Wednesday, 20 November 2024

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

 मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई 

२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने होईल याकडे मुंबई शहर जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठीमतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव असणार आहे.

मतदार यादीत नाव तपासून घ्या matdar

 मतदार यादीत नाव तपासून घ्या  matdar यादीतील

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे. 

आचारसंहिता भंगाच्या ९,२६५ तक्रारी निकाली ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या ९,२६५ तक्रारी निकाली

६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ९ हजार २९३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार २६५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Tuesday, 19 November 2024

मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्यमु

 मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

मतदानासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल. 

         मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी  मतदार ओळखपत्र सादर करतील.   मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये 

१) आधार कार्ड, 

२) मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, 

३) बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, 

४) कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, 

५) वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), 

६) पॅन कार्ड, 

७) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड 

८) भारतीय पारपत्र (पासपोर्ट) 

९) निवृत्तीवेतनाची दस्तावेज

१०) केंद्र अथवा राज्य शासनतसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र 

११) संसदविधानसभाविधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र

१२) भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

         मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

--

KYC App - उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल

Cvigil ॲप च्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे १०० मिनिटांत निराकरण केले जाते.

मतदार हेल्पलाईन क्रमांक  १९५० 

जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्रमांक  ०२२-२०८२२७८१  

निवडणूक नियंत्रण कक्ष  ७९७७३६३३०४        

0000

राज्यात एकूण 4136 उमेदवार

 राज्यात एकूण 4136 उमेदवार  

राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१  पुरूष, ३६३  महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

 राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

राज्यात 4,69,96,279 महिला मतदार  आहेत. रत्नागिरीनंदुरबारगोंदियाभंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग (PwDVoters) मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची  संख्या 1,16,170 आहे.

मतदार नोंदणीत वाढ; राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार

 मतदार नोंदणीत वाढ;

राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९,  तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.  

Featured post

Lakshvedhi