Sunday, 29 September 2024

रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

 रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी

सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान

पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले अभिनंदन

 

मुंबईदि.२८: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्निल कापडणीस,सरपंच सचिन तोडणकरउपसरपंच दत्ताराम भुवडकृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. 

या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९९१ गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ३६ गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रातील १२६ ग्रामपंचायतीने यामध्ये सहभाग घेतला होता. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी कर्दे गावाला मान्यता मिळाली.

            रत्नागिरीच्या किनारपट्टीवर वसलेले कर्दे हे गाव स्वच्छ समुद्रकिनारेपांढरी वाळू आणि नयनरम्य परिसर यामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे आणि यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

            २०२३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचा उद्देश ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्या भागातील पर्यटनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गावांच्या प्रयत्नांना मान्यता देणे हा आहे. कृषी पर्यटनमहिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासासाठीच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनांसाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. गावाने पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापरजल व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यासह विविध उपक्रम राबवले आहेत.

शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या गावाच्या प्रयत्नांची आणि स्थानिक पर्यावरण आणि संस्कृती जतन करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेची मान्यता म्हणून हा पुरस्कार दिला जातो.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार 'हर घर दुर्गा' अभियानाचा शुभारंभ

  

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार

'हर घर दुर्गाअभियानाचा शुभारंभ

 - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई दि. 28: दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असूनवाईट प्रवृत्तींचा नाश करते. त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे.

या अभियानामार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये वर्षभर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींव्यतिरिक्त इतर महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतातअसे मंत्री श्री. लोढा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या अभियानामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात येणार आहे. इतर विषयांप्रमाणे आत्म संरक्षणाच्या सुद्धा तासिका असाव्यात अशी मंत्री श्री. लोढा यांची संकल्पना होती, त्यानुसार 'हर घर दुर्गा अभियानराबविण्यात येत आहे.

नवरात्र उत्सवात स्वसंरक्षण शिबिराचा एक कार्यक्रम ठेवावा, असे सांगून सर्व मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी या अभियानाला साथ द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

राज्यातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे नुकताच घेण्यात आला. त्या अनुषंगाने कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये एचपी कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक दर्जाचे डिजिटल एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले असूनत्याचे देखील उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंत्री श्री. लोढा यांनी दिली.

0000

अत्याधुनिक उद्यान विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण

 अत्याधुनिक उद्यान विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण

 

नाशिकदि. 28 : नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकर जागेत साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे व तेवढेच दर्जेदार आहे. या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसेआमदार संजय शिरसाटमहानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकरमाजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेया उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे, ते उपयुक्त ठरेल. तसेच उत्तम कलादालनसाहसी खेळांचा येथे समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे अभूतपूर्व होती. व्यंगचित्रेछायाचित्रे श्री. बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या उद्यानामध्ये पाहावयास मिळणार आहेत. विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण करणे गरजेचे आहे. चांगले रस्तेउड्डाणपूलमेट्रो आणि पायाभूत सुविधांबरोबरच उद्यानेही आवश्यक आहेत. धकाधकीच्या आयुष्यामध्ये  या उद्यानाच्या माध्यमातून क्षणभर विश्रांती उपलब्ध होणार आहे. या उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे आहेत. सर्वच बाबतीत हे उद्यान परिपूर्ण होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती साधत आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यशासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव भगूरमधील विविध विकास कामांसाठी शासनाने 40 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पारदर्शक व निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुकांचे नियोजन

 पारदर्शक व निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुकांचे नियोजन

-         केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

Ø  विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन

Ø  महिला मतदारांच्या नोंदणीत १०.१७ लाखांची वाढ. ७.७४ लाख महिला नवमतदार

Ø  कातकरीकोलममारिया गोंड  या आदिवासी मतदारांची १०० टक्के नोंदणी

Ø  शहरी भागातील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टींग

Ø  १९.४८ लाख नवमतदार

Ø  उंच इमारतींमध्ये एक हजार ११८ मतदान केंद्रांची सुविधा

Ø  यादीत नाव तपासण्यासाठी VHA तर गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी C-Vigil ॲप

मुबंई,दि.२८: महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या असून लोकशाहीच्या या उत्सवात महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी विशेषतः शहरी भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे सहभागी होत मतदानाचा टक्का वाढवावाअसे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे केले.

