Monday, 26 August 2024

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे 27 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या

 महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे 27 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहीती कृती समिती तर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. राज्यस्तरीय कृती समिती च्या बंद ची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मा. आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ व पणन, वित्त सहकार, नगरविकास विभागाचे मुख्य सचिव, मा. पणन संचालक व विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रस्ताविक केले. कृती समिती चे समन्वय राजेंद्र बाठीया व दि पुना मर्चन्टस चेंबर चे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी बाजार समिती च्या विविध प्रश्‍नाची मांडणी केली. फॅम चे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी जीएसटी चे प्रश्‍न मांडले. मोहन गुरनानी, दिपेन अग्रवाल व भिमजी भानुशाली यांनी चर्चेमध्ये भाग घेतला.


सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व प्रश्‍न समजुन घेतले व बाजार समिती विषयासाठी तसेच जीएसटी व अन्य विषयांसाठी कृती समिती सदस्य व मु‘य सचिव व उच्च अधिकारी वर्गाची तीन समिती गठीत करण्यात आली. सदर समितीने 30 दिवसामध्ये योग्य निर्णय घेण्याचे निर्देश मान. उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत.

दरम्यान या बैठकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी ललित गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून व्यापार्‍यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली व बंद मागे घ्यावा असे आवाहन केले.

उद्योग मंत्री उदय सामंत, नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यापार्‍यांची भूमिका सरकार कडे प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष पुढाकार घेऊन बैठक आयोजनामध्ये सहभाग घेतला.

याबाबत कृती समितीने चर्चा करून 27 तारखेचा एकदिवसीय राज्यव्यापी बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, फॅम चे सचिव प्रितेश शहा, ग्रोमा चे सचिव नितेश वीरा, पुना मर्चंट चेंबर चे माजी अध्यक्ष प्रविण चोरबोले, अनिल भन्साली उपस्थित होते. ग्रोमा चे अध्यक्ष भीमजी भानुशाली यांनी आभार मानले.

हसू नका बरं

 😊😇 


रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण. *नाक मात्र नक्की मोकळं होतं* 


😂😂😂😂  


ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात. *त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते.* 


😂😂😂😂


जिथे मारामारी करणं शक्य नाही *तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.* सोडायचं नाही अजिबात.


😂😂😂😂 


गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना *"तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो?* 


😂 😂😂😂


आपल्या सोबत बाईकवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो. *त्याला काहीच ऐकू येत नसतं.* 


😂  .  


जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल, *तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा.* 


😂 😂😂😂😂


जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं की *आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे.*  


😂 😄 😅 😜


होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच.

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर *साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात.* त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर *४ गोळ्या बाटलीत परत जातात*.

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो.


😄 😄 😄 😄


खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो, कारण *थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.* 


😛😛😛😛😛😛


नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं,

 *याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात.* 


😜😜👍👍


माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...


१. बायको गोरी असेल तर

 *Sun Screen* 

आणि

२. काळी असेल तर

 *Fair & Lovely* 


😝😝😝😝😜


असं म्हणतात की, *जो हसला, त्याचं घर वसलं!* 

पण

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा *की तो मग केव्हा हसला?* 


😄😄😄😛😛😛


बायकोला समजून घेणं म्हणजे :~

 *32 GB चा Video Download करणं.* 

आणि

 *31.5 GB Download झाल्यावर Error मेसेज दिसणं!* 


😝😝😝😝


जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, *ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतात.* 


😛😛😛😛😛😛


*कांही लोक whatsapp वर फक्त दोनच स्टेटस पोस्ट करतात*

पहिलं:

 *good morning* 

दूसरं:-- 

 *good night* 

असं वाटतं *जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.*


😜😜😜😒😒


एका सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात *'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'* हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात.


💔💔😂😂😝😝


भारतातले लोक इतके टॅलंटेड असतात की, *गाड़ी हालवून सांगू शकतात की गाडीत पेट्रोल किती आहे*?


😎😜😜😜😜


ट्रेनच्या आंतल्या गर्दीच्या ' *'चक्रव्यूहाला भेदण्याचं जे कौशल्य'* या "नमकीन अथवा शहाळी" विकणाऱ्यांपाशी असतं *ते तर 'अभिमन्यु' पाशीही नव्हतं.* 


😊😛😖😆😉😄


माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.

आई शप्पथ सांगतो की

*त्याला ओलंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.* 


😂😂😂😂


अजून पर्यंत हे समजलं नाही की 

*OKच्या ऐवजी K* 

आणि 

*GOOD MORNING च्या ऐवजी GM* लिहिणारे, 

*आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील?*


आणि .....ह्या  hmmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे,

*असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय !* 


😜😜😃😛


 *So confusing*  

😯😯😯😯😳

आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ  शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात. पहिली म्हणजे :

*मुलगा खात्या पित्या घरातला असावा*

आणि दूसरी म्हणजे

*तो पिणारा - खाणारा नसावा*

हे कसं काय बुवा? 


😳😄😂😂


*गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे*

आणि

*चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं.*


😂😜😂😜😂😭😜


*🌹जीवन चांगलं  जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे !!!🌹*

आयुष्याच्या या तीन टप्प्यात उदास होऊ नका:*

 *आयुष्याच्या या तीन टप्प्यात उदास होऊ नका:*


(१) पहिला टप्पा : ५८ ते ६५ वर्षे


कामाची जागा तुमच्यापासून दूर जाते.


तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कितीही यशस्वी किंवा पराक्रमी झालात, तरी तुम्हाला एक सामान्य माणूसच म्हटले जाईल. 

त्यामुळे, तुमच्या पूर्वीच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या मानसिकतेला आणि श्रेष्ठता संकुलाला चिकटून राहू नका


(२) दुसरा टप्पा : ६५ ते ७२ वर्षे


या वयात समाज हळूहळू तुमच्यापासून दूर जातो. 

तुमचे वारंवार येणारे मित्र आणि सहकारी कमी होतील आणि तुमच्या पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला क्वचितच कोणी ओळखेल.


"मी होतो..." किंवा "मी एकदा होतो..." असे म्हणू नका कारण तरुण पिढी तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटू नये!


(३) तिसरा टप्पा : ७२ ते ७७ वर्षे


या शिबिरात, कुटुंब हळूहळू तुमच्यापासून दूर जाईल. 

जरी तुम्हाला बरीच मुले आणि नातवंडे असतील, परंतु बहुतेक वेळा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा एकटे राहत असाल.


जेव्हा तुमची मुलं अधूनमधून भेट देतात, तेव्हा ती आपुलकीची अभिव्यक्ती असते, म्हणून त्यांना कमी भेट दिल्याबद्दल दोष देऊ नका, कारण ते त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहेत!


आणि शेवटी 77+ नंतर,


पृथ्वी तुम्हाला नष्ट करू इच्छित आहे. 

यावेळी, दुःखी किंवा दु: खी होऊ नका, कारण हा जीवनाचा शेवटचा टप्पा आहे आणि प्रत्येकजण शेवटी या मार्गाचा अवलंब करेल!


 *म्हणून, आपले शरीर अद्याप सक्षम असताना, पूर्ण जीवन जगा!


खा, प्या, खेळा आणि आवडेल ते करा. आनंदी रहा, आनंदाने जगा..


प्रिय ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो,


वरील लेख लेखकाने खूप छान लिहिला आहे.


👍 लेखकाचे खूप खूप आभार आणि अभिनंदन.


58+ नंतर, मित्रांचा एक गट तयार करा आणि ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी अधूनमधून भेटत रहा. 

दूरध्वनी संपर्कात रहा. 

आयुष्यातील जुने अनुभव आठवा आणि एकमेकांसोबत शेअर करा.


नेहमी आनंदी रहा.🙏🌹*

https://pro.visicards.in/amarsingh-rajput-amfi-registered-mutual-fund-distributor-20544/

Sunday, 25 August 2024

सनदी लेखापालांनी भारताच्या 'बिग - फोर' कंपनी निर्माण कराव्या

 सनदी लेखापालांनी भारताच्या 'बिग - फोरकंपनी निर्माण कराव्या

- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

 

मुंबई, दि. २५: विकसित भारताचे उद्दिष्ट साकारण्यासाठी तसेच भारताला तिसरी मोठी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी सातत्यपूर्ण व सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे.  हे उद्दिष्ट गाठताना जनसामान्यांपेक्षा सनदी लोकपालांना अनेक पटींनी अधिक योगदान द्यावे लागेल असे सांगताना  सनदी लेखापालांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेखा परीक्षण व कर सल्लागार कंपन्या निर्माण कराव्याअसे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले. 

 

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया सनदी लेखापालांच्या राष्ट्रीय संस्थेच्या  पश्चिम क्षेत्रीय विभागातर्फे आयोजित ३८ व्या क्षेत्रीय परिषदेचा समारोप शनिवारी (दि. २४) राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मुंबई येथे संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते. 

 

सनदी लेखापाल हे शासन आणि उद्योग जगतातील दुवा असून अंबानीअदाणी यांचेपासून लघुमध्यम व मोठ्या उद्योगांसह जनसामान्यांना योग्य तो सल्ला देण्याचे कार्य करीत असतात.  कोणतीही कंपनी 'सत्यम'च्या वाटेने जाऊ नये या करिता काय योग्य आहे काय अयोग्य आहे तसेच पूर्वी झालेल्या चुका कश्या प्रकाराने टाळता येऊ शकतात याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले पाहिजेअसे राज्यपालांनी सांगितले.       

 

'सशक्त सनदी लेखापालविकसित भारत' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे अभिनंदन करून सनदी लेखापालांनी राष्ट्रनिर्माण कार्यात तसेच समृद्ध भारताच्या निर्मितीत भागीदार व्हावे असे आवाहन राज्यपालांनी केले. 

 

आयसीएआय घडवणार पंचायत व पालिका लेखापाल : अंकीत राठी

 

आयसीएआय ही संस्था पंचायती व महापालिकांमध्ये आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने कार्य करीत असून नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या सहकार्याने संस्थेने पंचायत तसेच पालिकांमध्ये लेखापाल निर्माण करणार असल्याची माहिती आयसीएआयचे पश्चिम क्षेत्रीय अध्यक्ष अंकीत राठी यांनी यावेळी दिली. या दृष्टीने आयसीएआयने   बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ महिन्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

पंचायत व पालिका लेखापालांना अंदाजे चाळीस हजार रुपये वेतन मिळेल असे त्यांनी सांगितले.  अश्या प्रकारे आयसीएआय कौशल्य विकास करून युवकांना रोजगार सक्षम करीत आहे. देशातील केवळ २७ टक्के लोक आर्थिक दृष्ट्या साक्षर असून आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी आयसीएआय संस्था १२ भारतीय भाषांमधून  जनतेचे वित्त व लेखा विषयांवर प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.     

 

समारोप सत्राला सनदी लेखापाल रणजीत कुमार अग्रवालअध्यक्षआयसीएआयराहुल पारीख,  उपाध्यक्ष,पश्चिम क्षेत्रगौतम लथ, सचिव तसेच पश्चिम क्षेत्रातील सनदी लेखापाल उपस्थित होते.

जसंअ, राजभवन

00000

 

 

Maharashtra Governor call upon CAs to become partners in creating prosperity for India

 

Mumbai, Date 25:- Maharashtra Governor C.P. Radhakrishnan presided over the valedictory session of the 38th Western India Regional Conference of The Institute of Chartered Accountants of India at Jio World Convention Centre in Mumbai on Sat (24 Aug).

 

Addressing the members of the CA fraternity on the theme 'Sashakta Chartered Accountants: Viksit Bharat', the Governor called upon them to become real partners in nation building and to play a transformative role in building a prosperous and vibrant India.

 

CA Ranjeet Kumar Agarwal, President ICAI, CA Ankit Rathi, Chairman, Western India Regional Council of ICAI, CA Rahul Parikh, Vice Chairman, WIRC, CA Gautam Lath, Secretary and chartered accountants from the Western Region were present.   

00000


अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

मुंबईदि.२५:  देशात १ जुलै २०२४ पासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले असून भारतीय न्याय संहिता व अन्य कायद्यांबाबत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांची मुलाखत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रसारित होणार आहे. 

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातील मुलाखतीत अॅड उमेशचंद्र यादव-पाटील यांनी 

देशात १ जुलै २०२४ पासून लागू झालेल्या भारतीय न्याय संहिताभारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखतसोमवार दि.२६ आणि मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ

 नांदेड रेल्वे स्टेशन देशातील सर्वोत्कृष्ट स्टेशन बनविणार : रवनीत सिंघ

 ·   केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंघ यांच्या हस्ते पाच तख्त साहिबांची विशेष रेल्वेला हिरवी झेंडी

 

नांदेड दि. 25  (जिमाका)- नांदेड हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंघजी यांचे वास्तव्य असलेली पावन भुमी असून या भुमीत त्यांनी सर्व जगाला मानवतेची शिकवण दिली आहे. अशा या पावनभूमीतील नांदेडचे रेल्वे स्टेशन हे येत्या कालावधीत सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेले देशातील सर्वोत्तम रेल्वे स्टेशन करण्यात येईल,असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी केले. 

 

गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 25 ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यत पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशन येथून दुपारी 12.30 वाजता या यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी या विशेष ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

 

यावेळी आमदार मोहन हंबर्डेजिल्हाधिकारी अभिजीत राऊतनांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकारमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेसंत बाबा कुलवंत सिंघजीसमुह पंच प्यारे साहिबानसंत बाबा बलविंदर सिंघजीआयोजक रविंद्रसिंघ बुंगई, दिलीप कंदकुर्ते, संतुक हंबर्डे आदींची उपस्थिती होती.

