Thursday, 12 December 2024

ही कविता नसून औषध आहे:* *डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी*

 *नक्की वाचा*


*डॉ. Ratnakar kendre*        

 एम डी मानसोपचारतज्ज्ञ           


 *ही कविता नसून औषध आहे:*

*डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी*


माणूस काय करतो ?


कुढतो जास्त ,

अन रडतो कमी !

म्हणून त्याचं हृदय ,

धडधडत असतं नेहमी !


                बोलणं कमी झाल्यामुळे ,

                   प्रश्न निर्माण झालेत !

                     सारं काही असूनही ,

                    एकलकोंडे  झालेत !


भावनांचा कोंडमारा ,

होऊ देऊ नका !

हसणं आणि रडणं ,

दाबून ठेऊ नका !


                आपल्या माणसांजवळ ,

                    व्यक्त झालं पाहिजे !

                   खरं खरं दुःख सांगून ,

                   मोकळं रडलं पाहिजे !


हसण्याने , रडण्याने ,

दबाव होतो कमी !

भावनांचा निचरा ,

ही Fresh होण्याची हमी !


             कुणाशी तरी बोला म्हणजे ,

                  हलकं हलकं वाटेल !

                 दुःख जरी असलं तरी ,

                   मस्त जगावं वाटेल !


येऊद्यानं कंठ दाटून ,

काय फरक पडतो  ?

आपल्या माणसाजवळच,

गळ्यात पडून रडतो !


            आपली माणसं , आपली माणसं,

              बाजारात मिळत नसतात !

                 नाती-गोती जपून ती ,

               निर्माण करावी लागतात !


भौतिक साधनं जमवू नका ,

आपली माणसं जमवा !

नाहीतर तुम्ही गरीब आहात ,

कितीही संपत्ती कमवा !


                 हाय , हॅलो चे मित्र बाबा ,

                  काही कामाचे नसतात !

                   तुझी पाठ वळली की ,

                     कुत्सितपणे हसतात !


हसण्यासाठी , रडण्यासाठी ,

माणसं जपून ठेव !

नाहीतर मग घरात एखादा ,

" रोबोट "तरी  आणून ठेव !


              रोबोटच्याच गळ्यात पडून ,

                   हसत जा , रडत जा !

                  शांत झोप येण्यासाठी ,

                  दररोज गोळ्या घेत जा !


दुःख उरात दाबून वेड्या ,

झोप येत नसते !

हसत खेळत जगण्यासाठी 

माणसांचीच गरज असते ,


                   इथून पुढे भिशी कर ,

              हसण्याची अन रडण्याची !

               हीच खरी औषधं आहेत ,

            डिप्रेशनच्या बाहेर पडण्याची !!


         ...... कवी .....                

     *डॉ. Ratnakar kendre*       

      एम डी मानसोपचार

🙏 बा

सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र व्दितीय स्थानी सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत या श्रेणींमध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायत अव्वल बेळा ग्रामपंचायत- कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

 सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात 

महाराष्ट्र व्दितीय स्थानी

सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य 

विशेष पंचायत या श्रेणींमध्ये

मान्याचीवाडी ग्रामपंचायत अव्वल

बेळा ग्रामपंचायत- कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, 11 : महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार -2024 मध्ये सहा राष्ट्रीय पुरस्कार  मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. ओडिशा आणि त्रिपुरा राज्याने प्रत्येकी सात पुरस्कारांसह संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर तर बिहार आणि हिमाचल प्रदेश राज्यांनी प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले.

दारिद्र्य निर्मूलनआरोग्यबालकल्याणजलसंधारणस्वच्छतापायाभूत सुविधासामाजिक न्यायप्रशासन आणि महिला सक्षमीकरण या निकषांवर पंचायतींच्या प्रयत्नांना ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

विज्ञान भवनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमातसंयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध श्रेणीतील 45 पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज  करण्यात  आले. या कार्यक्रमासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंहराज्यमंत्री प्रो. एस.पी बघेलसचिव विवेक भारव्दाज यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान केला. यावेळी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करतानाश्रीमती मुर्मू यांनी या पुरस्कारांद्वारे प्रदान करण्यात आलेल्या मान्यतेचा उद्देश इतर पंचायतींना सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास व ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करेलअशी आशाही व्यक्त केली.          

