Friday, 11 October 2024

शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान

 शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान

 

            सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासन मान्य खाजगी अंशत: अनुदानित शाळांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

            निकषांची पूर्तता केलेल्या 820 प्राथमिक शाळा3,513 वर्ग/ तुकड्या व त्यावरील 8,602 शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी1,984 माध्यमिक शाळा2,380 वर्ग किंवा तुकड्या व त्यावरील 24,028 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी3040 उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालय3,043 वर्गतुकड्याअतिरिक्त शाखा व त्यावरील 16,932 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, ( एकूण 5,844 शाळा8,936 वर्ग/तुकड्या/अति.शाखा व त्यावरील एकूण 49,562 शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी) अनुदानाच्या विविध टप्पावर वेतन अनुदान घेत आहेत. त्यांना 20 टक्के अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला.

राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी

 राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी

            जर्मनीतील बाडेन वुटेन बर्ग यांचे राज्याशी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र स्टेट इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट अॅण्ड स्कील ॲडव्हान्समेंट कंपनी स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            जर्मनीमध्ये निवड झालेल्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांना व्हिसा व पासपोर्टबाबत मदत करणेत्याचप्रमाणे इतर आवश्यक त्या उपाययोजना या कंपनीमार्फत करण्यात येतील. या कंपनीला तीन कोटी रुपये भागभांडवल उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या या योजनेसाठी 27 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून 10 हजार 50 उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला

 पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला

            पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील कृषी व पदुम विभागाच्या 460.00.0 हे. आर जमिनीपैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेली 377.26.19 हे. आर शासकीय जमीन तसेच मौजे टोकराळे येथील 125.55.2 हे.आर ही शासकीय जमीन प्रचलित वार्षिक बाजारमुल्य दर तक्त्यानुसार शेती दराने येणारी कब्जेहक्काची रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-2 म्हणून एमआयडीसीला देण्यात येईल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी : नव्या ७ हजार गावांचा समावेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती · केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविणार · हिंगोलीतील हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी · विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यास

मंत्रीमंडळाची मंजुरी : नव्या ७ हजार गावांचा समावेश

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

·        केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविणार

·        हिंगोलीतील हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी

·        विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी

 

            मुंबई दि. १० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी, राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली आदी 21 जिल्ह्यातील 6959 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे.

            राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्षशेतकरी माहिती संचहंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भाकीत भूभाग असणारे गाव नकाशे माहिती संच महसूल विभाग तयार करेल. यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना कृषि विभाग करेल. यासाठी सुकाणू समितीअंमलबजावणी समितीक्षेत्रिय स्तरावर विभागस्तरीयजिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येतील. पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून सुमारे 81 कोटी 83 लाख रुपये खर्च दरवर्षी येईल.

            हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी ७०९ कोटी २७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या केंद्रासाठी मंजूर अतिरिक्त निधी टप्पेनिहाय वितरीत करण्यात येणार आहे. हळदीवरील संशोधनासाठी तसेच निर्यातक्षम उत्पादन बनवण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

            राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांमधून ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी विशेष बाब म्हणून निर्बंध शिथील करून मान्यता देण्याचा निर्णय सुद्धा झाला. 50 टक्के पदे ही त्याच विद्यापीठांच्या बाधित प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव ठेवण्यात येतील. चारही कृषि विद्यापीठांत 3 हजार 232 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असूनयामुळे बाधित झालेल्या कुंटुंबातील पात्र उमेदवाची यात भरती करण्यात येईल. ही विशेष भरती प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेचा निर्णयसमांतर आरक्षण व सामाजिक आरक्षण याची सांगड घालण्यात येईलअशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

0000

दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ

 दत्ताची नावे आणि त्यांचा अर्थ 


 दत्त* : दत्त म्हणजे ‘आपण आत्मा आहोत’ याची अनुभूती देणारा. प्रत्येकात आत्मा आहे; म्हणून प्रत्येक जण चालतो, बोलतो आणि हसतो. यावरून ‘आपल्यात देव आहे’, हेच सत्य आहे. त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही. आपल्याला याची जाणीव झाली, तर आपण प्रत्येकाशी प्रेमानेच वागू. या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चय करूया..


