Friday, 13 September 2024

२१ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

 २१ सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे

समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

 

मुंबईदि. १३ : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबर रोजी  सकाळी ७.०० वाजता जुहू बीचमुंबई येथे राज्य सरकारस्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितले.

दलामल हाऊसनरीमन पाँईंट येथे आयोजित आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस निमित्ताने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने आयोजित  बैठकीत ते बोलत होते.

श्री. दराडे म्हणालेकेंद्रीय पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्रालयनवी दिल्ली तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत सर्व १३ किनारी राज्यांमध्ये २१ सप्टेंबर, २०२४ रोजी (आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस) समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय किनारी अभियान योजनेअंतर्गत दि. २१ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू बीचमुंबई येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात आली असून त्याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सर्व यंत्रणास्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वायाने कामे करावे, अशा सूचना श्री. दराडे यांनी दिल्या.

यावेळी विविध यंत्रणांचे आणि स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर

  

एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर

 

मुंबईदि. 13 : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणारी एसटी 9 वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर धावू लागली आहे. आर्थिक संकटामध्ये रूतलेल्या एसटीने आता भरारी घेतली असून महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल 9 वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात आल्याने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत भविष्यातही प्रयत्नांची पराकाष्टा करून महामंडळ सातत्याने नफ्यात येईलअसे प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे.

            मागील काळात दोन वर्ष कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एस टी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आले होते. मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली. तथापिएसटीचा घटलेला प्रवासी पुन्हा एसटीकडे वळविणे हे मोठे आव्हान होते. यावेळी राज्य शासनाने 75 वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्याकी ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. सध्या सरासरी 54 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत.

याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात " हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छसुंदर बस स्थानक अभियान"विद्यार्थ्यांना शाळेत थेट पासप्रवासी राजा दिनकामगार पालक दिनश्रावणात एसटी संगे तीर्थाटनअसे अनेक अभिनव उपक्रम राबविले. तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेतत्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या. तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करूनत्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या. याच बरोबर नादुरुस्ती बसेसचे प्रमाण 12 टक्क्यांवरुन 6 टक्के झाले. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये ते निम्याने कमी करण्यात आले. तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करुन डिझेलची खपत 0.52 कि.मी.ने वाढविण्यात आले. त्यामुळे डिझेलची बचत झाली आहे. या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये  एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे.

भविष्यात येऊ घातलेल्या स्व: मालकीच्या बसेस व भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करुन एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. जेणेकरुन एसटीला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.

स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रमआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

 स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम

           राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे २० सप्टेंबर रोजी होणार आहे.या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीराज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीकेंद्रीय उद्योगमंत्री जीतन राम मांझी,केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंहउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार,वने मंत्री सुधीर मुनगंटीवार,उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना

         नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतंर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे. 

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण; प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ

 उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण;

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

 मुंबईदि. १३ : कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये 'संविधान मंदिर लोकार्पण हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभआणि 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभप्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी होणार आहेअशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी  कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलराज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक यावेळी  उपस्थित होते.

संविधान मंदिर लोकार्पण सोहळा

           राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा  यांच्या उपस्थितीत रविवार १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या भारतीय संविधानाची शिकवण  देण्यात येणार असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.                                      

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी

मी आणि माझे कुटुंबीय पासुन सावधान रहा



मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात

 मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुख्यमंत्री शिंदेउपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमएमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल – प्रा. श्र्वाब

 

मुंबईदि. 12 : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी - सकल उत्पन्न दुप्पट होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स ईकॉनॉमीच्या दिशेने टाकलेल्या पावलांना बळ दिले आहेअसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री श्री. शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला 'जागतिक आर्थिक केंद्रम्हणून विकसित करण्याबाबत निती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- एमएमआरडीए व वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्या एमएमआर वर्ल्ड ईकॉनॉमी हबसाठीच्या सामंजस्य करार करण्यात आला.

या करारावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रमकुमार तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. क्लॉस श्वाब यांनी स्वाक्षरी केल्या व करारांचे आदान-प्रदान केले.

या समारंभास उद्योग मंत्री उदय सामंतशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणगृहनिर्माण मंत्री अतुल सावेकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाखासदार मिलिंद देवरावर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा. श्वाबश्रीमती हिल्डे श्र्वाबनिती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यमराज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकगृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ आय. एस. चहलमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेनियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरानगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्तामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहएमएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रमकुमारवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता तसेच उद्योगबांधकाम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेगणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या संकल्पनेचा शुभारंभ होत आहे. मुंबई महानगर प्रदेश हे जागतिक आर्थिक केंद्र व्हावे, हे स्वप्न होते. हे स्वप्न साकार होत असल्याचा विशेष आनंद आहे. मुंबई ही आम्हा सर्वांसाठीच जीवनवाहीनी आहे. हा एक महत्वपूर्ण क्षण आहे. मुंबई बदलली तर महाराष्ट्र आणि देशासाठीही महत्वाचे बदल होणार आहेत. आम्ही राज्याच्या विकासासाठी स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेने राज्याच्या विकासासाठी शिफारस आणि आराखडा सादर केला आहे. या आराखड्याला बळ मिळेल, अशी संकल्पना घेऊन निती आयोग पुढे आला आहे. सात बेटांवरील मुंबईचा विकास आता एमएमआर आर्थिक केंद्र होण्यासाठी सात महत्वाच्या शिफारशी निती आयोगाने केल्या आहेत. मुंबई ही भविष्यात ग्लोबल फिनटेक कॅपिटल होईलअसा विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलीयन डॉलर्स करण्याचा संकल्प केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेहा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यात महाराष्ट्राचे एक ट्रिलीयन डॉलर्सचे योगदान असेल, असे नियोजन केले आहे. दावोस मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून विक्रमी अशी गुंतवणूक आली. तसेच जगभरातील महत्वाच्या उद्योगांनी महाराष्ट्रासाठी पसंती दिली. यातून मोठी गुंतवणूक येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार संधीही उपलब्ध होणार आहेत. यामधून जागतिक आर्थिक केंद्राला बळच मिळणार आहे. एमएमआर जागतिक आर्थिक केंद्राच्या या संकल्पनेला साकार करण्यासाठी एमएमआरडीएध्ये विशेष मध्यवर्ती कक्ष स्थापन करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईपालघरठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या संकल्पनेतून या परिसरात मोठ्या क्षमतेचे डाटा सेंटरवाढवणदिघी या बंदरामुळे परिसराचा कायापालट होईल. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल. महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. गुंतवणूकदारांना सुविधा देण्यात येत आहेत. महाराष्ट्र परकीय गुंतवणूक मिळवणारे भारतातील प्रथम क्रमाकांचे राज्य आहे. यामुळे रोजगारस्टार्टअपस्क्लीन एनर्जी यामध्येही महाराष्ट्र नेतृत्व करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीनिती आयोगाने अत्यंत महत्वाचा असा अहवाल योग्य वेळी आणला आहे. हा अहवाल आणि सामंजस्य करार हे दोन्ही ऐतिहासिक क्षण आहे. यातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल. आर्थिक विकासाचे नियोजन केल्याने अनेक क्षेत्रांना न्याय देता येणार आहे. यात नागरिकांच्या जीवनाशी निगडीत अनेक घटकांचा साकल्याने विचार केला गेला आहे. गत काही वर्षांत आम्ही मुंबईतील पायाभूत सुविधांसह विविध कामांना चालना देण्यावर भर दिला आहे. यामुळे मुंबई अनेक क्षेत्रातील विकासाचे नेतृत्व करत आहे. अटल सेतु – एमटीएचल या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई उदयास येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे टेक्नॉलॉजी हब या परिसरात उभे होत आहे.यातून देशातील डीजिटल ईकॉनॉमीलाही चालना मिळणार आहे. वाढवण बंदरबुलेट ट्रेनविरार-अलिबाग कॉरिडॉर यामुळे या परिसरांचा विकासात्मक असा कायापालट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रा. श्र्वाब यांनी निती आयोगाच्या अहवालाचे आणि एमएमआर जागतिक आर्थिक केंद्र निर्माणासाठी सुरु असलेल्या अंमलबजावणीचे कौतुक केले. ते म्हणालेहा अहवाल हाच मुळात अप्रतिम आहे. या ब्लू-प्रिंटमुळे विकासाला चालना मिळेल. यातून सामाजिक बदल आणि पर्यावरण पूरकतेचीही काळजी घेतल्याचे दिसते. या परिसरात जागतिकस्तरावरील आधुनिक अशा पायाभूत सुविधांची निर्मिती होईल. या सर्व प्रक्रियेमध्ये मानवी आस्थांचा विचार केला गेला आहेहे देखील महत्वाचे आहे. यातून मुंबई ही जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईत आल्यानंतर तरूण उद्यमींशी भेट झाली. या तरूणामध्ये भविष्यातील संधीविकास याबाबत सकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवले. त्यामुळे मुंबईचा हा आर्थिक केंद्राचा मास्टर प्लॅन निश्चितच यशस्वी होईलअसेही ते म्हणाले.

सुरुवातीलामुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी प्रास्ताविक केले. शिरीष संख्ये यांनी सादरीकरणातून आर्थिक केंद्राच्या उद्दीष्टाबाबत माहती दिली. ध्वनीचित्र फितीद्वारे एमएमआरडीएच्या यशस्वी आणि प्रगतीपथावरील प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

 

निती आयोगाच्या विशेष अहवालाचे या प्रसंगी अनावरण करण्यात आले. या अहवालात मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे सर्वंकष दृष्टिकोन मांडले आहेत. मुंबई महानगर प्रदेशामध्ये असलेली अभूतपूर्व वाढीची क्षमता आणि २०३० व २०४७ साठी या प्रदेशाची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे यावर या अहवालात भर देण्यात आला आहे. त्यात पुढील उद्दिष्टांचा समावेश आहे :

•          एमएमआरचा जीडीपी $१४० अब्जांवरून (₹१२ लाख कोटी) २०३०पर्यंत $३०० अब्जांपर्यंत (₹२६ लाख कोटी) वाढवणे आणि २०४७ पर्यंत $१.५ ट्रिलियनचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

•          २०३० पर्यंत २५-२८ लाख नवे रोजगार निर्माण करणेविशेषतः मनुष्यबळामध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे.

•          दरडोई उत्पन्न $,२४८ वरून २०३० पर्यंत $१०,०००-१२,००० पर्यंत वाढवणे आणि २०४७ पर्यंत $३८,०००चे उद्दिष्ट ठेवणे.

•          या कार्यक्रमात एमएमआरच्या परिवर्तनासाठी काही महत्त्वाच्या धोरणांचा उल्लेख करण्यात आला

•          वित्तीय सेवाफिनटेकएआयआरोग्यआणि मीडिया यांसारख्या उद्योगांक्षेत्रांसाठी मुंबई महानगर प्रदेश हे जागतिक सेवा केंद्र म्हणून स्थापित करणे.

•          झोपडपट्टी पुनर्वसनासह ३० लाख परवडणारी घरे बांधणे.

•          पर्यटन आणि मनोरंजन केंद्रांचा विस्तार करणे. विशेषतः समुद्रकिनारेक्रूझ आणि निसर्ग पर्यटन विकसित करण्यावर भर देणे.

•          बंदरांजवळ लॉजिस्टिक हब विकसित करणे आणि आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ६०-७० दशलक्ष चौरस फुटांची अतिरिक्त गोदाम क्षमता निर्माण करणे.

 

भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या मुंबई महानगर प्रदेशाच्या इकोनॉमिक मास्टर प्लॅनचे ३० महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये रूपांतर करण्यात आले असूनहे प्रकल्प पुढील पाच ते सहा वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत. या सोबतचया कालावधीत खाजगी क्षेत्रातून १२५-१३५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे  या प्रदेशाच्या वाढीस आणखी चालना मिळेल.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या यशस्वी सहकार्यातून शाश्वत विकासपायाभूत सुविधा विकासआणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी असलेली कटिबद्धता दिसून येते. या प्रयत्नांमुळे मुंबई महानगर प्रदेशाला प्रमुख जागतिक आर्थिक केंद्र म्हणून स्थान प्राप्त होईल. एमएमआरडीए सध्या मुंबईचे पुनरुत्थान आणि मुंबई महानगर प्रदेशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे भव्य पायाभूत सुविधा प्रकल्प राबवत आहेज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील अडीच कोटी नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.


Thursday, 12 September 2024

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरू होणार अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

  

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरू होणार

अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

 

        मुंबईदि.12 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच 47 बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात येत असून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत  स्वीकारण्यात  येणार आहे.   त्यानंतर प्राप्त अर्जांचे शुल्क स्वीकारण्याचे कामकाज सुरू करण्यात येईल.

 

            आकर्षक अथवा पसंती क्रमांक घेण्यास इच्छूक असलेल्या अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर क्रमांक देण्यात येणार आहे. मालिका सुरू होण्याच्या दिनांकास सकाळी 11 वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास आकर्षक क्रमांकासाठी विहीत पद्धतीनुसार लिलाव करण्यात येईल. त्यानुसार एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सर्व अर्जदार मालिका सुरू होण्याच्या दिनांकाच्या दिवशी संबंधीत क्रमांकासाठी असलेल्या मुळ रक्कमेचा धनाकर्ष संबंधीत रोखपाल यांना सादर करतील. त्याच दिवशी 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत लिलाव बोलीच्या रकमेचा धनाकर्ष बंद पाकिटात संबंधीत रोखपालाकडे सादर करावा लागणार आहे. या बंद पाकीटातील धनाकर्ष नोंदणी प्राधिकाऱ्यांसमोर उघडले जावून सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास आकर्षक अथवा पसंती क्रमाक देण्यात येईल. अर्जदाराने 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बोली रकमेचा बंद पाकिटातील धनाकर्ष जमा केला नाहीतर सदर क्रमांक दुसऱ्या अर्जदारास देण्यात येईलअसे बोरीवलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम कासार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi