Saturday, 26 October 2024

आयरलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद

 आयरलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद

 

मुंबईदि. 25 : आयरलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली.  यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया काटेकोरपणेनियोजनबद्धरित्या पार पाडत आहे. राज्यातील एकूण मतदारमतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधामतदार जनजागृती आदींची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिली.

यावेळी आयरलॅंड निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीमती मॅरी बेकरमुख्य कार्यकारी अधिकारी ऑर्ट ओलॅरीमहावाणिज्यदूत श्रीमती अनिता केलीआयरलँड दूतावासाचे अरमान श्रीवास्तवराज्याच्या निवडणूक विभागाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णीअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीपसहमुख्य निवडणूक अधिकारी डॉ.विजय राठोड तसेच उपसचिव के.सूर्यकृष्णमुर्ती  यावेळी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भारत निवडणूक आणि राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात. राज्याची लोकसंख्याविधानसभा मतदार संघएकूण मतदान केंद्र,  निवडणूक प्रक्रियाईव्हीएमव्हीव्हीपॅट यंत्रबॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्थाराजकीय पक्ष आणि आचारसंहितामतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रमआधुनिक तंत्रज्ञानाचा निवडणूक प्रक्रियेत उपयोग  करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावीयासाठी आयरलँडच्या शिष्टमंडळांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi