शिला तोरणम एक रहस्यमय रचना.!
तिरुपती व्यंकटेश्वर बालाजी मंदिराच्या जवळ असलेल्या तिरुमाला डोंगरावर "शिला तोरणम" नावाची विचित्र दगडी कमान आहे.!
कमान खूप मोठी आहे, ती 26 फूट रुंद आणि 10 फूट उंच आहे. आणि भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते अशा प्रकारची कोणतीही रचना संपूर्ण आशियामध्ये अस्तित्त्वात नाही. शास्त्रज्ञांना सुद्धा अजूनही ह्या शीला तोरणम चे गूढ उलगडलेले नाही.!
शिला तोरणमची एक रहस्यमय गोष्ट आहे ती म्हणजे "शिला तोरणम" हे विशिष्टवेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करते.!
इथल्या स्थानिक लोकांद्वारे जो इतिहास सांगितला जातो तो म्हणजे भगवान विष्णूंनी पृथ्वी तलावर इथेच पाहिले पाऊल ठेवले! आणि त्याची साक्ष शीला तोरणम जवळ असलेल्या भगवान विष्णूंच्या पादुका देतात.! ह्या भगवान विष्णूंच्या पादुकांचे रहस्य असे आहे की ह्या पादुकांनवर पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी क्षणात त्याची वाफ बनते. सध्या ह्या पादुकांना जाड प्लास्टिक बॉक्सचे कव्हर केलेले आहे.!
"शिला तोरणम" मधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन एव्हडे जबरदस्त आहेत की, इथे भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांचे सेल फोन, कॅमरे कायमचे बंद पडलेले आहेत! किंवा अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू "शिला तोरणम" च्या संपर्कात आल्या तर त्या निकामी होतात.!
सध्या "शिला तोरणम" परिसर पूर्णतः बंदिस्त करण्यात आलेला आहे. कोणालाही जवळ जाता येत नाही किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू इथे घेऊन जाण्याची परवानगी नाही.!
पण ह्या "शिला तोरणम" परिसरातील माहितीचा बोर्ड ह्यामगच अद्भुत रहस्य उलगडण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. बोर्डाच्या फोटोमध्ये आपण बघू शकता स्पष्टपणे लिहलेलं आहे. " भगवान श्री बालाजी अर्थात भगवान विष्णू स्वयंभू बनून ह्या शिलतोरणं मधून बाहेर आले."!
आता स्वयंभू म्हणजे कोणत्याही साधनांचा किंवा मनुष्यांच्या मदतीशिवाय प्रकट होणे. याचा अर्थ असा होतो की भगवान विष्णू या कमानीद्वारे प्रकट झाले ज्यामुळे ही रचना स्टार गेट अर्थात तारा द्वार असू शकते.!
स्टार गेट किंवा तारा द्वार म्हणजे काय?
स्टार गेट किंवा तारा द्वार अश्या पॉईंट ला म्हंटले जाते जिथून एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहापर्यंत काही वेळातच पोहचता येते! अर्थात पृथ्वीवरून कुठल्याही ग्रहापर्यंत पोहचायचे असेल तर स्टार गेट च्या माध्यमातून काही वेळातच पोहचू शकतो.! किंवा कुठल्याही ग्रहावरून पृथ्वीवर पोहचायचे असेल तरी सुद्धा स्टार गेट च्या माध्यमातून काही सेकंदात पृथ्वीवर पोहचता येते.!
आजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक हिंदू देवतांना कमानीत कोरले जाते त्या कमानींना शिला तोरणम पण म्हणतात.! त्या कमानी वरती अग्नीच्या ज्वालाच चित्रण कोरलेल असत. आता त्या कमानी सुशोभीकरणासाठी कोरल्या असाव्यात की मुर्तीकारांनी स्टार गेटच्या माध्यमातून देवता पृथ्वीतलावर आवतरत होत्या हे सांगायचा प्रयन्त केलेला आहे.!
ह्याचाच अर्थ "शिला तोरणम" हे एक स्टार गेट आहे, पण आजच्या काळातील तथाकथित वैज्ञानिकांसाठी तो काल्पनिक वैज्ञानिक भास आहे.!
जर "शिला तोरणम" ही नैसर्गिक दगडी संरचना असेल तर असा कुठला नैसर्गिक दगड आहे ज्याचा संपर्कात आजच्या आधुनिक काळातील इलेक्ट्रॉनिक उपकरण आली तर तो ती उपकरणे कायमची निकामी करतो? किंवा असा कुठला नैसर्गिक दगड आहे जो काही सेकंदामध्ये पाण्याची वाफ तयार करतो? ह्याची उत्तर आजच्या काळातील तथाकथित वैज्ञानिकांकडे सुद्धा नाहीत.!
माझ्या मते सनातन वैदिक हिंदू धर्मातील उच्च कोटीच्या विज्ञानाच उदाहरण ह्यापेक्षा दुसरं असू शकत नाही.!
No comments:
Post a Comment