२] *अवधूत* : जो अहं धुतो, तो अवधूत ! अभ्यास करतांना आपल्या मनावर ताण येतो ना ? खरेतर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण ‘अभ्यास करणारा मी आहे’, असे वाटल्याने ताण येतो. हाच आपला अहंकार आहे. दत्त जयंतीला आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, माझ्यातील अहं नष्ट करण्याची शक्ती आणि बुद्धी तूच मला दे....’


३] *दिगंबर* : दिक् म्हणजे दिशा हेच ज्याचे अंबर, म्हणजे वस्त्र आहे असा ! जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर ! जर ही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्य जिवांनी त्याला शरणच जायला हवे. तसे केल्यासच आपल्यावर त्याची कृपा होईल. आपण प्रार्थना करूया, ‘हे दत्तात्रेया, शरण कसे जायचे ? ते तूच आम्हाला शिकवा….’

*******************************


💐 *दत्ताच्या परिवाराचा भावार्थ* 💐


४] *गाय* : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे प्रतीक आहे. कामधेनू आपणाला जे हवे, ते सर्व देते. पृथ्वी आणि गायही आपल्याला सर्व काही देतात.…


५] *४ कुत्रे* : हे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या ४ वेदांचे प्रतीक आहेत.…


६] *औदुंबर वृक्ष* : दत्ताचे पूजनीय रूप ! या वृक्षात दत्त तत्त्व अधिक आहे.…


🍁 *दत्ताच्या मूर्तीतील वस्तूंचा भावार्थ पुढील प्रमाणे आहे.* 🍁


१] *कमंडलू आणि जपमाळ* : हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे.…


२] *शंख आणि चक्र* : श्री विष्णूचे प्रतीक आहे.…


३] *त्रिशूळ आणि डमरू* : शंकराचे प्रतीक आहे.…


४] *झोळी* : ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. झोळी घेऊन दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं नष्ट होतो.…


*-:|| दत्त तिर्थक्षेत्रे ||:-*


*श्री दत्तात्रेय प्रभू आणि त्यांनी मनुष्य रूपामध्ये घेतलेल्या अवतारांची प्रमुख मुळ दत्त तिर्थक्षेत्रे.*


१} *माहूर(नांदेड)महाराष्ट्र* :- हे क्षेत्र सद्गुरु दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे.महासती अनुसयेच्या सत्व परिक्षेसाठी आलेल्या ब्रह्मा,विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन महासती अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीस मान देऊन याच ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला.हे क्षेत्र फार प्राचीन आहे.ह्या क्षेत्रास दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुध्दा म्हणतात.ह्या ठिकाणी रेणुका मातेचे मूळ शक्ती पीठ सुध्दा आहे.हे स्थान नांदेड जिल्ह्यात येते.नांदेड पासून ११० किमी अंतरावर माहूर हे क्षेत्र आहे. पुण्या,मुंबई कडील भक्तां साठी औरंगाबाद, जालना, मेहकर, वाशीम,पुसद,माहूर अशी सरळ बससेवा आहे.नांदेड हे मनमाड-हैदराबाद मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.या ठिकाणी निवासासाठी भक्त निवास आहे.


२} *गिरनार(जुनागड)(सौराष्ट्र गुजरात)*:-हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते.जुनागड या शहरा पासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे.याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला.हे स्थान उंच पर्वतावर असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात.ह्या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत.इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्यय भक्तांना नेहमी येतो.या ठिकाणी जाण्यासाठी सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून जुनागड (गिरनार)साठी नियमीत बससेवा आहे.रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत, अहमदाबाद, राजकोट, जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.


३} *पिठापूर* - (पूर्व गोदावरी जिल्हा) आंध्रप्रदेश :-हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे.या क्षेत्रास पादगया सुध्दा म्हणतात.आंध्र प्रदेशमधे पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्या जवळ हे क्षेत्र आहे.आपस्तंब शाखेतील आपलराज,आणि सुमती माता या ब्राह्मण दांपत्यांच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला.सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी श्राध्दकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर सुमती मातेने दत्तात्रेयांना भिक्षा वाढली.त्यामुळे संतुष्ट होऊन श्री दत्तात्रेयांनी मी तुझ्या उदरी जन्म घेईल असा आशिर्वाद सुमती मातेस दिला.जीवनात एक वेळेस या क्षेत्रास जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन जरूर घ्यावे. हैद्राबाद, विशाखापट्टनम या मार्गावर सामलकोट हे रेल्वे स्टेशन लागते तिथे उतरून रिक्षा

अथवा बसने (१०किमी) अंतरावर असलेल्या पिठापूर

या क्षेत्राला जाता येते.या ठिकाणी

जाण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकांवरून नियमीत रेल्वे आहेत.शिर्डी, विशाखापट्टनम,काकिनाडा एक्सप्रेस या रेल्वे गाडया मराठवाडयातून पिठापूरला जाण्यासाठी सोईस्कर आहेत.पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी मुंबई भुवनेश्वर(कोणार्क एक्सप्रेस),तर विदर्भातील लोकांसाठी दक्षिण किंवा ओखा- पुरी एक्सप्रेस ही ह्या रेल्वेगाडया सोयीच्या आहेत.या ठिकाणी राहण्यासाठी भक्त-निवास असून दुपारी १२ वाजता आणि रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.पिठापूरला जाणारया भक्तांनी १५ दिवस अगोदर आपली पिठापूरला जाण्याची तारिख संस्थानला फोनने कळ्वावी.जेणेकरून तिथे गेल्यावर रूम मिळ्ण्यास अडचण निर्माण होणार नाही. श्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम पिठापूरम- फोन नं.-(०८८६९) २५०३००,२५२३००.


४} *कुरवपूर(जि.रायचूर)कर्नाटक*:- हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले.श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला. मुंबई,बंगलोर(व्हाया गुलबर्गा)या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते.तिथे उतरून रायचूर बसस्थानका वरून बस मार्गाने ३०किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा

नदीचा तीर लागतो.होडिने १ किमी प्रवास करून मंदिरा पर्यंत जाता येते.दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बस मार्गावर मतकल नावाचे गाव लागते तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते.नंतर होडिने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरा पर्यंत पोहोचता येते.हा मार्ग अधिक सोयीचा आहे.पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा~यांसाठी या आश्रमात

गाडी पार्किंगची व्यवस्था आहे.वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे.याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्य नमस्कार घालण्यासाठी येत असत.याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा~यांना भोजना साठी आधी सांगावे लागते. वासुदेव भट्ट पुजारी,श्री क्षेत्र कुरवपूर,जि.रायचूर.फोन नं.-(०८५३२-२८०५७०)

मोबाईल नं.-०९७३१८२७५४६,०९७४०३१३८२८


५} *लाड कारंजा(दत्त)(वाशिम)महाराष्ट्र* :- हे क्षेत्र दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे.आजही स्वामींचा ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगिराज वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा साक्षात्कार झाला होता.त्या वाड्यामधे आजही स्वामींचे अस्तित्व जाणवते.हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बाल स्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे.इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत.श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या आज्ञेनुसार (लिलादत्त) श्रीपत ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या मंदिराची १९३४ साली स्थापना केली.वाशीम,अमरावती,अकोला,यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून कारंजा हे ६० किमी अंतरावर असून या शहरातून कारंजा साठी नियमीत बस सेवा आहे.मुंबई-हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशन वर उतरून बसमार्गाने ३० किमी अंतरावर कारंजा या क्षेत्रास जाता येते.इथे निवासासाठी भक्त निवास असुन दुपारी १ वाजता महाप्रसादाची सोय आहे. गुरुमंदिर कारंजा- फोन-(०७२२६) २२४७५५, २२२४५५


