Saturday, 26 October 2024

आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 232 शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ 1 शॅडो मतदान केंद्र

 आगामी विधानसभा निवडणूकांसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र

रत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक 232 शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ 1 शॅडो मतदान केंद्र

मुंबईदि२६आगामी विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेतरत्नागिरी जिल्हयात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे.

राज्यात एकूण २४ जिल्हयांमध्ये शॅडो मतदान केंद्र असतील१२ जिल्हयांमध्ये शॅडो मतदान केंद्र नसतीलया शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेतयामध्ये विशेष मेसेंजरवॉकी-टॉकीव्हीएचएफवायरलेस सेंटरवायरलेस कम्युनिकेशन सेवासॅटेलाईट फोनवने आणि पोलीस विभागाचा रनर या शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतीलयाशिवाय बीएसएनएलमार्फत पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल.

विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हानिहाय शॅडो मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे :

.क्र

जिल्हयाचे नाव

शॅडो मतदान केंद्राची संख्या

अहमदनगर

२२

अमरावती

७३

औरंगाबाद

०९

बीड

२२

भंडारा

०२

बुलढाणा

०७

चंद्रपूर

४१

धुळे

१६

गडचिरोली

४९

१०

गोंदिया

३३

११

जळगाव

१६

१२

कोल्हापूर

१७

१३

नागपूर

०४

१४

नांदेड

१२

१५

नंदूरबार

६९

१६

नाशिक

१०२

१७

पुणे

३८

१८

रायगड

४६

१९

रत्नागिरी

२३२

२०

सांगली

०१

२१

सातारा

३१

२२

सिंधुदुर्ग

६०

२३

वर्धा

०२

२४

यवतमाळ

११

एकूण

९१५

0000

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक

 विधानसभा निवडणूक २०२४-*

*मुंबई उपनगर जिल्हा*  

 विधानसभा निवडणूक २०२४-*

*मुंबई उपनगर जिल्हा*  

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक

जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई दि 26: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींनी अथवा उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम  प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  2024 अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडउपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळसमिती सदस्य निवडणूक निर्णय अधिकारीसहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीसमाजमाध्यम तज्ञ प्रा अभिजित पाटीलमाहिती व प्रसारण मंत्रालयातील अधिकारी वैशाली त्रिवेदीस्वतंत्र पत्रकार/माध्यम तज्ञ राजेंद्र हुंजे पंकज दळवीमनिषा रेगेप्रसाद कुलकर्णीतसेच  सदस्य सचिव तथा माध्यम समन्वयक केशव करंदीकर  उपस्थित होते.      

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व 26 विधानसभा मतदारसंघांसाठी कार्यरत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) कार्यरत आहे.

पेड न्यूजवरही 'एमसीएमसी'ची करडी नजर

जाहिरात प्रमाणीकरणाबरोबरच पेड न्यूजला आळा घालण्यासाठी माध्यमप्रमाणीकरण व  संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

पेड न्यूजवरही 'एमसीएमसी'ची करडी नजर असून पेड न्यूज आढळल्यास व समितीव्दारे ती पेडन्यूजअसल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांस नोटीस बजावण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले. 

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण

समितीची परवानगी आवश्यक

सर्व राजकीय पक्षउमेदवारव्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती

जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्याकेबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारणचित्रपटगृहेरेडिओखाजगी एफएमसार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य माध्यमा‌द्वारे (Audio- Video Display) होणारे प्रसारणई-वृत्तपत्रांमधील जाहिरातींचे प्रकाशनबल्क एसएमएस (SMS)  / व्हॉईस मॅसेजेस यांचा समावेश होतो.

मुद्रीत माध्यमांनी मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरिता पूर्व परवानगी घेणे आवश्यक

मुद्रीत माध्यमांमध्ये (Print Media Paper) मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरिता देखील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

जिल्हा आणि राज्यस्तरावर समिती

जाहिरातीचे पूर्वप्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील समितीकडे समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जारी करावयाच्या जाहिरातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे. तसेच राज्यस्तरीय समितीकडे सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षसंस्था यांनी जाहिरात पूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज करावयाचा आहे. या समितीकडून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण केले जाते. जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती यांनी मान्यता दिल्याशिवाय राजकीय पक्ष / उमेदवारांनी राजकीय जाहिरातीचे प्रसारण करू नये.

