बालविवाह निर्मूलनासाठी बीड जिल्ह्याने राबविलेल्या अभिनव उपाययोजना
- दीपा मुधोळ मुंडे
बीड जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमुख कारण म्हणजे उसतोड कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच हुंडा प्रथा, बाल लिंग गुणोत्तर, गरिबी, जुन्या चाली रूढी या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे बाल विवाह रोखणे तसेच जन जागृती करणे या बाबत बीड जिल्ह्यात तत्कालीन जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी विशेष मोहीम हाती घेऊन संपूर्ण जिल्हा प्रशासनाला यामध्ये सहभागी करून घेतले.
या अंतर्गत बाल विवाह निर्मूलन या विषयावर जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत दर महा जिल्हा कृती दल बैठक आखली. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत येथे दर्शनीय भागात चाईल्ड हेल्प लाईन 1098 चा लोगो पेंट करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समित्यांचे नव्याने स्थापन करण्यात आल्या. या माध्यमातून यांची कार्यशाळा घेऊन जनजागृती चे नवनवीन अभिनव उपक्रम राबविण्यात आले. निबंध स्पर्धा, रॅली, प्रतिज्ञा, पालकांचे समुपदेशन, मुलींना बालविवाहमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत जागृती करण्यात आले. बालविवाह होण्यामध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीवर कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो याबाबतचाही प्रचार प्रसार करण्यात आला.
चाइल्ड हेल्पलाइन 1098 या क्रमांकाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जन जागरण झाल्याने एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 अखेर 182 बाल विवाह थांबवून 03 प्रकरणात बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
वर्ष 22-23मध्ये 132 तर वर्ष 23-24 मध्ये 255 बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले असल्याची प्रतिक्रिया दीपा मुधोळ मुंडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.
No comments:
Post a Comment