Monday, 4 November 2024

गोरेगाव येथे वाहनातून सहा लाखांची रक्कम जप्त

 गोरेगाव येथे वाहनातून सहा लाखांची रक्कम जप्त

मुंबईदि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आचारसंहितेच्या भरारी पथक क्रमांक ८ ने १६३- गोरेगाव येथे वाहन तपासणी केली. या तपासणीदरम्यानजैन मंदिराजवळील एस. व्ही. रोडवर एका वाहनामध्ये ६ लाख ११ हजार ८२० रुपये रोख रक्कम सापडली.

आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विहित रकमेपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगल्याबद्दल गोरेगाव पोलिस ठाण्यात रीतसर पंचनामा करून या नोटांच्या तपशीलासह जप्त रक्कम जमा करण्यात आली आहे. यासंदर्भात भरारी पथकातील अधिकारी पुढील कार्यवाही करत आहेत.

चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

 चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

मुंबईदि. 4 : चेंबूर विधानसभा मतदारसंघात मतदारांना प्रलोभन म्हणून साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

३ नोव्हेंबर २०२४ रोजीचेंबूर विधानसभा मतदारसंघातील मनपा वार्ड क्र. १५३घाटला येथील शिवशक्ती रहिवाशी संघाजवळील कर्नाटक शाळेच्या परिसरात निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी मतदारांना भुलवण्याच्या उद्देशाने साड्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली.

संबंधित विधानसभा मतदारसंघातील भरारी पथकाने तात्काळ पाहणी केली. प्राप्त व्हिडिओच्या आधारे भरारी पथकाने गोवंडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसारगोवंडी पोलिस ठाण्यात भगवान बोडके आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली आहे.


वासुदेव बळवंत फडके

 *वासुदेव बळवंत फडके.*


*आज ०४  नोव्हेंबर क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके यांचा जन्मदिन*


हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.


रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.


येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.


*क्रांतीचा पाया*


आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.


१८७० च्या दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारने केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.


*सशस्त्र क्रांती*


इ.स. १८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. २५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ही वेळ नाही असे सांगून त्यांना निराश केले.


फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली.


शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.


या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्‍री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.


*धरपकड, खटला व मृत्यू.*


जुलै २३, इ.स. १८७९ रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना येमेन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.


तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा फेब्रुवारी १७, इ.स. १८८३ रोजी मृत्यू झाला.


*शैक्षणिक कार्य*


वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये इ.स. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.


स्त्रोत: विकिपीडिया.

पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची

जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मंगळवारी रात्री 8.00 वाजता

समाज माध्यमावर रात्री 8.00 वाजता मुलाखतीचे प्रसारण

 

मुंबईदि. 4 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024’ आणि समाज माध्यमांची भूमिका’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या नागरिकांनी लोकशाहीला बाधा निर्माण होणार नाही यासाठी जबाबदारीने हे माध्यम हाताळण्याबाबत या कार्यक्रमात सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी माहिती दिली आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात श्री.शिंत्रे यांची मुलाखत मंगळवार दि. 5 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 रात्री वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर ऐकता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत  निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि समाज माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांवरून नियमांचे उल्लंघन होणार नाही, फेसबुकइन्स्टाग्रामएक्स इत्यादी माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्टतथ्यहीन माहिती पसरणेनिवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत कोणती नियमावली जाहिर करण्यात आली आहेयाबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

००००

 

 

 

राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

 राज्यात ९.७ कोटी मतदार;  

पुण्यात सर्वाधिकपाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक

 

मुंबईदि. ४ : विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरीनंदुरबारगोंदियाभंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे.

पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार

पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत.

पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक

रत्नागिरीनंदुरबारगोंदियाभंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७६ आणि महिला मतदार ६ लाख ९३ हजार ५१० आहेत. नंदुरबारमध्ये एकूण मतदार १३ लाख २१ हजार ६४२ असून यामध्ये १३ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ५४ हजार ४१२ आणि महिला मतदार ६ लाख ६७ हजार २१७ आहेत.

गोंदिया जिल्ह्यात एकूण मतदार ११ लाख २५ हजार १०० असून यामध्ये १० तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ५३ हजार ६८५ आणि महिला मतदार ५ लाख ७१ हजार ४०५ आहेत. भंडारा येथे एकूण मतदार १० लाख १६ हजार ८७० असून यामध्ये ४ तृतीयपंथींची नोंद आहेपुरुष मतदार ५ लाख ६ हजार ९७४ आणि महिला मतदार ५ लाख ९ हजार ८९२ आहेत. सिंधुदुर्गात एकूण मतदार ६ लाख ७८ हजार ९२८ असून यामध्ये ३ तृतीयपंथींची नोंद आहे. पुरुष मतदार ३ लाख ३६ हजार ९९१ आणि महिला मतदार ३ लाख ४१ हजार ९३४ आहेत.

राज्यात ४.६९ कोटी महिला मतदार

राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंद आहे ज्यामध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला आणि ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत.

५ जिल्ह्यात ३० लाखांहून अधिक मतदार

अहमदनगरसोलापूरजळगावकोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. सोलापूरमध्ये ३८ लाख ४८ हजार ८६९, अहमदनगरमध्ये ३७ लाख ८३ हजार ९८७जळगावमध्ये ३६ लाख ७८ हजार ११२कोल्हापूरमध्ये ३३ लाख ५ हजार ९८ आणि औरंगाबादमध्ये ३२ लाख २ हजार ७५१ मतदार आहेत.

बुलढाणाअमरावतीयवतमाळनांदेडरायगडमुंबई शहरबीडसातारासांगली आणि पालघर या १० जिल्ह्यांमध्ये २० लाखांहून अधिक मतदार आहेत.

0000


आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली 253 कोटींची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या 2452 तक्रारी निकाली

253 कोटींची मालमत्ता जप्त

 

            मुंबईदि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी  15 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 2469 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2452 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 

            नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण 253 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

0000

गर्जा जयजयकार क्रांतीचा

 🇮🇳⚜️🇮🇳🔆🌅🔆🇮🇳⚜️🇮🇳


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

            

            ⚜️⚜️🇮🇳⚜️⚜️

          *आद्य क्रांतीकारकाच्या*

                  *जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

       

🌹🇮🇳🌹🔆🇮🇳🔆🌹🇮🇳🌹

     

        *"दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांसाठी दिल्या. हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये ?"*  

        *.... वासुदेव बळवंत फडके*

        *वासुदेव बळवंत फडके या नावाची इंग्रजांना एवढी दहशत होती की त्यांना थेट येमेनच्या एडन येथे तुरुंगात धाडले होते. भारतातील हे सशस्त्र क्रांतीचे आद्य क्रांतीकारक. यांचा आज जन्मदिन.*

        *वासुदेव फडकेंचा जन्म  शिरढोण, जिल्हा रायगड (१८४५-१८८३). कर्नाळा किल्लेदाराचे हे नातू. घोडसवारी.. शस्त्रविद्या यात तरबेज. ते नोकरीसाठी पुण्यात आले. तिथे न्या. रानडे आणि लहुजी वस्ताद यांच्या राष्ट्रवादी विचारांनी खूपच प्रभावित झाले.*

        *सन १८७०. देशात प्रचंड दुष्काळ पडलेला. गोरगरीब आणि गुरेढोरे यांचे दुष्काळात जीव जात होते. पण जुलमी ब्रिटिश सरकारने मदत करणे सोडून शेतसारा वाढवून या दुष्काळात निर्दयपणे वसूली सुरु केली. हे बघून वासुदेव व्यथित झाले. आज आमचे हिन्दुस्थानचे सरकार असते तर असा अन्याय झाला नसता.*

        *मग याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वासुदेव गावोगाव सभातून इंग्रजी सत्तेविरुद्ध जागृती करु लागले. ते इंग्रजी लष्करी खात्यात असल्याने इंग्रजांची प्रवृत्ती ठाऊक होती. त्यांना मरणासन्न आईला भेटण्यासाठीही इंग्रजांनी रजा दिली नाही तेव्हा त्यांनी तडक नोकरी सोडली.*

        *देशातील दुष्काळात.. साथीच्या रोगात सरकारच्या निर्दयतेने हजारो मृत्यू झाले होते. त्याचा प्रतिशोध त्यांनी  घ्यायचे ठरवले. १८५७ चे स्वातंत्र्य समर संपले होते.  तेव्हा सरकार विरुद्ध लढायला सशस्त्र क्रांती हाच पर्याय होता. लोकशाही मार्ग  नव्हताच. मग वासुदेवांनीही हाच पर्याय निवडला.*