हॉटेल ट्रायडंट येथे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने यंत्रणांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री.राजीव कुमार माध्यमांना संबोधित करत होते. निवडणूक आयुक्त सर्वश्री ग्यानेश कुमार,  डॉ.सुखबीर सिंह संधूवरिष्ठ उप निवडणूक आयुक्त सर्वश्री धमेंद्र शर्मानितेश व्यास,  मनीश गर्ग,  उप निवडणूक आयुक्त सर्वश्री हर्देश कुमार,  अजित कुमारमनोजकुमार साहू,  संजय कुमार, सह संचालक अनुज चांडक आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम उपस्थित होते.

श्री.राजीव कुमार यांनी सांगितले की महाराष्ट्रात एकूण २८८ मतदार संघ असून  सर्वसाधारण मतदार संघ २३४अनुसूचित जमातींसाठी राखीव २५ तर अनुसूचित जातींसाठी २९ मतदारसंघ राखीव आहेत. राज्यात एकूण ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ४.९५ कोटी पुरुष तर ४.६४ कोटी  महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी ५९९७ दिव्यांग ६.३२ लाख इतके मतदार आहेत. ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या १२.४८ लाख आहे. तर १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या १९.४८ लाख इतकी आहे. राज्यात राबवण्यात येत असेलल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामुळे महिला मतदारांची नोंदणी मोठ्या संख्येने वाढलेली असून १०.१७ लाख या प्रमाणात  झालेली वाढ ही अभिनंदनीय बाब आहे. हजार पुरूषांमागे महिलांची संख्या ९१४ वरून ९३६ इतकी वाढली आहे. तसेच १८ ते १९ वयोगटातील नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या महिलांची संख्या ७.७४ लाख इतकी असल्याचे त्यांनी सांगितले.

शंभर पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ४९ हजार ३४ इतकी असून निवडणूक आयोगामार्फत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांसाठी घरपोच मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ज्येष्ठ मतदार हे मतदान कक्षावर येऊन मतदान करण्यासाठी उत्सुक असतात, हे लोकसभेच्या मतदानाच्या वेळी प्रकर्षाने दिसून आले. ही बाब युवा मतदारांसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगून श्री.राजीवकुमार यांनी नवमतदार तसेच महिला आणि शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी पुढे येत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केले.

राज्यात  एक लाख १८६ मतदान केंद्र असून शहरी भागात ४२ हजार ५८५ तर ग्रामीण भागात ५७ हजार ६०१ मतदान केंद्र असणार आहेत. २९९ मतदान केंद्र हे दिव्यांग संचलित असतील तर ३५० हे युवा संचलित असतील. महिला संचलित मतदान केंद्रांची संख्या ३८८ असेल. प्रत्येक मतदान केंद्रावर मदत केंद्रदिव्यांगांसाठी स्वच्छतागृहपिण्याचे पाणी यासह सर्व आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करुन देण्याचे नियोजन असल्याचे श्री.राजीवकुमार यांनी यावेळी सांगितले.

अति दुर्गम भागात प्रत्येकाच्या घरी जाऊन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. त्यात कातकरीकोलममारिया गोंड या आदिवासी समाजातील मतदारांची शंभर टक्के नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच रोजंदारी कामगारांनाही मतदानासाठी भरपगारी रजा देण्याच्या सूचना आयोगाने संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

मतदारांसाठी ऑनलाईन सुविधा

मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी VHA ॲप तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास C-Vigil ॲपवर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. ज्यावर आयोगामार्फत तातडीने कारवाई करण्यात येईल. निवडणुकीतील उमेदवारांच्या संदर्भातील माहिती KYC (Know Your Candidate) या ॲपवर उपलब्ध असणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील ११ राजकीय पक्षांसोबत आढावा घेतला असून येत्या काळात असलेल्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची सूचना राजकीय पक्षांनी केल्याचे श्री.राजीव कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, शहरी भागात मतदानासाठी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर गर्दी होत असते हे लक्षात घेऊन पूरक सुविधांसह अधिक संख्येने मतदान केंद्रांची उपलब्धता ठेवण्याच्या सूचनांचा आयोग विचार करणार आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही कायदा व सुव्यस्थेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचा आढावा घेऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर होणार नाही यासाठी तसेच मद्य, अंमलीपदार्थांचे वाटप या सारख्या केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. मतदारांना जास्तीत जास्त सुलभतेने मतदानाचा हक्क बजावता यावायादृष्टीने सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

देशात कमी मतदानाचा टक्का असलेल्या महाराष्ट्रातील शहरी भागातील प्रामुख्याने कुलाबाकल्याणमुंबादेवीपुणे या सारख्या शहरांतील मतदारांनी आपल्या भागातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आर्वजून पुढे यावे. अद्यापही ज्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदविले नाही ते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. ही प्रक्रिया आयोगामार्फत निरंतर सुरू आहे, असे सांगून सर्व मतदारांनी आपल्या लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने  सहभागी व्हावे असे आवाहन श्री.राजीव कुमार यांनी यावेळी केले.