पंचायती राज राष्ट्रीय पुरस्कार विविध श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आले यामध्ये दिनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत एकूण 27 पुरस्कार प्रदान करण्यात आले. या श्रेणीत नाशिक जिल्ह्यातील  मोडाळे ग्रामपंचायतीला स्वच्छ व हरित पंचायत श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला.

सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी या ग्रामपंचायतीला आज दोन श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिली श्रेणी - नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत एकूण नऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात सर्वोत्तम ग्रामपंचायतचा प्रथम पुरस्कार सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला तर याच ग्रामपंचायतीला ग्राम उर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीत अव्वल स्थान प्राप्त झाला व प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.  या श्रेणीत नऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला.

नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीतील सर्वोत्तम ब्लॉक पंचायत या श्रेणीत गोंदिया जिल्ह्यातील तिरोरा या पंचायत समितीला  तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार तिरोरा पंचायत समितीच्या प्रतिनिधींनी स्वीकारला. कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्काराच्या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील  बेळा ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ग्रामपंचायतीच्या  प्रतिनिधींनी स्वीकारला.  तरपंचायत क्षमतानिर्माण  सर्वोत्तम संस्थान या श्रेणीत पुण्याच्या यशदा अकादमीला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  हा पुरस्कार अकादमीचे उप महासंचालक व संचालक मल्‍लिनाथ कलशेट्टी व वरिष्ठ अधिकारी यांनी स्वीकारला.

यावेळी केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांनी विजेत्या पंचायतांना डिजिटल स्वरूपात पुरस्काराची रक्कम हस्तांतरित केली. मोडाळे ग्रामपंचातीला 50 लाखमान्याचीवाडीला 2.5 कोटी (रूपये 1.5 कोटी व रूपये 1.00 कोटी ग्राम ऊर्जा श्रेणीत)तिरोरा पंचायत समितीला 1.5 कोटीबेळा ग्रामपंचायतीला  रूपये 1 कोटी आणि यशदा अकादमीला 50 लाख रुपये प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी 'पुरस्कार प्राप्त पंचायतांचे कार्य: सर्वोत्तम प्रथाया पुस्तिकेचे अनावरण केले. या पुस्तिकेची पहिली प्रत राष्ट्रपतींना सादर करण्यात आली. याशिवायकाही पंचायतांच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित एक माहितीपट देखील सादर करण्यात आला.

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये विविध श्रेणींमध्ये पंचायतींना सन्मानित करण्यात आलेत्यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कारनानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कारग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कारकार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्थान पुरस्कार श्रेणींचा समावेश होता.

००००

Wednesday, 11 December 2024

श्री वेड राही याणा साहित्या अकॅडमी felowship

 



In Kutch, Gujarat, the Patel community has a traditional custom that at the time of marriage, all the young and old people of the family touch the feet of the daughter and ask for forgiveness.

 In Kutch, Gujarat, the Patel community has a traditional custom that at the time of marriage, all the young and old people of the family touch the feet of the daughter and ask for forgiveness.

That if they have made any mistake in upbringing her from birth till now or in saying anything, then please forgive me, blessed be the Hindu Religion.

Very beautiful heart touching program.


प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट

 प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट


 - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन


राजभवन येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम


 


मुंबई, दि. 10 : लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपण या तत्वाचे पालन करित असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे राज्य मानवी हक्क आयोगामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड, आयोगाचे सदस्य एम. ए. सईद, संजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, जमाती, महिला, मुले, तृतीयपंथी आणि दिव्यांग व्यक्तींचे हक्क हे आपल्या मानवाधिकार अजेंड्याच्या अग्रस्थानी राहिले पाहिजेत. प्रत्येक गट समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो आणि त्यांना समानतेचे आणि आदराचे वातावरण मिळणे आवश्यक आहे.


हवामान बदल व अन्य नैसर्गिक घटक हेदेखील शेतकऱ्यांसमोरील आव्हानांचे व्यापक स्वरूप असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन सेवा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगाचे कार्य दुर्बल घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्यात उपयुक्त ठरले असल्याचेही ते म्हणाले.


मानवी हक्क दिनाचा यावर्षीचा ‘आपले हक्क, आपले भविष्य, आत्ता’ हा विषय अत्यंत दूरदृष्टीपूर्ण असून मानवाधिकारांच्या आव्हानांवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी आयोगाचे कौतुक केले. राज्य मानवी आयोग स्थापन झाल्यापासून, अशा असंख्य व्यक्ती आणि गटांसाठी तो आशेचा किरण ठरला असल्याचे सांगून राज्यभरातील व्यक्तींच्या सन्मान आणि हक्कांचे रक्षण करण्याचे राज्य मानवाधिकार आयोगाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.


