🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*तीर्थरूपांच्या आशीर्वादाची*
🌹⚜️🌹🔆🙏🔆🌹⚜️🌹
*प्रतिमा आणि प्रतिकांचे जगभर महत्त्व आहे. सध्या पितृपक्ष अर्थात कृतज्ञता पंधरवाड्यात आमच्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला त्यांच्या प्रतिमांचे पूजन होणार. तो भूतकाळ समोर साकारतो.. पूर्वजांनी केलेला संघर्ष, आम्हांला घडविण्यासाठी खाल्लेल्या खस्ता.. तो त्याग आठवतो.*
*त्या प्रतिमा बोलत नसल्या तरीही नकळत संवाद साधला जातो. आज दुरावलेल्या.. जगावेगळे निरपेक्ष प्रेम करणाऱ्यांच्या आठवणींनी डोळ्यांत अश्रू येतात. प्रत्येक जण मानतो की, आज जे आम्ही सुखात आहोत ते या आमच्या पूर्वजांच्या.. आईवडीलांच्या पुण्याईमुळे.*
*नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या किलकिल्या डोळ्यांना त्यांनीच हे विशाल जग दाखविले.. रक्षण केले. प्रेमवर्षावाने या जगात जगायला पंखात बळ दिले.*
*आईसोबतच वडिलांचाही तेवढाच मोठा वाटा.. कदाचित त्यांचे योगदान काकणभर सरसच. उदभवेल तशा परिस्थितीत संघर्ष करुन त्यांच्या कमाईनेच चार घास मिळाले. जीवनात कितीही संकटे आली तरीही त्याची धग त्यांनी घराला लागू दिली नाही. म्हणूनच वडिल हे तीर्थरुप.*
*पण वडिलांचे प्रेम एवढ्यावरच थांबत नाही. ते जगात असो वा नसो, प्रत्यक्ष सहवास.. धीर लाभो अथवा न लाभो, त्यांच्या आशीर्वादात एवढे सामर्थ्य असते की त्यांच्या पश्चातही त्यांची मुले संघर्ष करुन यशस्वी होत प्रगतीची शिखरे गाठून सुखात नांदतात.*
*ही प्रगती आपल्या तीर्थरुपांच्या पुण्याईचे.. आशीर्वादाचे फळ आहे याची जाणीव मुलांना असतेच. हे चांगले दिवस आलेत, पण हे वैभव बघायला ते हयात नाहीत यामुळे मन खिन्न होते.*
*मुलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे, मुलांसाठी संपूर्ण जीवन खर्च करणारे कल्पवृक्ष म्हणजे वडील. त्यांनी जीवनात जे काही पुण्य कमावले ते आमच्या कामास आलेय. आज त्यांची थोरवी समजलीय की त्यांच्या पुण्याईने आमचे हे घर म्हणजे पुण्यदायी गंगेकाठचे घरच नाही तर ही तीर्थक्षेत्र काशीच झालीय.*
*पण हे आमचे वैभव बघायला एकदा तरी प्रत्यक्ष या. तुम्ही कृपादृष्टीची जणू बरसातच केलीय. पाचही बोटे अमृतात न्हायलीय. हे आमचे सुख चंद्र सूर्याच्या डोळ्यांनी तुम्ही बघताय, हे पण ठाऊक आहे. पण.. पण एकदा तरी पाठीवरुन हात फिरवायला या हो.*
*जसजसे वय वाढते, जगाचे अनुभव येतात तसतसे वडिलांच्या त्यागाविषयीची कृतज्ञता वाढते. त्यांच्या आठवणी आनंद.. उर्जा.. सकारात्मकता शिकवतात.*
*लता दिदी तर नव्वदी पार झाल्या तरीही नित्य वडिलांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळायचे.. आठवणींनी कंठ दाटून यायचा. वडिलांच्या आशीर्वादाचे फळ काय असते याचे आजच्या काळातील उदाहरण म्हणजे पंचरत्न मंगेशकर परिवार.*
*पी. सावळाराम यांनी मा. दीनानाथांच्या स्मृतिदिनानिमित्य लिहिलेले.. लतादिदींच्या भावना व्यक्त करणारे हे गीत.*
🌺🌿🌸☀️🌺☀️🌸🌿🌺
*कल्पवृक्ष कन्येसाठी*
*लावुनिया बाबा गेला*
*वैभवाने बहरुन आला,*
*याल का हो बघायाला*
*तुम्ही गेला आणिक,*
*तुमच्या देवपण नावा आले*
*सप्तस्वर्ग चालत येता,*
*थोरपण तुमचे कळले*
*गंगेकाठी घर हे अपुले,*
*तीर्थक्षेत्र काशी झाले !*
*तुम्हावीण शोभा नाही,*
*वैभवाच्या देऊळाला*
*सूर्य, चंद्र तुमचे डोळे*
*दुरुनीच ते बघतात*
*कमी नाही आता काही,*
*कृपादृष्टीची बरसात*
*पाच बोटे अमृताची,*
*पंचप्राण तुमचे त्यात*
*पाठीवरी फिरवा हात,*
*या हो बाबा एकच वेळा*
🌺🌿🌸🔆🙏🔆🌸🌿🌺
*गीत : पी. सावळाराम* ✍
*संगीत : वसंत प्रभू*
*स्वर : लता मंगेशकर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-१९.०९.२०२४-*
🌻🌿🥀☘🌺☘🥀🌿🌻
No comments:
Post a Comment