 

नांदेड रेल्वे स्टेशन येथून आज पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वेला रवाना करण्यात आले. या यात्रेत हजार 300 भाविकांचा समावेश असून ही यात्रा पटनादिल्लीअनंतसाहिब फतेहगडसाहिब सरहंददमदमासाहिब भटींडादरबारसाहिब अमृतसर येथे पोहोचणार आहे. तसेच ही यात्रा सप्टेंबर रोजी नांदेडला पोहोचणार आहे. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी लंगरवाहनांची व्यवस्थावैद्यकीय व्यवस्था केली आहे.

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य –

 आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

Ø  अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण

Ø  पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित

 

 

जळगावदि. 25 (जिमाका): भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठूअसा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात 3 कोटी घरे बांधण्यात येतीलत्यात महिलांचे नाव प्रथम असेलअसेही त्यांनी सांगितले. 

जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे (विमानतळ परिसर) देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवकेंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेन्नासानीकेंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवानकेंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेराज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलखासदार स्मिता वाघआमदार सर्वश्री संजय सावकारेसुरेश भोळेकिशोर पाटीलमंगेश चव्हाणआमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेचकार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवलेनाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामविशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळेजिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले कीमहाराष्ट्र ही राजमाता जिजाऊक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे. या राज्याला मातृशक्तीचा समृध्द आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो. अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचे दर्शन घडले. जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

आपल्या देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोलाचा असून लखपती दीदी योजना ही त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.  मागील एका महिन्यात 11 लाख दीदी लखपती बनल्या आहेत, यात एक लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून त्या दिशेने काम सुरु असताना महिलांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले कीमहिलांसाठी 3 कोटी घरे बांधताना ती त्यांच्या नावावर केली जातील. याशिवाय केंद्र सरकारने जनधन खाते उघडले. मुद्रा योजना सुरू केली. विना तारण कर्ज दिले. यात 70 टक्के महिला आहेत. महिलांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्यांच्यासाठी  स्व- निधी योजना सुरू केली. विश्वकर्मा परिवार अंतर्गत महिलांना जोडले. सखी मंडळ मार्फत 10 कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांना गेल्या दहा वर्षांत लाख कोटींची मदत केलीअसे त्यांनी नमूद केले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले कीबचतगटांच्या महिलांना ड्रोन पायलट बनविणार असल्याचे सांगून  त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. आधुनिक शेतीसाठी महिलांना प्रेरित कऱण्यात येईल. यासाठी महिलांना कृषी सखी करून रोजगार वाढविण्यावर भर राहील. महिलांसाठी अर्थसंकल्पात लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सेनादलात महिलांचा समावेश केला गेला आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावेयासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल. महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईलमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईलअसेही त्यांनी स्पष्ट केले. 

भाविकांना आदरांजली

दरम्यानआपल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीनेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरूंबाबत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना तातडीने नेपाळला पाठविले. या दुर्घटनेत जखमींवर चांगले उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना  उच्च शिक्षण मोफतमहिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

देशात 3 कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, यात राज्यातील 50 लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेवून लघु उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात 25 हजार स्वयंसहायता गटांना  30 कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने 76 हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदाकापूसदूधसोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेलअसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना – शिवराज सिंह चौहान

लखपती दीदी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि विकासाला वेग देणारी योजना आहे. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल त्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले. 

देशाच्या विकासात नारीशक्तीचे मोठे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या नारीशक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सहाय्य करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

            नारीशक्ती ही विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. देशाच्या  विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही.  संत मुक्ताई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अशा ठिकाणी हे लखपती दीदीचे संमेलन होत आहे. राज्यात बचतगटामार्फत 75 लाख कुटूंब जोडली गेली असून दोन कोटी कुटूंब जोडण्याचा संकल्प आपण केला आहे. जळगाव जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नार-पार सिंचन योजनेला आपण गती दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर निविदा आणि इतर प्रक्रिया सुरु होईलअशी माहिती त्यांनी दिली. 

राज्य शासन नेहमीच महिला भगिनींच्या पाठिशी – उपमुख्यमंत्री अजित पवार

संपूर्ण देशात सुरू असलेला विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे.  केळी,  कांदा उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यात  50 लाख लखपती दीदी बनविण्यात येणार आहेत्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

दरम्यानआजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटीलमनीषा जगतापज्योती तागडेसीमा कांबळेरमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश)महबूबा अख्तर (जम्मू काश्मीर)गंगा अहिरवार (मध्य प्रदेश)एस. कृष्णावेण्णी (तेलंगणा) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश)सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. 

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बचतगटाच्या 48 लाख महिलांना 2500 कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. 

उघड्या जीपमधून प्रधानमंत्री मोदी यांचे भगिनींना अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरी मारली. यावेळी उत्साहाने भारावलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.   

0000

 


Featured post

Lakshvedhi