प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगता येईल अशा संधी निर्माण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, जागतिक हवामान बदलांना सामोरे जाणे याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.


मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयोगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. न्या.तातेड यांनी प्रारंभी आयोगाच्या कार्याची माहिती दिली. तर, न्या. पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या हक्कांचे जतन करतानाच इतरांच्या हक्कांचीही जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.


यावेळी बांधावरील प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर तसेच आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्काबाबत जनजागृती करणारी दालने उभारण्यात आली होती, त्यांची राज्यपाल राधाकृष्णन यांनी पाहणी केली.

भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी

 भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा

इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

            मुंबई, दि. 10 : भारतीय सैनिक सीमेवर अतुलनीय शौर्य गाजवीत असतात. त्यांच्या शौर्याचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवणे आवश्यक असून युवा पिढीला तो प्रेरणादायी असल्याचा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीर चक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांच्या या गौरवाच्या 25व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी कारगिल युद्धाच्या प्रसंगी आपण संसद सदस्य असल्याची प्रधानमंत्री श्री. वाजपेयी यांना भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यावर संपूर्ण विश्वास होता याची आठवण सांगितली. कॅप्टन यादव यांनी ग्रेनेडियर म्हणून बजावलेल्या पराक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. जीवनात शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही. ‘एनसीसी’ पासूनच तरुण वयात शिस्तीचे धडे शिकायला मिळतात. यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील ‘एनसीसी’च्या बळकटीकरणावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कॅप्टन यादव यांनी यावेळी कारगिल युद्धप्रसंगाचा घटनाक्रम सांगून उपस्थितांच्या डोळ्यासमोर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे चित्र उभे केले. कॅप्टन यादव यांच्या लग्नाचा देखील २५ वा वाढदिवस असल्याने राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या पत्नी श्रीमती रीना यादव यांचा यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे ओटी भरून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आश्रयदाता डॉ. अश्विनी भिडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

००००

 

Governor felicitates Param Vir Chakra Captain Yogendra Singh Yadav

 

Mumbai, 10th Dec : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan felicitated Captain Yogendra Singh Yadav, who was awarded the Param Vir Chakra Medal at a young age for his bravery in the Kargil War at Raj Bhavan.

The function was organised by Vinayak Dalvie Charitable Foundation. The Governor praised Captain Yadav on his feat as a grenadier in the Kargil war. President of Foundation Vinayak Dalvie and others were present on this occasion.


बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी

 बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक

कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी

 

मुंबईदि. 10 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाद्वारा वरळी येथे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा अन्वये तसेच बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अन्वयेआयोगाकडे प्राप्त तक्रारीबाबत बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) 35 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.

 

यामध्ये प्रामुख्याने पोक्सो कायद्याअंतर्गत प्राप्त तक्रारींचा समावेश होता. यावेळी मुंबई शहर व उपनगर परिसरातील संबंधित पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारीबाल कल्याण समितीजिल्हा महिला व बाल विकास अधिकारीजिल्हा बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

सुनावणीसाठी असणाऱ्या जवळपास सर्वच प्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोप पत्र दाखल केले होते. याबाबत आयोगाने पोलिसांचे कौतुक केले. ही प्रकरणे सदयस्थितीत न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच बऱ्याच प्रकरणांमध्ये तक्रारदारांनी गैरहेतूने खोट्या तक्रारी दाखल केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून आयोग लवकरच मार्गदर्शक सूचना व शिफारशी जारी करणार आहेतयामुळे कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर वचक  बसेल आणि वेळ वाया जाणार नाही.

 

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन शाहआयोगाचे सदस्य अॅड. श्री. संजय सेंगरअॅड. निलिमा चव्हाणसायली पालखेडकरअॅड. प्रज्ञा खोसरे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली.

 

या सुनावणीमध्ये प्रामुख्याने पोक्सो कायद्याअंतर्गत तक्रार प्रकरणांचा समावेश असल्याने विशेष पोलीस निरीक्षकमहिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागमुंबई या कार्यालयाच्या वतीने पोलीस उपअधीक्षकसारा अभ्यंकर या उपस्थित होत्या.

Featured post

Lakshvedhi