Tuesday, 24 December 2024

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील

 हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई दि.२४ : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना 16 हजार मेगावॅट इतकी वीज देतो. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचे काम दोन वर्षापासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील. शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उंबरठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

0000

*🏵️‼️औषधाशिवाय जीवन‼️🏵️*

 *🏵️‼️औषधाशिवाय जीवन‼️🏵️*

 


 *१.* लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे.

 *२.* ओमचा जप हे औषध आहे.

 *३.* योग प्राणायाम ध्यान आणि व्यायाम हे औषध आहे.

 *4.* सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील औषध आहे.

 *५.* उपवास हे सर्व रोगांवर औषध आहे.

 *६.* सूर्यप्रकाश देखील औषध आहे.

 *७.* मडक्याचे पाणी पिणे हे देखील औषध आहे.

 *८.* टाळ्या वाजवणे हे देखील औषध आहे.

 *९.* अन्न पूर्णपणे चघळणे हे देखील औषध आहे.

 *१०.* अन्नाप्रमाणेच चघळण्याचे पाणी आणि पिण्याचे पाणी हे देखील औषध आहे.

 *११.* अन्न घेतल्यानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे.

 *१२.* आनंदी राहण्याचा निर्णय हे देखील एक औषध आहे.

 *१३.* कधी कधी मौन सुद्धा औषध असते.

 *१४.* हसणे आणि विनोद करणे हे औषध आहे.

 *१५.* समाधान हे देखील औषध आहे.

 *१६.* मनःशांती आणि निरोगी शरीर हे देखील औषध आहे.

 *१७.* प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता हे औषध आहे.

 *18.* निस्वार्थी प्रेम हे देखील एक औषध आहे.

 *१९.* सर्वांचे भले करणे हे देखील औषध आहे.

 *२०.* एखाद्याला आशीर्वाद देणारे कार्य करणे म्हणजे औषध होय.

 *२१.* सर्वांसोबत राहणे हे औषध आहे.

 *२२.* खाणे, पिणे आणि कुटुंबात मिसळणे हे देखील औषध आहे.

 *२३.* तुमचा प्रत्येक खरा आणि चांगला मित्र हे सुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.

 *२४.* आनंदी राहा, व्यस्त रहा, निरोगी राहा आणि मन प्रसन्न ठेवा, हे देखील औषध आहे.

 *२५.* प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घेणे हे देखील औषध आहे.

 *२६.* *आणि शेवटी...* हा संदेश एखाद्याला प्रसाद म्हणून पाठवून चांगलं काम केल्याचा आनंदही एक औषध आहे.

 🪷 निसर्गाची *"महानता"* समजून घेणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील औषध आहे.🌹🌹🙏🙏

 

 *ही सर्व औषधे तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध आहेत.*

तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!* *ते अविचल कधीच नसतं...!*

 *आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!*

*ते अविचल कधीच नसतं...!*


*साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!*


*जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!*

*वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

*चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!*


*जगण्याचा आनंद घ्या...!*

*" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""*


*काचेला " पारा " लावला की,*

*आरसा तयार होतो. पण..* *लोकांना  "आरसा "* *दाखवला की,*

*त्यांचा " पारा " चढतो.*

*"आरसा तोच असतो "*

*फक्त त्यात  " हसत " पाहिले की,*

*आपण  " आनंदी "  दिसतो,* *आणि " रडत " पाहिले की,*

*आपण " दु:खी " दिसतो.*


*तसेच  " जीवन " ही तेच असतं,*

*फक्त त्याच्याकडे आपला*

*पहाण्याचा " दृष्टीकोन " त्याला*

*" आनंदी "  किंवा " दु:खी " बनवतो.*


*" म्हणुन.. "* 

*" दृष्टीकोन " महत्वाचा आहे.*


🙏🌹🌺💐🌸🙏

Monday, 23 December 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला Description: https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर विशेष पुरस्कार

 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला Description: https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर विशेष पुरस्कार

रायपूर, दि. 22 : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण लोकसभेचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार साय व छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर, ब्रॅंडिंग व भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला.

         महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पारितोषिकांबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी जनसंपर्क विभागाचे अभिनंदन केले. छत्तीसगडमधील रायपूरच्या हॉटेल बेबीलॉन इंटरनॅशनलमध्ये आयोजिलेल्या 47 व्या भारतीय जनसंपर्क परिषदेच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी `पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती, डॉ. यू. एस. शर्मा, डॉ. समीर गोस्वामी, रायपूर चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. शाहीद अली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत

 

अहिल्यानगर(जिमाका) दि.22- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत  विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा  मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. 

 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले, काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

 

तत्पूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी त्यांचे स्वागत केले.

 

0000

एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे - राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन शारदाश्रम विद्यामंदिरचा 75 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

  एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे - राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन

शारदाश्रम विद्यामंदिरचा 75 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

 

मुंबई दि.22- मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे, असे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे,                                                                    असा सल्लाही त्यांनी दिला.


          सायन येथील षन्मुखानंद सभागृहात आयोजित या सोहळ्यात सेवानिवृत्त मेजर जनरल नितीन गडकरी, शारदाश्रम विद्यालय शाळा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजन गुप्ते, चेअरमन पी. बी. देसाई, सचिव गजेंद्र शेट्टी यांच्यासह माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.  यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या प्रवासातील ७५ वर्षे हा मोठा टप्पा असतो. शारदाश्रम शाळेने या कालावधीत कौतुकास्पद काम केले आहे. दिलीप प्रभावळकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह या शाळेत शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरीद्वारे शाळेचे नाव उंचावले आहे. या माजी विद्यार्थ्यांचा प्रवास प्रेरणादायी असून शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाप्रमाणे आपल्या अभ्यासात एकाग्रतेची आणि कठोर परिश्रम करण्याची सवय अंगिकारावी, यश नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


          राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे. शिवाजी महाराजांच्या आठवणी सांगून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी अशा व्यक्तींच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवावी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळांमध्ये अवश्य सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री.गडकरी यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना सेवादलाच्या माध्यमातून देशसेवेसाठी पुढे येण्यासाठी प्रेरणा दिली. तर संस्थेचे सचिव श्री. शेट्टी यांनी शारदाश्रमच्या वाटचालीबाबतची माहिती दिली.


          शाळेतील दहावीच्या परीक्षेत तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या अम्ब्रोसिया या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही राज्यपालांनी कौतुक केले.
  

0000

 

 


राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

 दि. 22 डिसेंबर, 2024

                                                                                  वृत्त क्र. 304

राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

 

मुंबई, दि.22 : - राज्य  मंत्रिमंडळांचे खातेवाटप  21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे-

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क. 

 

मंत्री 

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

श्री. राधाकृष्ण विखे - पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण 

श्री. चंद्रकांत(दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य 

श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.

श्री. गणेश नाईक : वने

श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता. 

श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.

श्री.  संजय राठोड : मृद व जलसंधारण.

श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण. 

श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता. 

श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा 

श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार. 

श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन. 

श्री. अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा 

श्री.  अशोक उईके : आदिवासी विकास. 

श्री. शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.

अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य. 

श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास. 

श्री. शिवेंद्रसिंह  भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).

अॅड. माणिकराव कोकाटे : कृषी. 

श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज. 

श्री. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य. 

श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग. 

श्री.  संजय शिरसाट : सामाजिक न्याय. 

श्री. प्रताप सरनाईक : परिवहन 

श्री. भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास. 

श्री. मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.

श्री. नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे. 

श्री. आकाश फुंडकर : कामगार. 

श्री. बाबासाहेब पाटील : सहकार. 

श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. 

 

राज्यमंत्री

अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार, 

श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ. 

डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म. 

श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम). 

श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण. 

श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन. 


Featured post

Lakshvedhi