Wednesday, 16 October 2024

विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) - २०२४ दि. 25 जुन 2024 ते 30 ऑगस्ट 2024

 विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) - २०२४ दि. 25 जुन 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या कार्यक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत. विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) - 2024 अंतर्गत स्वीप उपक्रम :- या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभागअशासकीय संस्थाविद्यापीठेमहाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.

परिशिष्ठ 1

 दि.15.10.2024 रोजीच्या मतदार यादीतील विविध मतदारांची संख्या

अ.क्र.

 

तपशील

 

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार

 

दि.30 ऑगस्ट2024

रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील

मतदार

दि.15.10.2024 रोजीच्या अद्यावत मतदारांची संख्या

 

1

पुरुष

4,67,37,841

4,93,33,996

4,97,40,302

2

महिला

4,27,05,777

4,60,34,362

4,66,23,077

3

तृतीयपंथी

2,593

5,944

6,031

 

एकूण

8,94,46,211

9,53,74,302

9,63,69,410

अ.क्र.

 

मतदारांचा प्रवर्ग

 

संख्या

 

1.

दिव्यांग

6,36,278

2.

सेनादलातील मतदार

1,16,355

3.

18-19 वर्ष वयोगट

20,93,206

4.

85+ वर्षावरील जेष्ठ नागरीक

1950 क्रमांकाची हेल्पलाईन

 1950 क्रमांकाची हेल्पलाईन

            राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात येईल.

मतदारांसाठी उपयुक्त संगणक प्रणाली (IT Application):-

 मतदारांसाठी उपयुक्त  संगणक प्रणाली  (IT Application):-

 यंदाच्या निवडणूकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने विकसीत केलेली संगणक प्रणाली पुढील प्रमाणे आहे.

सी व्हिजील (Vigil) :- आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हीजील (Vigil) हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

        सक्षम (App) :- पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणेमतदान केंद्राचा शोध घेणेव्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लीकेशन (IT Application) उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

केवायसी (Know Your Candidate) App :- मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशीलउमेदवाराची माहितीइ. माहिती पाहता येऊ शकते.

इएसएमएस (ESMS App/Portalनिवडणूक अधिक मुक्त व निःपक्ष वातावरणात व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसादारुअंमली पदार्थ व भेटवस्तूमौल्यवान धातूइ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहेत. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी इएसएमएस (ESMS App/ Portal) वरुन कळविण्यात येत आहे.

मतदारांसाठी सुविधा

 मतदारांसाठी सुविधा

दिव्यांग मतदार (PwDs) :- भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने सक्षम" हे अॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम 2024 (दुसरा) च्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबीरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 6 लाख 36 हजार 278 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेव्दारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

            ही सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. दि.30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्यापपर्यंत 69 लाख 23 हजार 199 इतकी वाढ झाली आहे.

येथे कर माझे जुळती

 *"काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे,*. 

 *(मेजर जनरल विजय जगताप)*


त्याचे असे झाले,

२००२ सालातील हि गोष्ट आहे, आज त्या घटनेला बावीस वर्षे होऊन गेली. 

माझी मुंबईत नियुक्ती झाली होती आणि एक दिवस माझ्या हातात माझी खास नेमणूक झाल्याची ‘ऑर्डर’ पडली.

मी उघडून वाचली मात्र, मी आश्चर्याने थक्क आणि आनंदाने वेडा झालो. 


त्यामध्ये लिहिले होते, कि,

‘मला भारताच्या सर्वोच्च अशा महान फील्ड मार्शल माणेकशॉ यांच्या मुंबई भेटी दरम्यान सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.’


माझ्या वरिष्ठांनी किती मोठा विश्वास टाकला आहे, ह्या कल्पनेनेच भारावून गेलो होतो. पण थोड्या वेळातच मला माझ्यावरील जबाबदारीची जाणीव झाली आणि मी भानावर आलो! 


मी फिल्डमार्शल माणेकशा यांच्या कार्यालयात दूरध्वनी करून त्यांच्या पुढील कार्यक्रमांची माहिती घेतली.

लवकरच ते मुंबईमध्ये येणार होते. पारशी कुटुंबीयांनी त्यांचा सत्कार कार्यक्रम योजला होता.

