Monday, 23 September 2024

विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा

 विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबईदि. 23 : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावाअसे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. वेळ ही अमूल्य बाब असून आयुष्यात त्याचा योग्य वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पीएचडीपदव्युत्तर पदवी तसेच पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रपदक देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरचे संचालक भिमराया मेत्रीडॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणालेज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविणे हे शासनाच्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्याला शिक्षित करण्यामध्ये शिक्षक आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेतील आपण महत्त्वाचा घटक असून आयुष्याच्या पुढील वाटचालीत आपणही आपले कर्तव्य पार पाडून समाजासाठी योगदान द्यावे. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला जगाशी स्पर्धा करायची असून क्वचित अपयश आले तरीही खचून न जाता ज्ञानाच्या पाठबळावर एकाग्रतेने काम करायश नक्की मिळेलअसा सल्ला त्यांनी दिला.

श्री. मेत्री यांनी आयुष्यात केवळ स्वतःला ओळखणे नव्हे तर सिद्ध करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी अपयशाची भीती न बाळगता मोठी स्वप्ने पाहावीत आणि वेगळी कामगिरी करून दाखवण्याची जिद्द ठेवावीअसे सांगितले.

दीक्षांत समारंभात विज्ञान आणि तंत्रज्ञानवाणिज्य आणि  व्यवस्थापनमानवता विद्या शाखाआंतरविद्या शाखा अशा विविध शाखांमधून १ हजार १३० पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात येत असून त्यापैकी ७७८ पदवीधर३४१ पदव्युत्तर आणि ११ जणांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपालांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना पदवी तर विविध परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. या दीक्षांत समारंभात ५३ टक्के विद्यार्थिनी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रारंभी कुलगुरू प्रा. कामत यांनी विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल सादर केला.

000

 

Governor  presides over the  Convocation of

the Dr Homi Bhabha State University

 

 Mumbai, 23rd Sept : The Governor of Maharashtra and Chancellor of universities C.P. Radhakrishnan presided over the Annual Convocation of the Dr Homi Bhabha State University at the Sir Cowasjee Jehangir Convocation Hall in Mumbai. Degrees were awarded to more than 1500 students passing the UnderGraduate and Postgraduate examinations. Ph D degree was awarded to 11 candidates. Medals and Certificates were presented to meritorious graduates.

Director of IIM Nagpur Dr Bhimaraya Metri and Vice Chancellor of HBSU Dr Rajneesh Kamat, Registrar Prof Vilas Padhye, Members of General Council, Academic Council, Management Council, faculty and students were present.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी

केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा

 

नवी दिल्लीदि. 23 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे  अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई  दौ-यावर  येणार आहेत.

27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची  विविध राजकीय पक्षएसपीएनओनोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिवपोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत  निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईलअसे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.


अन्न व औषध प्रशासन विभागाकडील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार

 अन्न व औषध प्रशासन विभागाकडील

भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार

- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील

५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

 

मुंबईदि. २३ :- अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट क) ३७ पदे व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब (अराजपत्रित) १९ पदे अशी एकूण ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज सदर करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ आहे. या पदाभरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या माध्यामतून राबविण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन त्याचा निकाल विभागास सादर केल्यानंतर पुढील कागदपत्रे तपासणी व आदेश देणे हे काम विभागामार्फत केले जाणार असल्याचे मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धतआवश्यक अर्हताआरक्षणवयोमर्यादापरीक्षेच स्वरुपपरीक्षा शुल्कनिवडीची सर्वसाधारण प्रक्रिया बाबतची सविस्तर माहिती  www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील 'सर्वसाधारण सूचना" या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच  भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमकार्यक्रमातील बदलसूचना इत्यादी माहितीही वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार असून याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाहीअसे पदभरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठी सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास 24 तास परवानगी द्यावी

 माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठी

सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास 24 तास परवानगी द्यावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

मुंबईदि. 23 :- पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी  परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी करण्यासाठी येत्या 26 सप्टेंबर रोजी भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयात आज आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरानगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्तापोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारपुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेपुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेपुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसेपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारसहपोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मेट्रो लाईन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यासड्रेनेजलाईन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्तेड्रेनेजलाईनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

मेट्रोचे काम सुरु असताना वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

महाराष्ट्रात खाद्य संस्कृतीची आजची अवस्था*

 *महाराष्ट्रात खाद्य संस्कृतीची आजची अवस्था*


♦️ *तांदूळ भाकरी १५ रुपयांची महाग* वाटते, आणि त्याच *तांदळाचा डोसा ५० ते १५० रुपये* असून सुध्दा महाग ही भाकरी वाटते.


♦️ *बटाटावडा २० रुपये* झाला की महागाईत वाढ झाली असे वाटते पण त्याच बटाट्याचा मॅकडोनाल्ड चा *बर्गर ९९ रुपये* असला तरी महागाई वाढलेली वाटत नाही. 


♦️पारंपरिक व अत्यंत मेहेनतीची *पुरणपोळी २५-३० रुपये झाली तर* ग्राहकाची लूट चालू आहे असं वाटतं आणि त्याच *चण्याच्या पिठाचा ५० रुपये १०० ग्रॅम ढोकळा* हा योग्य दराचा वाटतो.


♦️ *भाजणी चकली, शंकरपाळी, विविध लाडू, थोडक्यात दिवाळीचे फराळ एक हजार रुपयात अख्खी दिवाळी आनंदात* आणि नाती जोडण्यात घालवू शकतो पण *दीड हजारात चौघांना पुरणार पिझ्झा,* कॅडबरी, केक हा आज सणांची शान आहे असं लोकांना वाटतं. 


*थालीपीठ, आंबोळी, सोलकडी, उकडीचे मोदक, अळूवडी* असे अनेक पदार्थ आहेत जे आज बाजारात मराठी ग्राहकच पाठ फिरवत आहेत म्हणून दुर्मिळ होत चाललेत.


*म्हणूनच कधीही,कुठेही महाराष्ट्रीयन पदार्थांची आग्रहाने खरेदी करा!*


चला परंपरा जपू या, महाराष्ट्रीयन पदार्थ वाचवू या, महाराष्ट्र वाढवू या...!

कोळी भवनाला निधी कमी पडू देणार नाही

 कोळी भवनाला निधी कमी पडू देणार नाही

                                        -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नवी मुंबईतील कोळी भवनाचे भूमीपूजन

 

            ठाणे, दि.22 (जिमाका):- कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाहीअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            ऐरोली नवी मुंबई येथील भूमीपुत्र - प्रकल्पग्रस्तकोळी - आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार नरेश म्हस्केआमदार मंदा म्हात्रेज्ञानेश्वर म्हात्रेनिरंजन डावखरेप्रवीण दरेकरमाजी खासदार विनय सहस्रबुद्धेमाजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटीलगणेश नाईकसंदीप नाईक,तसेच स्थानिक कार्यकर्ते विजय चौगुलेपंढरीनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीकोळी हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमीपूत्र आहे. या वास्तूचा वापर राज्यातील कोळी भूमीपूत्र घेतील. जी-20 चा मुंबईत कार्यक्रम होता तेव्हा जगभरातून लोक आले होतेत्यांनी कोळी गीतांना प्राधान्य दिले होते. कोळी बांधवांची गाणी त्यांचा नाच आणि त्यांची संस्कृती पाहून परदेशातून आलेले पाहुणे खूष झाले होते .

            मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणालेभूमीपूत्रांना न्याय मिळाला पाहिजे. आपल्या सरकारचे एकच सूत्र नोकरीत पहिला भूमीपूत्र. जे प्रकल्प होत आहेत त्यामध्ये कोळी बांधवाचे मोठे योगदान आहे. आज राज्यामध्ये विकास पर्व सुरू झाले आहे. प्रकल्पांना आम्ही चालना दिली. तसेच कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरू केली. महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण" योजना सुरू केली. आपले राज्य देशातील पहिले राज्य आहे कीजे युवकांना प्रशिक्षण भत्ता देत आहे.

            राज्यात एकाच वेळी विकास आणि कल्याणकारी योजनाही सुरू आहेत असे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीकोळी बांधवाच्या दाखल्याच्या प्रश्नासाठी एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे. काही अडचणी आम्ही दूर केल्या आहेत. उर्वरित अडचणीही दूर केल्या जातील. हे अहोरात्र काम करणारेलोकहिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठीभूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकार हात आखडता घेणार नाही. सर्व प्रकल्प व वास्तू लवकरच पूर्ण होतील. गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत होतीत्या घरांना आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला आहे.        यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले कीअनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर कोळी भवनाचे भूमीपूजन आज संपन्न झाले आहे. हा भूखंड मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कोळी भवन उभे राहत आहेयाचा मला मनस्वी आनंद होत आहे. नवी मुंबईतील सर्वांत सुंदर कोळी भवन झाले पाहिजे. निधी कमी पडू दिला जाणार नाही. महाराष्ट्रात अटल सेतू तयार केला तेव्हा मासेमारी करता येत नाहीत्याच्यासाठी आपण कॅपेक्शन देतो म्हणून आपण 25 कोटी रुपये देण्याची तरतूद केली आहे. कोस्टल रोड तयार करतानासुध्दा अशीच अडचण आली होती. कोळी लोकांच्या होड्या समुद्रात जाणे शक्य नव्हते. तेव्हासुध्दा आलेल्या अडचणी आपण दूर केल्या. आपले सरकार कोळी बांधवाच्या बाजूनी खंबीरपणे उभे आहे.

            ते म्हणालेअठरा हजार कोळी बांधवाना जातपडताळणी नसल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकण्यात  येणार होते. त्यांना अधिसंख्य पदावर घेतले. आम्ही त्यांना कायमस्वरुपी कर्मचारी केले. इतर कर्मचारी जे लाभ घेतात ते सर्व लाभ त्यांना आपण दिले. श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर कोळी बांधवाचा साकल्याने विचार झाला. केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रीपद तयार केले. स्वतंत्र खाते तयार केले. मस्यसंपदा योजना सुरू केली.

            देशातील सर्वात मोठे पॅकेज आपण "वाढवण" च्या प्रकल्पग्रस्त कोळी बांधवाना देणार आहोतअसे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणाले कीमासेमारी करण्यासाठी चांगली व्यवस्था देणार आहोत. मच्छीमार बांधवाच्या बाजूने उभे राहणारे आपले सरकार आहे.

            आमदार मंदा म्हात्रेमाजी आमदार गणेश नाईकमाजी आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना शितपेटीचे वाटप करण्यात आले तसेच प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेतून "फिश ऑन व्हिल्स" वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या.

00000

Featured post

Lakshvedhi