr8g?si=D91--YQID6tfQeFF


(२) https://youtu.be/Gu69djMP_v4?si=Kzai3594NOxRtdvQ


 

*नमामि देवी नर्मदे!*

श्रीकृष्ण वसंत पुराणिक

Sunday, 29 December 2024

Govt News फॉर सीनिअर सिटिझन

 


पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य...*

 *पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य...*


अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं...

हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो.

ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे.

आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ?

फार थोड्या लोकांना.त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही.


* मग वैशिष्ट्य कशांत आहे...?

पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य किंवा रहस्य यात आहे की यातील तीन मंदिरं, जी एकमेकांपासून काही शे किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत..!


होय.अक्षरशः एका सरळ रेषेत आहेत..!!


]]] ती तीन मंदिर आहेत [[[


श्री कालहस्ती मंदिर

श्री एकंबरेश्वर मंदिर,कांचीपुरम

श्री तिलई नटराज मंदिर,त्रिचनापल्ली


आपण पृथ्वीवर एखादी जागा ठरविण्यासाठी कोआर्डिनेटस चा उपयोग करतो, ज्याला आपण अक्षांश आणि रेखांश म्हणतो. यातील अक्षांश (Lattitude) म्हणजे पृथ्वीवर आडव्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा. जसं विषुववृत्त, कर्कवृत्त वगैरे. आणि रेखांश (Longitude) म्हणजे उभ्या मारलेल्या (काल्पनिक) रेघा.


या तीन मंदिरांचे अक्षांश–रेखांश आहेत


१.श्री कालहस्ती मंदिर 13.76 N 79.41 E वायू


२.श्री एकंबरेश्वर मंदिर 12.50 N 79.41 E पृथ्वी


३.श्री तिलई नटराज मंदिर 11.23 N 79.41 E आकाश


यातील रेखांश हा तिन्ही मंदिरांसाठी 79.41 E आहे. अर्थात तिन्ही मंदिरं एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरांमधील अंतर सव्वाशे किलोमीटर आहे तर एकंबरेश्वर आणि तिलई नटराज मंदिरांमधील अंतर हे पावणे दोनशे किलोमीटर आहे. ही तिन्ही मंदिरं नक्की केंव्हा बांधली, ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या पल्लव, चोल इत्यादी राजांनी ह्या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त, ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल.

आता इथे खरं आश्चर्य हे आहे, की साधारण तीन हजार वर्षांपूर्वी, इतक्या लांबच्या लांब अंतरावरील ही मंदिरं एकाच उभ्या सरळ रेषेत कशी बांधली असतील..?

याचा अर्थ, त्या काळात नकाशाशास्त्र इतकं प्रगत होतं की अक्षांश–रेखांशांच ज्ञान त्यांना होतं ? पण अक्षांश–रेखांशांचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशा शास्त्रा बरोबरच कंटूर मेप चं ज्ञान त्यांना आवश्यक होतंच!

की

इतर कुठली एखादी पध्दत त्या काळात वापरली गेली, जी आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे..?


सारंच अतर्क्य.....!


ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर दोन मंदिरांबरोबर जेंव्हा ह्या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं, तेंव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोण निर्माण होतात.


याचा अर्थ, त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची झेप लक्षात घ्या. जमिनीच्या, काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंच महाभूतांच्या पाच शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात.आणि त्या रचनेतून आपल्याला काही_सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूट भाषा समजू शकत नाही.


या पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली चार, तामिळनाडू मधे आहेत. यातील वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करणारं, श्री कालहस्ती मंदिर, हे आंध्र प्रदेशातल्या चितूर जिल्ह्यांत, तिरुपतीहून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. स्वर्णमुखी या लहानश्या नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारों वर्षांपासून ह्याला ‘दक्षिण कैलास’ किंवा ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते.


हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग पाचव्या शतकात तर बाहेरचा, गोपुरांचा भाग हा अकराव्या शतकात बांधलेला आहे. पल्लव, चोल आणि नंतर विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी आणि बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात. आदी शंकराचार्य ह्या मंदिरात येऊन गेल्याचे उल्लेख अनेक साहित्यात मिळतात. खुद्द शं‍कराचार्यांच्या ‘शिवानंद लहरी’ मधे ह्या मंदिराचा आणि येथील ‘भक्त कणप्पा’ चा उल्लेख आहे.

हे मंदिर पंच महाभूतांपैकी वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करते. याचे काही चित्तवेधक संदर्भ मिळतात/दिसतात.


या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला (हे वायुतत्व असल्यामुळे) कधीही स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारी सुध्दा ह्या मुख्य लिंगाला कधीच स्पर्श करीत नाहीत. अभिषेकासाठी आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे ह्या मंदिराच्या गाभार्‍यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो. हे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. कारण मंदिराचा गाभारा हा लहान असुन त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्य द्वार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं..! कुठलाही वारा नसताना, दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे कां होतं ?

याचं कोणतंही शास्त्रीय कारण आजतागायत मिळू शकलेलं नाही.


मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते, असं येथील लोकांचं म्हणणं आहे!!


या मंदिरापासून साधारण सव्वाशे किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंच महाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे – श्री एकंबरेश्वराचे मंदिर.


तामिळनाडूच्या प्रसिध्द कांचीपुरम मधे हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे.

पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली, पार्वती ने आराधना केली. आणि ती देखील मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची. म्हणूनच ह्याला एकंबरेश्वर म्हणतात. तामिळ मधे एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. कार्बन_डेटिंग ने ह्या झाडाचे वय साडेतीन हजार वर्षे निघाले आहे, असे म्हटले जाते. ह्या झाडाला चार वेदांचे प्रतीक समजले जाते. असं म्हणतात, ह्या झाडाला चार वेगवेगळ्या स्वादाचे आंबे लागतात.


हे मंदिर, ‘कांचीपुरम’ ह्या मंदिरांच्या शहरात आहे. कांचीपुरम हे ‘कांजीवरम’ साड्यांसाठी जगप्रसिध्द आहे.ह्या मंदिरात तामिळ, तेलगु, इंग्रजी आणि हिंदीत एक फलक लावलाय की हे मंदिर ३,५०० वर्ष जुनं आहे. नेमकं किती जुनं हे सांगता येणं कठीण आहे. पुढे पाचव्या शतकात पल्लव, नंतर चोल आणि पुढे विजयनगर च्या राजांनी ह्या मंदिराची डागडुजी केल्याचे उल्लेख आढळतात.


ह्या दोन मंदिरांच्याच अगदी सरळ रेषेत, दक्षिण दिशेत, ह्या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर पंच महाभूतांचे तिसरे मंदिर आहे – तिलई नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर, तामिळनाडू च्या चिदंबरम या शहरात आहे.


खुद्द पतंजली ऋषींनी स्थापन केलेले हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. नेमके केंव्हा बांधले हे सांगणं कठीण आहे. मात्र पाचव्या / सहाव्या शतकात, पल्लव आणि चोल राजांनी याची डागडुजी आणि काही नवीन बांधकाम केल्याचे उल्लेख आढळतात. ह्या मंदिरात ‘भरतनाट्यम’ च्या १०८ विभिन्न मुद्रा दगडी खांबांवर कोरलेल्या आहेत. याचाच अर्थ, अत्यंत विकसित असं भरत नाट्यम हे नृत्य शास्त्र काही हजार वर्षांपूर्वी सुध्दा अस्तित्वात होतं, हे सिध्द होतं..!


मात्र


कोठेही खांबांवर, शंकराच्या अनेक मुद्रा कोरल्या असल्या तरी, नटराज ची मूर्ती किंवा मुद्रा कोरलेली नाही. ती मुख्य गर्भगृहात विराजमान आहे.


येथे भगवान शंकर हे नटराजाच्या रुपात असुन सोबत शिवकामी अर्थात पार्वती ची प्रतिमा ही आहे. मात्र नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे, तिला ‘चिदंबरा रहस्यम’ असे म्हटले जाते. या मोकळ्या जागेला सोन्याच्या चकत्यांच्या हारांनी सजवले जाते. येथील मान्यतेनुसार ही मोकळी जागा, मोकळी नसून ते (आकारहीन) आकाशतत्व आहे.


पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी ही मोकळी जागा लाल पडद्याने आच्छादित असते. पूजेच्या वेळेला हा लाल पडदा बाजूला करून त्या (आकारहीन) शिव तत्वाची अर्थात आकाश तत्वाची पूजा केली जाते.अशी मान्यता आहे की येथे शिव आणि कालीमातेच्या स्वरुपात पार्वती, ह्यांनी नृत्य केले होते.


ह्या चिदंबरम पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर कावेरी नदी समुद्राला जाऊन मिळते. या भागात आठव्या/नवव्या शतकात चोल राजांनी जहाजांसाठी गोदी बांधली होती. ह्या जागेचं नाव आहे – पुम्पुहार. एके काळी हे फार मोठे आणि पूर्व किनाऱ्यावरचे फार प्रसिध्द बंदर होते. आज मात्र ते एक लहानसे गाव राहिले आहे.


या पुम्पुहार मधे काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने उत्खनन केलं आणि त्यांना अक्षरशः खजिना गवसला.


