Tuesday, 29 October 2024

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ३२५९ उमेदवारांचे ४४२६ नामनिर्देशन पत्र दाखल

 २८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ३२५९ उमेदवारांचे

४४२६ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबईदि. २८ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.  नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

Monday, 28 October 2024

बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

 बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

 

मुंबईदि. २८ : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखातर्फे आयोजित बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सन २०२४- २०२५ या वर्षात निबंधस्पर्धेसाठी विकसित भारत- 'सन २०४७',(Viksit Bharat-India in 2047उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण (Public Policy for the Marginalized)आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग(Use of Artificial Intelligence in Government) या विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावयाचा आहे. निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावानिबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मकसंशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नयेनिबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून)टोपणनावपत्तासंपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपयेदुसरे बक्षिस ७ हजार ५०० रुपयेतिसरे बक्षीस ५ हजार रुपये, उत्तेजनार्थ बक्षिस दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी)टोपणनावपत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर 'बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा२०२४-२०२५असे नमूद करावे. हा लिफाफा 'मानद अध्यक्षभारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र विभागीय शाखातळ मजलाबँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मादम कामा मार्गमंत्रालय, मुंबई- ४०००३२या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: js.mrb-iipa@gov.in द्वारे संपर्क साधावा.

0000

राजू धोत्रे/विसंअ


उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 54 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त मुख

 उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत

54 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त

 

मुंबईदि. 28 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रा वळण रस्तायेथे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर आणि सहकार नगरलिंक रोडचेंबूरमुंबई या ठिकाणी परराज्यात निर्मित असलेला भांग मिश्रीत पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर 26 ऑक्टोंबर रोजी कारवाई केली.

यामध्ये चेंबूर येथील कारवाईत 5 व मुंब्रा येथील कारवाईमध्ये 2 अशा एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण 54 लाख 48 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालापैकी चेंबूर येथे 35 लाख 73 हजार 400 व मुंब्रा येथे 18 लाख 75 हजार 200 रूपयांचा समावेश आहे.

या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या साहित्यामध्ये 3 टेम्पो वाहने, 2232 किलो भांग मिश्रीत पदार्थपरराज्यातील भारतीय बनावटीचे 120 बॉक्स विदेशी मद्य आदींचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे,  कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. मुंब्रा येथील कारवाई ठाणे अधिक्षक प्रवीण तांबेउपअधीक्षक श्री. वैद्यश्री. पोकळेए. डी देशमुखयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. चेंबूर येथील गुन्ह्यामध्ये दुय्यम निरीक्षक विशाल सकपाळरिंकेश दांगटहनुमंत यादवसहा. दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकरजवान केतन वझेभाऊसाहेब कराडहनुमंत गाढवेविजय पाटीलनारायण जानकरश्रीराम राठोडअमित सानपकुणाल तडवी यांनी कारवाई केली. तसेच मुंब्रा येथील कारवाईमध्ये निरीक्षक एम.पी धनशेट्टीदुय्यम निरीक्षक एन. आर. महालेदुय्यम निरीक्षक एस. आर मिसाळ,सहायक दुय्यम निरीक्षक बी. जी थोरातजवान श्री. खेमनरआर. एस पाटीलपी. ए महाजनपी. एस नागरेएम. जी शेखश्रीमती एस.एस. यादव यांनी सहभाग घेतलाअसे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

००००

धनत्रयोदशी, दीपावलीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

 धनत्रयोदशीदीपावलीनिमित्त 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

 

 मुंबई, दि. 28 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला धनत्रयोदशी तसेच दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

वसुबारसधनत्रयोदशी पासून सुरु होत असलेला दीपावलीचा सण सर्वांच्या जीवनात आनंदसमृद्धी व सुख-शांती घेवून येवो ! दीपावलीनिमित्त सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो व शुभेच्छा देतोअसे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

 

Maharashtra Governor extends 

Diwali greetings to people

 

Mumbai Dated 28 : The Governor of Maharashtra C P Radhakrishnan has conveyed his greetings to the people of Maharashtra on the occasion of Diwali.  In a message to the people, the Governor has said:

“May the festival of Deepawali, which commences from Vasu Baras and DhanTeras bring happiness, prosperity and peace to one and all. I congratulate the people and extend my warmest greetings to all on the auspicious occasion of Diwali.”

0000

 

Sunday, 27 October 2024

*मतदान ओळ्खपत्राशिवाय १२ प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य*

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ 

*मतदान ओळ्खपत्राशिवाय १२ प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य

 

धाराशिव दि २७ ( माध्यम कक्ष): भारत निवडणूक आयोगाने मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र दिले आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र मतदानाच्या वेळी सादर करू शकत नाही,अशा मतदारांना मतदानाच्या वेळी त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त पुढील १२ प्रकारचे कागदपत्रे मतदानाच्या वेळी ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार आहे.यामध्ये आधार कार्डमनरेगाचे रोजगार पत्रक,बँक/पोस्ट ऑफिसने दिलेले छायाचित्रासह पासबुक,कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,वाहन चालक परवानापॅन कार्ड,रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड,भारतीय पासपोर्टफोटोसह पेन्शन दस्तऐवज,केंद्रराज्य सरकार/सार्वजनिक उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्रखासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय  सशक्तिकरण मंत्रालयाने दिलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ४ विधानसभा मतदारसंघासाठी *चार निवडणूक निरीक्षकांची नेमणूक*

 जिल्ह्यात  विधानसभा मतदारसंघासाठी

*चार निवडणूक निरीक्षकांची नेमणूक

 

धाराशिव दि.२७माध्यम कक्ष): भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी चार निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहेयामध्ये २४० - उमरगा आणि २४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्यम्हणून श्री.पंकज कुमार (९७१११ २९०४४आणि २४२ - उस्मानाबाद आणि २४३ - परंडा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्यश्रीगोपाल चांद (९४१८० ६५९००यांची तर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्चम्हणून श्री.अलूरू व्यंकट राव (८९८५९ ७२३६१यांची आणि निवडणूक निरीक्षक (पोलीसश्री.आर.एसबेलवंशी (९४२५१ ५८८५२ (६३६३३१२५८४यांची नेमणूक केली आहे.

निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक*

 *निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक*

 

धाराशिव दि.२७ (माध्यम कक्ष):  भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक उमेदवारांचे निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहेउमेदवाराला हे बँक खाते त्याच्या नावे किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधी यांच्या संयुक्त नावाने उघडता येते.सहकारी बँक तसेच कोणत्याही बँकेत किवा पोस्ट ऑफीसमध्येही खाते उघडता येते

 

उमेदवारांने निवडणुक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधीत बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहेनिवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातुन उमेदवाराने आपला निवडणुक खर्च धनादेश/धनाकर्ष/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे.

 

उमेदवारांना बँक खाती उघडल्यास तत्पर सेवा मिळावी  निवडणुक काळात संबंधीत खात्यातुन प्राधान्याने पैसे काढण्यास आणि पैसे जमा करण्याच्या उद्देशाने समर्पित काऊंटर (Dedicated Counter) उघडणेबाबत सर्व बँकांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी निर्देश दिले आहे.

 

 

 

 

Featured post

Lakshvedhi