Thursday, 26 September 2024

खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

 खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन

उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. २६ :- खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहेज्या शेतकऱ्यांनी अद्याप   ई-केवायसी केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहेवनपट्टा धारक शेतकरीज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाहीअशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे .

हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून  जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदारांपैकी  ६८ लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांचे ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी २.३० लाख खातेदार यांनी  २५ सप्टेंबर २०२४ अखेर ई-केवायसी पूर्ण केले आहे. याव्यतिरिक्त शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करावयाचे आहेत्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे लॉगीन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी करतील. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रीकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सीएसी (CSC) जावून सुद्धा ई-केवायसी करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बमेंट स्टेट्स (Disbursement status) येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त ओटीपी किंवा सीएसी केंद्रातील बायोमॅट्रीक मशिनच्या माध्यमातून ते ई-केवायसी पूर्ण करु शकतात. तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करुन घ्यावेअसे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000

नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार

 नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी महाप्रित आणि


एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांच्यात करार


 


मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नाविन्यपूर्ण नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी सहकार्य करण्यासाठी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रित) आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड एनजीईएल (NGEL) यांच्यात मुंबई येथे संयुक्त उपक्रम करार झाला आहे . या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट 10 गीगावॅट क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी पार्क आणि अक्षय ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येतील. जेणेकरून राज्याच्या ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे.


या संयुक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून महाप्रित आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड विविध अक्षय ऊर्जा प्रकल्प जसे की ग्राउंड माउंटेड सोलर, फ्लोटिंग सोलर, बॅटरी एनर्जी स्टोरेज, हायब्रीड सोलर, ई. प्रकल्प विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील आणि या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमधून 40% वीज निर्मिती अपेक्षित आहे. ही भागीदारी महाराष्ट्राच्या 2030 च्या अक्षय उर्जा निर्मितीच्या ध्येयात लक्षणीय योगदान देईल अशी अपेक्षा आहे.


या संयुक्त उपक्रमामुळे राज्यात तांत्रिक आणि गैर-तांत्रिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच सुमारे 30 हजार एकर बिगरशेती आणि नापीक जमीन या प्रकल्पासाठी वापरात येईल जी स्थानिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक येण्यास मदत होईल.


यावेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी एनजीईएल सोबतचे हे सहकार्य राज्यातील नवीकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधा वाढविण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे असे सांगितले.


एनजीईएल चे सीईओ राजीव गुप्ता म्हणाले, एनजीईएल महाप्रितशी संलग्न होऊन ह्या अपारंपरिक उर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी करतील. यावेळी महाप्रित आणि एनजीईएल चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


००००

श्रीगणपतीचे साडेतीन पीठाची माहिती......🚩

 *🚩श्रीगणपतीचे साडेतीन पीठाची माहिती......🚩*


 सर्व साधारणपणे लोकांना अष्टविनायक माहित आहेत पण गणेशाची साडेतीन पीठे माहित नसतील म्हणून हा लेखनप्रपंच. 


महाराष्ट्रामध्ये गणेशाची साडेतीन पीठे आहेत. मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ मोरगाव व जिथे कमरेपर्यंतचा धडाचा भाग पडला ते राजूर  येथे दुसरे पीठ .कमरे पासून पाया पर्यंतचा भाग जिथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ महान गाणपत्य मोरया गोसावी याना करा नदीत स्नान करताना त्याच्या ओंजळीत गणपतीची मूर्ती आली .हि मूर्ती घेऊन मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगांवी जात असत. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला. म्हणून हे अर्ध पीठ ओळखले जाते. "गणपती बाप्पा मोरया " हा घोष  हा तेव्हा पासून सुरु झाला.

 

*पहिले पीठ श्रीक्षेत्र मोरगाव*


 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.


*दुसरे पीठ श्रीक्षेत्र राजुर (जालना)*


श्री राजूरेश्वर - राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला  फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.

         

मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात.

               हा गणपती नवसाच्या समईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाजे सव्वाशे समया रोज तेवत असतात. शेकडो समयांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर, राजापूर येथे आणले, म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे ही पर्वणी मानली जाते. 


*तिसरे पीठ पद्मालय (जळगाव)*


पद्मालय - येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म (कमळे) फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.

               समुद्रमन्थनाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्न झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी,तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धरणीश्वर गणेश' म्हणतात.


*अर्धपीठ श्रीक्षेत्र चिंचवड*


चिंचवड - चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावींच्या मुळे याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणेश तांदळा स्वरुपात आला. तो घेऊन ते मोरगांवी वारी करीत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली.

बैसूनी पाण्यावरी वाचिली न्यानेश्वरी, पहाच pl शेअर

 


श्री दत्त मंदिर* मुरूड, जि.रायगड

 *श्री दत्त मंदिर*

मुरूड, जि.रायगड


संकलन - सुधीर लिमये पेण 


मुरुड गावचे उत्तरेकडे टेकडीवर समुद्रसपाटीपासून सुमारे ३५० ते ४०० मीटर उंचीवर १०६ गुंठे जमिनीवर हे श्री. दत्त गुरूंचे मंदिर आहे. ते अतिशय सुंदर व अप्रतिम ठिकाण आहे.  हे मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक लहान मोठ्या व्यक्तींचे योगदान आहे. १८ व्या  शतकाच्या मध्यास ब्रम्हेंद्रस्वामी धावडशिकर या सिद्धी प्राप्त साधूने या टेकडीच्या माथ्यावर सपाट मैदानात उंबराच्या झाडापाशी श्री दत्तगुरूंच्या पवित्र पादुकांची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका आहे. 


२० व्या शतकाच्या प्रारंभिक १९०६  ते १९०७ च्या सुमारास जंजिरा संस्थानाच्या सरन्यायाधीश पदी असलेल्या राजाध्यक्ष यांनी स्वखर्चाने छोटीशी दत्तगुरूंची मूर्ती आणून त्या मूर्तीची त्या ठिकाणी विधिवत प्रतिष्ठापना केली. सोबत मूर्ती पुढे त्यापूर्वी ब्रम्हेंद्रस्वामीनी स्थापित केलेल्या श्री दत्तगुरूंच्या पादुका स्थापित केल्या त्या आजतागायत आहेत.


या ठिकाणी  प्रशस्त मंदिर बांधले जावे अशी भक्तांची इच्छा होती. त्याप्रमाणे १९२६-२७ मध्ये दत्त मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. यावेळी मंदिरातील सभागृह कौलारू जे होते ते आज देखील जपून ठेवण्यात आले आहे. सभागृहात छताला लाकडी सिलिंग होते. त्यावर दत्त मंदिरातून दिसणा-या आजूबाजूच्या परिसराची चित्रे कोरण्यात आली होती. त्यावेळी जिर्णोद्धाराचे कार्यात  कै. चिंतामणी अनंत जोशी यांचा पुढाकार होता. कालांतराने अलीकडे पुन्हा सन १९९७ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. सदरचा जिर्णोद्धार चौलकर कुटुंबाने पुढाकार घेऊन केला असून. दत्तगुरूंच्या मूर्तीसाठी लाकडी देव्हारा करण्याचे काम देखील चौलकर  कुटुंबाने खर्च करून श्री नयन जमादार यांच्या कामगिरीतून पार पाडले आहे. श्री नरेश खोत व विलास खोत या बंधूंनी आगरदांडा रस्त्यापासून थेट मंदिरापर्यंत दगड व मुरूम यांच्या साह्याने रस्ता तयार करून त्यावर डांबरीकरण केले आहे.


सदरचे मंदिर टेकडीवर असल्याने तेथून मुरुड शहरातील निसर्गरम्य अशी नारळी पोकळींच्या हिरवागार भागांचे दर्शन होते.


Heart' अटॅक वर तत्काळ उपाय

 


दिलखुलास’ कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक नवनाथ वाठ यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे

संचालक नवनाथ वाठ यांची मुलाखत

 

मुंबईदि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात 'स्वच्छता हीच सेवाया अभियानाची अंमलबजावणी या विषयावर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे (नागरी) 2.0 राज्य अभियान संचालकनवनाथ वाठ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. याच धर्तीवर स्वच्छता हाच आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणेरस्ते झाडणेपाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  हस्ते आरंभ झालेले हे राज्यस्तरीय अभियान 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अभियानाची अंमलबजावणीवैशिष्ट्ये आणि अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम याबाबत अभियानाचे संचालक श्री. वाठ यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत गुरूवारदि. 26 व शुक्रवार दि.27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Featured post

Lakshvedhi