सुमारे दोन/अडीच हजार वर्षांपुर्वीचे एक अत्यंत समृध्द आणि विकसित शहर त्यांना सापडले. या नगराचे नियोजन, त्यातील रस्ते, घरं, नाल्या, पाण्याचा निचरा इत्यादी गोष्टी बघून आजही थक्क व्हायला होतं.


एकुणात काय, तर आजपासून किमान दोन/तीन हजार वर्षांपूर्वी ह्या परिसरात एक अत्यंत समृध्द आणि विकसित अशी संस्कृती नांदत होती, ज्या संस्कृतीने पंचमहाभूतांच्या पाच मंदिरांचा एक मोठा पट, ह्या विशाल जागेत मांडला होता..!


ह्या तीन मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी विशिष्ट कोण करून उभं आहे, पंच महाभूतांपैकी चौथं मंदिर – जंबुकेश्वर मंदिर. त्रिचनापल्ली जवळ, तिरुवनाइकवल गावात हे मंदिर आहे. पंच महाभूतांपैकी जल तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे, कावेरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगाखाली पाण्याचा लहानसा पण खळाळता झरा आहे. त्यामुळे हे शिवलिंग सतत पाण्यात बुडलेले असते.


ब्रिटीश काळात फर्ग्युसन ह्या पुरातत्ववेत्त्याने या मंदिराबाबत बरेच संशोधन केले, जे अनेकांनी प्रमाण मानले. त्याच्या मते चोल वंशाच्या प्रारंभिक काळात या मंदिराचे निर्माण झाले. मात्र त्याची निरीक्षणं_चुकीची_होती हे आता समोर येतंय. मंदिरात आढळलेल्या एका शिलालेखावरून हे मंदिर इसवी सनापूर्वी काही शे वर्ष अस्तित्वात होते हे सिध्द झालेले आहे.


त्या सरळ रेषेत असलेल्या तीन मंदिरांशी विशिष्ट कोण केलेले, पंच महाभूतांच्या मंदिरांपैकी शेवटचे, मंदिर आहे – अरुणाचलेश्वर मंदिर. तामिळनाडू च्या तिरुअन्नामलई मधे असलेलं हे मंदिर, पंच महाभूतांच्या अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. भारतातल्या मोठ्या मंदिरांपैकी हे एक आहे. एका पहाडावर बांधलेले हे मंदिर, विशाल परिसरात पसरलेले आहे. सातशे फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या भिंतींच्या आत बांधलेल्या ह्या मंदिराच्या गोपुरांची उंची १४ मजली इमारती च्या बरोबर आहे.


☆☆☆☆☆

ही पाच शिव मंदिरं आणि त्यांची जमिनीवरची रचना अक्षरशः अद्भुत आहे. यातील तीन मंदिरं एका सरळ रेषेत असणं हा योगायोग असू शकत नाही. अत्यंत विचारपूर्वक, आंध्र आणि तामिळनाडू च्या विस्तीर्ण पटावर बांधलेली ही मंदिरं म्हणजे चमत्कार आहे. त्यांच्या रचनेतून निर्माण होणारी कूट भाषा आपण जर समजू शकलो तर प्राचीन काळातील ज्ञानाची अनेक रहस्यं आपल्यापुढे उलगडू शकतील..!!cp

एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार

 एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार

 

माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकांसाठी,

त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणार

 

मुंबईदि. 28 :- महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून आपल्या गड-किल्ल्यांनी ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा जपला आहे. महाराष्ट्राचा हा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्यासाठी गतीने प्रयत्न करावेत. त्यातून स्थानिक विकासालाही चालना देण्यात यावी, असे निर्देश पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण  विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत  तीनही विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयरमाजी सैनिक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजखनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोकेपर्यटन संचालक डॉ. व्ही.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशीभूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक श्री.कडू,  माजी सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरेमाजी सैनिक कल्याणचे संचालक कर्नल दिपक ढोंगेमेस्कोच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा आदी अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले कीयेणाऱ्या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटन वाढीसाठी  योग्य नियोजन व नवीन नियमावली तयार करुन पर्यटन विभागाची कामे  मार्गी लावण्यात यावीत. प्रचार व प्रसिद्धीसाठी पर्यटन विभागाचे ब्रॅण्डींग करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करावीअशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच

त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

        मुंबई दि. 28 :- महाराष्ट्राला कृषीवीज निर्मितीउद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

            महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे लिस्टिंग करण्याबाबत विचार करावा लागेल. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हाविभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री तथा मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकरमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीकंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आभा शुक्लासंचालक लोकेश चंद्राराधाकृष्णन बी.अनुदीप दिघेस्वतंत्र संचालक विश्वास पाठकनीता केळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

Featured post

Lakshvedhi