Friday, 20 September 2024

थीम पॅव्हेलियनमध्ये प्रधानमंत्र्याचा लाभार्थ्यांशी संवाद पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींचे प्रदर्शन 21 आणि 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

 थीम पॅव्हेलियनमध्ये प्रधानमंत्र्याचा लाभार्थ्यांशी संवाद

  पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींचे प्रदर्शन

  21 आणि 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

 

वर्धादि. 20 (जिमाका) : पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. हे प्रदर्शन नागरिकांसाठी 21 व 22 सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्मलघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचा वर्षपुर्ती सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या आकर्षक कलाकृतींची पाहणी करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कारागिरांचे कौतुक केले.

प्रदर्शनीमध्ये या कलाकृतींचा समावेश : उत्तराखंड राज्यातील जैंबुन निशा (गारलँड मेकर)बिहार येथील सिंटू कुमार ( डॉल व टॉय मेकर)नागालँड येथील अखिरिली किरहा (सुतार)मध्यप्रदेश येथील रामनाथसिंग गुजर (मूर्तीकार)केरळ राज्यातून सतीष के.सी. (सोनार)ओडिशा येथील सुदिप्ता दास (मत्सजाळे कारागीर)झारखंड येथील गोपाल माडीया (लोहार)आंध्रप्रदेश येथील एम. हरीक्रिष्णा (न्हावी)छत्तीसगड येथील कांतीबाई साहू (बास्केट मेकर)आसाम येथील उपेंद्रा बरुहा (राजमिस्त्री)तेलंगणा येथील महाराजू लक्ष्मी (धोबी)पंजाब येथील कमल कुमार (मोची)उत्तरप्रदेश येथील राजाराम (कुंभार)जम्मू आणि कश्मीर येथील अब्दूल माजीद भट (बोट मेकर)महाराष्ट्रातील कीर्ति संतोषराव रावेकर (टेलर्स)कर्नाटक येथील शेखरप्पा कम्म (अस्त्रकार)राजस्थान येथील भोला लौहार (हातोडा व टुल किट मेकर) आणि गुजरात राज्यातील कमलेशभाई परमार (कुलूप निर्मितीकार) यांचा समावेश आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा़ विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा़

विहिरीशेततळेवीज जोडणीसाठी भरीव अनुदान

 

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरीशेततळेवीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार एवढे होते. इनवेल बोअरिंगसाठी आता 40 हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50 हजार रुपये आणि परसबागेकरिता 5 हजार देण्यात येईल.  नवीन विहिरींबाबत 12 मीटर खोलींची अट रद्द करण्यात आली आहे.  तसेच दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल.  त्याच प्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25 हजार रुपये देण्यात येतात.  आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल.  अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी  97 हजार किंवा  प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.

याशिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) या योजनेंतर्गत घटकांचे आर्थिक मापदंड वाढविणेनिकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे

 या योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे अनुदानात वाढ व निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण

प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.2 लाख यापैकी जे कमी असेल ते.इनवेल बोअरिंगसाठी  40 हजार रुपये,वीज जोडणी आकारासाठी 20,000 किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते .विद्युत पंपसंच/डिझेल इंजिनसाठी 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रू. 40,000 यापैकी जे कमी असेल ते. सोलार पंप (वीज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी) प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू. 50,000 यापैकी जे कमी असेल ते. एचडीपीई/ पीव्हीसी पाईपसाठी प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 100% किंवा रू. 50,000 यापैकी जे कमी असेल ते .

सूक्ष्म सिंचन संच मध्ये तुषार सिंचन संचासाठी

प्रचलित आर्थिक मापदंडान्वये तुषार सिंचन संच-रू.47,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान यापैकी जे कमी असेल ते.

ठिबक सिंचन संचासाठी प्रचलित आर्थिक मापदंडान्वये ठिबक सिंचन संच-रू.97,000/- किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदान यापैकी जे कमी असेल ते.तुषार सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत (1) अल्प /अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 10% तसेच  (2) बहू भूधारकांसाठी 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15% किंवा रू.  47,000/- यापैकी जे कमी असेल ते.

ठिबक सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत (1) अल्प /अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 10% तसेच  (2) बहू भूधारकांसाठी 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15% किंवा रू.  97,000/- यापैकी जे कमी असेल ते.यंत्रसामुग्री (बैलचलित/ ट्रॅक्टर चलित अवजारे) (नवीन बाब) साठी 50 हजार रुपये.परसबागेसाठी पाच हजार रुपये.

त्याचप्रमाणे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रु.1,50,000 वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात  आली आहे.या योजनेंतर्गत यंत्रसामग्री (बैलचलित / ट्रॅक्टरचलित अवजारे) ही नवीन बाब समाविष्ट करण्यात आली आहे.नवीन विहीरीबाबत रू. 4 लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहीरीची खोली असावी12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात  आली आहे.महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नयेयास मान्यता देण्यात आली आहे. ही योजना अनुसूचित जमातीच्या लाभ धारकांसाठीच राबविण्यात येत असल्यानेदोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट रद्द करण्यात आली आहे.

नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थीस 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात यावा. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकासाठी प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.2 लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्याची तरतूद करावी. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच इतर योजनेंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यात आलेल्या तसेच स्वखर्चाने शेततळे केलेल्या शेतकऱ्यांना देखील देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीरजुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एकाच घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देय राहील.

अ) नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन विहीरइनवेल बोअरिंगवीज जोडणी आकारविद्युत पंपसंच/डिझेल इंजिनसोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)एचडीपीई/ पीव्हीसी पाईपसूक्ष्म सिंचन संचयंत्रसामुग्रीपरसबाग या घटकांसह एकूण रु. 6,42,०००/ किंवा रु. 6,92,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (विहीर- रु.4,00,000+ इनवेल बोअरिंग-रु.40,000 + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु.50,000+ परसबाग रु.5,000 = रु. 6,42,000/किंवा रु. 6,92,000)

आ)जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास जूनी विहीर दुरुस्तीइनवेल बोअरिंगवीज जोडणी आकारविद्युत पंपसंच/डिझेल इंजिनसोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)एचडीपीई/पीव्हीसी पाईपसूक्ष्म सिंचन संचयंत्रसामुग्रीपरसबाग या घटकांसह एकूण रु 3,42,०००/ किंवा रु 3,92,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (जूनी विहीर दुरुस्ती- रु.1,००,०००+ इनवेल बोअरिंग-रु.40,000 + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु.50,000+ परसबाग रु.5,000 = रु. 3,42,000/किंवा रु. 3,92,000)

इ) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणवीज जोडणी आकारविद्युत पंपसंच/डिझेल इंजिनसोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)एचडीपीई/पीव्हीसी पाईपसूक्ष्म सिंचन संचयंत्रसामुग्रीपरसबाग या घटकांसह एकूण रु. 4,०2,०००/किंवा रु. 4,52,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण - रु.2,००,००० + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप(वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु.50,000+ परसबाग रु.5,000 = रु. 4,02,000/किंवा रु. 4,52,000).


पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा

 पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

·         वर्धा येथे पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात

·         अमरावती येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन

·         राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्गाटन

·         पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ

·         ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनास प्रारंभ

 

वर्धादि.20 (जिमाका) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच सप्लाय चेनसारख्या व्यवस्थेचा भाग व्हावेअशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय मंत्री जीतन राम मांझीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरीराष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीरवनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलउद्योग मंत्री उदय सामंतकौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.

आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळतेअसे सांगून प्रधानमंत्री म्हणालेविश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योगशिल्पकलाधातूविज्ञानअभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मानसामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणालेदेशातील सातशेहून अधिक जिल्हेअडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच सप्लाय चेनसारख्या व्यवस्थेचा भाग व्हावेअशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणालेदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबरफायबर टू फॅब्रिकफॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदासोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहेअसे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्वाची

-          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील गरीबवंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेअमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय लघुसुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले कीपीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे श्री.मांझी यांनी यावेळी सांगितले.

देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून  कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाहीपरंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पूर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईलअसा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कारागिरांना प्रमाणपत्रधनादेशाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्कराज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघुसुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळेडॉ.पंकज भोयरदादाराव केचेसमीर कुणावारमाजी खासदार रामदास तडसप्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकरजिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

0000


विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

  

विधानसभा निवडणुकीसाठी

बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे

प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार


मुंबईदि. २० : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवरभारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसारमतदारांना सुलभतेने मतदान करता यावेया दृष्ट‍िकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ ने वाढ झाली आहे. यामध्ये प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १५०० मतदारांची संख्या आता सरासरी १२०० पर्यंत असेलत्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढली असून परिणामी मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होणार आहे.

            निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसारजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू आहे. याच धर्तीवर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. 

            बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना प्रामुख्याने एका मतदान केंद्रावर सरासरी १२०० पर्यंत मतदारसंख्या राहीलहे सूत्र लक्षात ठेवून मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तरअधिक मतदान केंद्र असणाऱ्या एकाच ठिकाणावरील मतदान केंद्रांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेलोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत बृहन्मुंबईतील काही भागांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.

            याच अनुषंगाने बृहन्मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये झालेल्या सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात १९ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक पार पडली. मतदान केंद्र सुसूत्रीकरणाची माहिती देण्यासाठी, मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखालीअतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सविस्तर माहिती दिली.  अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादवविशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवारसंबंधित अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ वेळी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण २ हजार ५०९ मतदान केंद्र होते. तरमुंबई उपनगर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार ३८४ होती. सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे २ हजार ५३७ आणि ७ हजार ५७४ म्हणजेच संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) १० हजार १११ इतकी झाली आहे.

            सुसूत्रीकरण केल्याने मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये झालेल्या नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ म्हणजेच ‘Know Your Polling Station’ ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देतील. याशिवायनोंदणीकृत मतदारांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनही माहिती देण्यात येईलअसेही प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

***

इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना*" आशिया खंडामधला पहिला प्रकल्प *"विज्ञान गड"

 "*इंजीनियरिंग मधला एक अद्भुत नमुना*"

     आशिया खंडामधला पहिला प्रकल्प

               *"विज्ञान गड"* 

आकाराला येतोय महाबळेश्वर तालुक्यामध्ये "कोट्रोशी" या ठिकाणी. 


नमस्कार अभियंता मित्रांनो ,


      आपणा  सर्वांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अभियंता दिनाच्या निमित्ताने आपणाला एका नवीन प्रकल्पाची ओळख करून द्यावी अशा उद्देशाने या प्रकल्पाची थोडक्यात माहिती आपणाला पाठवत आहे.

       "विज्ञान गड" गेली १८ वर्ष या प्रकल्पाचे काम सुरू आहे. एक वेगळी संकल्पना, वेगळा   विषय आणि विज्ञान आधारित ही थीम असलेले अत्यंत नाविन्यपूर्ण आणि इंजिनिअरिंग मधला एक अद्भुत  नमूना या ठिकाणी उभारला जात आहे.


      येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये शासनाच्या सर्व परवानक्या प्राप्त होऊन हा प्रकल्प  सर्वांसाठी खुला होईल. आशिया खंडा मधला हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाहनांसाठी रस्ता उपलब्ध नाही. डोंगराच्या पायथ्याला आपली वाहने लावून या ठिकाणी जवळपास १५० मी उंच   असलेल्या डोंगरावर  माथ्यावर, वायरच्या मदतीने खेचली जाणारे रेल्वे मधून जावे लागते. याला फिन्यूक्युलर असे म्हटले जाते. सर्वसाधारण ४० लोकांची क्षमता असलेले दोन डबे बॅलन्सिंग पद्धतीने एकावेळी वर खाली होत असतात. सर्वसाधारण सात मिनिट ते दहा मिनिटांचा कालावधी या ठिकाणी जाण्यासाठी लागतो. डोंगराचा तिव्र  उतार सर्वसाधारण ३५ डिग्री ते ४० डिग्री च्या आसपास आहे. आपली ही फिनिक्युलर वरती असलेल्या गोल इमारतीच्या आत मध्ये थांबते. प्रत्येक दरवाज्याच्या पुढे फ्लोरिंग येईल अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.