त्या दोन दिवसांच्या त्यांच्या दौर्यामध्ये महान अशा सॅम बहादूर सरांना सतत दोन दिवस कारमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एस्कॉर्ट करणे हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभव होता. अगदी एक स्वप्न प्रत्यक्षात येणार होते.    

त्या काळात त्याचा करिष्मा जबरदस्त होता. एखाद्या चुम्बकासारखे त्यांचे व्यक्तिमत्व हे आकर्षक होते.


माझ्यासाठी त्यांचा ओझरता सहवास ह्या पूर्वी झाला होता, त्यांच्याशी संवाद WWII, 1971 पासून माझ्या राजपुताना रायफल्सच्या शौर्यापर्यंत, गोरखा सैन्यापर्यंत होता.


आता मुंबईमध्ये मी त्यांच्या आगमनाची वाट बघत होतो, आणि तो दिवस उजाडला. 

मुंबई विमानतळावर ते उतरले आणि मी त्यांना एक जोरदार सलाम ठोकून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली.


त्यांच्या बरोबर गाडीमध्ये बसणे हा देखील एक विलक्षण अनुभव होता. 

माझे लक्ष सतत सर्वत्र होतेच, एक हात खिशातील होल्स्टर मधील पिस्तुलावर होता. 


पारशी समुदायाकडून एनसीपीए नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात भारताचे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ उपस्थित राहणार होते. 


आम्ही तिथे पोहोचलो. बाहेरील आवारात गर्दी होतीच, मी त्या गर्दीतून वाट काढत त्यांना सभागृहात घेऊन गेलो. आतमध्ये देखील मोठा जमाव जमला होता आणि जोरजोरात जल्लोष आणि पारशी गाणी गायली जात होती. अगोदरच स्टेजवर कोणीतरी निवेदन करत होते. 


आम्ही आत शिरताच त्या निवेदकाने थांबून सॅमच्या आगमनाची घोषणा केली.

 

संपूर्ण सभागृह क्षणभर शांत झाले आणि नंतर टाळ्यांच्या कडकडाटात सर्व श्रोते उभे राहिले, ‘सॅम सॅम’ असा जयघोष करत सभागृह डोक्यावर घेतले.


सर्व एका सुरामध्ये पारशी स्वागत गाणे म्हणू लागले. 

त्यांना मध्यभागी असलेल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आले. 


लोक त्याच्याभोवती गर्दी करू लागले, त्यांना ओझरता का होईना पण स्पर्श करू लागले, 

त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी झटपटू लागले, 

काही जण त्याच्याशी अत्यंत आदराने आणि प्रेमाने बोलू लागले. त्यामध्ये भारतातील अत्यंत महान अशी पारशी घराणी होती. 


माझ्यावरील जबादारीची जाणीव सतत मला होतीच.

मी, माझ्या कर्तव्यानुसार सर्वांना दूर हलवण्याचा प्रयत्न करत होतो.


सर्वाना विनंती करून बाजूला करून त्याच्याभोवती जागा बनवण्याचा प्रयत्न करत होतो.


तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. 

खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता. 


मी या व्यक्तीला नम्रपणे हलण्यास सांगितले. पण त्या व्यक्तीने तितक्याच विनयाने हलण्यास नकार दिला, 

जमिनीवर बसलेल्या अवस्थेमध्येच त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, 

"*काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ*". 


त्याचे डोळे करुणा, आदर आणि प्रेम आणि आत्मविश्वासाने भरलेले होते.

त्यांची नजर हि माझ्या अंगावरील गणवेशाचा देखील सन्मान करणारी होती.

आणि

मी देखील त्या व्यक्तिमत्वाकडे बघून भारावून गेलो होतो,

पटकन मी थोडा मागे झालो, म्हणालो ‘होय सर.’ 


समोर खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये नजर टाकली. समोर प्रेक्षकांच्या रांगांमध्ये खुर्च्यांवर गोदरेज, वाडीया, पूनावाला, भाभा, मिस्त्री अशी एकसे एक महान कुटुंबीय मंडळी बसली होती.


माझ्या लक्षात आले कि, ‘हा मेळावा कोणाचा आहे, कोणता समुदाय आहे. आपले राष्ट्र महान होण्यासाठी ह्या समाजाने काय योगदान दिले आहे. अल्पसंख्याकांमधील पुन्हा अल्पसंख्याक, सूक्ष्मातील अतिसूक्ष्म, परंतु व्यवसायापासून ते सशस्त्र दलापर्यंत, सामाजिक संस्था पासून ते वैज्ञानिकांपर्यंत, सर्वच क्षेत्रात भारताला बलवान करण्यात ह्यां समाजाचे अमूल्य योगदान आहे!’. आरक्षण नसताना आणि सरकारकडून कोणतीही अपेक्षा नसतानाही या लोकांनी भारतासाठी इतकं काही केलं, त्याला तोड नाही!


आणि आणि, ह्या सर्व पारशी समुदायाचे मेरुमणी असणारे टाटा कुटुंबीय कुठे आहे?

त्यांचा कुटुंब प्रमुख कुठे आहे? माझी नजर हुडकत होती,  

होय, त्याच वेळी माझ्या डोक्यातील ट्यूब क्षणार्धात पेटली,  माझे डोळे भरून आले!  माझी मान पुढे वाकली, माझे दोन्ही पाय जुळले, पाठीचा कणा ताठ झाला, छाती पुढे झाली, 

मी मनातूनच काडकन सलाम केला!


भारताचे सर्वोच्च सेनाधिकारी फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या समोर एक गुडघा टेकून खाली बसलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ते तर साक्षात रतन टाटा होते!

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती.


होय, तेच होते महान रतन  टाटा !


त्यांच्या नजरेत भारताच्या सर्वोच्च सेनाधिकारी असणाऱ्या ‘सॅम’ प्रती असणारा आदर भरून ओसंडून वाहत होता.


एका उद्योगाच्या बादशहा ने भारतीय सैन्याच्या बादशाहाला दिलेला तो आदर युक्त सन्मान होता! एक मानवंदना होती.


माझा आयुष्यातील तो सर्वात प्रेरणादायी क्षण राहिला आहे.

महान रतन टाटा आणि सॅम बहादूर यांना पुन्हा कधीही भेटले नाही, परंतु ते माझ्या आयुष्यातील सर्वोच्च शिखरावर आहेत.


आजही माझ्या डोळ्यामध्ये तीच आश्वासक नजर दिसते आहे, कानामध्ये तोच आवाज घुमतो आहे, 

"*काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ"*. 


*अलविदा रतन टाटा!*


 ----- *मेजर जनरल विजय जगताप*.

 *(शब्दांकन - डॉ संदीप गजानन श्रोत्री, सातारा)*

*गोष्ट हिरकणीची..!* *कोजागिरी पौर्णिमेचा* *दिवस* *

 *गोष्ट हिरकणीची..!* 

 *कोजागिरी पौर्णिमेचा* *दिवस* 

 *सन 1674 साली* *शिवकाळातील ही* *घटना...* *रायगडाच्या* *पायथ्याशी* असणाऱ्या गावातून लोक गडावर वस्तू विकण्यासाठी येतं असतं. त्यात एक हिरा नावाची गवळण होती. आपल्या घरातील गाईंचं दूध घेऊन ती गडावर विकण्यासाठी जायची.  या विक्रीतून ती कुटुंबाचं उदरनिर्वाह करायची. हिराचा हा दिनक्रम होता. पण या गडावर एक नियम होता. शिवाजी महाराजांच्या आज्ञानुसार गडाचे दरवाजे सकाळी उघडत असत आणि संध्याकाळी ते दरवाजे बंद होत असतं. गडाचे दरवाजे एकदा बंद झाल्यानंतर ते उघड नव्हते. 

ती रात्र होती कोजागिरी पौर्णिमेची...हिरा ही ओली बाळंतीण होती. तिला गोंडस असा चिमुकला होता. नेहमी प्रमाणे ती सकाळी गडावर गेली. काम करता करता हिराला वेळचं भान राहिलं नाही. महाराजाच्या आज्ञांनुसार संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाले...

हिरा व्याकूळ होऊन धावत धावत गडाच्या महादरवाज्यावर पोहोचली, पण पहारेकऱ्यांनी गडाचे दरवाजे बंद केले होते.आता कुणाचीही गय केली जाणार नव्हती. हिराचा जीव तिच्या बाळासाठी कासावीस होऊ लागला तिने पहारेकऱ्यांना विनवणी केली. पण ते महाराजांच्या हुकमाचे बांधील होते. 