००००

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती p

आर्थिक बाबी, खर्चावर असणार करडी नजर केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांकडून कामकाजाचा आढावा

आर्थिक बाबी, खर्चावर असणार करडी नजर

केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांकडून कामकाजाचा आढावा

मुंबईदि.25 : विधानसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षामार्फत करडी नजर ठेवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी सौरभकुमार शर्मानागेंद्र यादवमीतू अग्रवालविनोद कुमारराजेशकुमार मीना व चंचल मीना हे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक दाखल झाले असून ते मतदारसंघनिहाय आर्थिक बाबी आणि खर्चविषयक कामकाजाचा आढावा घेत आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिका-यांची खर्च संनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्माअतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनीअतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगरजिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडउपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ, पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक

जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणालेउमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर करडी नजर असणार आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहित नमुन्यात ठेवणेउमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक राहणार असल्याचेही श्री क्षीरसागर यांनी सांगितले.  

विविध यंत्रणांकडून तपासणी

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापरमद्याचा मोफत पुरवठाभेटवस्तूंचे वाटपकिंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नयेयासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्सराज्य उत्पादन शुल्ककेंद्रीय वस्तू आणि सेवा करराज्य वस्तू आणि सेवा करव्यावसायिक करअमली पदार्थ नियंत्रण दलसीमा सुरक्षा दलसशस्त्र सीमा दलपोलीस दल केंद्रीयऔद्योगिक सुरक्षा दलभारतीय किनारा दलरेल्वे संरक्षण दलपोस्ट विभागवन विभागनागरी उडुयन विभागविमानतळ प्राधिकरणराज्य नागरी विमान वाहतूक विभागराज्य परिवहन विभागयांच्यासह  फिरते पथक ( एफएसटी ) स्टॅटिक सर्विलन्स टीम ( एसएसटी ) कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीत निवडणूक खर्चासंदर्भात घ्यावयाची खबरदारी याबद्दलची माहिती देण्यात आली.

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे *१२९२ नामनिर्देशन पत्र दाखल

 २८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे

*१२९२ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबईदि. २५ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून आजपर्यंत ९९१ उमेदवारांचे १२९२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेतअशी माहितीमुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.  नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

 निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

मुंबईदि. २५ : भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

         भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजेपासून ते २० नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणेकोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे.

      त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल) अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेलअसेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे

आयरलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद

 आयरलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद

मुंबईदि. 25 : आयरलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया काटेकोरपणेनियोजनबद्धरित्या पार पाडत आहे. राज्यातील एकूण मतदारमतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधामतदार जनजागृती आदींची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिली.

यावेळी आयरलॅंड निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीमती मॅरी बेकरमुख्य कार्यकारी अधिकारी ऑर्ट ओलॅरीमहावाणिज्यदूत श्रीमती अनिता केलीआयरलँड दूतावासाचे अरमान श्रीवास्तवराज्याच्या निवडणूक विभागाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णीअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीपसहमुख्य निवडणूक अधिकारी डॉ.विजय राठोड तसेच उपसचिव के.सूर्यकृष्णमुर्ती  यावेळी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भारत निवडणूक आणि राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात. राज्याची लोकसंख्याविधानसभा मतदार संघएकूण मतदान केंद्र,  निवडणूक प्रक्रियाईव्हीएमव्हीव्हीपॅट यंत्रबॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्थाराजकीय पक्ष आणि आचारसंहितामतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रमआधुनिक तंत्रज्ञानाचा निवडणूक प्रक्रियेत उपयोग  करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावीयासाठी आयरलँडच्या शिष्टमंडळांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.

0000

Friday, 25 October 2024

मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

 मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

-         जिल्हाधिकारी संजय यादव

       मुंबईदि. २५ : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईलअशी माहिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी ही माहिती दिली. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र आहे, असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी  मतदार ओळखपत्र सादर करतील.

         मतदार ओळखपत्र नसेल अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्डमनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्रबँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबूकामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्डवाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)पॅन कार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्डभारतीय पारपत्र (पासपोर्ट)निवृत्तीवेतनाची दस्तावेजकेंद्र अथवा राज्य शासनतसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,

संसदविधानसभाविधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्रभारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

     मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

००००

Featured post

Lakshvedhi