     आणि इथून पुढे तुमचा सुरुवश होतो..... एक अद्भुत प्रवास!!! आपण नक्की काय पहावे व कोणते प्रथम पाहावे अशा प्रकारची आपली परिस्थिती होते. या इतक्या उंच ठिकाणी, इतका भव्य प्रकल्प असेल असे रस्त्यावरून वाटत नाही. समुद्रसपाटीपासून सर्वसाधारण बाराशे पन्नास मीटर उंचीवर असलेला हा प्रकल्प महाबळेश्वर आणि पाचगणी यांच्या उंची पेक्षाही जास्त आहे. या इमारतीच्या माथ्यावर गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्ग पाहण्यासाठी कोणताही अडथळा राहत नाही. 

या ठिकाणाहून सह्याद्रीच्या अवाढव्य गगनाला भिडणारया रांगा, कोयना जलाशयाचा विस्तीर्ण नजरेत न सामावणारा पसारा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमार्ग ,कासचे नयनरम्य पठार ,वासोटा किल्ला, उत्तेश्वराचं पुराणतन मंदिर, मकरंद गड, महाबळेश्वर, पाचगणी,लिंगमळा , भिलार हा सगळा परिसर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये येतो आणि हे तुम्ही , आशिया खंडा मधला पहिल्या रोटेटिंग  डोम मध्ये बसून पाहत असता. 

      या ठिकाणी अत्यंत मोठ्या क्षमतेचे कॅमेरे बसवून, या सर्व ठिकाणांचे दर्शन स्क्रीन वरती आपणाला पाहता येते. याशिवाय आपली वेळ संध्याकाळची असेल तर आकाशातले ग्रह तारे या स्क्रीनवर तुम्हाला पाहता येतात.  या ठिकाणचे  फिरणारे हॉटेल आणि या ठिकाणी बसून घेतलेल्या जेवणाचा आस्वाद आपणाला आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. तुम्ही ३६० डिग्री मध्ये फिरत, निसर्गाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचे दर्शन घेत जेवणाचा आनंद घेत असता. या ठिकाणी आहे अर्थक्वेक मधले सर्व प्रकारचा अभ्यास, या ठिकाणी आहे अभ्यासण्यासाठी विंड एनर्जी प्रोजेक्ट,सोलर एनर्जी प्रोजेक्ट आणि हायड्रो प्रोजेक्ट सुद्धा.  पाण्यामध्ये होत असलेले बदल आणि त्यासंबंधीची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहता येतात. सुनामी प्रत्यक्ष होते तरी कशी? व तिचा इफेक्ट नक्की असतो कसा? हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल या ठिकाणी .लाटा मधलं सायन्स आहे तरी काय? हे अभ्यासायचे असेल तर या ठिकाणी भेटायलाच हवं. भारतीय सैन्य दलामध्ये अत्याधुनिक शस्त्र वापरण्यात येतात. ती प्रत्यक्ष असतात कशी व ती वापरली कशी जातात ? याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच असते . या ठिकाणी शिकण्यासाठी , अभ्यासण्यासाठी आणि पाहण्यासाठी भरपूर काही आहे. अभियंता म्हणून या प्रकल्पाला एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.  मी या प्रकल्पाची अत्यंत थोडक्यात माहिती दिली प्रत्यक्षात बरेच काही आहे .

    तुम्ही कदाचित याल त्यावेळी शिवाजी महाराजांचे अभियंते हिरोजी इंदुलकर यांचं अत्यंत सुंदर शिल्प या ठिकाणी तयार झालेले असेल. या सह्याद्रीच्या रांगांमध्ये हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या तीव्र बुद्धीमतेने अभियंता म्हणून आपले नाव इतिहासाच्या पानावर कायमचे कोरून ठेवलेले आहे. या अभियंत्याची स्मृती म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सह त्यांचाही पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे.


     वयाच्या ६८ व्या वर्षी रात्रंदिवस काम करणारे , या प्रकल्पाचे मालक आणि अभियंते जोशी सर यांची भेट म्हणजे  स्फूर्ती आणि संकल्पना याचा अनोखा मिलाफ. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने स्वतःचे स्थान निर्माण करणारे व अभियंता म्हणून नक्की कसे असावे याचे हे जिवंत उदाहरण आहे.


प्रकल्प मालक व अभियंता - इंजि. वसंत जोशी सर 

प्रकल्प सल्लागार. - इंजि. राम पडगे

आर्किटेक्ट -   अर्कि. विक्रांत पडगे 

आर सी सी सल्लागार. -  इंजि.    अनिल कदम


     अभियंत्यांनी एकदा आवर्जून भेट द्यावी असा हा प्रकल्प आहे. या ठिकाणी ज्याला पाहायचे आहे ते भरपूर काही पाहू शकतात ,ज्याला शिकायचं आहे तो भरपूर काही शिकू शकतो .एक अभियंता म्हणून निश्चितच चॅलेंजिंग असा हा प्रकल्प आहे, म्हणूनच आज अभियंता दिनाच्या निमित्ताने आपल्यासमोर मी हे थोडक्यात मांडत आहे.


आपला

 इंजि राम पडगे.

९६८९३५९४७८

🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻 *मधुर स्मृतींची*

 🌹⚜️🌹🎼🌅🎼🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


                 *मधुर स्मृतींची*              

                                          

🌸🥀🔆🌺🎶🌺🔆🥀🌸

             

        *जीवनात अनेक नाती जोडली जातात. पण काळाच्या ओघात ही नाती विसरलीही जातात. मग त्या नात्यांसोबत व्यतीत केलेला आज निघून गेलेला काळ.. त्यात भेटलेली ती नाती.. त्या व्यक्ती खरंच भेटल्या होत्या  का ? तो भूतकाळ भास तर नव्हता ना असेही वाटते. हे आमचे जीवन म्हणजेच भास तर नाही ना असेही वाटते.*

        *आता बघा ना.. अजूनही ते दृश्य दिसतेय. ती तुडुंब भरुन वाहणारी यमुना.. त्या लगतचा कदंब वृक्ष.. तिथे मोरपिस लावलेला.. मुरलीने गारूड घालणारा गोकुळातील भेटलेला कान्हा.. सोबत असणारी ती राधा.. त्या कृष्णाच्या लीला. हे जे सारे  प्रत्यक्षात अनुभवले होते, ते खरे होते की.. की तो भासच होता ?*

        *कधीकधी आसपास पुण्यवान व्यक्ती असल्या तरीही त्यांना ओळखताच येत नाही. अगदी परमात्माही जवळपास असला तरीही आम्हांला पटतच नाही. विश्वास बसत नाही. पण तो कान्हा अविनाशी. आमच्या अज्ञानाचे रहस्य तोच जाणतो.*

        *एकाच जीवनात किती किती म्हणून भूमिका वठवल्यात त्या कृष्णाने ? बंधू.. पती.. पिता.. परममित्र राजा.. द्रष्टा उपदेशक.. सर्वांना आश्रय देणारा असा सहृदयी नेता. त्याच्या सगळ्या लीलासुद्धा आम्हाला शिकवण देणाऱ्या.. आमचे भलेच करणाऱ्या.. आनंद देणाऱ्या.*

       *कृष्णाने त्याच्या जीवनातून अशाश्वत जीवनात कसे जगावे याचा धडा शिकवलाय. प्रेमबंधनी   नात्यांमध्ये अडकला नाही. सुखदुःखापासून अलिप्तता राखून धर्म कर्तव्य चोख पार पाडली. जीवन रहस्य जाणणारा असा तो योगी*

