विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४
आज १२ उमेदवारांनी केले नामांकन अर्ज दाखल
६० व्यक्तींनी केली ११२ अर्जाची खरेदी
धाराशिव दि.२५ (जिमाका) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज २५ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज सादर करण्याच्या चवथ्या दिवशी जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवारांनी १२ नामांकन अर्ज दाखल केले.तर ६० निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ११२ नामांकन अर्ज खरेदी केले.
आज २४० - उमरगा विधानसभा मतदारसंघात ११ अर्जदारांनी १८ नामांकन अर्ज खरेदी केले.तर कोणत्याही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही.२४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ३ नामांकन अर्ज दाखल केले. यामध्ये अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे,अमर शेख व योगेश केदार यांचा समावेश आहे.तर २० अर्जदारांनी ३१ अर्ज खरेदी केले.
२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात राहुल माकोडे (अपक्ष), आनंद पाटील (अपक्ष),पांडुरंग कुंभार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),लहू खुणे (बहुजन समाज पार्टी) व व्यंकट गुंड (शिवसेना) यांनी आज नामांकन अर्ज भरले तर २० अर्जदारांनी ३१ नामांकन अर्जाची खरेदी केली.
२४३ -परंडा विधानसभा मतदारसंघात ३ अपक्ष उमेदवारांनी आणि राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) यांनी अर्ज दाखल केला.तर ९ अर्जदारांनी १३ अर्जाची खरेदी केली
No comments:
Post a Comment