Tuesday, 27 August 2024

अघटित* *सत्यघटना* *( - डॉ.सुभाष मुंजे )* अलिबागगुरु कोणत्या रुपात भेटणार हे सांगता येणार नाही.*

 *गुरु कोणत्या रुपात भेटणार हे सांगता येणार नाही.*


हा लेख छोटासा आहे पण उत्सूकता वाढवणारा आहे.


*अघटित* *सत्यघटना* 

*( - डॉ.सुभाष मुंजे )*


 *मी नोकरीवर अलिबागला रुजू झालो..* 

 *येणारी प्रत्येक केस माझ्या पुस्तकी ज्ञानात भर टाकत होती. प्रत्येक पेशंट शिकवत होता.* 


 *त्या दुपारी अशीच एक स्त्री आली.* 


 *लग्न होऊन ११ वर्षांनंतर*

**नवसासायासाने आलेले गर्भारपण. पण काय व्हावं ?* 


 *आमच्या अलिबागच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या बैलानं नेमकी हिला ढुशी दिली आणि शिंग तिच्या पोटाला भोसकून बाहेर आलं !* 

 *तिला साऱ्यांनी मिळून हॉस्पिटल*

 *मध्ये आणलं होतं.** 


 *जखम पाहिली तर पोट भोसकले गेले होते.* 


 *त्यामधून डोकावत होतं उदरपोकळीचं संरक्षक आवरण, आतड्यांचं एक वळण व बाळाचा एक हात !* 

जखम अगदी नुकतीच झालेली होती.

 हाताच्या आणि आतड्याच्या हालचाली दिसत होत्या. 

ही ७ महिन्यांची पहिलटकरीण. 

तिच्या दृष्टीनं हे दृश्य काही बरे लक्षण नव्हते. शिंगाने गर्भाशयाची भिंतही छेदली होती. त्यातून बाहेर आलेला तो चिमुकला हात 'काही तरी करा हो' म्हणून विनवणी करीत होता जणू.


परिस्थिती गंभीर होती.

आता एकूण प्रसंग बघा.


 *गर्भाशयाला इजा म्हणजे बाळालाही इजा झालेली असण्याची शक्यता.* 


 *तसं असेल तर आता सातव्यातच बाळंतपण करावं लागणार. म्हणजे मग मूल जगण्याची आशा फारच कमी.* 


 *त्या साठीही सिझेरियन करावं लागणार, म्हणजे पोटावर वण येणार आणि शिवाय मुलाचीही खात्री नाही. काय उपयोग ?* 


 *आईच्या जीवासाठी हे करणं भाग पडू शकते आणि मुलाच्या जीवाला धोका संभवू शकतो ही गोष्ट मी नातेवाईकांना तातडीने समजावून सांगितली.* 


 *आता त्या घरातलं हे बाळ म्हणजे*

 *किती मोलाचं कौतुक.** 


त्याच्या जन्मघडीची सारे घरदार वाट बघत बसलेलं. किती बेत, किती स्वप्नं जन्माआधीच त्याच्या भोवती विणलेली असतील !


रोजच्या रस्त्याने जाता-जाता सांडाने सारं क्षणात उधळून दिलं.


मी सांगायला गेल्यावर त्यांनी निक्षून सांगितलं, "की आईचा जीव वाचवायचा बघा. बाळाला हात लावू नका."

 

ते मला लिहून द्यायला तयार होते.

पण त्यांच्या सहीने शस्त्रक्रियेमधील प्रश्न कुठे सुटत होता ?  

तांत्रिक बाबी पुऱ्या होतील पण सद्सद्विवेक बुद्धीचं काय ? 


मी बाळाबाबतची त्यांची अट न स्वीकारता ऑपरेशन करण्याचे मान्य केलं.


 मुला बाबत काहीही न केलं तर आईच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशा वेळी मला योग्य वाटेल ते मी करीन असे सांगितले. पण ते ठाम होते. 

प्रसंग आणीबाणीचा होता. मी माझ्या विवेकाला स्मरुन ठरवलं, की बाहेर आलेला हात आत लोटून गर्भाशय शिवून घेता आले तर ठीक. नाहीतर बाळंतपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे आईचा जीव वाचवण्यासाठी हे करावं लागलं, असं सांगण्याचं मी ठरवलं.

 

मी नाही म्हटले असते तर ते तरी कोठे जाणार  होते?