000

 

सारथी’ च्या विभागीय कार्यालयासह 225 कोटींच्या विविध इमारतींचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन

  

 सारथी’ च्या विभागीय कार्यालयासह 225 कोटींच्या विविध इमारतींचे

मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन


नाशिकदि. 28: नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटींच्या विभागीय कार्यालयासह विविध इमारती बांधण्यात येणार आहेत. या विभागीय कार्यालयासह अभ्यासिका, 500 मुलांची व 500 मुलींची वसतिगृह इमारत तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनींसाठीचे वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीससार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भूमिपूजन झाले.

भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदेसीमा हिरेॲड. राहुल ढिकलेमाजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार हेमंत गोडसेसकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदी उपस्थित होते.

यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करण्यात आला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारित विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक

 महापुरुषांची स्मारके प्रेरणादायी आणि दिशादर्शक

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक येथे महात्मा फुलेसावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण

 

नाशिकदि. 28: महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरीकामगारमहिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे. महापुरुषांची स्मारके प्रेरणादायीऊर्जा देणारी आणि दिशादर्शक असतातअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मंत्री श्री. भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज दुपारी संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारपालकमंत्री दादाजी भुसेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीफुले दाम्पत्याचे काम उत्तुंग आहे. त्यांच्या आदर्शांवर वाटचाल करणे हे आपले कर्तव्य आहे. महापुरुषांनी सामाजिक समतेचा पाया घातला. महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य आहे. त्यामागे महात्मा जोतिराव फुलेराजर्षी शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा जोतिराव फुले यांना आपले गुरू मानले होते. महात्मा जोतिराव फुले यांनी ब्रिटीश साम्राज्याला आव्हान देत शेतकरीकामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडत तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले. पुण्यातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्याचे स्मारकात रुपांतर करण्यात येणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

राज्यात औद्योगिकपायाभूत सुविधा मजबूत होत आहेत. राज्यआर्थिक दृष्ट्या सक्षम बनत असल्याने सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात चांगले काम करता येणार आहे. शिक्षणआरोग्यकृषीसिंचनरोजगार-स्वयंरोजगारउद्योगकौशल्य विकासात आपण सर्व घटकांचा विचार करीत आहोत. क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. आता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमहात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचासंविधानाचा मार्ग दाखविला आहे. त्याच मार्गावरून आपल्याला वाटचाल करायची आहे.  महात्मा फुले यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारणांसाठी लढा दिला. ते युग पुरुष होते. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांनी समाजाला शिक्षणाचा मंत्र दिला. त्यामुळे परिवर्तन घडून आले. सामाजिक कार्यात त्यांचे नाव अग्रेसर राहीलअसेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमहात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक समतेचा लढा देत स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी दिलेल्या सत्यशोधक विचारांवर देश उभा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. मुलींची देशातील पहिली शाळा असलेल्या भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तेथे मुलींची शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. फुले दांपत्याला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. महात्मा जोतिराव फुले यांच्या मूळ गावी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा सुरू करण्यात येईलअसे सांगत त्यांनी नाशिकमध्ये उभारण्यात आलेले स्मारक वैभवात भर घालणारे आहेअसे ही सांगितले.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले कीमहात्मा जोतिराव फुलेसावित्रीबाई फुले यांनी आयुष्यात विविध संकटांवर मात करुन आपले कार्य सुरू ठेवले. त्यांनी विविध क्षेत्रात कामगिरी बजावून सामाजिक प्रश्न हाताळले. प्लेगच्या साथीत त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांनी सर्वच पंथांचा विचार केला आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळे हे देशातील सर्वांत मोठे अर्ध पुतळे आहेत. त्यांनी केलेले काम कायम संस्मरणीय आहे. सर्वांना शिक्षणशेतकऱ्यांना मदत आणि महिलांचे सबलीकरण हे सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न साकारण्याचे काम राज्य शासन करीत आहेअसेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

