Sunday, 22 September 2024

दिलखुलास’ कार्यक्रमात अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची मुलाखत


            मुंबईदि.22:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रम या विषयावर महाराष्ट्र संशोधनउन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
            राज्य शासनाने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक व युवतींना
  शैक्षणिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला. यासाठी  महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच 'अमृतया स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेची कार्यपद्धती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न याबाबत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जोशी यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.
            'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत सोमवारदि. 23, मंगळवार दि.24 आणि बुधवार दि.25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यपालांच्या उपस्थितीत जैन संघ रथयात्रा रवाना

 राज्यपालांच्या उपस्थितीत जैन संघ रथयात्रा रवाना

 

            मुंबई, दि.22:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला प्रार्थना समाज मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. 

            यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा,  भक्तियोग आचार्य यशोविजय महाराज, अचल गच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वर महाराज तसेच जैन संघांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

            तीर्थंकर भगवान महावीर यांनी समाजाला अहिंसा, सत्य आणि करुणा ही तत्त्वे दिली आहेत. ही रथयात्रा भगवान महावीरांच्या शिकवणीची आठवण करून देणारी आहे. भगवान महावीरांची तत्वज्ञान आज विशेष प्रासंगिक आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            रथयात्रेत सहभागी झालेल्या जैन संघाचे अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

00000

 

Governor flags off Jain Sangh Rath Yatra

 

      Mumbai, September 22Maharashtra Governor C P Radhakrishnan flagged off the Rath Yatra organized by various Jain Sanghs of South Mumbai from Prarthana Samaj, Mumbai on Sunday (22 Sept).

            Minister of Skills development, Employment, Entrepreneurship and Innovation Mangal Prabhat Lodha, Bhaktiyog Acharya Yashovijay Maharaj, Achal Gachhaadhipati Kalaprabhsagar Surishvar Maharaj,  Jain Munis and Members of the Jain Sangh were present.

            The Governor said the Rath Yatra serves as a reminder of the noble teachings of Bhagwan Mahavir, whose wisdom continues to guide humanity even today. 

            He said Bhagwan Mahavir, the 24th Tirthankara, gifted invaluable principles of non-violence, truth, and compassion. He called upon the people to take these teachings to the new generation

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या कोनशिलेचे सरन्यायाधीशांच्या हस्ते अनावरण

 मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन संकुलाच्या

कोनशिलेचे सरन्यायाधीशांच्या हस्ते अनावरण

 

मुंबई, 22 :- मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन संकुल हे वांद्रे पूर्वमुंबई येथे बांधण्यात येणार असून सोमवार, 23 सप्टेंबर 2024 रोजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्तावित जागेवर बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. 

कोनशिला अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवईन्यायमूर्ती ए.एस.ओकन्यायमुर्ती दीपंकर दत्तान्यायमूर्ती उज्वल भुयान आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय उपस्थित राहणार आहेत.

सध्या मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे 16 ऑगस्ट 1862 रोजी स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे. नोव्हेंबर 1878 मध्ये बांधण्यात आलेली ही भव्य इमारत केवळ 6 न्यायालये आणि दहा न्यायाधीशांच्या वापरासाठी तयार करण्यात आली होती.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून औद्योगिक आणि आर्थिक विकासात आघाडीवर आहे. काळानुरूप मुंबई उच्च न्यायालयाच्या पायाभूत सुविधांनी युक्त अशा इमारतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

या नवीन प्रस्तावित संकुलात न्यायालयीन खोल्यान्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी दालन, वकीलांसाठी कक्ष, सभागृहग्रंथालय याबरोबरच बँकिंग सुविधावैद्यकीय सुविधाकॅफेटेरिया, वाहनतळ, संग्रहालय अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध असतील. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या इमारतीत असतील.

0000

why we are asking to wash well all fruits and vegetables, any bitten sign can

 Thats why we are asking to wash well all fruits and vegetables, any bitten sign can be like this too.😳


आधारस्तंभ

 *_वृद्धाश्रम_* 👴🏼 👵🏼 👨🏼‍🦳

मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले, नेहाच्या माहेरी गेलीत. 


राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथ ब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण, त्यानंतर मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला. 

राज किती खर्च करतोस आमच्यावर? न राहवून आई-बाबांनी विचारले. 


दोन दिवस आपल्याला पाचगणी-महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला, राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला.


पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी-महाबळेश्वरला मनसोक्त भटकलेत. रात्री न राहवून आईने विचारले, राज आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे? आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिताफीने टाळले. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून राज त्याच्या रूममध्ये गेला. 


तितक्यात फोन वाजला. राज त्याचा फोन आई-बाबांच्या रूममध्ये विसरला होता. फोन नेहाचा होता. 

फोन घेताना आईंनी चुकून फोन "स्पीकर" आणि "म्युट" मोडमध्ये टाकला. 

राज, ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले. पाचगणी-महाबळेश्वर दर्शनही झाले, आता पुढचा प्लॅन म्हणजे आई-बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे. सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचायचे आहे पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस. कीप इट टोटली सिक्रेट. नेहाने फोन ठेवला. 


नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय का? कशासाठी? आपलं काही चूकलं का? निर्णय पोटच्या गोळ्याचा की सुनेचा? असंख्य, अनुत्तरित प्रश्न.


आबासाहेब - साधारणतः एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो त्यावेळी राज त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत होता. मी आल्याचे पाहून  दोघेही बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे घरातील कटकटी कमी झाल्या आणि शांतता निर्माण झाली असे राजचा मित्र सांगत होता. 


आई - मी पण ऐकले ते. अहो, पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांना त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो, आपण आपलं सर्व काही करतो, शिवाय तुम्ही मुलांना शिकवतात, त्यांना शाळेत पोहोचवतत, शाळेतून घरी आणतात. 

मी देखील नेहाला स्वयंपाकात नी घर कामात शक्य तेवढी मदत करते. 

का आला असेल आपला कंटाळा त्यांना? 


मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले तेव्हा नेहाने पटकन ड्रेसिंग करून त्यावर पट्टी बांधली आणि मला सांगितले, आता तुम्ही आराम करा अजिबात काम करू नका. खुप प्रेमळ आहे हो नेहा.


आबासाहेब- राज ही खूप प्रेमळ आहे. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलु देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो, खूप काळजी घेतो माझी. मागच्या वर्षी मला थोडा ताप आला तर रात्रभर उशाशी बसून होता.


आई - दोन-तीन आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत. कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल.


आबासाहेब - अगदी तसेच असेल तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडे आणि काही दिवस माझ्या बहिणीकडे जाऊ.


आई - वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते, अस्वच्छता असते आणि खूप हाल होतात असं मी ऐकलंय. उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचे का?


आबासाहेब - नको नको. याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलेच बरे.


चला उशीर होतोय झोपूया, उद्या सकाळी लवकर उठायचे आणि आपल्याला आपल्या "अखेरच्या" घरी जायचे ना.


"आलिया भोगासी असावे सादर" म्हणत आबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली की राज आणि नेहाचा प्लॅन अर्थात् कट आपल्याला समजला आहे हे अजिबात दाखवायचे नाही. जे होतेय त्यात समाधान मानायचे.


प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती.


आई - एक विचारू?

आबासाहेब - विचार

आई - वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का? निदान नातवांच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का? राहायला नव्हे फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी. आपण तेथे राहायचे नाही, मुक्काम करायचा नाही, अगदी जेवणही नाही करायचे. फक्त आशीर्वाद देऊन परतायचे. 

राज, नेहा आणि नातवांशिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून.

अजून एक विचारू?

आबासाहेब - तुझा "एक" कधीच संपत नाही. विचार. विचार.

आई - निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का हो?

आबासाहेब - येईल, राज नक्की येईल, तो तितका कठोर नाही. शेवटी पीडा कायमची गेली, सुटलो एकदाचा, म्हणून तरी आनंदाने येईल.

मी सांगतो ते ऐक. जर मी प्रथम गेलो आणि राज आला नाही तर तू मला अग्नी दे आणि 

तू प्रथम गेलीस आणि राज आला नाही तर मी तुला अग्नी देईन.

आई - जर आपण दोघेही एकाच वेळी गेलो तर?

आबासाहेबांकडून कोणतेही उत्तर आले नाही, बहुधा त्यांचा डोळा लागला असावा.


साताऱ्याला जाताना, राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता, आई बाबा मात्र गप्प गप्पच. 

दुतर्फा दाट झाडी, वळणा वळणाचा रस्ता, गार हवा, अगदी प्रसन्न वातावरण. कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेले, बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता - 

पराधीन आहे जगती

पुत्र मानवाचा 

दोष ना कुणाचा


वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईंचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले.

संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावलेत. 

हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॅानफरन्स हॅाल, मिटींग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर रहायच्या रूम्स. वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होते. 

"वार्षिक फी १ लाख प्रत्येकी", समोरच्या बोर्डवर लिहिले होते.

चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणालेत, सर्व तयारी झाली आहे चला आपण जाऊया. आई-बाबांनी मन घट्ट केले.


मिटींग रूममध्ये २५-३० लोक जमले होते. 

राज पुढे झाला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आई-बाबांना खूप आवडला. 

हो ना? राजने आई-बाबांकडे पाहिले. 

त्यांनी यांत्रिकपणे मान डोलावली, डोळ्यांतले अश्रू लपवत.


राजने दोघांना पुढे बोलावले आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आई-बाबांचा हुंदका कुणालाही ऐकू गेला नाही.


मॅनेजर साहेब, निघतो. राज म्हणाला. 

राज बेटा,  सावकाश जा, सांभाळून गाडी चालव आणि घरी पोहोचल्यावर फोन कर, आई-बाबा म्हणालेत. 

हे काय? मला एकट्यालाच पाठवतात? राजने विचारले.

आम्हीही यायचे? खात्री करून घेण्यासाठी आई-बाबांनी विचारले. 

अर्थातच, राज उत्तरला. 

आणि ते २ लाख रुपये, वृद्धाश्रमाच्या फी चे? 

छे, छे, ते तर तुमच्या लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे. चला, आपल्याला परत पुण्याला जायचेय.


आई-बाबांसाठी हा सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला. राज, कसा झाला कार्यक्रम? लवकर परत या. मी आणि मुले तुझी आणि आई-बाबांची वाट पाहत आहोत आणि हो, येताना शिरवळला आईंची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका.


नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवांपासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते, सुनेचा नी मुलाचा सहवास लाभणार होता. हरवेल असे वाटणारे सुख अबाधित होते. 


कारमधील रेडिओ मस्त गाणं ऐकवत होता - 

मला सांगा, 

सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असलं की ते, 

घरबसल्या मिळतं?


दिलीप कजगांवकर, पुणे

७७७००२५५९६


_____Vishal Ade ____Cp____

बालविवाह निर्मूलनासाठी बीड जिल्ह्याने राबविलेल्या अभिनव उपाययोजना

 बालविवाह निर्मूलनासाठी बीड जिल्ह्याने राबविलेल्या अभिनव उपाययोजना

 - दीपा मुधोळ मुंडे


            बीड जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमुख कारण म्हणजे उसतोड कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच हुंडा प्रथाबाल लिंग गुणोत्तरगरिबीजुन्या चाली रूढी या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे बाल विवाह रोखणे तसेच जन जागृती करणे या बाबत बीड जिल्ह्यात तत्कालीन जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी विशेष मोहीम हाती घेऊन संपूर्ण जिल्हा प्रशासनाला यामध्ये सहभागी करून घेतले. 

या अंतर्गत  बाल विवाह निर्मूलन या विषयावर जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत दर महा जिल्हा कृती दल बैठक आखली. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा कॉलेजप्राथमिक आरोग्य केंद्रअंगणवाडीपोलीस स्टेशन व ग्रामपंचायत येथे दर्शनीय भागात चाईल्ड हेल्प लाईन 1098 चा लोगो पेंट करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समित्यांचे नव्याने स्थापन करण्यात आल्या. या माध्यमातून यांची कार्यशाळा घेऊन जनजागृती चे नवनवीन अभिनव उपक्रम राबविण्यात आले. निबंध स्पर्धारॅलीप्रतिज्ञापालकांचे समुपदेशनमुलींना बालविवाहमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत जागृती करण्यात आले. बालविवाह होण्यामध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीवर कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो याबाबतचाही प्रचार प्रसार करण्यात आला.

चाइल्ड हेल्पलाइन 1098 या क्रमांकाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जन जागरण झाल्याने  एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 अखेर 182 बाल विवाह थांबवून 03 प्रकरणात बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

 वर्ष 22-23मध्ये  132  तर वर्ष 23-24 मध्ये 255 बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले असल्याची  प्रतिक्रिया दीपा मुधोळ मुंडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

बीड जिल्हयाला बाल विवाह निर्मुलनासाठी प्रतिष्ठित ‘स्कॉच’ चा पुरस्कार प्रदान तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी स्वीकारला पुरस्कार

 बीड जिल्हयाला बाल विवाह निर्मुलनासाठी प्रतिष्ठित स्कॉच’ चा पुरस्कार प्रदान


तत्कालीन  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी स्वीकारला पुरस्कार

 

बीडदि. २१ (जिमाका):- बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा  "स्कॉच 2024  राष्ट्रीय पुरस्कार"  बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना आज प्रदान करण्यात आला. 

विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते. श्रीमती दीपा मुधोळ मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्हयात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पाऊले उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. याचीच पोच पावती म्हणुन स्कॉच या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने या कामाची दखल घेत बीड जिल्हयाची बाल विवाह निर्मुलनासाठी निवड केली गेली होती. 

आज राजधानी नवी दिल्ली येथे 99 व्या स्कॉच परिषदेनिमित्त इंडिया हॅबिटाईट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहामध्ये एका शानदार समारंभात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

Featured post

Lakshvedhi