१०० मैलांपर्यंत काही सोयीही नव्हत्या.


मी पोटावर छेद घेतला. इतर इजा

फार गंभीर नव्हती. गर्भाशयानेच

पुढे राहून इतर अवयवांचे रक्षण केले होते. पण बाळाचा हात काही केल्या आत जाईना.


गर्भाशयाचे स्नायू चांगलेच जाड व भक्कम असतात. हाताभोवती

त्यांचं घट्ट आकुंचन झाले होते.

गर्भाशयाला सुदैवाने दुसरी काही इजा नव्हती.


 *हा एवढा हात आत गेला आणि जखम शिवली की माझं कर्तव्य पार पडलं असं माझ्या मनात येत होतं.* 


 *पण नेमकं तेच होत नव्हतं आणि तो चिमुकला हात आता पांढरा पडायला लागला होता. हे लक्षण धोक्याचं होतं. रुधिराभिसरण थांबलं की अवयव प्रथम निळा पडतो आणि मग पांढरा.* 

 *पुढचा टप्पा म्हणजे गॅंगरीन !* 

 *हात कापून तर गर्भाशय शिवता येणार नव्हते.* 


 *माझ्या मनात असला विचार डोकावून गेला याचाच मला धक्का बसला.* 


पण मी घायकुतीला आलो होतो आणि या छोट्या हाताशी झगडताना रंजीस आलो होतो.


माझ्यावरचा हा पेचप्रसंग आमच्या जुन्या वॉर्डबॉयच्या लक्षात आला. 

त्याचं नाव सांडे !


तो ऑपरेशन थिएटर मध्ये डोकावला. आता हा प्राणी कायमच प्यायलेला असायचा. तारेतच चालायचा.

त्याच्या ' आनंदाला ' व्यत्यय तो कसा माहीतच नव्हता. 

त्याला बघता क्षणी वाटायचं, याला  'चालता हो' म्हणावं.

पण त्याचा कुणाला त्रास नसे आणि त्याचं काम तो चोख करीत असे.


थिएटरची स्वच्छता आणि शस्त्र क्रियेची सामुग्री निर्जंतुक करणं ही त्याची नेमलेली कामं. 

आधीच माझ्याकडे मनुष्य बळ कमी.

त्यात याला जाऊ देणं परवडण्यासारखं नव्हतं.


शिवाय त्याची एक जमेची बाजू म्हणजे त्याच्या कधीही दांड्या नसायच्या.

नेहमी कामावर हजर !


मी तो हात हलके आत लोटण्यासाठी झगडत होतो.


तेवढ्यात सांडे म्हणाला, "साहेब, गरम सुईचा चटका द्या हाताला.. हात दचकून मागे जाईल ! "


मी मेडिकलचे शिक्षण घेतलं त्या रुग्णालयात किंवा अभ्यासासाठी पालथ्या घातलेल्या पुस्तकांत ही सूचना नव्हती.. पण माझे सर्व पर्याय संपले होते...


मन घट्ट करून आणि परमेश्वराचे नाव घेऊन, मनात लाख वेळा त्या बाळाला सॉरी म्हणत एक इंजेक्शनची सुई लाल तापवून मी त्या हातावर टेकवली...


आणि.......... खरंच हात आत गेला !

मुलानं ओढून घेतला म्हणायला हवं. 

मग सगळं एकदम सोपं झालं. 


आश्चर्य म्हणजे बाई पूर्ण दिवस घेऊन सुखरूप बाळंत झाली आणि बाळाच्या हातावर डागाचा कसलाही मागमूस नव्हता !


हा सगळा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल.


 *गुरू, हा  माणसाला कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही हेच खरे.* 

 *कल्पनातीत अडथळ्यांमधूनही सुखरूप सुटका हे अघटीतच घडले होते.* 


 *यालाच,  'ही तर श्रींची इच्छा' म्हणत असावेत.* 


 *हा आमचा वॉर्डबॉय आता हयात नाही. मी* *इतर कुणाची नावे घेतली नाहीत, पण या थरार नाट्याच्या सुखांत शेवटाचे श्रेय* 

 *हे त्याचेच आहे.** 


 *पुढे त्याच्या ' सांडे ' आडनावावरून आमच्यात एक* 

 *विनोद प्रचलित झाला होता,* 

 *'सांडानं मारलं पण सांडेनं तारलं ! '* 


 *( " Behind the mask " या* 

 *डॉ.सुभाष मुंजे या शल्यविशारदाने लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या श्यामला वनारसे यांनी* 

 *' बिहाइंड द मास्क ' याच नावाने केलेल्या अनुवादित व मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई प्रकाशित पुस्तकातून वेचलेला एक थक्क करणारा अनुभव - साभार )* 


*गुरू कोणत्या रूपात प्रकट होतील हे सांगणे फार कठीण आहे.*

Monday, 26 August 2024

स्टार गेट किंवा तारा द्वार म्हणजे काय

 शिला तोरणम एक रहस्यमय रचना.!


तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिराच्या जवळ असलेल्या तिरुमाला डोंगरावर "शिला तोरणम" नावाची विचित्र दगडी कमान आहे.!


कमान खूप मोठी आहे, ती 26 फूट रुंद आणि 10 फूट उंच आहे. आणि भूगर्भ  शास्त्रज्ञांच्या मते अशा प्रकारची कोणतीही रचना संपूर्ण आशियामध्ये अस्तित्त्वात नाही. शास्त्रज्ञांना सुद्धा अजूनही ह्या शीला तोरणम चे गूढ उलगडलेले नाही.!


शिला तोरणमची एक रहस्यमय गोष्ट आहे ती म्हणजे  "शिला तोरणम" हे विशिष्टवेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करते.!


इथल्या स्थानिक लोकांद्वारे जो इतिहास सांगितला जातो तो म्हणजे भगवान विष्णूंनी पृथ्वी तलावर इथेच पाहिले पाऊल ठेवले!  आणि त्याची साक्ष शीला तोरणम जवळ असलेल्या भगवान विष्णूंच्या पादुका देतात.! ह्या भगवान विष्णूंच्या पादुकांचे रहस्य असे आहे की ह्या पादुकांनवर पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी क्षणात त्याची वाफ बनते. सध्या ह्या पादुकांना जाड प्लास्टिक बॉक्सचे कव्हर केलेले आहे.!


"शिला तोरणम" मधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एव्हडे जबरदस्त आहेत की, इथे भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांचे सेल फोन, कॅमरे कायमचे बंद पडलेले आहेत! किंवा अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू "शिला तोरणम" च्या संपर्कात आल्या तर त्या निकामी होतात.!


सध्या "शिला तोरणम"  परिसर पूर्णतः बंदिस्त करण्यात आलेला आहे. कोणालाही जवळ जाता येत नाही किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे घेऊन जाण्याची परवानगी नाही.!

पण ह्या "शिला तोरणम" परिसरातील माहितीचा बोर्ड ह्यामगच अद्भुत रहस्य उलगडण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. बोर्डाच्या फोटोमध्ये आपण बघू शकता स्पष्टपणे लिहलेलं आहे. " भगवान श्री बालाजी अर्थात भगवान विष्णू स्वयंभू बनून ह्या शिलतोरणं मधून बाहेर आले."!


आता  स्वयंभू म्हणजे कोणत्याही साधनांचा किंवा मनुष्यांच्या मदतीशिवाय प्रकट होणे. याचा अर्थ असा होतो की भगवान विष्णू या कमानीद्वारे प्रकट झाले ज्यामुळे ही रचना स्टार गेट अर्थात तारा द्वार असू शकते.!


स्टार गेट किंवा तारा द्वार म्हणजे काय?


स्टार गेट किंवा तारा द्वार अश्या पॉईंट ला म्हंटले जाते जिथून एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहापर्यंत काही वेळातच पोहचता येते! अर्थात पृथ्वीवरून कुठल्याही ग्रहापर्यंत पोहचायचे असेल तर  स्टार गेट च्या माध्यमातून काही वेळातच पोहचू शकतो.! किंवा कुठल्याही ग्रहावरून पृथ्वीवर पोहचायचे असेल तरी सुद्धा स्टार गेट च्या माध्यमातून काही सेकंदात पृथ्वीवर पोहचता येते.!


आजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक हिंदू देवतांना कमानीत कोरले जाते त्या कमानींना शिला तोरणम पण म्हणतात.! त्या कमानी वरती अग्नीच्या ज्वालाच चित्रण कोरलेल असत. आता त्या कमानी सुशोभीकरणासाठी कोरल्या असाव्यात की मुर्तीकारांनी स्टार गेटच्या माध्यमातून देवता पृथ्वीतलावर आवतरत होत्या हे सांगायचा प्रयन्त केलेला आहे.!

