Wednesday, 31 July 2024

नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल

 नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल

            नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            हे रुग्णालय नंदीग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेमार्फत सहकार तत्त्वावर चालविले जाते.  संस्थेने एक कोटी भाग भांडवल जमा करून तसेच 6 कोटी कर्ज घेऊन रुग्णालय सुरु केले आहे.  मात्र कर्जाच्या बोजामुळे रुग्णालय तोट्यात गेले असून जवळपास 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. रुग्णसेवा आणि सामाजिक संवेदनशीलतेमुळे रुग्णालय चालविणे आवश्यक असल्यामुळे संस्थेला 1 : 9 याप्रमाणे 9 कोटी भाग भांडवल स्वरुपात 10 वर्षात शासकीय भाग भांडवल अंशदान स्वरुपात अर्थसहाय देण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.  शासकीय भाग भांडवलाची परतफेड पुढील 8 वर्षात समान हप्त्यात करावी.  ही भाग भांडवलाची रक्कम बिनव्याजी राहील. तथापिपरतफेडीचा हप्ता न भरल्यास थकीत रकमेवर 12 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल.

-----०---

आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

 आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

 

            आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धर्तीवर दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            आजपर्यंत आदिवासी सहकारी सूत गिरण्या या लाभापासून वंचित होत्या.  सध्या या सूत गिरण्यांना 1 : 9 या प्रमाणात शासकीय भागभांडवल देण्यात येते.  आता दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी मुदत कर्ज देणाऱ्या वित्तीय बँका व वित्तीय संस्था यांच्या व्यतिरिक्त मिटकॉनॲग्रीकल्चर फायनान्स कार्पोरेशन मुंबईदत्ताजीराव टेक्निकल इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्यापैकी एका संस्थेकडून प्रस्ताव तपासून शासनास सादर करावा लागेल.  प्रकल्प किंमतीच्या 5 टक्के आणि 80 लाखापर्यंत सभासद भागभांडवल गोळा करणाऱ्या गिरण्या कर्जासाठी पात्र असतील.  या शिवाय सूत गिरणीला वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या कर्ज भाग भांडवलाच्या अटी व शर्ती लागू राहतील.

            प्रकल्प सुरु झाल्यानंतर 2 वर्षांनी कर्जाची परतफेड सुरु होईल.

वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले

 वसतीगृहेआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले

 

            विविध विभागांच्या वसतीगृहेआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            सामाजिक न्यायदिव्यांग कल्याणइतर मागास बहुजन कल्याणआदिवासी विकासमहिला व बालविकास या विभागांमार्फत सुरु असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानीत संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दरडोई परिपोषण अनुदान आता प्रती विद्यार्थी प्रती महिना 1500 रुपयांवरुन 2200 रुपये करण्यात येईलतर एड्सग्रस्त व मतीमंद निवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान 1650 रुपयांवरून 2450 इतके वाढविण्यात येईल. 

            यासाठी येणाऱ्या 346 कोटी 27 लाख इतक्या निधीला मान्यता देण्यात आली.  या सर्व संस्थांमधून एकूण 4 लाख 94 हजार 707 विद्यार्थी असून सुमारे 5 हजार संस्था आहेत. वाढत्या महागाईमुळे हे अनुदान देखील वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. 

Khushiya बहुत सस्ती हैं, लेकिन दुंडते हैं मेहेंगी दुकानोमे

 💕✍️ *कोणी लिहीले माहीत नाही पण छान पटण्यासारखे आहे.......*


        *सहजच मनातलं शब्दात*


      *"बस, तुम कभी रुकना मत!"* 


••••• आज आजी उदास आहेत.

••••• हे आजोबांच्या लक्षात आल.

••••• काय झालं ग? आजोबांनी विचारल.

••••• आजी म्हणाल्या,

••••• अहो, आता थकवा येतो.

••••• आधी सारखं राहिलं नाही.

••••• आता गडबड, सहन होत नाही.