        *त्यांनी गावोगाव आदिवासी तरुण जमवले. व्यायामशाळा काढल्या. मिळतील ते साथीदार जमवले. संघर्ष करताना लोकांना मदतीचे आवाहन केले. धनाढ्य सावकार हे सरकारशी जुळवून घेणारे. सुशिक्षित चळवळीपासून अलिप्त राहणारे. पुणे मुंबई कुठूनच मदत मिळेना. अखेर दरोडा.. लुट हा मार्ग साथीदारासह निवडला. लोणी येथे लढ्याचे केंद्र केले. शस्त्र जमवली. एकेका गावातील सावकार आणि सरकारी खजिना लुटणे सुरु केले. गनिमी काव्याने क्रांती युद्ध सुरू केले.*

        *वासुदेवांनी आपली सत्ता सात जिल्ह्यात निर्माण केली. अगदी पुणे शहरावरही काही दिवस त्यांचा अंमल होता. अखेर वासुदेव त्यांना पकडून देणाऱ्यास किंवा ठावठिकाणा कळविणाऱ्यास ब्रिटिशांनी ५० हजाराचे बक्षिस ठेवले. तर याला प्रत्युत्तर देत वासुदेवांनीही मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास तसेच बक्षिस जाहिर केले.*

        *आपल्या सैन्यात रोहिले.. अरब यांना भरती करण्यासाठी ते हैद्राबादला गेले. पण बातमी इंग्रजाना कळली. नंतर विजापूरला गेले असता त्याचीही माहिती मिळवून इंग्रजांनी त्यांना पकडून पुण्यात आणले, त्यांचा खटला लढवायला कुणाची हिंमत होत नव्हती. अखेर गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काकांनी मदत केली. पण फाशी ऐवजी आजीवन जन्मठेप झाली. येमन येथे एडनच्या जेलमध्ये ठेवण्यात आले.*

        *वासुदेव हे बलशाली होते. त्यांनी जेलचे दरवाजे तोडून पळ काढला. पण ते पुन्हा पकडले गेले. यानंतर एकांतवासात काळ्या पाण्याची शिक्षा प्रचंड यातना भोगत अखेर त्यांनी मृत्यूला जवळ केले.* 

        *वासुदेव फडके हे आगळे द्रष्टे क्रांतिकारक. त्यांनी लोकांना दुष्काळात खूप मदत केली. पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी' संस्था सुरू केली. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.*

        *अत्यंत सुशिक्षित.. धार्मिक वृत्तीचे दत्तभक्त.. उपासक होते. त्यांनी 'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूने देशात ब्रिटिश सत्ते विरुद्ध स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला.*

        *अशा या थोर देशभक्त क्रांतीकारक.. भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*


🌹🔆🇮🇳🔆🌻🔆🇮🇳🔆🌹

  

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार*

  *अन् वज्रांचे छातीवरती*

  *घ्या झेलून प्रहार !*


  *श्वासांनो जा वायूसंगे*

  *ओलांडुनी भिंत*

  *अन् आईला कळवा*

  *अमुच्या हृदयातील खंत*

  *सांगा वेडी तुझी मुले*

  *ही या अंधारात*

  *बद्ध करांनी अखेरचा*

  *तुज करिती प्रणिपात*

  *तुझ्या मुक्तीचे एकच होते*

  *वेड परि अनिवार*

  *तयांना वेड परि अनिवार*

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार !*


  *कशास आई, भिजविसी डोळे,*

  *उजळ तुझे भाल*

  *रात्रीच्या गर्भात उद्याचा*

  *असे उषःकाल*

  *सरणावरती आज अमुची*

  *पेटता प्रेते*

  *उठतील त्या ज्वालांतून*

  *क्रांतीचे नेते*

  *लोहदंड तव पायांमधले*

  *खळखळा तुटणार*

  *आई, खळखळा तुटणार*

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार !*


  *आता कर ॐकारा तांडव*

  *गिळावया घास*

  *नाचत गर्जत टाक बळींच्या*

  *गळ्यावरी फास*

  *रक्तमांस लुटण्यास गिधाडे*

  *येऊ देत क्रूर*

  *पहा मोकळे केले आता*

  *त्यासाठी ऊर*

  *शरीरांचा कर या सुखेनैव*

  *या सुखेनैव संहार*

  *मरणा, सुखेनैव संहार*

  *गर्जा जयजयकार क्रांतीचा*

  *गर्जा जयजयकार !*


🌸🇮🇳🌼🇮🇳🌻🇮🇳🌼🇮🇳🌸

  

  *गीत : कुसुमाग्रज*  ✍️

  *संगीत : कानू घोष*

  *स्वर : आकाशवाणी गायकवृंद*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧   

               

            *🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-०४.११.२०२४-*


🌻🇮🇳🌻🔆🇮🇳🔆🌻🇮🇳🌻

Featured post

Lakshvedhi