Thursday, 10 October 2024

भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित

 भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित

            संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी पाझर तलाव (भेंडाळे वस्ती) हा प्रकल्प मृद व जलसंधारण विभागाकडून पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभागास हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या तलावाचे काम पूर्ण झाले असून तलावाचा पाणीसाठा 141.42 सघमी आहे.

-----०-----

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना

 पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना

            पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशूसंवर्धनदुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            पुनर्रचनेनंतर पशूसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय असे या पदाचे नाव राहील. राज्यातील 351 तालुक्यांत तालुका पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कार्यालय सुरु करण्यात येईल. त्याचप्रमाणे 169 तालुक्यात तालुका लघू पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय सुरु करण्यात येतील. राज्यातील 2 हजार 841 पशू वैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे श्रेणी एक दवाखान्यात श्रेणीवाढ करण्यात येईल. त्याशिवाय 12 हजार 222 नियमित पदांना व कंत्राटी तत्वावरील 3 हजार 330 पदे यांच्या वेतनासाठी 1681 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला

 पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला

            पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            मौजे दापचरी व मौजे वंकास (ता.डहाणू) येथील कृषी व पदुम विभागाच्या 460.00.0 हे. आर जमिनीपैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निश्चित केलेली 377.26.19 हे. आर शासकीय जमीन तसेच मौजे टोकराळे येथील 125.55.2 हे.आर ही शासकीय जमीन प्रचलित वार्षिक बाजारमुल्य दर तक्त्यानुसार शेती दराने येणारी कब्जेहक्काची रक्कम आकारून भोगवटादार वर्ग-2 म्हणून एमआयडीसीला देण्यात येईल.

यह लड़की थाईलैंड की सबसे युवा *प्रधानमंत्री शिनावात्रा* उम्र 37 वर्ष है...

 यह लड़की थाईलैंड की सबसे युवा *प्रधानमंत्री शिनावात्रा* उम्र 37 वर्ष है...

ना कोई सुरक्षाकर्मी, ना लग्जरी कारों का बेड़ा, ना पैदल पुलिस, ना ट्रैफिक जाम, ना कोई अतिरेक प्रोटोकॉल, ना आम लोगों की रोजमर्रा की जिंदगी में बाधक, एक सच्ची जननेता .👍👌 *भारत में एक पार्षद या सरपंच या किसी को छोटा मोटा पद ही मिल जाय तो भाव देखने लायक, दो-चार आदमियों ओर कारो के साथ ही चलता है, इतना घमंड कि फूला नहीं समाता....👍*


जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आयसीयु

 जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आयसीयु!

दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म, जात, वर्ण, श्रीमंत, गरीब...‌एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री, पुरुष हा भेदही इथं नसतो!

तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडतात तिथेच गळून पडतात, मध्ये फक्त मानवी शरीर जातं!

आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू असतील... पण जो अर्थ , जे तत्वज्ञान इथं आयसीयुमध्ये मिळतं, ते कुठेच वाचायला मिळत नाही! आयुष्याचा अर्थ कळतो! 

म्हणून ही जागा फार सुंदर आहे...

एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. इथं आयसीयुच्या एकेका बेडवर आजवर शंभर, दोनशे... असंख्य लोक मेलेले असतात! कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला... एवढं सोप्पं असतंय तिथं!

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध...‌ आस्तिक, नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशिनमधून ऑक्सिजन जात असतो! 

आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो, कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, मेकअप बिघडला का, लोक हसतील माझ्या अवताराला, बोलण्याला, भाषेला... इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. नाकातला शेंबूड दिसू नये म्हणून दिवसभर कळत नकळत आपला आटापिटा सुरू असतो... तिथं हगणं, मुतणं माफ असतं! पुरुष असो की स्त्री... लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते!

वेळेची खरी किंमतही सर्वात जास्त इथेच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते... फक्त आणखी एक दिवस, एक तास, अजून पाच मिनिटं मिळावी...

बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वत: कडून, इतरांकडून... अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा...‌ असंख्य अपेक्षा! 

तिथे फक्त एकच अपेक्षा असते... फक्त एकदा डोळे उघड!


आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं... घमंड उतरतो! कधी वाटलंच की, माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं आहे तेव्हाही जायचं... आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे!

निसर्गाने माणूस निर्माण करतेवेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील 'माणूस' मला तिथे दिसतो...

म्हणून ही जागा जगात सर्वात सुंदर आहे!

चोरोकी टोळी, सावधान रहे

 






..

कथा पुण्यातील एका चौकाची....

 सत्यकथा


*कथा पुण्यातील एका चौकाची....*



     शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी साम्राज्यात केले. 


मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा पुर्‍या हिंदोस्तानात गाजत होता. 

अशाच वेळी अहमदशाहा अब्दाली दिल्लीवर चालून आला. दिल्ली हादरली होती...

मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली...


नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे....

भाऊंच्या हाताखाली होळकर, शिंदे, पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते...

      

दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती. एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते. याचवेळी भाऊची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती...


अशाच एका खलबतात जनकोची शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला...

तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला...

बघताबघता १०,००० सैन्य गारद केले...


पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले.. 

पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्‍या जनकोजीला लांबूनच पहात होते...

शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशिवभाऊंकडे परत आला. भाऊंनी त्याचा सत्कार केला. तसा जनकोजींनी भाऊंना प्रश्न विचारला, "माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता? आणि बळवंतराव काय करत होते जरा विचारा त्यांना.."

त्यावरुन शब्दाला शब्द झाला.. 

दरबार संपला....

सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले...


पण बळवंतरावांच्या बायकोला घडला दरबारातील प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच....

आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला...

तिने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले..

आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली. 

एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले...

आर्यपत्नी म्हणाली ,"या पराक्रम करुन आलात.. ओवाळते पंचारतीने.. आपण रक्ताचा थेंबही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात." बळवंतरावांनी मान खाली घातली..

तसा पत्नीच्या तोंडाचा पट्टा सुटला...

ती म्हणाली, "उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव? एका नामर्दाचा? की पळपुट्याचा? लाज कशी वाटली नाही तुम्हाला?"

   

पत्नी ताडताड बोलत होती...

आणि बोलता बोलता म्हणाली, "जा परत, गिलच्यांना ठेचा. त्याशिवाय तोंडही मला दाखवू नका.. जिंकून आलात ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन...."

      

गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले....

सत्वर हात तलवारीवर घालून निघाला..

बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकली...

बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले...

हर हर महादेव ..

जय भवानी..

जय शिवाजी.. 

आरोळी घुमली....

अफाट कापाकापी सूरु झाली....

गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते..

बळवंराव त्वेषाने दांडपट्टे फिरवत होते...

त्यांचे कान फक्त आकडे एकत होते...

हजार...

पाचहजार...

आठहजार....

एकच कापाकापी...

रक्ताचा चिखल अन प्रेतांचा ढीग दिसू लागला...

एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा हलगीचा नाद घुमला. फिरणाऱ्या दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल...

साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात....

बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले...

प्रत्यक्ष स्वामी....

फक्त माझ्यासाठी...

खरंच धन्य झालो मी आज...

पण एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली...

एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या...

भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला....

सदाशिवभाऊनी त्या अचेतन देहाला मिठीच मारली...

आदर्श प्रेमाच हे उदाहरण....

    भाऊंनी तो देह मागे आणला. पानपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली..

बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली...

त्या सती जाणार्‍या पत्नीला सदाशीवराव भाऊ सांगत होते...

"बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे, किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको..."

पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली...

तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की, याचा सांभाळ आपण करा...

आणि मोठा झाला की फक्त एव्हढंच सांगा त्याला "तुझे आई वडील का मेले" 

हीच आठवण द्या...

बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल, कारण तो वीराचा पुत्र आहे.....

पुढे १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचा रणसंग्राम झाला....

मराठे तळहातावर शीर घेऊन लढले. 

देशासाठी ..

धर्मासाठी....

महाराष्ट्राची एक तरुण पिढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली ...

         पण,पानिपतात जय मिळवूनही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची...

अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला....


पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा....

राष्ट्रभक्तीचा....

आणि १७७५-७६च्या वर्षात मराठ्यांनी पुन्हा दिल्लीला धडक दिली...

पार सिंधूपर्यत भगवा रोवला....

यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता...

पानपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता...

*आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले....तो पोर म्हणजेच...लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा...*

*आप्पा बळवंत मेहेंदळे....*

*आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा.....*


त्याच्या पराक्रमावर बेहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली उभी करुन दिली....

आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नाव ठेवले गेले


 *"आप्पा बळवंत चौक..."*


     या चौकाच्या नावाच्या निमित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे...

स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्‍या सदाशिवरांवांचे... 

आणि 

आई वडीलांचा शब्द साकार करणार्‍या त्या आप्पा बळवंतांचे....


राष्ट्रासाठी स्वतःची आहुती देणार्‍या या सार्‍या वीरपुरुषांना दंडवत


 *आप्पा बळवंत चौक* 

या नावाचा आज अर्थ उमगला.🙏🏼

Featured post

Lakshvedhi