०००००

 



Saturday, 28 September 2024

वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

 वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंदसमाधानाचे क्षण आणण्यासाठी

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना



- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ

 

कोल्हापूरदि.२८ (जिमाका): आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभवज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदसमाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते  हिरवा झेंडा दाखवून रेल्वेच्या प्रवासाला सुरूवात झाली. खासदार धैर्यशील माने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी शुभेच्छा संदेशाद्वारे म्हणालेतीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ आई अंबाबाईच्या करवीर येथून होत आहेयाचा मनापासून आनंद होत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील पहिली रेल्वे अयोध्येसाठी रवाना होते आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य असे मंदिर साकारलेले आहे. प्रभू रामांचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळतेयत्यामुळे कोल्हापूर ते प्रभू श्री रामांची जन्मभूमी अयोध्या या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आई अंबाबाईच्या चरणी प्रणाम करून सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराजांनाही विनम्र अभिवादन केले.

            ज्येष्ठांना राज्य व देशातील तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक समाधान मिळवणे सोपे होणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांचा आपण प्रवासनिवासभोजन खर्च करणार आहोत. भारतातील ७३ आणि आपल्या राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश केला आहे. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते आहे. तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषधवैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक न्याय विभागाचे १०वैद्यकीय मदतीसाठी तीन तर आयआरसीटीसीचे २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोल्हापुरातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून अंमलबजावणी सुरू होईलअसा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

            योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जातेय हे माझे भाग्यच - पालकमंत्रीहसन मुश्रीफ

शासनाकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शुभारंभ कोल्हापुरातून होतोय याचा आनंद झाल्याचे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जातेय हे माझे भाग्यच असल्याची भावना व्यक्त केली. यात्रेकरूंना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता अधिकारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

 

 

Teertha Darshan scheme aimed at bringing joy and moments of satisfaction in the lives of elderlies – Chief minister Eknath Shinde

Kolhapur, Sept 28 – Stating that elderlies in the society is our treasure since whatever efforts they took in their lives, chief minister Eknath Shinde said that their knowledge and experience is a rich legacy for us which is why it is our responsibility to bring joy and satisfaction in their lives. He said that with this feeling, the department of social justice and special assistance has launched Chief Minister Teertha Scheme for the citizens above 60 years from all the religions. Chief minister launched the scheme statewide via video conference. Minister for medical education and special assistance Hasan Mushrif who is also guardian minister for Kolhapur district showed green flag which marked actual start of the railway journey under this scheme.  MP Dhairyasheel Mane was chief guest for the function a Kolhapur where 800 senior citizens started their journey with slogans of Jai Shreeram, Jai Shreeram.

Stating that he was happy that Teerth Darshan scheme is being launched with Dakshin Kashi, Aai Ambabai’s Kolhapur or Karvir, chief minister Shinde bowed before Aai Ambabai and Rajarshi Shahu Maharaj who was champion of social cause. He said that Prime Miniser Narendra Modi has brought in to reality the Ram Temple at Ayodhya and the first trip under Teertha Darshan scheme is going to Ayodhya which would provide an opportunity to all the participants. Congratulating all 800 senior citizens participating in he first inaugural trip the chief minister extended them his best wishes for the happy journey.   

The senior citizens would be able to avail peace of mind along with spiritual satisfaction by visiting pilgrim centres in the state and in the country. The district level committees have been founded for this scheme and the state would bear the expenses for journey, stay and food of the selected beneficiaries. There are 66 from state and 73 pilgrim spots from all over the country included in this scheme and the scheme would be run in a transparent manner and with online registration.

Here are various facilities like medical aid is also provided in the train during the journey and for the help of participants, 10 employees from the social justice department along with 3 persons for medical help and 24 IRCTC have been deployed. Chief minister Shinde expressed confidence that with the launch from Kolhapur, this scheme would be implemented from all the districts of the state.

It's my fortune that the first train in this scheme is launched from Kolhapur

– Guardian Minister Hasan Mushrif

 

Expressing his happiness that earth Darshan scheme is being launched from Kolhapur, guardian minister Hasan Mushrif said that he is fortunate since the first train is starting journey under this scheme from Kolhapur. He assured that he officials from his department are taking due care so that there is no inconvenience to any of the passengers ravelling under this scheme.

0000

 

 

 

 

बुजुर्गों के जीवन में खुशीसमाधान के पल लाने के लिए मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे

वीडियो कोन्फ्रेंस के द्वारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों व पालकमंत्री हसन मुश्रीफ की प्रमुख उपस्थिति में कोल्हापुर में मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का राज्यस्तरीय शुभारंभ

कोल्हापूरदि.२८ (जिमाका): हमारे बुजुर्ग ही हमारी संपत्ति है और आज तक जिन्होंने परिश्रम किए हैउनका अनुभवउनका ज्ञान यहीं हमारे लिए बड़ा उपहार है। इसलिए उनके जीवन में खुशीसमाधान के पल लाने की ज़िम्मेदारी भी हमारी ही है। इसी भावना से हमने राज्य के सभी धर्मियों के साठ सालऔर उसके ऊपर आयु के ज्येष्ठ नागरिकों के लिए सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग के जरिये मुख्यमंत्री तीर्थ योजना शुरू की हैयह प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने वीडियो कॉन्फ़ेंस के द्वारा दिये संदेश से किया। इस अवसर पर उनके हाथों मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न हुआ। इस दौरान कोल्हापूर में चिकित्सा शिक्षण व विशेष सहायता मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ ने हरी झंडी दिखाकर रेल यात्रा की शुरुआत की। सांसद धैर्यशील माने इस दौरान प्रमुखता से उपस्थित थे। जय श्रीराम जय जय श्रीराम’ के जयघोष में 800 जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शन के लिए विशेष रेलवे से  रवाना हुये।

मुख्यमंत्री शिंदे ने शुभकामना संदेश में कहा कि  तीर्थ दर्शन योजना का शुभारंभ दक्षिण काशीआई अंबाबाई के करवीर से होता हैइस बात की बहुत खुशी हो रही है। उन्होंने माँ अंबाबाई के चरणों में प्रणाम कर सामाजिक क्रांति के प्रणेता राजर्षी शाहू महाराज को भी विनम्र अभिवादन किया। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना की पहली रेलवे अयोध्या के लिए रवाना हो रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ने अयोध्या में प्रभू श्रीराम का विशाल ऐसा मंदिर बनाया है। प्रभू श्रीराम का दर्शन करने का अवसर इस यात्रा के शुभारंभ के औचित्य से हम यात्रियों को मिल रहा है। इसलिए दक्षिण काशी कोल्हापूर से प्रभू श्री राम की जन्मभूमि आयोध्या इस तीर्थयात्रा में सहभागी होनेवाले सभी ज्येष्ठ नागरिकों का अभिनंदन करते हुये उन्हें शुभकामनाएँ दी।

ज्येष्ठों को राज्य और देश के तीर्थ स्थलों को जाकर मनःशांति और आध्यात्मिक समाधान पाना अब सहज होगा। इसके लिए जिलास्तर पर समिति का गठन भी किया गया है। चयनित लाभार्थियों का हम यात्रानिवासभोजन खर्च करेंगे। भारत के 73 और हमारे राज्य के 66 तीर्थक्षेत्रों का इस योजना में समावेश किया है। यह योजना पारदर्शक और ऑनलाईन पद्धति से चलाई  रही है। 

तीर्थयात्रा में शामिल ज्येष्ठों के लिए रेलवे में औषधचिकित्सा सुविधा भी उपलब्ध कराई गई है। जेष्ठ नागरिकों की मदद के लिए सामाजिक न्याय विभाग के 10, चिकित्सा मदद के लिए 3 और आयआरसीटीसी के 24 कर्मचारी नियुक्त किए गए है। कोल्हापुर से शुरू होनेवाले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का अब राज्य के सभी जिलों से क्रियान्वयन शुरू होगायह विश्वास मुख्यमंत्री शिंदे ने इस दौरान व्यक्त किया।

 

  योजना की पहली रेलवे कोल्हापुर से जा रही है यह मेरा सौभाग्य ही है-पालकमंत्रीहसन मुश्रीफ

 

सरकार की ओर से मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना का शुभारंभ कोल्हापुर से हो रहा है इस बात की खुशी होने की बात कहते हुये पालकमंत्री हसन मुश्रीफ ने कहा की इस योजना की पहली रेलवे कोल्हापुर से जा रही हैयह मेरा सौभाग्य है। यात्रियों को यात्रा में किसी भी प्रकार की दिक्कत नहीं आएगीइस बात का ध्यान हमारे अधिकारी रख रहे है।

०००००००

Featured post

Lakshvedhi