६} *नृसिंहवाडी-(कोल्हापूर,महाराष्ट्र)*:- हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर अंदाजे ७०० वर्षां पूर्वी वसले असून सद्गुरु दत्तत्रेयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून हे क्षेत्र ओळ्खले जाते.श्री नृसिंह सरस्वती स्वामी या क्षेत्री १२ वर्षे;राहिले.आपल्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी अनेक अवतार लीला केल्या आहेत. त्यापैकी गुरु चरित्रातील प्रसंगांपैकी अमरापूर गावी घेवड्याचा वेल उपटल्याची कथा आहे.(नृसिंह वाडी पैलतीरी)बिदरच्या मुस्लिम राजाच्या मुलीची गेलेली दृष्टी स्वामींनी आशिर्वाद देऊन परत आणली त्याची उतराई म्हणून विजापूर बिदर बादशहाने सध्याचे मंदिर बांधले आहे.कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांचे परमप्रिय शिष्य श्री नृसिंह सरस्वती (दिक्षीत स्वामी) यांनी स्थापन केलेले श्री दत्त अमरेश्वर मंदिर,वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे.त्याचा जिर्णोध्दार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला आहे. नृसिंह वाडीला गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे.हे क्षेत्र कोल्हापूर पासून पूर्वेस ५० किमी. अंतरावर आहे.सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून २२ किमी. अंतरावर दक्षिणेस हे क्षेत्र आहे.सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे. सांगली- कुरूंदवाड बसने सुध्दा इथे जाता येते.सांगली हे कोल्हापूर-मुंबई मार्गावरचे महत्त्वाचे रेल्वे-स्टेशन आहे.इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त-निवास आहे.दुपारी १२ वाजता महाप्रसादाची सोय आहे.काही वर्षांपूर्वीच दत्तभक्त शरद उपाध्ये यांनी या ठिकाणी "वेदभवन"या वास्तुचे निर्माण केले आहे. ही वास्तु सुध्दा अवश्य पाहावी. श्री नृसिंह सरस्वती दत्त संस्थान,श्रीनृसिंहवाडी,तालुका शिरोळ,जिल्हा कोल्हापूर फोन-(०२३२२),२७००६४,२७०००६,२७०५०१


७} *औदुंबर:-(सांगली,महाराष्ट्र)*:-सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्त क्षेत्र आहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे.या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली ही कथा गुरु चरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे.याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी,श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील व त्या वृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखाली गुरु चरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल.त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील,असे वचन दिले. औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे.सांगली- अंकलखोप या बसने इथे जाता येते.तासगाव- कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे.रेल्वे मार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे,कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते.त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या औदुंबर या क्षेत्रास जाता येते.या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचे घरी सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान औदुंबर तालुका पुलुस जिल्हा सांगली फोन रामभाऊ पुजारी (०२३४६)२३००५८,९९७०१२९७१३,


८} *गाणगापूर(गुलबर्गा,कर्नाटक)*:- गाणगापूर हे क्षेत्र मनुष्य रूपी दत्तात्रेयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदिर्घ वास्त्वयासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे.भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा २ ते ३ मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे.या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून,यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगल कारक केला आहे.या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे.दत्त भक्तांची अशी भावना आहे की,आज ही दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात.येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे.हे क्षेत्र दत्त संप्रदायामधे फार महत्त्वपूर्ण आहे.मुंबई हैद्राबाद(व्हाया सोलापूर) किंवा मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते.तिथे उतरून बस किंवा ऑटोने २० किमी. अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते.बस मार्गाने सोलापूर-गाणगापूर अशी थेट बससेवा

आहे.या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछ्त्र मंडळात सोय होऊ शकते.श्री दत्त संस्थान गाणगापूर फोन नं-(०८४७२)

२७४३३५,२७४७६८


९} *माणिकनगर(बिदर,कर्नाटक)*:- सोलापूर-हैद्राबाद बस मार्गावर हुमनाबाद या तालुक्याच्या ठिकाणा पासून १ किमी अंतरावर माणिक नगर हे क्षेत्र आहे.कर्नाटक राज्यात हे क्षेत्र येते.सकलमत संप्रदाय संस्थापक दत्तावतारी सिध्दपुरुष श्री माणिक प्रभूजी यांची ही कर्मभुमी आहे.राम नवमीच्या दिवशी सव्यं सद्गुरु दत्त प्रभुंनी बया बाईंना(माणिक प्रभूंची आई)दृष्टांत देऊन मी तुझ्या उदरी पुत्र रुपाने जन्म घेइल असा आशिर्वाद दिला.२२ डिसेंबर १८१७ साली(मार्गशीर्ष शुध्द चतुर्दशी)दत्त जयंतीच्या दिवशी बसव कल्य़ाण जवळील लाडवंती या गावी श्री माणिकप्रभूंचा जन्म झाला.माणिक नगर,बसवकल्य़ाण ,बिदर या परिसरा मध्ये प्रभुनीं अनेक अवतार लीला केल्या आहेत.त्यापैकी एक म्हणजे ज्याप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला वास्तव्यास असतांना दिवाळीच्या दिवशी आपल्या अनेक शिष्यांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक शिष्याच्या घरी भोजनासाठी गेले आणि त्याच वेळी ते देह रूपाने गाणगापूरला सुध्दा होते.त्याच प्रमाणे श्री माणिक प्रभूजी बिदर जवळील झरणी नृसिंह येथे मुक्कामास असतांना त्यांच्या अनेक हिंदू-मुस्लिम भक्तांच्या आग्रहास्तव एकाच समयी अनेक रूपे घेऊन प्रत्येक भक्ताच्या घरी भोजनास गेले आणि त्याच वेळी ते देहरूपाने झरणी येथे देह रूपाने गाढ निद्रा घेत होते.त्यांचे एक वैशिष्टय होते की,त्यांच्या दरवाज्यातून कधीही कुणीही विमुख गेले नाही. शिर्डीचे साईबाबा सुध्दा त्यांच्याकडे भिक्षेसाठी आले होते.श्री माणिक प्रभूजी हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन होते.त्यांचा एकमेकांचा आपसात परिचय होता.त्यांच्या नेहमी भेटी होत असत.श्री माणिक प्रभूंनी सकल संत संप्रदायाची स्थापना करुन १९व्या शतकाच्या मध्यकाळा मध्ये या महान देशाच्या मध्यकाळा मध्ये एका मुसलमान अधिराज्यामधे (तत्कालीन,निजाम इलाका)हिंदी समाजाच्या एकात्मतेचा प्रयोग यशस्वी करुन आम्हापुढे एक आदर्श ठेवला.पुढे श्री रामकृष्ण परमहंसांनी याच तत्वाचा उद्घोष केला व महात्मा गांधीनीही हेच तत्व अंगीकारून आपली राष्ट्रीय ऎक्याची इमारत रचली.हे एकमेव असे दत्त क्षेत्र आहे की,ज्याठिकाणी आजही गादी परंपरा सुरु आहे.माणिक प्रभू संस्थान आध्यात्मिक कार्या बरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहे.अंधशाळा,वेदपाठ शाळा,पब्लिक स्कूल,संगीत विद्यालय,संस्कृत पाठशाळा असे अनेक प्रकल्प यशस्वीपणे माणिक प्रभू संस्थान राबवित असून त्याद्वारे समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगिण विकास केला जातो.असे दत्त अवतारी पुरुष मार्गशीर्ष शुध्द एकादशी सन १८६५ मध्ये माणिकनगर येथे संजीवन समाधीमध्ये लीन झाले. हे क्षेत्र सोलापूर पासून १४० किमी अंतरावर आहे.गुलबर्गा-बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणा पासून हुमानाबादसाठी (माणिकनगरसाठी)नियमित बससेवा आहे.बीदर पासून ४० किमी आणि गुलबर्गापासून ६५ किमी अंतरावर हुमनाबाद (माणिकनगर)आहे.या ठिकाणी

राहण्यासाठी भक्तनिवास असून दुपारी १ वाजता महा प्रसादाची सोय आहे.श्री माणिक प्रभू संस्थान,माणिकनगर ता.हुमनाबाद जि.बिदर फोन

(०८४८३-२०३२४२)०९४४८४६९९१३


१०} *अक्कलकोट(सोलापूर,महाराष्ट्र)*:- अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्द पुरुष होते.पंजाब राज्यात पानिपत जवळ छेली या खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली.त्या मूर्तीने लगेच स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला.त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली.३०० वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले.एका लाकूड तोड्याने झाड तोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला.त्या मूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले.फिरत फिरत स्वामी १८४४ साली मंगळ्वेढ्यास आले.तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली अक्कलकोटला आले.अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे

त्यांचे समाधी काळपर्यंत होते.त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे.त्यांचे वास्तव्य नेहमी वटवृक्षाच्या खालीच असे.त्यावेळचे इंग्रज पत्रकार व इतिहासकार जनरल अल्कार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेऊन ब्रिटन मध्ये गेल्यावर असे जाहीर केले की,आजच्या काळात प्रभू येशू पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहे.स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजता समाधी घेतली.अक्कलकोट हे सोलापूरपासून ३५ किमी.अंतरावर आहे.सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त- निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट,अक्कलकोट,जि.सोलापूर

(०२१८१)२२०३२१,भक्त निवास-२२१९०९.


११} *माणगाव(सिंधुदुर्ग,कोकण महाराष्ट्र)* -योगीराज प.पु.वासुदेवानंद सरस्वती(टेंबे स्वामी) यांचे हे जन्मगाव.दत्तभक्त श्री गणेश शास्त्री आणि सौ.रमाबाई या ब्राह्मण दांपत्यांच्या पोटी श्रावण कृष्ण पंचमी शके १७७६ (दि.१३/०८/१८५४)

रोजी माणगावी स्वामीचा जन्म झाला. ते दत्त अवतारी सिध्द पुरुष होते.कारण गणेश शास्त्रींना गाणगापूरी सद्गुरू दत्तात्रेयांनी दृष्टांन्त देऊन मी तुझ्या कुळात जन्म घेईल असा आशिर्वाद दिला होता.श्री टेंबे स्वामींचे आयुष्य म्हणजे केवळ दत्तात्रेयांच्या कृपेने विकसीत झालेले आणि सर्वांच्या आयुष्यात सुगंध पसरविणारे ब्रह्मकमळ.स्वामींनी पायी भारत भ्रमण करून दत्त संप्रदायाचा प्रसार केला .त्यांच्या कार्याला दत्त संप्रदायात तोड नाही.त्यांना सर्व विद्या अवगत होत्या.श्री टेंबे स्वामी हे उत्तम वैद्य,मंत्रसिध्द,यंत्र- तंत्रज्ञ,उत्कृष्ट ज्योतिषी,मराठी व संस्कृत आध्यात्मिक वाड:मयातील प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिध्दकवी,वक्ते,हठयोगी,उत्कट

दत्तभक्त व साक्षात दत्तात्रयस्वरूप होते.एकच खंत वाट्ते की,त्यांना संसार सुख लाभले नाही.जन्मताच मुलाचा मृत्यु आणि त्यानंतर पत्नीचे देहावसान या गोष्टी ते टाळू शकत होते.पण प्रारब्ध भोग म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला.स्वामीजींना अनेक विद्या अवगत होत्या.अशा महान योगीराजाने गरुडेश्वर येथे १९१४मधे समाधी घेतली.माणगाव हे क्षेत्र

कोकणांत सिंधुदूर्ग जिल्हयात सावंतवाडी जवळ आहे.सावंतवाडी ते कुडाळ या बस मार्गावर माणगाव फाटा लागतो.तिथे उतरून बस मार्गाने ७ किमी. अंतरावर असलेल्या माणगावला जाता येते.सावंतवाडी साठी कोल्हापूरवरून नियमीत

बससेवा आहे.या ठिकाणी निवासा साठी भक्त निवास असून दुपारी १२ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे.(दत्त मंदिर,माणगाव,ता.कुडाळ,जि.सिंधुदूर्ग कोकण फोन

नं.०२३६२-२३६२४५,२३६४२५)


