Friday, 25 October 2024

मतदान यंत्राची ( ईव्हीएम ) कार्यप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्था

 मतदान यंत्राची ( ईव्हीएम ) कार्यप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्था

 

मतदान प्रक्रिया पारदर्शकतेनेनियमानुसार  पार पाडण्यासाठी  निवडणूक आयोगामार्फत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येतेयामध्ये  मतदानाची नोंद करणारे मतदान यंत्रत्याची निगराणी आणि सुव्यवस्थितपणा  या बाबी विशेषत्वाने महत्वाच्या ठरतातयादृष्टीने  ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने आवश्यक ती  विशेष काळजी  निवडणूक यंत्रणेकडून घेतली जाते.                                                  

                        विधानसभा निवडणकीत वापरण्यात येणार एकूण 1,37,118 व्हीव्हीपॅट

महाराष्ट्र  विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट   EVM-VVPAT चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 2,26,624 बॅलेट युनिट  ( Bus), 1,26,911 सीयु (CUs) आणि 1,37,118 व्हीव्हीपॅट (VVPAT)  यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी  (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना त्याबाबत अवगत करुन तपासणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात कळवण्यात आले. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी, या हेतूने मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगामार्फत जनजागृती कार्यक्रम दि. 10 सप्टेंबर 2024 ते दि.9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. यामध्ये  सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे, याची जनतेला माहिती देण्यात आली. या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला.             

ईव्हीएमची निर्मिती आणि रचना

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (संरक्षण मंत्रालयातंर्गत सार्वजनिक उपक्रमआणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( संरक्षण विभागांतर्गत सार्वजनिक उपक्रम ) यांनी  इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएमआणि व्हीव्हीपॅटची निर्मिती केली आहे

इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएममध्ये दोन युनिट्स असतातएक कंट्रोल युनिट (सीयु)आणि दुसरे बॅलेट युनिट(बीयु). एक बॅलेट युनिट सोळा उमेदवारांसाठी वापरता येतेदृष्टीहीन मतदारांसाठी बॅलेट युनिट्सच्या उजव्या बाजूला मतदाराचे मत या बटणाशेजारी 1 ते 16 अंक ब्रेललिपीत कोरलेले असतात.

व्होटर व्हेरिफायबेल पेपर ऑडिट ट्रेल(व्हीव्हीपॅटव्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल ही इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला संलग्न पण स्वतत्र अशी प्रणाली आहेयामुळे मतदारांना त्यांचे मत त्यांनी दिले त्यानुसारच नोंदले गेले आहे हे पडताळता येते.

                 ईव्हीएमची सरमिसळ ( Randomization ) प्रक्रिया

 निवडणूकीत वापरल्या जाणा-या सर्व मतदान यंत्रांची म्हणजे  ईव्हीएम  यंत्राची  सरमिसळ प्रक्रिया दोन वेळा करण्यात येतेभारत निवडणूक आयोगाद्वारे विकसित केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यस्थापन प्रणालीचा (ईएमएसवापर करुनइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र  व्हीव्हीपीएटी यांचे सरमिसळ ( यादृच्छिकीकरण ) करण्यात येतेयाची पहिली फेरी राष्ट्रीय  राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उपस्थितीत करण्यात येतेविधानसभा मतदारसंघनिहायप्रभाग  क्षेत्र निहाय इेल्क्ट्रॉनिक  मतदान यंत्र  व्हीव्हीपीएटीचे वाटप करण्यासाठी ही प्रक्रिया केली जातेविधानसभेच्या निवडणूकीसाठी या  सरमिसळ  प्रक्रियेची  पहिली फेरी राज्यातील सर्व जिल्हयात पूर्ण करण्यात आली आहे.

प्रथम यादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादी (विधानसभा मतदारसंघनिहाय/  विधानसभा प्रभाग क्षेत्रनिहाय)  राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात येते.  निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतरयादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे  व व्हीव्हीपीएटी यांची यादी (विधानसभा मतदारसंघनिहायविधानसभा प्रभागक्षेत्रनिहायनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना  देखील देण्यात येते.   इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांचे दुसरे यादृच्छिकीकरणइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी सुरू करण्यापूर्वीनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीतमतदान केंद्रनिहाय वाटप करण्यासाठी आणि यंत्रे राखीव ठेवण्यासाठी करण्यात येते.  दुसरे यादृच्छिकीकरण  झालेली  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादीनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना देण्यात येते.

        इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी कार्यान्वित करणे (commissioning)

मतदानात वापरण्यासाठीची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटीनिवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे कार्यान्वित करण्यात येतातकार्यान्वित करण्याच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटीचा सुरक्षित कक्षध्वनिचित्रमुद्रणाखाली (व्हिडिओग्राफीउमेदवारांच्या/त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येतोप्रत्येक व्हीव्हीपीए मध्ये चिन्हांकन भरण युनिटद्वारे (सिम्बॉल लोडींग युनिटद्वारे) (एसएलयुचिन्हांचा अंतर्भाव करण्यात येईलव्हीव्हीपीएटीमध्ये अंतर्भूत केलेली चिन्हेउमेदवारांना/त्यांच्या प्रतिनिधींना मॉनिटर/टीव्हीपडद्यावर पहाता यावीतयासाठी एकाचवेळी प्रदर्शित करण्यात येतीलप्रत्येक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपीएटी मतदानासाठी वापरताना त्यांचीनोटासह सर्व उमेदवारांना एकेक मत देऊन तपासणी केल्या जाते.  त्याबरोबरचयादृच्छिकपणे निवडलेल्या पाच टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचे एक हजार मतांचे उच्चस्तरीय अभिरुप मतदान केले जाते ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा इलेक्ट्रॉनिक निकाल व्हीव्हीपीएटीच्या चिठ्ठ्यांच्या संख्येशी  मिळता जुळता आहे ना हे पाहिले जाते.  उमेदवारांना त्यांच्या प्रतिनीधींनाहीपाच टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी यंत्रे यादृच्छिकपणे निवडण्यास आणि अभिरूप मतदानात मतदान करण्यास परवानी देण्यात येतेईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मोहोरबंद करण्यासाठी वापरावयाच्या मोहोरांवर स्वाक्षरी करण्यास उमेदवार/त्यांच्या प्रतिनिधींना परवानगी देण्यात येतेईव्हीएम-व्हीव्हीपीएटी कार्यान्वित केल्यानंतरउमेदवार त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुहेरी कुलुप वापरून ईव्हीएमव्हीव्हीपीएटी सुरक्षित कक्षात ठेवण्यात येते.

मतदान संचलन पथकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्रांचे वाटपाच्या दिवशी  सुरक्षित कक्ष उमेदवारांच्यात्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हीडीओ चित्रणातर्गत उघडण्यात येतोत्यांच्या उपस्थितीत यंत्र वितरीत करण्यात येतात.

                                मतदानाच्या  दिवशी ईव्हीएम कार्यान्वितता 

 मतदानाच्या दिवशीप्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या वेळेपासून ९० मिनिटे अगोदरनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी  नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्येक मतदान केंद्रात किमान ५० मतांचे अभिरूप मतदान (नोटासहप्रत्येक उमेदवाराला किमान एक मत देऊनघेण्यात येईलअभिरूप मतदानाचा इलेक्ट्रिॉनिक निकाल  व्हीव्हीपीएटी  चिठ्यांच्या  संख्येशी  मिळता-जुळता आहे  हे पडताळून  बघण्यात  येईल.

 नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाच्या सर्व माहितीसाठा नष्ट करण्यात येईल आणि अभिरूप मतदानातील व्हीव्हीपीएटी  चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यामध्ये ठेवण्यात येईल आणि तो गुलाबी कागदी मोहरेने मोहोरबंद करण्यात  येईलमतदान केंद्राध्यक्ष तशा आशयाचे अभिरुप मतदान  प्रमाणपत्र  तयार करील.  प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीनियंत्रण युनिट हे हिरवी कागदी मोहोरविशेष खूणचिठ्ठी आणि निर्देश खूणचिठ्ठी यांच्याद्वारे मोहोरबंद करण्यात येईलव्हीव्हीपीएटी ड्रॉप बॉक्ससुद्धा (मतदान कक्षपत्ता खुणचिठ्ठीने  मोहोरबंद करण्यात येईल.  मतदान समाप्त झाल्यावरमतदान केंद्राध्यक्ष मतदान समाप्त करण्यासाठी नियंत्रण युनिटचे" CLOSE " बटन दाबेलईव्हीएम व्हीव्हीपीएटी त्या त्या वहन पेट्यांमध्ये ठेवण्यात येतीलआणि ते निर्देश खूणचिठ्ठीने मोहोरबंद करण्यात येतीलईव्हीएम आणि व्हीव्हीपीए‌टी मोहोरबंद करण्यासाठी वापरलेल्या मोहोरांवर (मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी आणि मतदान समाप्तीच्या वेळीस्वाक्षरी करण्याची मतदान प्रतिनिधींना परवानगी देण्यात येईल.

मतदान यंत्राची ( ईव्हीएम ) कार्यप्रणाली आणि सुरक्षा व्यवस्था

 

मतदान प्रक्रिया पारदर्शकतेने, नियमानुसार पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येते. यामध्ये मतदानाची नोंद करणारे मतदान यंत्र, त्याची निगराणी आणि सुव्यवस्थितपणा या बाबी विशेषत्वाने महत्वाच्या ठरतात. यादृष्टीने ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने आवश्यक ती विशेष काळजी निवडणूक यंत्रणेकडून घेतली जाते.                                                  

                        विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार एकूण 1,37,118 व्हीव्हीपॅट

महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट EVM-VVPAT चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 2,26,624 बॅलेट युनिट ( Bus), 1,26,911 सीयु (CUs) आणि 1,37,118 व्हीव्हीपॅट (VVPAT) यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना त्याबाबत अवगत करुन तपासणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात कळवण्यात आले. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी, या हेतूने मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगामार्फत जनजागृती कार्यक्रम दि. 10 सप्टेंबर 2024 ते दि.9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे, याची जनतेला माहिती देण्यात आली. या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला.             

ईव्हीएमची निर्मिती आणि रचना

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (संरक्षण मंत्रालयातंर्गत सार्वजनिक उपक्रम) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( संरक्षण विभागांतर्गत सार्वजनिक उपक्रम ) यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटची निर्मिती केली आहे. 

इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन (ईव्हीएम) मध्ये दोन युनिट्स असतात. एक कंट्रोल युनिट (सीयु)आणि दुसरे बॅलेट युनिट(बीयु). एक बॅलेट युनिट सोळा उमेदवारांसाठी वापरता येते. दृष्टीहीन मतदारांसाठी बॅलेट युनिट्सच्या उजव्या बाजूला मतदाराचे मत या बटणाशेजारी 1 ते 16 अंक ब्रेललिपीत कोरलेले असतात.

व्होटर व्हेरिफायबेल पेपर ऑडिट ट्रेल(व्हीव्हीपॅट) व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल ही इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला संलग्न पण स्वतंत्र अशी प्रणाली आहे. यामुळे मतदारांना त्यांचे मत त्यांनी दिले त्यानुसारच नोंदले गेले आहे हे पडताळता येते.

                 ईव्हीएमची सरमिसळ ( Randomization ) प्रक्रिया

 निवडणूकीत वापरल्या जाणा-या सर्व मतदान यंत्रांची म्हणजे ईव्हीएम यंत्राची सरमिसळ प्रक्रिया दोन वेळा करण्यात येते. भारत निवडणूक आयोगाद्वारे विकसित केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यस्थापन प्रणालीचा (ईएमएस) वापर करुन, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपीएटी यांचे सरमिसळ ( यादृच्छिकीकरण ) करण्यात येते. याची पहिली फेरी राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उपस्थितीत करण्यात येते. विधानसभा मतदारसंघनिहाय/ प्रभाग क्षेत्र निहाय इेल्क्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपीएटीचे वाटप करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. विधानसभेच्या निवडणूकीसाठी या सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी राज्यातील सर्व जिल्ह्यात पूर्ण करण्यात आली आहे.

प्रथम यादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादी (विधानसभा मतदारसंघनिहाय/ विधानसभा प्रभाग क्षेत्रनिहाय) राष्ट्रीय व राज्य मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात येते. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर, यादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादी (विधानसभा मतदारसंघनिहाय/ विधानसभा प्रभागक्षेत्रनिहाय) निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना देखील देण्यात येते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांचे दुसरे यादृच्छिकीकरण, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी सुरू करण्यापूर्वी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत, मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यासाठी आणि यंत्रे राखीव ठेवण्यासाठी करण्यात येते. दुसरे यादृच्छिकीकरण झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी यांची यादी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना देण्यात येते.

        इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी कार्यान्वित करणे (commissioning)

मतदानात वापरण्यासाठीची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत जिल्हा कर्मचाऱ्यांद्वारे कार्यान्वित करण्यात येतात. कार्यान्वित करण्याच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व व्हीव्हीपीएटीचा सुरक्षित कक्ष, ध्वनिचित्रमुद्रणाखाली (व्हिडिओग्राफी) उमेदवारांच्या/त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येतो. प्रत्येक व्हीव्हीपीए मध्ये चिन्हांकन भरण युनिटद्वारे (सिम्बॉल लोडींग युनिटद्वारे) (एसएलयु) चिन्हांचा अंतर्भाव करण्यात येईल. व्हीव्हीपीएटीमध्ये अंतर्भूत केलेली चिन्हे, उमेदवारांना/त्यांच्या प्रतिनिधींना मॉनिटर/टी. व्ही. पडद्यावर पहाता यावीत, यासाठी एकाचवेळी प्रदर्शित करण्यात येतील. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपीएटी मतदानासाठी वापरताना त्यांची, नोटासह सर्व उमेदवारांना एकेक मत देऊन तपासणी केल्या जाते. त्याबरोबरच, यादृच्छिकपणे निवडलेल्या पाच टक्के इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचे एक हजार मतांचे उच्चस्तरीय अभिरुप मतदान केले जाते ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा इलेक्ट्रॉनिक निकाल व्हीव्हीपीएटीच्या चिठ्ठ्यांच्या संख्येशी मिळता जुळता आहे ना हे पाहिले जाते. उमेदवारांना त्यांच्या प्रतिनीधींनाही, पाच टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी यंत्रे यादृच्छिकपणे निवडण्यास आणि अभिरूप मतदानात मतदान करण्यास परवानी देण्यात येते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मोहोरबंद करण्यासाठी वापरावयाच्या मोहोरांवर स्वाक्षरी करण्यास उमेदवार/त्यांच्या प्रतिनिधींना परवानगी देण्यात येते. ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी कार्यान्वित केल्यानंतर, उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुहेरी कुलुप वापरून ईव्हीएम- व्हीव्हीपीएटी सुरक्षित कक्षात ठेवण्यात येते.

मतदान संचलन पथकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्रांचे वाटपाच्या दिवशी सुरक्षित कक्ष उमेदवारांच्या/ त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हीडीओ चित्रणांतर्गत उघडण्यात येतो. त्यांच्या उपस्थितीत यंत्र वितरीत करण्यात येतात.

                                मतदानाच्या दिवशी ईव्हीएम कार्यान्वितता 

 मतदानाच्या दिवशी, प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याच्या वेळेपासून ९० मिनिटे अगोदर, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रत्येक मतदान केंद्रात किमान ५० मतांचे अभिरूप मतदान (नोटासह, प्रत्येक उमेदवाराला किमान एक मत देऊन) घेण्यात येईल. अभिरूप मतदानाचा इलेक्ट्रिॉनिक निकाल व्हीव्हीपीएटी चिठ्यांच्या संख्येशी मिळता-जुळता आहे हे पडताळून बघण्यात येईल.

 नियंत्रण युनिटमधील अभिरूप मतदानाच्या सर्व माहितीसाठा नष्ट करण्यात येईल आणि अभिरूप मतदानातील व्हीव्हीपीएटी चिठ्ठ्या काळ्या लिफाफ्यामध्ये ठेवण्यात येईल आणि तो गुलाबी कागदी मोहरेने मोहोरबंद करण्यात येईल. मतदान केंद्राध्यक्ष तशा आशयाचे अभिरुप मतदान प्रमाणपत्र तयार करील. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी, नियंत्रण युनिट हे हिरवी कागदी मोहोर, विशेष खूणचिठ्ठी आणि निर्देश खूणचिठ्ठी यांच्याद्वारे मोहोरबंद करण्यात येईल. व्हीव्हीपीएटी ड्रॉप बॉक्ससुद्धा (मतदान कक्ष) पत्ता खुणचिठ्ठीने मोहोरबंद करण्यात येईल. मतदान समाप्त झाल्यावर, मतदान केंद्राध्यक्ष मतदान समाप्त करण्यासाठी नियंत्रण युनिटचे" CLOSE " बटन दाबेल. ईव्हीएम / व्हीव्हीपीएटी त्या त्या वहन पेट्यांमध्ये ठेवण्यात येतील, आणि ते निर्देश खूणचिठ्ठीने मोहोरबंद करण्यात येतील. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीए‌टी मोहोरबंद करण्यासाठी वापरलेल्या मोहोरांवर (मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी आणि मतदान समाप्तीच्या वेळी) स्वाक्षरी करण्याची मतदान प्रतिनिधींना परवानगी देण्यात येईल.


दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत

 

मुंबईदि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आणि समाजमाध्यमांची भूमिकाया विषयावर सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

 राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ही निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी काटेकोरपणे नियोजन देखील करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि ही सर्व माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात समाज माध्यमांवरून कुठेही नियमांचे उल्लघंन होणार नाही तसेच फेसबुकइन्स्टाग्रामएक्स इत्यादी समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्टतथ्यहीन माहिती पसरवणेनिवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत कोणती नियमावली जाहिर करण्यात आली आहे, याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

'दिलखुलासकार्यक्रमात श्री. शिंत्रे यांची मुलाखत सोमवार दि. 28, मंगळवार दि. 29, बुधवार दि. 30 आणि गुरूवार दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

भ्रष्टाचार रोखण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

 भ्रष्टाचार रोखण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर

‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन

 

मुंबईदि. 25 : भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृती  उपक्रम राबविले जातात. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे.  केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार 28 ऑक्टोंबर  ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरीता यावर्षी सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सप्ताहाचा प्रारंभ येत्या 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने होणार आहे.

 कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतानाभ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागबृहन्मुंबई विभाग91सर पोचखानवाला मार्गवरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064दूरध्वनी क्रमांक 022-24921212अथवा संकेतस्थळ acbmaharashtra.gov.inईमेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai @mahapolice.inफेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.netट्विटर - @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावाअसे  आवाहन संदीप दिवाणअपर पोलीस आयुक्तलाचलुचपत प्रतिबंधक विभागमुंबई यांनी केले आहे.

००००

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ आज १२ उमेदवारांनी केले नामांकन अर्ज दाखल ६० व्यक्तींनी केली ११२ अर्जाची खरेदी




  

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४

 

आज १२ उमेदवारांनी केले नामांकन अर्ज दाखल

 

६० व्यक्तींनी केली ११२ अर्जाची खरेदी

 

धाराशिव दि.२५ (जिमाकाविधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज २५ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज सादर करण्याच्या चवथ्या दिवशी जिल्ह्यातील  विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवारांनी १२ नामांकन अर्ज दाखल केले.तर ६० निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ११२ नामांकन अर्ज खरेदी केले.

आज  २४० - उमरगा विधानसभा मतदारसंघात ११ अर्जदारांनी १८ नामांकन अर्ज खरेदी केले.तर कोणत्याही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही.२४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात  उमेदवारांनी  नामांकन अर्ज दाखल केलेयामध्ये अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे,अमर शेख  योगेश केदार यांचा समावेश आहे.तर २० अर्जदारांनी ३१ अर्ज खरेदी केले.

२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात राहुल माकोडे (अपक्ष), आनंद पाटील (अपक्ष),पांडुरंग कुंभार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),लहू खुणे (बहुजन समाज पार्टी व्यंकट गुंड (शिवसेनायांनी आज नामांकन अर्ज भरले तर २० अर्जदारांनी ३१ नामांकन अर्जाची खरेदी केली.

२४३ -परंडा विधानसभा मतदारसंघात  अपक्ष उमेदवारांनी आणि राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटयांनी अर्ज दाखल केला.तर  अर्जदारांनी १३ अर्जाची खरेदी केली

 मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य

-         जिल्हाधिकारी संजय यादव

 

       मुंबईदि. २५ : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईलअशी माहिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी ही माहिती दिली. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र आहे, असे मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटविण्यासाठी  मतदार ओळखपत्र सादर करतील.

         मतदार ओळखपत्र नसेल अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्डमनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्रबँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबूकामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्डवाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)पॅन कार्डराष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्डभारतीय पारपत्र (पासपोर्ट)निवृत्तीवेतनाची दस्तावेजकेंद्र अथवा राज्य शासनतसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमपब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,

संसदविधानसभाविधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्रभारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र असे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

     मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेवून जाणे आवश्यक आहे.

००००


Featured post

Lakshvedhi