एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार
माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकांसाठी,
त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणार
मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून आपल्या गड-किल्ल्यांनी ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा जपला आहे. महाराष्ट्राचा हा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून वृद्धिंगत करण्यासाठी गतीने प्रयत्न करावेत. त्यातून स्थानिक विकासालाही चालना देण्यात यावी, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत तीनही विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर, माजी सैनिक कल्याण विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, पर्यटन संचालक डॉ. व्ही.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक श्री.कडू, माजी सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे, माजी सैनिक कल्याणचे संचालक कर्नल दिपक ढोंगे, मेस्कोच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा आदी अधिकारी उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटन वाढीसाठी योग्य नियोजन व नवीन नियमावली तयार करुन पर्यटन विभागाची कामे मार्गी लावण्यात यावीत. प्रचार व प्रसिद्धीसाठी पर्यटन विभागाचे ब्रॅण्डींग करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
No comments:
Post a Comment