उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण;
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ
- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १३ : कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये 'संविधान मंदिर लोकार्पण ' हा कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र शुभारंभ' आणि 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना शुभारंभ' प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते दि. २० सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विकास नाईक यावेळी उपस्थित होते.
संविधान मंदिर लोकार्पण सोहळा
राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रम उपराष्ट्रपती जगदीप धनखड व राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या भारतीय संविधानाची शिकवण देण्यात येणार असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी
No comments:
Post a Comment