 

ह्याचाच अर्थ "शिला तोरणम" हे एक स्टार गेट आहे, पण आजच्या काळातील तथाकथित वैज्ञानिकांसाठी तो काल्पनिक वैज्ञानिक भास आहे.!


जर "शिला तोरणम" ही नैसर्गिक दगडी संरचना असेल तर असा कुठला नैसर्गिक दगड आहे ज्याचा संपर्कात आजच्या आधुनिक काळातील इलेक्ट्रॉनिक उपकरण आली तर तो ती उपकरणे कायमची निकामी करतो? किंवा असा कुठला नैसर्गिक दगड आहे जो काही सेकंदामध्ये पाण्याची वाफ तयार करतो? ह्याची उत्तर आजच्या काळातील तथाकथित वैज्ञानिकांकडे सुद्धा नाहीत.!


माझ्या मते सनातन वैदिक हिंदू धर्मातील उच्च कोटीच्या विज्ञानाच उदाहरण ह्यापेक्षा दुसरं असू शकत नाही.!

महिलांसाठी हेल्प लाईन


 

गुजरात मधील द्रोणेश्वर येथील शिवलिंग मंदिर

 *गुजरात मधील द्रोणेश्वर येथील शिवलिंग मंदिर. ज्यामध्ये शिवलिंगावर मागे असलेल्या नंदीच्या मुखातून गेली हजारो वर्षे प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक जलाभिषेक होत आहे.*🔱🩷🐚


आपल ते सोनं पण ओळखणार कोण..?🤔 👉 खोबरेल तेल

 आपल ते सोनं पण ओळखणार कोण..?🤔


👉 खोबरेल तेल


खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे..!


माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर झाले !


कृपया मित्र मैत्रिणींनो हा लेख जरूर वाचा आणि आवडला तर ज्यांच्या ज्यांच्यावर तुमचे प्रेम माया आहे त्यांना पाठवा ….!


तुमच्यासाठी ख़ास डॉ मीना नेरुरकर यांचा हा लेख ..!!


“कोकोनट ऑइल”

गेली तीस वर्षे नारळाच्या खोबर्‍याला, खोबरेल तेलाला आरोग्यबाधक ठरवल्यावर त्याचे ग्रह पालटले आहेत.


दिवसागणिक वाढत असलेल्या अल्झायमर या रोगावर जालीम उपाय म्हणून खोबरेल तेलाला आत्ता महत्त्व आलेले आहे.


अमेरिकेत डॉक्टर पेशंटना टोस्टवर खोबरेल तेल लावून द्या, असे सांगत आहेत. इतके दिवस आजूबाजूचा काहीही गंध नसलेली अल्झायमर पीडित जनता महिनाभराच्या टोस्टवरच्या खोबरेल तेलाने एकेकाळचे परिचित जग परत नव्याने ओळखायला लागलेली आहे. कोकोनट ऑइलचे भाग्य पालटायला डॉ. ब्रूस फाइफ याच्या रूपाने गॉडफादर लाभला.


अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यात राहणार्‍या या न्यूट्रिशयन शेजारी पॉल सोएर्स नावाचा फिलिपिनो माणूस होता. पॉल मिरॅकल ऑइल विकायचा. आजूबाजूची फिलिपिनो जनता काहीही झाले की त्याच्या दुकानात धावत यायची व तेल घेऊन जायची.


कुतुहल म्हणून ब्रूसने एके दिवशी पॉलला विचारणा केली. पॉल म्हणाला, थायलंड वा फिलिपाइन्स देशातून नारळ आणतो, नारळाच्या डोळ्यात खिळा घालून पाणी काढतो, मग तो हातोड्याने फोडतो, आतले खोबरे किसतो, ते पाण्यात उकळत ठेवतो, पाणी आटून वर राहते ते कोकोनट ऑइल. कसल्याही व्याधीवर उपचार म्हणून देतो.


