Thursday, 19 September 2024

महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही

 महिला भगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे

दिवस आणण्यासाठी हात आखडता घेणार नाही

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

बुलढाणादि. 19 : राज्यातील महिलाभगिनींच्या जीवनात सुखासमाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना’ अंमलात आणली आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना निरंतर चालू राहण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून यापुढेही हात आखडता घेणार नाहीअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा महिलाभगिनींच्या उपस्थितीत बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर झाला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान व विविध विकासकामांचे लोकार्पण झालेत्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय आयुषआरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवसहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे - पाटीलआमदार सर्वश्री किरण सरनाईकडॉ. राजेंद्र शिंगणेडॉ. संजय कुटेसंजय रायमूलकरॲड. आकाश फुंडकरसंजय गायकवाडश्वेता महालेविभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेयविशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळेजिल्हाधिकारी डॉ. किरण पाटीलपोलीस अधिक्षक विश्व पानसरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  महिलाभगिनींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना व्यापकपणे व गतीने राबविण्यात आली. विक्रमी कमी वेळेत पैसे खात्यात येण्याची ही योजना ठरली आहे. शासनाने ३३ हजार कोटी रुपये या योजनेसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. त्यामुळे योजना कधीही बंद पडणार नाही. योजनेत मिळणा-या रकमेमुळे गरीबांना निश्चित मदत होत आहे. यापुढेही आम्ही ही रक्कम वाढवत जाऊअशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमुलींना मोफत शिक्षणलेक लाडकीलखपती दीदीअन्नपुर्णा योजनामुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनाकिसान सन्मान योजनामुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अशा योजनांमुळे महिलांना व कुटुंबांना बळ मिळत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून विविध व्यवसायांचे जाळे निर्माण होत आहे. अधिकाधिक बहिणींना लखपती झाल्याचे बघायचे आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

बुलढाणा शहरात निर्माण करण्यात आलेले महापुरूषांचे पुतळे व विविध कामे, सौंदर्यीकरण विकासाला चालना देणारी आहेत. महापुरूषांच्या स्मारकामुळे नव्या पिढीला कायम स्फूर्ती मिळत राहीलअसेही त्यांनी सांगितले.  

एक कोटी भगिनींना लखपती बनविणार - उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीआर्थिक विकासाच्या प्रवाहात महिलांना आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीसारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्यातही 1 कोटी महिलाभगिनींना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. राज्यात भगिनींसाठी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनाएसटी प्रवास सवलतमोफत शिक्षण अशा योजनांबरोबरच लाडक्या भावांसाठीही युवा कार्य प्रशिक्षण योजनाशेतकऱ्यांना मोफत वीजपीक विमासौर वीज अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. शासनाने जिगाव प्रकल्प पूर्णत्वास नेला असूनवैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. 

योजनेमुळे ग्रामीण अर्थचक्राला गती – उपमुख्यमंत्री श्री. पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीमुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून आहे. याद्वारे ग्रामीण अर्थचक्राला गती मिळत आहे. या रकमेमुळे महिलाभगिनींना आत्मविश्वास मिळाला असूनछोटे व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. राज्यात उद्योग- व्यवसायांचीही भरभराट होत असूनदेशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. बुलडाणा शहरात उभे राहिलेले महापुरूषांचे पुतळे नवीन पिढीला सातत्याने प्रेरणा देत राहतील.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटपतसेच लखपती दिदी योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. बुलढाणा जिल्हा प्रशासनातर्फे प्रकाशित जिल्हा कॉफीटेबल बुक आणि राजमाता’ बोधचिन्हाचे अनावरण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचेतसेच राजमाता जिजाऊपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरसावित्रीबाई फुले आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. आमदार संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

महिलाभगिनींचा प्रचंड उत्साह आणि दाद

समारंभात जिल्ह्याच्या कानाकोप-यातून लक्षावधी भगिनी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे,  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीसउपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर महिलाभगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात व मोबाईल टॉर्च उंचावून त्यांचे जोरदार स्वागत केले. लाडक्या बहिणींचे अभिवादन स्वीकारत मान्यवरांनी मंचावर प्रवेश केला. यावेळी अनेक भगिनींनी मान्यवरांना राख्या बांधल्या व त्यांच्यासमवेत सेल्फीही घेतली. मान्यवरांनीही सर्वांचे अभिवादन स्वीकारत त्यांच्याशी संवाद साधला.

०००

एमटीडीसीमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम 'पर्यटन आणि शांतता' हे यंदाच्या पर्यटन दिनाचे घोषवाक्य

 एमटीडीसीमार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

'पर्यटन आणि शांतताहे यंदाच्या पर्यटन दिनाचे घोषवाक्य

            मुंबईदि. १९ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन २०२४’ साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) द्वारे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) 'पर्यटन आणि शांतता' ("Tourism & Peace") हे घोषित करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये यांच्यातर्फे 'पर्यटन व शांतताया विषयाच्या अनुषंगाने परिसंवादचित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी  दिली आहे.

               यावर्षी जॉर्जियाची राजधानी तीबीलीसी येथे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन दिन हा केंद्रिय पर्यटन मंत्रालयमहाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत एमटीडीसीची प्रादेशिक कार्यालयेपर्यटक निवासेउपहारगृहेबोट क्लब्सकलाग्राम इ. ठिकाणी २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत 'पर्यटन दिनसाजरा  करण्यात येणार आहे.

        एमटीडीसी प्रादेशिक कार्यालयांमार्फत परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये नामवंत व्यक्तीपर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर निबंध स्पर्धांचे प्रत्येक प्रादेशिक स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी  पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधनपर्यटन व जागतिक शांततामहाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेशमाझ्या स्वप्नातले पर्यटनभारत व पर्यटन : शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय  ठेवण्यात आले आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून 'पर्यटन व शातंताया घोषवाक्याशी निगडीत प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील शाळामहाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा  देखील आयोजित करण्यात येणार आहे.

           निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात दोन व्यक्तींना २ रात्री ३ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह. (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील पर्यटक निवासात)व्दितीय पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ रात्र २ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत)तृतीय पारितोषिक विजेत्याला जवळच्या पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था दुपारचे जेवण प्रमाणपत्र+ स्मृतीचिन्ह अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. पर्यटक निवासांमध्ये माहितीपत्रकांचे प्रकाशन करणे. पर्यटक निवासांत वास्तव्यास आलेल्या पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालूनपर्यटक निवासी वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना नजिकच्या सुरक्षित- पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेकजंगल ट्रेलनेचर वॉकचे आयोजन करावे जागतिक पर्यटन दिनाचे उपक्रम प्रभावीप्रणे राबवावे असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सूर्यवंशी यांनी केले आहे.

एमटीडीसीच्या  पर्यटन दिनानिमित्त राज्यभर होत असलेल्या प्रादेशिक कार्यालयातील विविध कार्यक्रमपरिसंवादनिबंध स्पर्धाचित्रकला स्पर्धाछायाचित्र स्पर्धाअनुभवात्मक पर्यटनाची नोंद जागतिक पर्यटन संघटना युनायटेड नेशन्सने घेतली असून  ही  माहिती युनायटेड नेशन्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

या स्पर्धेसाठी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वालराज्यातील प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापकमानसी कोठारे हे कार्यरत आहेत.


आयुष्याच्या या तीन टप्प्यात उदास होऊ नका:*

 *आयुष्याच्या या तीन टप्प्यात उदास होऊ नका:*


(१) पहिला टप्पा : ५८ ते ६५ वर्षे


कामाची जागा तुमच्यापासून दूर जाते.


तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कितीही यशस्वी किंवा पराक्रमी झालात, तरी तुम्हाला एक सामान्य माणूसच म्हटले जाईल. 

त्यामुळे, तुमच्या पूर्वीच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या मानसिकतेला आणि श्रेष्ठता संकुलाला चिकटून राहू नका


(२) दुसरा टप्पा : ६५ ते ७२ वर्षे


या वयात समाज हळूहळू तुमच्यापासून दूर जातो. 

तुमचे वारंवार येणारे मित्र आणि सहकारी कमी होतील आणि तुमच्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला क्वचितच कोणी ओळखेल.


"मी होतो..." किंवा "मी एकदा होतो..." असे म्हणू नका कारण तरुण पिढी तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटू नये!


(३) तिसरा टप्पा : ७२ ते ७७ वर्षे


या शिबिरात, कुटुंब हळूहळू तुमच्यापासून दूर जाईल. 

जरी तुम्हाला बरीच मुले आणि नातवंडे असतील, परंतु बहुतेक वेळा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा एकटे राहत असाल.


जेव्हा तुमची मुलं अधूनमधून भेट देतात, तेव्हा ती आपुलकीची अभिव्यक्ती असते, म्हणून त्यांना कमी भेट दिल्याबद्दल दोष देऊ नका, कारण ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत!


आणि शेवटी 77+ नंतर,


पृथ्वी तुम्हाला नष्ट करू इच्छित आहे. 

यावेळी, दुःखी किंवा दु: खी होऊ नका, कारण हा जीवनाचा शेवटचा टप्पा आहे आणि प्रत्येकजण शेवटी या मार्गाचा अवलंब करेल!


 *म्हणून, आपले शरीर अद्याप सक्षम असताना, पूर्ण जीवन जगा!


खा, प्या, खेळा आणि आवडेल ते करा. आनंदी रहा, आनंदाने जगा..


प्रिय ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो,


वरील लेख लेखकाने खूप छान लिहिला आहे.


👍 लेखकाचे खूप खूप आभार आणि अभिनंदन.


58+ नंतर, मित्रांचा एक गट तयार करा आणि ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी अधूनमधून भेटत रहा. 

दूरध्वनी संपर्कात रहा. 

आयुष्यातील जुने अनुभव आठवा आणि एकमेकांसोबत शेअर करा.


नेहमी आनंदी रहा.🙏🌹*

बाप्पा माझा जाउ नको ना रे


 

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते...🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

 🙏🙏🙏

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते...🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.


*जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच  वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व  जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात.  हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.*

जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो *परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त "कावळे"खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या "पोटातच" ही प्रक्रिया सुरु होते आणि *ते जेथे "विष्ठा" करतात तेथेच "वड" किंवा "पिंपळ" हे वृक्ष येतात.*


या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे  फक्त "भाद्रपद" महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना "घराघरातून" पोषक आहार या काळात "प्रत्येक" "सु-संस्कारी" मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच  "संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.


आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान" होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून *या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना"  देण्याची प्रथा सुरु करण्यात आली.* आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे  ! फक्त ती समजून घ्यायची आपली "कुवत" कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं  "पितृपक्ष"  आला की "कावळ्यावर" टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व  अति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. . 

 

नाही तरी "कोरोनाने"  मागे "आँक्सीजन" बद्दलचे महत्त्व  समाजाला पटवून दिलेच आहे.  जर का कावळ्यांना घरा घरातून "पितरांच्या" नावाने खायला नाही मिळाले ,  तर आपल्या मागील  "वंशाचे" नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ?  कधीच  व कुठेही, *कोणतेही सरकार "आँक्सीजनची" पुर्व तयारी करा  हे सांगणार नाही* . हेच "वैज्ञानिक" स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा..... तसेच हिंदू धर्मातील कोणत्याही प्रथेची टिंगल(मस्करी/ चेष्टा/ टर) उडविण्याअगोदर तिच्या मागिल शास्त्रीय आधार (बैठक) शोधण्याचा प्रयत्न करा

 

नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू. आज आम्ही "हजारो" रूपये देऊन  लाईन मधे दिवस-दिवस ऊभे राहून   आँक्सीजन सिलेंडर  मिळविलेच . पण भविष्यात नातू-पणतु "लांखो" रूपये देतील ?  की करोंडो" देतील ? हे ती वेळच ठरवेल .

🙏🙏

🌳झाडे लावा झाडे जगवा 🌳

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 19 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण कमी झाले असून सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी काढले. स्वच्छता ही सेवा-2024 (SHS) या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंग्री मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्‍त अश्विनी भिडे, सेना दलाचे अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर.आर.आर. (रिड्युस, रियुज, रिसायकल) केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधण्यात आली असून अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहील, याकरिता त्रिसुत्री नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. स्वच्छ भारत अभियानात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेने दीड लाख झाडे पावसाळ्यात लावली आहे. या अभियानामध्ये 9,359 कार्यक्रमाची नोंदणी झाली असून सीटीयू (क्लिनलीनेस टार्गेट युनिट) अंतर्गत 4,520 ठिकाणे शोधली असून या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. याकरिता जनसहभागाचे 4,111 कार्यक्रम राबविले जाणार आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते या अभियानांचा शुभारंभ झाला. गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केले. त्याचबरोबर ‘करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’ हा संदेश देणाऱ्या फलकावर स्वाक्षरी केली. 000

 







स्वच्छता ही सेवा’ या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबईदि. 19 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान  प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणेरस्ते झाडणेपाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण कमी झाले असून सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी काढले.

            स्वच्छता ही सेवा-2024 (SHS) या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  शुभारंभ करण्यात आला. याप्रसंग्री मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढामुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणीनगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराजमुंबई जिल्हाधिकारी संजय यादवमुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्‍त अश्विनी भिडेसेना दलाचे अधिकारीराष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थीस्वयंसेवी संस्थासफाई कर्मचारीनागरिक  आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायला हवीअसे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले कीस्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर.आर.आर. (रिड्युसरियुजरिसायकल) केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचे काम सुरू आहे. नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधण्यात आली असून अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहील, याकरिता त्रिसुत्री नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

            मुख्यमंत्री म्हणाले कीस्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. स्वच्छ भारत अभियानात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेने दीड लाख झाडे पावसाळ्यात लावली आहे. या अभियानामध्ये  9,359 कार्यक्रमाची नोंदणी झाली असून सीटीयू (क्लिनलीनेस टार्गेट युनिट) अंतर्गत 4,520 ठिकाणे शोधली असून या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. याकरिता जनसहभागाचे 4,111  कार्यक्रम राबविले जाणार आहे.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते  या अभियानांचा शुभारंभ झाला. गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केले. त्याचबरोबर करूया वाईट विचार नष्टस्वच्छ करूया आपला महाराष्ट्र हा संदेश देणाऱ्या फलकावर स्वाक्षरी केली.

000

*तीर्थरूपांच्या आशीर्वादाची*

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


      *तीर्थरूपांच्या आशीर्वादाची*

                  

🌹⚜️🌹🔆🙏🔆🌹⚜️🌹


        *प्रतिमा आणि प्रतिकांचे जगभर महत्त्व आहे. सध्या पितृपक्ष अर्थात कृतज्ञता पंधरवाड्यात आमच्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला त्यांच्या प्रतिमांचे पूजन होणार. तो भूतकाळ समोर साकारतो.. पूर्वजांनी केलेला संघर्ष, आम्हांला घडविण्यासाठी खाल्लेल्या खस्ता.. तो त्याग आठवतो.*

        *त्या प्रतिमा बोलत नसल्या तरीही नकळत संवाद साधला जातो. आज दुरावलेल्या.. जगावेगळे निरपेक्ष प्रेम करणाऱ्यांच्या आठवणींनी डोळ्यांत अश्रू येतात. प्रत्येक जण मानतो की, आज जे आम्ही सुखात आहोत ते या आमच्या पूर्वजांच्या.. आईवडीलांच्या पुण्याईमुळे.*

        *नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या किलकिल्या डोळ्यांना त्यांनीच हे विशाल जग दाखविले.. रक्षण केले. प्रेमवर्षावाने या जगात जगायला पंखात बळ दिले.*

        *आईसोबतच वडिलांचाही तेवढाच मोठा वाटा.. कदाचित त्यांचे योगदान काकणभर सरसच. उदभवेल तशा परिस्थितीत संघर्ष करुन त्यांच्या कमाईनेच चार घास मिळाले. जीवनात कितीही संकटे आली तरीही त्याची धग त्यांनी घराला लागू दिली नाही. म्हणूनच वडिल हे तीर्थरुप.*

        *पण वडिलांचे प्रेम एवढ्यावरच थांबत नाही. ते जगात असो वा नसो, प्रत्यक्ष सहवास.. धीर लाभो अथवा न लाभो, त्यांच्या आशीर्वादात एवढे सामर्थ्य असते की त्यांच्या पश्चातही त्यांची मुले संघर्ष करुन यशस्वी होत प्रगतीची शिखरे गाठून सुखात नांदतात.*

        *ही प्रगती आपल्या तीर्थरुपांच्या पुण्याईचे.. आशीर्वादाचे फळ आहे याची जाणीव मुलांना असतेच. हे चांगले दिवस आलेत, पण हे वैभव बघायला ते हयात नाहीत यामुळे मन खिन्न होते.*

        *मुलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे, मुलांसाठी संपूर्ण जीवन खर्च करणारे कल्पवृक्ष म्हणजे वडील. त्यांनी जीवनात जे काही पुण्य कमावले ते आमच्या कामास आलेय. आज त्यांची थोरवी समजलीय की त्यांच्या पुण्याईने आमचे हे घर म्हणजे पुण्यदायी गंगेकाठचे घरच नाही तर ही तीर्थक्षेत्र काशीच झालीय.*

        *पण हे आमचे वैभव बघायला एकदा तरी प्रत्यक्ष या. तुम्ही कृपादृष्टीची जणू बरसातच केलीय. पाचही बोटे अमृतात न्हायलीय. हे आमचे सुख चंद्र सूर्याच्या डोळ्यांनी तुम्ही बघताय, हे पण ठाऊक आहे. पण.. पण एकदा तरी पाठीवरुन हात फिरवायला या हो.*

        *जसजसे वय वाढते, जगाचे अनुभव येतात तसतसे वडिलांच्या त्यागाविषयीची कृतज्ञता वाढते. त्यांच्या आठवणी आनंद.. उर्जा.. सकारात्मकता शिकवतात.*

        *लता दिदी तर नव्वदी पार झाल्या तरीही नित्य वडिलांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळायचे.. आठवणींनी कंठ दाटून यायचा. वडिलांच्या आशीर्वादाचे फळ काय असते याचे आजच्या काळातील उदाहरण म्हणजे पंचरत्न मंगेशकर परिवार.*

        *पी. सावळाराम यांनी मा. दीनानाथांच्या स्मृतिदिनानिमित्य लिहिलेले.. लतादिदींच्या भावना व्यक्त करणारे हे गीत.*


🌺🌿🌸☀️🌺☀️🌸🌿🌺


  *कल्पवृक्ष कन्येसाठी* 

  *लावुनिया बाबा गेला*

  *वैभवाने बहरुन आला,*

  *याल का हो बघायाला*


  *तुम्ही गेला आणिक,*

  *तुमच्या देवपण नावा आले*

  *सप्तस्वर्ग चालत येता,*

  *थोरपण तुमचे कळले*

  *गंगेकाठी घर हे अपुले,* 

  *तीर्थक्षेत्र काशी झाले !*

  *तुम्हावीण शोभा नाही,* 

  *वैभवाच्या देऊळाला*


  *सूर्य, चंद्र तुमचे डोळे*

  *दुरुनीच ते बघतात*

  *कमी नाही आता काही,*

  *कृपादृष्टीची बरसात*

  *पाच बोटे अमृताची,* 

  *पंचप्राण तुमचे त्यात*

  *पाठीवरी फिरवा हात,* 

  *या हो बाबा एकच वेळा*


🌺🌿🌸🔆🙏🔆🌸🌿🌺


  *गीत : पी. सावळाराम*  ✍

  *संगीत : वसंत प्रभू*

  *स्वर : लता मंगेशकर*

  

  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१९.०९.२०२४-*


🌻🌿🥀☘🌺☘🥀🌿🌻

Featured post

Lakshvedhi