१२} श्री क्षेत्र कडगंची (गुलबर्गा,कर्नाटक):- वेदतुल्य अशा गुरु चरित्र ग्रंथाचे लेखन कडगंची येथे झाले.हे स्थान प्रसिध्दीस नव्हते.परंतु आता श्री सायंदेव दत्त देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.गाणगापूर पासून ३४ किमी.अंतरावर हे पुण्य स्थान आहे.सायंदेव साखरे हा श्री नृसिंह सरस्वतींचा प्रिय व श्रेष्ठ भक्त होता.त्याच्याच ५ व्या पिढीत सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला.श्री सिध्द मुनींनी सांगीतले आणि सरस्वती गंगाधर यांनी लिहीले तोच गुरुचरित्र ग्रंथ होय.गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी श्री सिध्दनाम धारक संवादे असा उल्लेख आहे.त्यातील नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधर होय.सायंदेवाचे घराचे जागेवरच श्री सायंदेव दत्त देवस्थानचे मोठे बांधकाम चालू आहे.येथील श्री दत्तात्रेयांची मूर्ती पाहून मन थक्क होते.श्री सायंदेव दत्त देवस्थान ट्रस्ट समिती कडगंची,ता.आळंद,जि.गुलबर्गा,कर्नाटक.फोन नं.-०८४७७-२२६१०३,९७४०६२५६७६


१३} मंथनगड(मंथनगुडी)महेबुब नगर(आंध्रप्रदेश) -श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरव्पूरला नवस फेडण्यासाठी जात असता याच ठिकाणी चोरांनी त्त्यास अडवून त्याची हत्या केली.त्यामूळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले,तेच हे ठिकाण हैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून हे क्षेत्र १० किमी.अंतरावर आहे.मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात.मतकल- नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथन गड येथून जातात.श्री क्षेत्र कुरवपुरला मतकल मार्गे जातांना अगर येतांना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन घ्यावे.


१४} गरुडेश्वर(नर्मदा,गुजरात):- हे क्षेत्र गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात येते.सुरत-अहमदाबाद या बस मार्गावर अंकलेश्वर हे गाव लागते.तिथे उतरून बस मार्गाने राजपिपला मार्गे गरुडेश्वर ६८ किमी अंतरावर आहे.राजपिपला हे तहसीलचे गाव आहे.शिरपूर-बडोदा,धुळे-बडोदा या बसेस राजपिपला मार्गे बडोद्याला जातात.त्यामुळे महाराष्ट्रातून गरुडेश्चरला जाणारया भक्तांसाठी शिरपूर किंवा धूळे येथून जाणे सोयीचे पडते.या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे.


🚩 *श्री गुरूदेव दत्त* 🚩

आतुरता शक्ती उपासना पर्वाची* , नवरात्र

 🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

    *आतुरता शक्ती उपासना पर्वाची*    

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

               

🌺🔱🌸🔆🙏🔆🌸🔱🌺


        *भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणांचा विशिष्ट उद्देश आहे. शारदीय नवरात्र हा तर नैराश्याचा अंत करुन आदिमातेकडून नवशक्ती प्राप्त करणारा कालखंड. जगताना जीवनात शक्ती हवीच. यामुळेच देवीच्या स्वागतासाठी मानवच नाहीतर सारेच सिद्ध झालेत.*

        *सुखावलेल्या निसर्गराजाने रंगीबेरंगी फुलांफळांची मुक्त उधळण केलेली आहे. ती बहरलेली झेंडूची.. गुलाबाची फुलेही आईच्या आगमनासाठी आतुर आहेत. बाजारही फुललेत.*

        *भारतात सगळेच सण सर्वदूर उत्साहानं साजरे होतात. पण तरीही काही प्रांताचे विशिष्ट सणांवर विशेष प्रेम आहे. मग कोकणाचे गणेशोत्सवावर तर बंगाल.. गुजराथ.. राजस्थान.. महाराष्ट्र हे या शारदीय नवरात्र उत्सवावर हक्क सांगतात.*

        *महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घोर निद्रेचा प्रारंभ झालायं. देवीची निद्रा संपून देवी ३ तारखेला पहाटे घटस्थापनेच्या दिवशी आपल्या सिंहासनावर विराजमान होईल.*

        *या विश्वाची रचना जगन्मातेने केलीय. तिच्याच छत्रछायेत.. तिच्या दयेने आमचे आनंदात जगणे सुरू आहे. सगळ्या दैन्य.. दुःख.. दैत्यांवर आदिशक्ती विजय मिळवते. आमच्या आशा आकांक्षाची पूर्तता करणारी म्हणून देवी ख्यातीप्राप्त आहे. आमच्या जीवनी सर्व शुभंकर घटना तीच पूर्णत्वास नेते.*

        *या मातेनेच अजातशत्रू होण्यासाठी मंजुळ वाणी आम्हांला प्रदान केली आहे. तर सर्वांविषयीचा पवित्र भावनांचा दृष्टीकोन या नयनी आहे. हे आई.. माय भवानी याच भरवशावर हे तुझे लेकरु तुझ्याकडे आलेय. या तुझ्या अजाण बाळाला तुझ्या कुशीत घे. माझ्याकडून होईल तशी तुझी सेवा गोड मानून घे. हेच काय ते मागणे.*

                 

🌹🔱🌸🛕🌺🛕🌸🔱🌹


        *सर्व मंगल मांगल्ये* 

        *शिवे सर्वार्थ साधिके ।*

        *शरण्ये त्र्यम्बके गौरी*

        *नारायणी नमोस्तुते ॥*


  *माय भवानी तुझे लेकरु*

  *कुशीत तुझिया येई*

  *सेवा मानून घे आई*


  *तू विश्वाची रचिली माया*

  *तू शीतल छायेची काया*

  *तुझ्या दयेचा ओघ अखंडित* 

  *दुरित लयाला नेई*


  *तू अमला अविनाशी कीर्ती*

  *तू अवघ्या आशांची पूर्ती*

  *जे जे सुंदर आणि शुभंकर* 

  *पूर्णत्वा ते नेई*


  *तूच दिलेली मंजुळ वाणी*

  *डोळ्यांमधले निर्मळ पाणी*

  *तुझ्या पूजना माझ्या पदरी* 

  *याविण दुसरे नाही*


🌷☘🛕🌸🌼🌸🛕☘🌷


  *गीत : सुधीर मोघे*  ✍

  *संगीत : मीना खडीकर*

  *स्वर : लता मंगेशकर*

  *चित्रपट : शाब्बास सूनबाई (१९८६)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧

 

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-०१.१०.२०२४-*


🌻🌼🥀🌸🌻🌸🥀🌼🌻

जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आयसीयु!

 जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आयसीयु!

दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म, जात, वर्ण, श्रीमंत, गरीब...‌एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री, पुरुष हा भेदही इथं नसतो!

तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडतात तिथेच गळून पडतात, मध्ये फक्त मानवी शरीर जातं!

आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू असतील... पण जो अर्थ , जे तत्वज्ञान इथं आयसीयुमध्ये मिळतं, ते कुठेच वाचायला मिळत नाही! आयुष्याचा अर्थ कळतो! 

म्हणून ही जागा फार सुंदर आहे...

एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. इथं आयसीयुच्या एकेका बेडवर आजवर शंभर, दोनशे... असंख्य लोक मेलेले असतात! कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला... एवढं सोप्पं असतंय तिथं!

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध...‌ आस्तिक, नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशिनमधून ऑक्सिजन जात असतो! 

आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो, कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, मेकअप बिघडला का, लोक हसतील माझ्या अवताराला, बोलण्याला, भाषेला... इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. नाकातला शेंबूड दिसू नये म्हणून दिवसभर कळत नकळत आपला आटापिटा सुरू असतो... तिथं हगणं, मुतणं माफ असतं! पुरुष असो की स्त्री... लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते!

वेळेची खरी किंमतही सर्वात जास्त इथेच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते... फक्त आणखी एक दिवस, एक तास, अजून पाच मिनिटं मिळावी...

बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वत: कडून, इतरांकडून... अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा...‌ असंख्य अपेक्षा! 

तिथे फक्त एकच अपेक्षा असते... फक्त एकदा डोळे उघड!


आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं... घमंड उतरतो! कधी वाटलंच की, माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं आहे तेव्हाही जायचं... आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे!

निसर्गाने माणूस निर्माण करतेवेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील 'माणूस' मला तिथे दिसतो...

म्हणून ही जागा जगात सर्वात सुंदर आहे!

Featured post

Lakshvedhi