🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*आतुरता शक्ती उपासना पर्वाची*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌺🔱🌸🔆🙏🔆🌸🔱🌺
*भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणांचा विशिष्ट उद्देश आहे. शारदीय नवरात्र हा तर नैराश्याचा अंत करुन आदिमातेकडून नवशक्ती प्राप्त करणारा कालखंड. जगताना जीवनात शक्ती हवीच. यामुळेच देवीच्या स्वागतासाठी मानवच नाहीतर सारेच सिद्ध झालेत.*
*सुखावलेल्या निसर्गराजाने रंगीबेरंगी फुलांफळांची मुक्त उधळण केलेली आहे. ती बहरलेली झेंडूची.. गुलाबाची फुलेही आईच्या आगमनासाठी आतुर आहेत. बाजारही फुललेत.*
*भारतात सगळेच सण सर्वदूर उत्साहानं साजरे होतात. पण तरीही काही प्रांताचे विशिष्ट सणांवर विशेष प्रेम आहे. मग कोकणाचे गणेशोत्सवावर तर बंगाल.. गुजराथ.. राजस्थान.. महाराष्ट्र हे या शारदीय नवरात्र उत्सवावर हक्क सांगतात.*
*महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या घोर निद्रेचा प्रारंभ झालायं. देवीची निद्रा संपून देवी ३ तारखेला पहाटे घटस्थापनेच्या दिवशी आपल्या सिंहासनावर विराजमान होईल.*
*या विश्वाची रचना जगन्मातेने केलीय. तिच्याच छत्रछायेत.. तिच्या दयेने आमचे आनंदात जगणे सुरू आहे. सगळ्या दैन्य.. दुःख.. दैत्यांवर आदिशक्ती विजय मिळवते. आमच्या आशा आकांक्षाची पूर्तता करणारी म्हणून देवी ख्यातीप्राप्त आहे. आमच्या जीवनी सर्व शुभंकर घटना तीच पूर्णत्वास नेते.*
*या मातेनेच अजातशत्रू होण्यासाठी मंजुळ वाणी आम्हांला प्रदान केली आहे. तर सर्वांविषयीचा पवित्र भावनांचा दृष्टीकोन या नयनी आहे. हे आई.. माय भवानी याच भरवशावर हे तुझे लेकरु तुझ्याकडे आलेय. या तुझ्या अजाण बाळाला तुझ्या कुशीत घे. माझ्याकडून होईल तशी तुझी सेवा गोड मानून घे. हेच काय ते मागणे.*
🌹🔱🌸🛕🌺🛕🌸🔱🌹
*सर्व मंगल मांगल्ये*
*शिवे सर्वार्थ साधिके ।*
*शरण्ये त्र्यम्बके गौरी*
*नारायणी नमोस्तुते ॥*
*माय भवानी तुझे लेकरु*
*कुशीत तुझिया येई*
*सेवा मानून घे आई*
*तू विश्वाची रचिली माया*
*तू शीतल छायेची काया*
*तुझ्या दयेचा ओघ अखंडित*
*दुरित लयाला नेई*
*तू अमला अविनाशी कीर्ती*
*तू अवघ्या आशांची पूर्ती*
*जे जे सुंदर आणि शुभंकर*
*पूर्णत्वा ते नेई*
*तूच दिलेली मंजुळ वाणी*
*डोळ्यांमधले निर्मळ पाणी*
*तुझ्या पूजना माझ्या पदरी*
*याविण दुसरे नाही*
🌷☘🛕🌸🌼🌸🛕☘🌷
*गीत : सुधीर मोघे* ✍
*संगीत : मीना खडीकर*
*स्वर : लता मंगेशकर*
*चित्रपट : शाब्बास सूनबाई (१९८६)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-०१.१०.२०२४-*
🌻🌼🥀🌸🌻🌸🥀🌼🌻
No comments:
Post a Comment