डॉ. ब्रूस न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे त्याला प्रक्रिया न झालेल्या नैसर्गिक खाद्यपदार्थामध्ये रस होता खोबर्‍यातून तेल काढण्याची किचकट प्रक्रिया सोपी करायला ब्रूसने खूप मदत केली. पॉलला खोबरे वाटायला मिक्सर आणून दिला. खोबर्‍यातून तेल काढायला द्राक्षातून वाइन काढायचा प्रेस आणून दिला. आता तेल काढणे खूप सोपे झाले. पॉलच्या सांगण्यावरून काहीही दुखत असले की, ब्रूसने चमचाभर कोकोनट ऑइल तोंडाने घ्यायला सुरुवात केली. कापलेल्या खरचटलेल्या ठिकाणी कोकोनट ऑइल लावायला सुरुवात केली. ब्रूसचे वजन कमी झाले, त्याची त्वचा तुकतुकीत दिसायला लागली. जखम पटकन भरायला लागली. ब्रूसच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.


इतके दिवस नारळाला का वाईट म्हणत होते याबद्दल त्याने खोलात जाऊन तपास करायला सुरुवात केल्यावर त्याला आढळून आले की, सोयाबीन इंडस्ट्रीने जगात पाय रोवण्यासाठी मुद्दाम खोबर्‍याविरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली होती. सगळे जण हार्ट अटॅकला घाबरतात. खोबरेल तेलात स्निग्धांश जास्त असतात व त्याने हार्ट अटॅक येतो, पण सोयाबीनचे पदार्थ खाल्ले तर हृदयविकार कमी होतात असा खोटा प्रचार सुरू केला. झाले. घाबरट लोकांनी हा रिपोर्ट वाचल्यावर नारळाचे पदार्थ खाणे कमी केले. चाणाक्ष सोयाबीन इंडस्ट्रीने स्वत:चे घोडे पुढे दामटले.


ब्रूसने नारळ वापरत असलेल्या देशात जाऊन खोबरेल तेलावर संशोधन केले. खोबर्‍यात असतात ते Medium chain fatty acids जे शरीराला हितकारक असतात. थायलंड,इंडोनेशिया, फिलिपाइन्स, पॉलिनेशियन देश खोबर्‍यावर जगतात. त्यांच्यात हार्ट अटॅकचे प्रमाण जगापेक्षा खूप कमी आहे. ब्रूसने शोधाअंती खोबर्‍यामुळे हार्ट अटॅक येत नाही असे विधान केले.


१९९९साली त्याने Coconut Oil miracle या नावाचे पुस्तक स्वत:च प्रसिद्ध केले. ते वाचून डॉ. मेरी न्यूपोर्ट हिने २००८ साली अल्झायमरच्या रोग्यांमध्ये कोकोनट ऑइलचा उपयोग करून पाहिला. फरक बघून तीदेखील चकीत झाली. इंटरनेटमुळे तो रिपोर्ट जगभर पसरला.


यू ट्यूबवर डॉक्टर हेल्दी फूडसाठी नारळाचे दूध कसे बिनधास्तपणे वापरावे याच्या रोज नव्या रेसिपीज देतात.


माझ्या आजीच्या बटव्यात जगातल्या सगळ्या व्याधींवर अक्सर इलाज म्हणून एकच औषध होते ते म्हणजे खोबरेल तेल.

परीक्षा आली की डोकं थंड राहावे म्हणून ती माझ्या डोक्यावर खोबरेल तेल थापटायची, केस काळे राहावेत म्हणून आंघोळीच्या आधी डोक्याला खोबरल तेलाचा मसाज करायची, कातडीत चरबी होऊ नये म्हणून अंगाला खोबरेल तेल चोळायची, कान दुखला तर कानात गरम खोबरेल तेलाची धार सोडायची…

सर्दी झाली, डोके खाली करून नाकात गरम खोबरेल तेलाचे थेंब घालायची.

ती जेव्हा ९५ व्या वर्षी गेली तेव्हा डोक्यावरचे सगळे केस शाबूत होते व काळे होते.


सध्या माझी हॉर्वर्ड विद्यापीठातली हुशार मुलगी अदिती नियमितपणे खोबरेल तेल वापरते. पणजी सारखे डोक्याला अंगाला तर लावतेच, पण ब्रूसने सांगितल्याप्रमाणे रोज तीन चमचे तेल पिते. खोबरेल तेलात जेवण करते. खोबरेल तेलावर वाढूनही मी त्याचा वापर थांबवला म्हणून माझी कीव करते. कोकोनट गुरू डॉ. ब्रूसच्या अथक प्रयत्नांनी अमेरिकेतही कोकोनट ऑईल खूप लोकप्रिय होत आहे. आता मी ही न बिचकता वाटी वाटी सोलकढी पिते. आमट्या, उसळी, कालवणांना नारळाचे वाटण घालते. कोकोनट ऑइल अँटी एजिंग असल्याचे रोज नवनवे रिपोर्ट बाहेर येत आहेत.


डॉ. मीना नेरूरकर….

२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे ३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे विषयावर चर्चा

 २७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे ३  सप्टेंबर रोजी

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे विषयावर चर्चा

 

मुंबईदि.२६ : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग आणि राज्य शासनाचा प्रशासकीय नावीन्यताउत्कृष्टता आणि सुशासन उपविभाग सामान्य प्रशासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "२७ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४" दि. ३ व ४ सप्टेंबर२०२४ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर (Jio World Convention Centre वांद्रे-कुर्ला संकुलमुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

ही परिषद देशातील सर्वात मोठ्या सभागृहांपैकी एक असलेल्या जस्मीन हॉलमध्ये होणार आहे. परिषदेचे यजमानपद यंदा महाराष्ट्र राज्याकडे असून "विकसित भारतः सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा पुरविणे" (Viksit Bharat : Secure and Sustainable e-Service Delivery) हा या परिषदेचा विषय आहे.

या परिषदेस प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या समारोप कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारहे उपस्थित राहणार आहेत.शालेय शिक्षणमराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर पालक मंत्री दीपक  केसरकर,   कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा  मुंबई उपनगर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा हेही या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेतून सु-प्रशासन तसेच ई- गव्हर्नन्ससाठीच्या उत्कृष्ट संकल्पनांचे आदान-प्रदान होणार आहे. या परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या प्रशासकीय सुधारणारचना व कार्यपद्धती या उपविभागाच्या नवीन नावांची घोषणादेखील केली जाणार आहे. या परिषदेमध्ये सहा मुख्य सत्रे आणि सहा उप-सत्रे होणार आहेत. त्यांमध्ये शासकीयशैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील व्याख्याते आणि पुरस्कार विजेते भाग घेणार असून नावीन्यपूर्ण ई-प्रशासन पद्धतींवर चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. या परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मार्गदर्शनपर भाषणे होणार असून डॉ. जितेंद्र सिंह,  केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कार विजेतेव्याख्याते आणि इतर सहभागींसाठी nceg.gov.in या पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे.

 

000000

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे

 आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे

-राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    मुंबईदि.२६ : आदिवासी बांधवांना  मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केले.

 आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनविणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे या विषयाबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवन येथे बैठक झाली.

या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावितआरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमारउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादवकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमलाआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेपर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजआदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे,आदिवासी विकास वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडआदिवासी संशोधनप्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ राजेंद्र भारुडवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडेपद्मश्री पोपटराव पवारविविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणालेराज्यात आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. या गावांमध्ये रस्तेशुद्ध पिण्याचे पाणीपायाभूत सुविधावैद्यकीय सुविधादर्जेदार शिक्षणशाश्वत कृषी विकासव्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. ही आदर्श गावे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्याबरोबरच आदिवासी बांधवांच्या सबलीकरणाबरोबरच आत्मविश्वास वाढवताना मानक म्हणून काम करतील. आदिवासी बांधवांच्या  सामाजिक व सांस्कृतिक उत्थानासाठी प्रयत्न न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

     आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्तम शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विद्यार्थ्यांसाठी 'के जी टू पी जी' पर्यंतचे उत्तम शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रस्तावित आदिवासी विद्यापीठांमध्ये अधिकाधिक राखीव जागा देऊन आदिवासी विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या विद्यापीठामधून उच्चशिक्षित विद्यार्थी घडले पाहिजेत. आदिवासी बांधवात शाश्वत शेती व व्यावसायिक प्रशिक्षण याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी. यासाठी विविध विभागाचे सचिव आणि सामाजिक संस्थांचे  सहकार्य मोलाचे असणार आहेअसे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

    दरम्यान 'प्रधानमंत्री जनमन योजने'च्या राज्यातील अंमलबजावणीचा आढावा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतला. यासोबतच आदिवासी बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता यावा या बांधवांकडे ओळख दर्शविणारे कागदपत्रे वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावीअशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Featured post

Lakshvedhi