🇮🇳⚜️🇮🇳🔆🌅🔆🇮🇳⚜️🇮🇳
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
⚜️⚜️🇮🇳⚜️⚜️
*आद्य क्रांतीकारकाच्या*
*जन्मदिनाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌹🇮🇳🌹🔆🇮🇳🔆🌹🇮🇳🌹
*"दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांसाठी दिल्या. हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये ?"*
*.... वासुदेव बळवंत फडके*
*वासुदेव बळवंत फडके या नावाची इंग्रजांना एवढी दहशत होती की त्यांना थेट येमेनच्या एडन येथे तुरुंगात धाडले होते. भारतातील हे सशस्त्र क्रांतीचे आद्य क्रांतीकारक. यांचा आज जन्मदिन.*
*वासुदेव फडकेंचा जन्म शिरढोण, जिल्हा रायगड (१८४५-१८८३). कर्नाळा किल्लेदाराचे हे नातू. घोडसवारी.. शस्त्रविद्या यात तरबेज. ते नोकरीसाठी पुण्यात आले. तिथे न्या. रानडे आणि लहुजी वस्ताद यांच्या राष्ट्रवादी विचारांनी खूपच प्रभावित झाले.*
*सन १८७०. देशात प्रचंड दुष्काळ पडलेला. गोरगरीब आणि गुरेढोरे यांचे दुष्काळात जीव जात होते. पण जुलमी ब्रिटिश सरकारने मदत करणे सोडून शेतसारा वाढवून या दुष्काळात निर्दयपणे वसूली सुरु केली. हे बघून वासुदेव व्यथित झाले. आज आमचे हिन्दुस्थानचे सरकार असते तर असा अन्याय झाला नसता.*
*मग याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वासुदेव गावोगाव सभातून इंग्रजी सत्तेविरुद्ध जागृती करु लागले. ते इंग्रजी लष्करी खात्यात असल्याने इंग्रजांची प्रवृत्ती ठाऊक होती. त्यांना मरणासन्न आईला भेटण्यासाठीही इंग्रजांनी रजा दिली नाही तेव्हा त्यांनी तडक नोकरी सोडली.*
*देशातील दुष्काळात.. साथीच्या रोगात सरकारच्या निर्दयतेने हजारो मृत्यू झाले होते. त्याचा प्रतिशोध त्यांनी घ्यायचे ठरवले. १८५७ चे स्वातंत्र्य समर संपले होते. तेव्हा सरकार विरुद्ध लढायला सशस्त्र क्रांती हाच पर्याय होता. लोकशाही मार्ग नव्हताच. मग वासुदेवांनीही हाच पर्याय निवडला.*
*त्यांनी गावोगाव आदिवासी तरुण जमवले. व्यायामशाळा काढल्या. मिळतील ते साथीदार जमवले. संघर्ष करताना लोकांना मदतीचे आवाहन केले. धनाढ्य सावकार हे सरकारशी जुळवून घेणारे. सुशिक्षित चळवळीपासून अलिप्त राहणारे. पुणे मुंबई कुठूनच मदत मिळेना. अखेर दरोडा.. लुट हा मार्ग साथीदारासह निवडला. लोणी येथे लढ्याचे केंद्र केले. शस्त्र जमवली. एकेका गावातील सावकार आणि सरकारी खजिना लुटणे सुरु केले. गनिमी काव्याने क्रांती युद्ध सुरू केले.*
*वासुदेवांनी आपली सत्ता सात जिल्ह्यात निर्माण केली. अगदी पुणे शहरावरही काही दिवस त्यांचा अंमल होता. अखेर वासुदेव त्यांना पकडून देणाऱ्यास किंवा ठावठिकाणा कळविणाऱ्यास ब्रिटिशांनी ५० हजाराचे बक्षिस ठेवले. तर याला प्रत्युत्तर देत वासुदेवांनीही मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास तसेच बक्षिस जाहिर केले.*
*आपल्या सैन्यात रोहिले.. अरब यांना भरती करण्यासाठी ते हैद्राबादला गेले. पण बातमी इंग्रजाना कळली. नंतर विजापूरला गेले असता त्याचीही माहिती मिळवून इंग्रजांनी त्यांना पकडून पुण्यात आणले, त्यांचा खटला लढवायला कुणाची हिंमत होत नव्हती. अखेर गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काकांनी मदत केली. पण फाशी ऐवजी आजीवन जन्मठेप झाली. येमन येथे एडनच्या जेलमध्ये ठेवण्यात आले.*
*वासुदेव हे बलशाली होते. त्यांनी जेलचे दरवाजे तोडून पळ काढला. पण ते पुन्हा पकडले गेले. यानंतर एकांतवासात काळ्या पाण्याची शिक्षा प्रचंड यातना भोगत अखेर त्यांनी मृत्यूला जवळ केले.*
*वासुदेव फडके हे आगळे द्रष्टे क्रांतिकारक. त्यांनी लोकांना दुष्काळात खूप मदत केली. पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. इ.स. १८७३ मध्ये त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी' संस्था सुरू केली. १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.*
*अत्यंत सुशिक्षित.. धार्मिक वृत्तीचे दत्तभक्त.. उपासक होते. त्यांनी 'दत्तमहात्म्य' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूने देशात ब्रिटिश सत्ते विरुद्ध स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला.*
*अशा या थोर देशभक्त क्रांतीकारक.. भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन.*
🌹🔆🇮🇳🔆🌻🔆🇮🇳🔆🌹
*गर्जा जयजयकार क्रांतीचा*
*गर्जा जयजयकार*
*अन् वज्रांचे छातीवरती*
*घ्या झेलून प्रहार !*
*श्वासांनो जा वायूसंगे*
*ओलांडुनी भिंत*
*अन् आईला कळवा*
*अमुच्या हृदयातील खंत*
*सांगा वेडी तुझी मुले*
*ही या अंधारात*
*बद्ध करांनी अखेरचा*
*तुज करिती प्रणिपात*
*तुझ्या मुक्तीचे एकच होते*
*वेड परि अनिवार*
*तयांना वेड परि अनिवार*
*गर्जा जयजयकार क्रांतीचा*
*गर्जा जयजयकार !*
*कशास आई, भिजविसी डोळे,*
*उजळ तुझे भाल*
*रात्रीच्या गर्भात उद्याचा*
*असे उषःकाल*
*सरणावरती आज अमुची*
*पेटता प्रेते*
*उठतील त्या ज्वालांतून*
*क्रांतीचे नेते*
*लोहदंड तव पायांमधले*
*खळखळा तुटणार*
*आई, खळखळा तुटणार*
*गर्जा जयजयकार क्रांतीचा*
*गर्जा जयजयकार !*
*आता कर ॐकारा तांडव*
*गिळावया घास*
*नाचत गर्जत टाक बळींच्या*
*गळ्यावरी फास*
*रक्तमांस लुटण्यास गिधाडे*
*येऊ देत क्रूर*
*पहा मोकळे केले आता*
*त्यासाठी ऊर*
*शरीरांचा कर या सुखेनैव*
*या सुखेनैव संहार*
*मरणा, सुखेनैव संहार*
*गर्जा जयजयकार क्रांतीचा*
*गर्जा जयजयकार !*
🌸🇮🇳🌼🇮🇳🌻🇮🇳🌼🇮🇳🌸
*गीत : कुसुमाग्रज* ✍️
*संगीत : कानू घोष*
*स्वर : आकाशवाणी गायकवृंद*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-०४.११.२०२४-*
🌻🇮🇳🌻🔆🇮🇳🔆🌻🇮🇳🌻
No comments:
Post a Comment