Monday, 14 October 2024

आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे*

 *आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे* 



प्रत्येक मुलगी,सुनआणि मुलांनी वाचावा असा लेख आहे.


एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो

जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची 

कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत 

जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !

आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? 

मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?

पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?

निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ....

थोडक्यात काय तर

दोघांपैकी एकजण गेल्यानंतर

मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !

लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात

आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात

स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात

परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात

म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची

असं झालं तरच ते जगू शकतील 

नसता " तो माणूस म्हणजे वडील " किंवा " ती स्त्री म्हणजे आई " तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही 

तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची .......सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ......म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !

केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा 

त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !

उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो 

म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायाने आणि आपुलकीने वागा !

🙏🙏

*आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे* 

प्रत्येक मुलगी,सुनआणि मुलांनी वाचावा असा लेख आहे.

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो
जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची 
कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत 
जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !
आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? 
मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?
पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?
निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ....
थोडक्यात काय तर
दोघांपैकी एकजण गेल्यानंतर
मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !
लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात
आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात
स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात
परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात
म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची
असं झालं तरच ते जगू शकतील 
नसता " तो माणूस म्हणजे वडील " किंवा " ती स्त्री म्हणजे आई " तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !
आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही 
तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची .......सर्वांची असते !
फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !
आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ......म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !
केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा 
त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !
उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो 
म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायाने आणि आपुलकीने वागा !
🙏🙏

मीठ,काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत. बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते.

 *** *मीठ*........


काल एक पोस्ट वाचनात आली, की पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही तसच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत. बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. 

का घडतं असं?? 


मिठाचं महत्व जेव्हा पानात असतं तेव्हा कळतच नाही. कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर असतं. तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवलाय का? ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का?? हे काहीच माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह. असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं. 


त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो.  त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो.  त्यात कधी वाटीतील रस्सा भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो.


नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी सल्ला देतात, कधी हक्काने कान धरतात तर कधी पोटतिडकीने  समजावून सांगतात. नकोच वाटतात,  कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते.  त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही तर वाटीमागे असलेलं ते एवुढंस मीठ काय दिसणार ना?? पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या ग्लास मध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं?? 


म्हणून देवाने वाढलेल्या ह्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं.  आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो ती आयुष्यात आलीय ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी भलेही ती तुमच्या आयुष्यात फार महत्वाचे नसतीलही पण निदान वाईट तर करणार नाहीत ना?? ....🙏🌷🙏

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे काम करणार

 लाडकी बहीण योजनेतून बहिणींना लखपती बहिण करण्याचे  काम करणार

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१२८ कोटी रुपये  खर्चातून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन

मुंबईदि. 13 :-  बहिणीच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैशाचे हप्ते नियमित जमा करण्यात येत आहेत,  या बहिणींना लखपती बहिणी करण्याचे  काम शासन करणार आहे.

ही योजना सुरू ठेवण्यासाठी तरतूद केली असून ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कांजूरमार्ग येथे १२८ कोटी रुपये खर्चातून मुंबई महानगपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचे भूमिपूजन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नेहरूनगर कांजूरमार्ग येथे  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार नरेश म्हस्केनगरसेविका सुवर्णा करंजे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणालेमहानगपालिकेच्या या रुग्णालयासाठी १२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शासनाने विविध रुग्णालयामध्ये कॅशलेस सुविधा देखील सुरू केली आहे. यासह महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. लेक लाडकी योजनामोफत उच्च शिक्षण अशा विविध योजनांमुळे महिलांना सक्षम होण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही,  असे त्यांनी यावेळी सांगितले.

दोन वर्षांत मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणार

मुंबई शहरातील रस्त्यांच्या कामाना प्राधान्य देण्यात येत आहे दोन वर्षांत मुंबई शहरातील रस्ते खड्डे मुक्त करणार आहेअसा  मुख्यमंत्री शिंदे ग्वाही दिली.

भूमिपूजनसह विविध प्रकारच्या कामांना प्राधान्य

  नेहरूनगर  वसाहती मधील माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण यापूर्वी आपण केले आहेनेहरूनगर येथील बुध्द विहार,   नागरिकांसाठी सिमेट्रीमुस्लिम नागरिकांच्या मागणीस देखील तात्काळ प्रतिसाद दिला आहे. मुस्लिमबुध्दख्रिश्चनपारसी असे सर्व समाजातील नागरिकांच्यासाठी राज्य सरकार काम करत आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले.

00000


 

 


 

महिलांचा शाश्वत विकासहेच शासनाचे मुख्य ध्येय


महिलांचा शाश्वत विकासहेच शासनाचे मुख्य ध्येय

 -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना सुरूच राहणार

महिलांच्या प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध

नवा मोंढा मैदानावर महिला सक्षमीकरणाचा शानदार सोहळा

 

नांदेड, दि १३ :- राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना देशभरात सुपर हिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेसह शासनाच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला.

नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, श्यामसुंदर शिंदे, राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाच्यवतीने मुख्यमंत्री शिंदे यांचे स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.  

            मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील दहा लाख भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा लाभ मिळतो आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देऊन सुरु केलेली ही योजना आहे. आता महिनाभरात भाऊबीज पण येईल. आमची भगिनींसाठी ही ओवाळणी थांबणार नाही. ती सतत सुरूच राहीन. योजना सुरु होऊन तीन महिने झालेत, जवळपास २ कोटी ३० लाख भगिनींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेसाठी शासनाने ३३ हजार कोटींची तरतूद केली आहे. तर १७ हजार कोटी रूपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ या दोन महिन्यांचे आगाऊ हप्तेही खात्यात जमा केले आहेत. सध्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रूपये जमा होताहेत. तर यापुढे यामध्ये योजनेच्या रक्कमेत टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे प्रत्येक महिलेला अधिक आर्थिक सक्षम बनविण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. छोटा, मोठा व्यवसाय उभारणीसाठी या रकमेचा पाठिंबा महिलांना मिळणार आहे. काही महिला या दिशेने पुढेही जात आहेत, त्याचे समाधान आहे. या महिला लखपती दिदी झाल्याचे पाहायचे आहे, असा आशावादही मुख्यमंत्री यांनी व्यक्त करत महिलांना प्रेरित केले. आर्थिक सक्षम महिला या ध्येयाबरोबरच सुरक्षित महिला यालाही शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटात ५० टक्के सवलतीचा लाभही देण्यात येत आहे. या योजनांबरोबरच सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आदी योजनाही सुरूच राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गान सम्राज्ञी आशाताई भोसले यांनीही या योजनेचे कौतुक करत सरकारचे अभिनंदन केले आहे, हे विशेष. सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत ‘शासन आपल्या दारी’ सारखा स्तुत्य उपक्रम राबवून पाच कोटी जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या आजच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून अतिशय समाधान होत आहे. बहिणींच्या डोळ्यातील आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर अखेरपर्यंत रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळते.

तत्पूर्वी आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळातवेळ काढून दोनवेळा पुढे ढकलेल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली याबद्दल आभार व्यक्त केले. त्यासोबतच मोठ्याप्रमाणात विकासासाठी निधी दिल्याबद्दलही आभार व्यक्त केले. राजर्षी पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. महिलांच्या आयुष्यात या नव्या आर्थिक क्रांतीने भर घातल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालय येथे २०० हून ५०० खाटांची संख्या वाढवून श्रेणी वाढ केल्याबद्दल तसेच नरहर कुरूंदकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्र अव्वल

लाडक्या बहिणीला रक्कम दिली, मग लाडक्या भावांचे काय ? असा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर भावांसाठीही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा ६ हजार, ८ हजार आणि १० हजार प्रशिक्षण भत्ता देऊन प्रशिक्षण योजना आपण राबवली, अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही गौरवोद्गार मुख्यमंत्री यांनी काढले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, लेक लाडकी योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियानासह इतर योजनांच्या महिला, युवा, ज्येष्ठ लाभार्थ्यांना यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात धनादेश आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

प्रारंभी लाडक्या बहिणींचे स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. सूत्रसंचालन स्म‍िता मोहरीर यांनी केले. आभार शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.

गोमातांचे पूजन, ‘खेळ पैठणी’ची रंगत

राज्यमाता म्हणून नुकताच गायीला सन्मान राज्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी या प्रजातीच्या गोमातांचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील कला, गितांनी कार्यक्रमाने रंगत आणली. तसेच उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर ‘खेळ पैठणीचा’ हा प्रश्न मंजुषा कार्यक्रम पार पडला. यामध्ये विचारलेल्या प्रश्नाला बरोबर उत्तर देणाऱ्या प्रत्येक विजेत्या महिलेस मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, आमदार कल्याणकर, जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.

00000


 

 

*आदिशक्तीची नऊ मंदिरे*

 *आदिशक्तीची नऊ मंदिरे*


*१) शैलपुत्री माता मंदिर, वाराणसी उत्तर प्रदेश / बारामुल्ला कारपीर:* पौराणिक साहित्यात नऊ नावांनी ओळखल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी शैलपुत्री या प्रथम आहेत. शैलपुत्री म्हणजे हिमालयांची कन्या माता पार्वती. मोक्षनगरी काशीमध्ये वरुणा नदीजवळ माता शैलपुत्रींचे मंदिर आहे. येथे शैलपुत्री देवींची सुंदर मूर्ती आहे, हिमालयांची कन्या असल्याने शैलपुत्री म्हंटल्या जाणाऱ्या मातेची मंदिरेही पर्वतांमध्ये आहेत. काश्मीरमधील झेलमच्या काठावर बारामुल्ला येथे शैलपुत्री देवींचे मंदिर आहे, मंदिराच्या परंपरेनुसार मुख्य मंदिरात अन्नदान आणि. स्वच्छता नियोजनाचे काम फक्त कुमारी मुलीच करतात.


*२ ब्रह्मचारिणी माता मंदिर, वाराणसी, उत्तर प्रदेश: 'ब्रहा चारयितुं शीलं यस्याः सा ब्रह्मचारिणी'* म्हणजे ज्यांचा स्वभाव परब्रह्माचे खरे आनंदमय रूप प्राप्त करणे आहे, ते रूप म्हणजे ब्रह्मचारिणी होय. बाबा विश्वनाथांचे शहर काशीच्या कर्णघंटा परिसरात माता ब्रह्मचारिणी देवीचे मंदिरदेखील आहे. सदनीरा माता गंगेच्या तीरावरील बालाजी घाटावर असलेल्या या मंदिरात सुखकर्ता, समृद्धी देणाऱ्या आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री मातेची आराधना केली जाते.


*३ चंद्रघंटा माता मंदिर, प्रयागराज आणि काशी, उत्तर प्रदेश: चंद्र: चन्द्रः घण्टायां यस्या सा चंद्रघंटा,* म्हणजे जे चंद्रासारखे शीतल असून ज्ञानाचा प्रकाश देतात, त्यांना चंद्रघंटा म्हणतात. चंद्रघंटा देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र सुशोभित आहे. तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये भगवती चंद्रघंटाच्या रूपात देवींची पूजा केली जाते. माता चंद्रघंटाचे मंदिर प्रयागराज, त्रिवेणी संगम शहर आणि वाराणसी येथे देखील आहे, जिथे नवरात्रीच्या निमित्ताने विशेष गर्दी होते.


*४) कुष्मांडा माता मंदिर, घाटमपूर, कानपूर, उत्तर प्रदेश:* कुष्मांडा ही नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची देवता आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर शहरात कुष्मांडा देवींचे प्राचीन मंदिर आहे. येथे देवी पिंडी दोन मुखांसह विराजमान आहेत, जेथे भक्तांसाठी आश्चर्याचा स्रोत म्हणजे पिंडीतून नेहमी पडत असलेले पाणी आहे, जे भक्त पवित्र आशीर्वाद मानून त्यांच्या डोक्यावर आणि कपाळावर लावतात. मराठा शैलीत बांधलेल्या मंदिराच्या निर्मितीच्या तिथीवर इतिहासकारांचे एकमत नाही. परंतु, स्थानिक लोककथांमध्ये अबाधित आहे.


*५) स्कंदमाता मंदिर, विदिशा, मध्य प्रदेश / काशी, उत्तर प्रदेश:* उमा-महेशांचे पुत्र षण्मुख कार्तिकेय यांना स्कंद म्हणतात, ज्यावरून देवींचे एक नाव स्कंदमाता आहे. स्कंदमातेचे मंदिर वाराणसीच्या जगतपुरा भागातील बागेश्वरी देवी मंदिर परिसरात आहे. देवींच्या मांडीवर स्कंद बालस्वरूपात विराजमान आहे. स्कंदमातेचे आणखी एक मंदिर विदिशामध्ये आहे जिथे दुर्गा देवींची पूजा स्कंदमातेच्या रूपात केली जाते. तामिळनाडूतील सेलमजवळील स्कंदगिरी येथे दुगदिवींची स्कंदमातेच्या रूपात पूजा केली जाते.


*६) माता कात्यायनी मंदिर, वृंदावन, उत्तर प्रदेश:* श्री राधाराणी अंतर्गत, माता कात्यायनींचे प्राचीन मंदिर श्रीकृष्णाचे लीलास्थळ श्रीधाम वृंदावनात आहे. महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्यांच्या घरी देवींनी पुत्रीरूपात जन्म घेतला होता. श्रीकृष्ण पती मिळावा म्हणून राधाराणीने कात्यायनी शक्तिपीठावर देवींची पूजा केली होती, असे मानले जाते.


*७) कालरात्री माता मंदिर, वाराणसी, उत्तर प्रदेश:* माता कालरात्रीला मातेचे सातवे रूप मानले जाते. कालरात्रीच्या रूपात देवीने राक्षसांचा वध केला, म्हणून त्यांची मूर्ती उग्र स्वरूपात पूजीली जाते. वाराणसीमध्ये माता कालरात्रीचे मंदिर दशाश्वमेध मार्गावर आहे. बिहारच्या सोनपूर, नयागाव डुमरी येथे माता कालरात्रीचे प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे पिंडीच्या रूपात माता शक्तीची स्थापना केली आहे.


*८) महागौरी माता मंदिर, काशी, उत्तर प्रदेश:* देवी शक्तीच्या आठव्या रूपात असणाऱ्या पूज्य महागौरी मातेची मुद्रा अत्यंत शांत असून त्यांचे रूप तेजस्वी आहे. प्रसिद्ध काशी विश्वनाथाजवळ असलेल्या अन्नपूर्णा देवी मंदिरात स्थापित केलेल्या मूर्तीला माता महागौरी म्हणतात. महादेवांना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतींनी कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे त्यांचे रूप कृष्णवर्णी झाले होते. तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवांनी गंगाजलाने देवींचे तेज पुन्हा परत आणले होते, अशी कथा आहे.


*९) सिद्धिदात्री माता मंदिर, छिंदवाडा, मध्य प्रदेश:* सिद्धिदात्री ही सर्व सिद्धीची जननी आहे. नवव्या दिवसाची अधिष्ठात्री माता सिद्धिदात्रीचे मंदिर मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात आहे. चतुर्भुज रूपात विराजमान असलेली देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. वाराणसीमध्ये भगवती सिद्धिदात्रींचे मंदिर असून येथे कृष्णवर्णातील मूर्ती आहे.

*नवी मुंबईतील सर्व महिलांसाठी खुशखबर*

 *नवी मुंबईतील सर्व महिलांसाठी खुशखबर*


सर्व महिलांना 14 ऑक्टोबर 2024 पासून सर्व प्रकारच्या NMMT बसेस (AC आणि Non AC) प्रवासादरम्यान तिकीट भाड्यात 50% सूट मिळणार आहे.


Sunday, 13 October 2024

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात क्रमांक एक वर

 पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात क्रमांक एक वर

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-3 च्या उत्तर

वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमीपूजन संपन्न

 

            ठाणे,दि.13 :-  राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्पविकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे केले.

         सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व

रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते.

      यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. दादाजी भुसेमाजी खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतेतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकरमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राजेश पाटीलमुख्य अभियंता श्री.राजेश निघोट मुख्य अभियंता श्री.एस.के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते .

       ठाणे खाडी पूल क्र.3 च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर रेवस - रेडी सागरी महामार्गावरील धरमतर कुंडलिकाआगरदांडाबाणकोटकेळशीजयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पूलांचे भूमीपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले.

       स्थानिक स्तरावर प्रत्येक खाडी पूलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमीपूजन स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

      या सात खाडी पूलांची एकूण लांबी 26.70 किलोमीटर असून त्यासाठी 7 हजार 851 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे .

        मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीरेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती.ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे . या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलचतसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे.

      ते म्हणालेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून  राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात पोहोचता येईल.

       ते म्हणालेपनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल .

      याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.दादाजी भुसे ठाणे खाडी पूल क्र.3 ची उत्तर वाहिनी या तीन पदरी पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईलअसा विश्वास व्यक्त करून म्हणाले कीपुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. आज दुग्धशर्करा योग म्हणजे रेवस-रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांचे भूमीपूजन एकाच वेळी होत आहे. या परिसरातील  निसर्गाला अनुरूप असे केबल स्टे व इतर प्रकारांच्या पूलांची निर्मिती रस्ते विकास महामंडळ अत्यंत कल्पकतेने करणार आहे.

        या उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवारदि.14 ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

प्रकल्पांची माहिती :

1)सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र.3

प्रकल्पामधील कामाचा वाव:

प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पूल बांधणे . (मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर )

प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.

पूलाची लांबी : 3180 मी. ( पोहोच रस्त्यासह )

सद्य:स्थितीत उत्तर वाहिनी पूलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी सोमवारदि.14 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम 80 % पूर्ण झाले आहे.

रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची एकूण लांबी : 498 किमी.

पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्गकोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प.

सागरी महामार्गावरील सात पूलांची माहिती-

सर्व 7 पूलांची एकूण लांबी 26.70 किमी आणि एकूण प्रशासकीय मान्यता रु. 7 हजार 851 कोटी इतकी आहे.

प्रत्येक पूलाच्या कामाची मुदत तीन वर्ष आहे .

1)रेवस- कांरजा भागातील धरमतर खाडीवरील पूल

एकूण लांबी : 10.20 किमी.

प्रशासकीय मान्यता : रु. 3 हजार 57 कोटी

पूलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पूल)

2)रेवदांडा- साळाव भागातील कुंडलिका खाडीवरील पूल:

एकूण लांबी : 3.82 कि मी

प्रशासकीय मान्यता रक्कम : 1 हजार 736 कोटी

पूलाचा प्रकार : केबल स्टे

3)दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडी वरील पूल:

एकूण लांबी : 4.31 किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : 1 हजार 315 कोटी.

पूलाचा प्रकार : केबल स्टे

4)बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पूल :

एकूण लांबी : 1.711 किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 408 कोटी

पूलाचा प्रकार : केबल स्टे

5)केळशी भागातील केळशी खाडीवरील पूल :

एकूण लांबी : 670 मी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 148 कोटी

पूलाचा प्रकार: बॉक्स गर्डर

6)जयगड खाडीवरील पूल:

एकूण लांबी : 4.40 किमी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 930 कोटी

पूलाचा प्रकार : केबल स्टे

7)कुणकेश्वर येथील पूलाचे बांधकाम

एकूण लांबी : 1580 मी.

प्रशासकीय मान्यता रक्कम : रु. 257 कोटी

पूलाचा प्रकार :  केबल स्टे

००००


Featured post

Lakshvedhi