Friday, 11 October 2024

पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे

 पत्रकारवृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे

            राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

            या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावीअशी आग्रही मागणी होती. पत्रकारतसेच वृत्तपत्र विक्रेंत्याच्या कल्याणासाठीच्या विविध योजना या महामंडळांमार्फत चालवण्यात येतील.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार

 नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार

            जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

            या प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजीनगरबीडजालनापरभणीधाराशीवलातूरनांदेडहिंगोलीअमरावतीअकोलावाशिमयवतमाळबुलढाणावर्धाजळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूरभंडारागोंदियाचंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित सहा हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे.

            प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण ६९५९ गावांच्या यादीस  मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापन करण्यात आली आहे.

मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची व्यवस्था

 मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये

सुलभ शौचालयांची व्यवस्था

            राज्यातील रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयस्नानगृह संकुल व राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            राज्यातील २०० खाटांची १२ आणि १०० खाटांची ४५ अशा एकूण ५७ आरोग्य संस्थांमध्ये सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनमुंबई यांच्यामार्फत शौचालयस्नानगृह संकुल व राहण्याची सुविधा देण्यात येईल.

कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला

 कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस

सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला

            कुर्ल्यातील चेंबूर येथील दोन हजार चौरस शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख लोकनाट्य कला प्रबोधनी संस्थेस भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            ही प्रबोधिनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्व. नामदेव ढसाळ व सुप्रसिद्ध लेखिका मलिका अमर शेख यांनी स्थापन केली असूनविविध कला व सामाजिक क्षेत्रात तिचे मोठे काम आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विकास आराखडा ३४ नुसार रुग्णालयासाठी आरक्षित असलेला हा भूखंड विहीत कार्यपद्धतीनुसार या संस्थेच्या डायलेसीस सेंटरला भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला.

काळ्या मुंग्या आणि तांबड्या मुंग्या*

 *काळ्या मुंग्या आणि तांबड्या मुंग्या* 


👉जर तुम्ही १०० काळ्या मुंग्या आणि १०० तांबड्या मुंग्या घेतल्या व एका काचेच्या बरणीत सोडल्या तर काही घडणार नाही. मुंग्या एकमेकांत मिसळून जातील. त्याचे त्यांना काही वाटणार नाही. पण जर तुम्ही काचेची वरणी कसलीही दया-माया न दाखवता जोरजोरात हलवलीत आणि टेबलावर ठेवलीत, तर तुम्हाला दिसेल की, दोन्ही प्रकारच्या मुंग्या एकमेकांना मारायला सुरुवात करतात.

काळ्या मुंग्यांना वाटते की, तांबड्या मुंग्यामुळे आपला जीव धोक्यात आहे. तसेच तांबड्या मुंग्यानाही वाटते की, काळ्या मुंग्या आपल्या जीवावर उठल्या आहेत. काळ्या आणि तांबड्या मुंग्या एक दुसऱ्याला शत्रु समजायला लागतात..! बरणी हिंस्सकपणे हलवणारे हात त्यांच्या लक्षातच येत नाहीत...! आणि *हेच आपल्या* *समाजात घडते आहे..!* 

 *समाज नेहमीच शांत,* *समंजस व आनंदाने राहतो.* *राजकारणी लोकांनी* *हिंस्सक हातांनी ढवळून* *काढलेला* *समाज एकमेकांच्या* *विरोधात उभा ठाकतो,* *एकमेकाला शत्रू मानायला लागतो.* *आपण हे हात* *ओळखायला* *शिकलं पाहिजे* . *अन्यथा एकमेकांत लढून मरणे हेच आपले जीवन असेल...!*

घर घर मे राणी लक्ष्मीबाई

 : ४ दिन प्रतिदिन सुबह ७:३० से लेकर रात को १० बजे तक लगभग १३-१४ घंटे रोज की ट्रेनिंग हुई है, 

कन्या गुरुकुल, महाविद्यालय, छोटीपुरा अमरोहा, उत्तरप्रदेश  

उनकी छोटी सी ६१ सेकंड की झलक।


अदभुत एवम प्रशंसनीय।]


lakshvedhimm@gmail.com: 🙏🤔👌👍 उपयुक्त निर्णय,साहसी उपक्रम ग्रामीण ते शहरी शाळा कॉलेज मधून रविवारी एनसीसी प्रमाणे राबविले पाहिजेत,, घर घर मे राणी लक्ष्मीबाई

आपले सरकार केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे मानधन मुख

 आपले सरकार केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे मानधन

            आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) प्रकल्पासाठी केंद्रचालकांना ग्रामरोजगार सेवकांच्या धर्तीवर दरमहा दहा हजार रुपये मानधन ग्रामपंचायीतमार्फत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पामुळे पंचायत राज संस्थांचा कारभार संगणीकृत होऊन ई- पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसुत्रता आणि पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे.

-----०-----

Featured post

Lakshvedhi