        *त्यानेच या मानवी नात्यांमध्ये रंग भरून हे  जीवन सुंदर केलेय.. आयुष्याला अर्थ दिलाय. या जीवनात चैतन्य निर्माण करणाऱ्याला काय बरे म्हणावे.. तो काळाचा स्वामी होता की देव. त्याच्या वागण्याचे गुढ अशा निळ्या अस्तित्वाचे रहस्य जनसामान्यांना समजण्या पलिकडचेच. पण तरीही जेव्हा तो दिसत नाही तेव्हा वाटते की त्याचे ते वागणे.. प्रेम करणे.. ते लीला दाखवणे हा भास तर नव्हता ना ?*

        *जसा काळ पूढे पूढे सरकतो तसे जगलेले मानवी जीवन भासमयच वाटते. ही पण त्याचीच माया. पण एकमात्र खरे की कृष्णाच्या या मधूर स्मृतीतही चैतन्य भरलेय.*


🌹🌼🎼🌺🎶🌺🎼🌼🌹

  

  *अजून तरळते दृष्टीपुढती* 

  *ते मोराचे पीस निळे*

  *झिळमिळत्या रंगांचे गारुड* 

  *अजून मला पुरते नकळे !*


  *ती मुरली ती तुडुंब यमुना*

  *कदंब फुलले काठी*

  *खरेच का तो होता तिथला*

  *गोकुळचा रहिवासी ?*

  *खरीच होती राधा अन तो*

  *रास खरा होता का ?*

  *नवलपरीच्या लीला त्याच्या*

  *भासच तो होता का ?* 

  *त्या अविनाशी मूलपणाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *तो तर होता गोपसखा*

  *की तरुण प्रियकर होता*

  *धीट किती तो लोकप्रिय किती*

  *नित्य अग्रणी होता*

  *मधुवचनी तो मुरलीमनोहर*

  *रूपवंत वेल्हाळ*

  *समयज्ञही तो चतुर जाणता*

  *शत्रूंजय कळीकाळ* 

  *त्या नित्य नूतन शत रूपांचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *तो बंधु तो पती पिता तो*

  *परम मित्र तो राजा*

  *तो द्रष्टा उपदेशक प्रेरक*

  *आश्रय तो सकलांचा* 

  *सर्वांसाठी सहृदय तरीही* 

  *तो तर त्या पलीकडचा*

  *अलिप्त सावध निर्मम साक्षी*

  *सगळ्या सुखदुःखांचा*

  *अपूर्व त्या जीवन योगाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


  *सर्व मानवी नात्यांना*

  *अति सुंदर केले त्याने* 

  *आयुष्याला अर्थ दिला*

  *रसभरल्या चैतन्याने*

  *काय म्हणावे ? काय नेमके*

  *द्यावे त्याला नाव ?*

  *काळाचा होता का स्वामी,* 

  *तो होता का देव ?*

  *गूढ निळ्या त्या अस्तित्वाचे*

  *रहस्यही पुरते नकळे !*


🌹🎼🌹🔆🎶🔆🌹🎼🌹 

  

  *गीत : अरुणा ढेरे*  ✍

  *संगीत : मिलिंद जोशी*

  *स्वर : श्रेया घोषाल*

  

  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२०.०९.२०२४-*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

बुलडाणा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला - समारंभात महिलाभगिनींनी व्यक्त केली भावना •

 बुलडाणा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला

- समारंभात महिलाभगिनींनी व्यक्त केली भावना

• जिल्ह्यातील बहिणींचा अभियानाला मोठा प्रतिसाद

 

         बुलढाणादि.19 : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्चघरखर्चज्येष्ठांचा औषधोपचार आदी बाबींबरोबरच महत्वाच्या व तातडीच्या गरजा भागविल्या जात आहेत. ही योजना आमच्यासाठी मोठा आधार असल्याची भावना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.

बुलडाणा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात लाभार्थींचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण समारंभ शारदा विद्यालयाच्या मैदानावर झाला. याप्रसंगी जिल्हाभरातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. समारंभात महिला भगिनींनी मोबाईल टॉर्च उंचावून व टाळ्यांच्या कडकडाटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.

 मान्यवरांनीही गुलाब पाकळ्या उधळून लाडक्या बहिणींचे स्वागत केले. अनेक भगिनींनी मुख्यमंत्रीदोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या रकमेतून संसाराला आधार मिळाला आहे. त्याचप्रमाणेकेंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे महिलांचे सशक्तीकरण होत आहेअशी भावना यावेळी भगिनींनी व्यक्त केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहीणींच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास झळकत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाहीआमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिलेही भावना व आनंद त्यांनी व्यक्त केला.  

रक्षाबंधनाचा सण गोड झाला - राधा झाल्टे

'रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होतापण हातात पैसे नव्हते. खूप चणचण होती. मुलांना कपडेस्वत:साठी साडीशैक्षणिक साहित्य घ्यायचे होते. राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात...माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आणि माझी चिंता मिटली....माझ्या बँक खात्यात 17 ऑगस्टला योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. त्यातून माझ्या कुटुंबाचा रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा झालाअशी प्रतिक्रीया बोरखडे (ता.जि.बुलडाणा) गावातील सौ. राधा शिवाजी झाल्टे यांनी दिली. 

भेट भावाचीठेव मुलांच्या भविष्याची – मीना कहाते

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीणयोजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. माझी दोन्ही मुले वसतीगृहात शिकतात. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून मुलांचे शैक्षणिक साहित्यगणवेश खरेदीसाठी उपयोगी पडले. योजनेतून मिळणाऱ्या पैश्यांचा उपयोग मी माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणारअशी भावना बोरखडे (ता.जि. बुलडाणा) गावातील सौ. मीना जयराम कहाते व रेखा सुनील ननई या दोघी बहिणींनी व्यक्त केली.

संसाराला हातभार लाभला – सिंदखेड माखल्याच्या भगिनींची प्रतिक्रिया

मी व माझे पती दोघेही शेत मजुरीचे काम करतो. घरात नेहमी पैश्याची चणचण होती. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले. माझ्या कुटुंबासाठी हे पैसे अडचणीच्या काळात घरखर्चासाठी उपयोगी पडले. या पैश्यांमुळे माझ्या संसाराला हातभार लागला असून त्यातून मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपड्यांची खरेदी केली. योजनेतून पैसे मिळाल्यानिमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावीअशी प्रतिक्रिया बुलडाणा तालुक्यातील सिंदखेड माखल्याच्या भारती सचिन खंडारे व सिंधु उबरहांडे या दोन्ही भगिनींनी व्यक्त केली.

योजनेच्या पैश्यातून घडले शिर्डीदर्शन – अर्चना उबरहांडे

'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीणयोजनेची माहिती व अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी ताईंनी मला मदत केली. या योजनेमुळे आम्हा महिलांना घरातील तातडीची कामे करण्यासाठी आर्थिक हातभार मिळाला आहे. मुलांचे शैक्षणिक साहित्यवैद्यकीय उपचार तसेच घरखर्च भागविण्यासाठी या पैश्यामुळे खूप मोठा आधार मिळाला. खूप दिवसापासून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मात्रपैश्याची वानवा असल्यामुळे दर्शन राहून गेले होते. योजनेतून मिळालेल्या पैश्यांमुळे मी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊ शकलेअशी भावना सिंदखेड माखल्याच्या अर्चना उबरहांडे यांनी दिली. 

मुख्यमंत्री नावाच्या भावाने दिली कल्याणकारी योजनांची शिदोरी - शीतल महाले

शासनाने केवळ मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. लेक लाडकी बहिणमाझी मुलगी भाग्यश्री योजनामुलींना मोफत उच्चशिक्षणएसटी प्रवासात सवलत या योजनांच्या मदतीने आम्हाला व आमच्या मुलींच्या शैक्षणिक व आर्थिक गरजा पूर्ण करता येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम ही मुला-मुलींच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी व घरखर्चासाठी उपयोगी पडली. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानतेअशी भावना बुलडाणा तालुक्यातील मासरुळ येथील रहिवासी शितल विनोद महाले यांनी व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi