Friday, 20 December 2024

विधानपरिषदेत सन 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्या मंजूर पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून

 विधानपरिषदेत सन 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्या मंजूर

पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 20 : विविध विभागाच्या 2024-25 या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्यांना विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले कीसंबंधित विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सभागृहातील सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची शहानिशा करुन त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

००००

प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत विधानपरिषदेत निवेदनm

 प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत विधानपरिषदेत निवेदन

 

नागपूरदि. 20 : मुंबई शहराजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.५५ च्या सुमारास घडली. या बोटीतील एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असून अद्याप शोधकार्य सुरू असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

मुंबईतील बोट दुर्घटनेप्रकरणी विधानपरिषदेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे कीनौदलाचे व्हाईस अॅडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसारनौदलाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत 13 जणांना मृत घोषित केले आहे. आतापर्यतच्या माहितीनुसार मृतामध्ये नौदलाचे 3 तर 10 नागरिक आहेत. 3 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एक 4 वर्षाची मुलगी व एक 8 महिन्यांची गरोदर महिला आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. नौदलाचा एक जवान सुध्दा गंभीर असून उपचार घेत आहे.

प्रसंगाचे गांर्भीय लक्षात घेता नौदलकोस्टगार्डमुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचाव कार्यात नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. अजूनही 8 क्राप्ट1 कोस्टगार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरुच आहे.

मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हा क्र. ०२८३ दि. १८.१२.२०२४ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६(१)१२५(a). १२५ (७)२८२३२४(३)३२४ (५) प्रमाणे नोंदविण्यात आलेले आहेत. तसेचअपघाताची इंडलँड व्हेसल ॲक्ट (Inland Vessel Act) मधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांच्या उल्लंघना प्रकरणी सर्वकष चौकशी करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदतमु

 ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

 

नागपूरदि. 20 :- ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना लेखी उत्तर देणार

 नगरविकाससार्वजनिक आरोग्य विभागाच्या

2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर

पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना लेखी उत्तर देणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. २० :- नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या ३ हजार ४६२ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या २ हजार ७७४ कोटी ४३ लाख आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६८७ कोटी ७४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले कीपुरवणी मागण्यांवरील चर्चेत ३४ सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

 

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीपुरवणी मागणीवरील चर्चेत काही सदस्यांनी महानगरपालिका नगरपालिकांच्या अखत्यारीत असलेले प्रश्न उपस्थित केले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात येतील. तसेच नागरिकांच्या दृष्टिकोनातून सदस्यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न सोडविले जातील.

 

या खेरीज सामान्य प्रशासनगृहमहसूल व वनशालेय शिक्षण व क्रीडावित्तजलसंपदाविधी व न्यायग्राम विकासअन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणसामाजिक न्याय व विशेष सहाय्यनियोजनगृहनिर्माणवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्यआदिवासीसहकार पणन व वस्त्रोद्योगउच्च व तंत्रशिक्षणमहिला व बालकल्याण विकासपाणी पुरवठा व स्वच्छताकौशल्यरोजगार,उद्योजकता व नाविन्यतामहाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयपर्यटन व सांस्कृतिक कार्यइतर मागास बहुजन कल्याणमृद व जलसंधारण आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या पुरवणी मागण्याही विधानसभेत मंजूर करण्यात आल्या.

मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामाला गती देऊन जानेवारी 2027 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे अध्यक्ष

 मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामाला गती देऊन

जानेवारी 2027 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

उच्चाधिकार समितीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

 

मुंबईदि. 20 : विधिमंडळ अधिवेशनासह मंत्रालयातील विविध कामांसाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी निवासाची व्यवस्था होण्याकरिता उभारण्यात येत असलेल्या मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाला गती देऊन ते जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दिले.

 

मुंबई येथील मनोरा आमदार निवास प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मनोरा आमदार निवासाच्या बांधकाम आराखड्यात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे हरित पट्टावाहनतळसांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या सुविधांचे ठिकाण आणि क्षेत्र यामध्ये बदल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कामाच्या स्वरुपात झालेला बदल आणि त्याच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली. मनोरा इमारतीच्या बांधकामाचा वेग वाढवून ठरलेल्या वेळेच्या आता सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीतअसे निर्देशही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

 

या बैठकीस विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदेउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्य सचिव सुजाता सौनिकविधानमंडळ सचिव जितेंद्र भोळेमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेलार्सन अँड टुब्रो कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी लार्सन अँड टुब्रो कंपनीतर्फे सादरीकरण करण्यात आले.

------

मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि.20 : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या Madhukranti.In/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्यायावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. सदर अभियानांतर्गत  लघु अभियान 1,2 आणि 3 समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

 

मधुक्रांती पोर्टलमुळे मधुमक्षिका पालकांना मिळणार लाभ

 

मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी केल्यास विविध लाभ मिळणार आहेत. यात मधुमक्षिकापालकाला नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना 1 लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होणार आहे. तसेच विना अडथळा मधुमक्षिका पेटयांचे स्थलांतर करता येणार आहे.

मधुक्रांती पोर्टलवर नोंदणीसाठी आधार कार्ड, अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-200 kb पर्यंत), मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-100 kbपर्यंत) ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

या नोंदणीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. स्वमालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या 10 ते 100 फ्रेमसाठी 250 नोंदणी शुल्क, 101 ते 250 फ्रेम साठी 500 रुपये, 251 ते 500 फ्रेम साठी एक हजार, 501 ते 1 हजार फ्रेम साठी दोन हजार, 1001 ते दोन हजार फ्रेम साठी दहा हजार, 2001 ते 5 हजार फ्रेम साठी 25 हजार, 5001 ते दहा हजार फ्रेम साठी एक लाख तर दहा हजारापेक्षा अधिक फ्रेम साठी दोन लाख नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.

नोंदणीबाबत अधिक माहितीसाठी राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली 011-23325265, 23719025, मधुक्रांती पोर्टल- Tech Support-18001025026, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे- (020)29703228 यावर संपर्क करावा. जास्तीत जास्त मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

0000

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

 

            मुंबई, दि. 20 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण दिले जाते. नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी २० जानेवारी २०२५ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सी.डी.एस.(CDS) प्रशिक्षणाचे क्र. ६४ आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निशुल्क प्रशिक्षणासह, निवास व भोजन उपलब्ध असेल अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

   मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे ६ जानेवारी २०२५ रोजी मुलाखतीस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हजर  रहावे. Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरील सी.डी.एस.-६४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट संपूर्ण माहितीसह आणावी.

  सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.

    अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.  ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi