*काळ्या मुंग्या आणि तांबड्या मुंग्या*
👉जर तुम्ही १०० काळ्या मुंग्या आणि १०० तांबड्या मुंग्या घेतल्या व एका काचेच्या बरणीत सोडल्या तर काही घडणार नाही. मुंग्या एकमेकांत मिसळून जातील. त्याचे त्यांना काही वाटणार नाही. पण जर तुम्ही काचेची वरणी कसलीही दया-माया न दाखवता जोरजोरात हलवलीत आणि टेबलावर ठेवलीत, तर तुम्हाला दिसेल की, दोन्ही प्रकारच्या मुंग्या एकमेकांना मारायला सुरुवात करतात.
काळ्या मुंग्यांना वाटते की, तांबड्या मुंग्यामुळे आपला जीव धोक्यात आहे. तसेच तांबड्या मुंग्यानाही वाटते की, काळ्या मुंग्या आपल्या जीवावर उठल्या आहेत. काळ्या आणि तांबड्या मुंग्या एक दुसऱ्याला शत्रु समजायला लागतात..! बरणी हिंस्सकपणे हलवणारे हात त्यांच्या लक्षातच येत नाहीत...! आणि *हेच आपल्या* *समाजात घडते आहे..!*
*समाज नेहमीच शांत,* *समंजस व आनंदाने राहतो.* *राजकारणी लोकांनी* *हिंस्सक हातांनी ढवळून* *काढलेला* *समाज एकमेकांच्या* *विरोधात उभा ठाकतो,* *एकमेकाला शत्रू मानायला लागतो.* *आपण हे हात* *ओळखायला* *शिकलं पाहिजे* . *अन्यथा एकमेकांत लढून मरणे हेच आपले जीवन असेल...!*
No comments:
Post a Comment