आपलं बाळ भूकने रडत असेल या विचाराने हिराचा जीव कासावीस झाला होता. तिच्या डोळ्यासमोर तिचं रडणाऱ्या बाळाचा चेहरा येतं होता. घरी रडणाऱ्या तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंहाचं बळ एकवटलं आणि तिने गड उतरणाचा निर्णय घेतला. जिवाचा धोका पत्करून एक  4400 फुटांचा रायगडावरील अत्यंत धोकादायक पश्चिमी बुरूज उतरण्याचा मातेचा धाडसी निर्णय...

रायगड कडेकपारी, जंगली श्वापद यांनी युक्त अवघड किल्ला होता. रात्रीच्या अंधारात उतरताना जर हात सुटला किंवा पाय घसरला तर मृत्यू ठरलेलाच...पण तिचा निश्चय पक्का होता...ती गडावरुन खाली जाण्याची वाट शोधत एका टोकापाशी आली. खरं त्या कडा दिवसाच्या प्रकाशात देखील उतरणे अशक्य होतं. पण तिने कसाही विचार केला नाही, तिने गड उतरण्यास सुरुवात केली...काटे टोचत होते, हातापायाला जखमा होतं होत्या. पण बाळाच्या प्रेमापुढे तिला ह्या वेदना जाणवत नव्हतं. 

अखेरीस तिने कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने त्या कड्यावरून सुखरुप खाली आली आणि धावत घर गाठलं. तिने बाळाला छातीशी कवटाळलं. त्यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली आणि शिवाजी महाराजांच्याही कानावर ही बातमी पडली. 

महाराजांना हिराच्या धाडसाचं कौतुक वाटलं पण दुसरीकडे रागडाच्या सुरक्षिततेचीही काळजी वाटली. हिराला मानसन्मानासाठी गडावर बोलवण्यात आलं. तिला साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला आणि त्या दिवशीपासून तिला हिराकणी नावानं ओळखलं जाऊ लागलं. शिवाय रायगडाच्या कडाला तटबंधी बांधून बुरुज बांधण्यात आला. त्या बुरुजास हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आलं. 

हा सन्मान होता तिच्या मातृत्वाचा आणि धैर्याचा...ती म्हणजे मातृत्वाचं आणि धाडसाचं प्रतीक... *आज करिअर आणि मूल यांचा योग्य ताळमेळ साधत यशस्वी लाखो हिरकणी आपण आपल्या* *आजूबाजूला पाहतो. कोजागिरी पौर्णिमानिमित्त त्या सर्व हिरकरण्यांना सलाम...*

हा चित्रपट केवळ २ मिनिटांचा असून, त्याचं चित्रीकरण फक्त ३० मिनिटांत केलं जातं, आणि तरीही तो ऑस्कर जिंकणारा लघुपट ठरतो.


 हा चित्रपट केवळ २ मिनिटांचा असून, त्याचं चित्रीकरण फक्त ३० मिनिटांत केलं जातं, आणि तरीही तो ऑस्कर जिंकणारा लघुपट ठरतो.


एक चित्रपट ज्यात शब्द नाहीत, पण आजच्या मानवी जीवनाचं यशस्वी वर्णन करतो;


स्वार्थी


नैतिकतेचा अभाव


शिष्टाचार हरवलेला


नेहमी स्वतःच बरोबर असल्याचं भासतं


सभोवतालच्या वातावरणाची काळजी नसणे


झुकण्याची तयारी नसणे


दुसऱ्यांसाठी काही देणं किंवा त्याग करण्याची इच्छाच नसणे


सहानुभूती आणि सहवेदना हरवलेली



कदाचित हा चित्रपट फक्त एक मनोरंजन आहे, पण असंही असू शकतं की आपणच या लघुपटातील पात्रं आहोत. आज आपण स्वीकारत असलेल्या मूल्यांमधील कमतरतेचं उत्कृष्ट चित्रण. एक नैतिक संदेशांनी भरलेला चित्रपट. शेअर करण्यासाठी चांगला आणि ज्यांनी पाहिला त्यांना जागृत आणि अंतर्मुख करणारा...!!!

Featured post

Lakshvedhi