जिल्ह्यात ४ विधानसभा मतदारसंघासाठी
*चार निवडणूक निरीक्षकांची नेमणूक*
धाराशिव दि.२७( माध्यम कक्ष): भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी चार निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. यामध्ये २४० - उमरगा आणि २४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून श्री.पंकज कुमार (९७१११ २९०४४) आणि २४२ - उस्मानाबाद आणि २४३ - परंडा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. गोपाल चांद (९४१८० ६५९००) यांची तर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून श्री.अलूरू व्यंकट राव (८९८५९ ७२३६१) यांची आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री.आर.एस. बेलवंशी (९४२५१ ५८८५२) व (६३६३३१२५८४) यांची नेमणूक केली आहे.
No comments:
Post a Comment