••••• कुठे जायचं तर, जास्त चालवत नाही 

••••• आॕटो मधे चढताना त्रास होतो.

••••• कधी भाजीत मीठ टाकायला 

      विसरते, तर कधी जास्त पडतं. 

••••• कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने

      दिलं आहे. 

••••• माहित नाही.

••••• आजोबा म्हणाले,

••••• देवाचा हिशोब मला माहित नाही.

••••• आणि त्याच्या निर्णयात आपण

      ढवळाढवळ करू शकत नाही. 

••••• त्याच्या Planning मधे एक क्षणाचाही

      बदल करणे. आपल्या हातात नाही.


••••• जे आपल्या हातात नाही, त्याचा 

     विचार करण्यापेक्षा आपल्या 

     हातात काय आहे?

     त्याचा विचार करावा.


••••• अग, वयानुसार हे सर्व होणारच.

••••• आधीचे दिवस आठव ना,

••••• किती काम करायची. 

     पूर्ण घर तू खूप छान सांभाळले,

••••• मला कशाची काळजी 

     नव्हतीच कधी.

••••• आता वयामाना  प्रमाणे हे 

      सर्व होणारच, पण त्यातुनच मार्ग 

      काढायचा असतो.

••••• आलेला दिवस आनंदात काढणे, 

••••• आपल्या हातात आहे.

••••• जीवनाच्या प्रत्येक फेज मधे 

      थोडे शारिरीक बदल होतातच.

••••• थोडे आपल्या ला करायचे असतात. 

••••• आपली *Lifestyle Reorganize* 

      करायची,

••••• म्हणजे, आयुष्याची घडी, 

      परिस्थिती प्रमाणे बदलायची असते, 

••••• कळलं का? आजोबा पूढे म्हणाले. 


••••• चल, आज सायंकाळी 

      बाहेर जाऊ या आपण. 

      छान ती नारंगी साडी नेस. 

••••• बाहेरच जेवू. 

••••• आजोबा संध्याकाळी आजींना 

      घेऊन बाहेर पडले. 

••••• व जवळच असलेल्या 

      बसस्टाॕप वर जाऊन बसले.

••••• दोघे बराच वेळ तेथेच 

      गप्पा मारत बसले.

 

••••• आजोबा आजी ना म्हणाले,

••••• अगं, पाय दुखत असतील 

      तर, मांडी घालून बस छान.

 

••••• नंतर,*गणेश भेळ* खाऊनच 

      घरी परतले. अगदी वयाला 

      व तब्येतीला शोभेसे  

      Outing आज होते दोघांचे.


••••• आजींची उदासी मात्र कुठे पळाली?

      हे त्यांना कळलेच नाही.

••••• अगदी Refresh झाल्या. 


••••• आज आजोबांनी आजी साठी 

      *On line Mobile stand* 

      मागवला. मोबाईल पकडून 

      आजींचा खांदा दुखतो ना म्हणून.

        

••••• आज आजींनी तर आजोबांना 

      सकाळीच सांगुन टाकलं, 

      की मी आज सायंकाळी 

      स्वयंपाक करणार नाही.

••••• काही तरी चमचमीत 

      खायला घेऊन या.

••••• आजोबांनी आनंदाने समोसे, 

      ढोकळा, खरवस, दोन 

      पुरण पोळ्या आणून आजींची 

      इच्छा पूर्ण केली. 


••••• ते बघून आजी म्हणाल्याचं 

      अहो, एवढं आणलंत? 

••••• अग आज आणि उद्या 

      मिळुन संपेल की....


••••• आज आजीं आजोबांची 

      पार्टी छान  झाली. 

••••• कोणी तरी खरंच  खूप छान 

      म्हंटलं आहे,

 

*"खुशीयां बहुत सस्ती है इस दुनिया में,*   

      *हम ही ढुंढतें फिरते हैं,* 

       *उसे मेहंगी दुकानों में"।"*


••••• आजोबा बऱ्याच वेळा पासुन 

      एका बाटलीचे झाकण 

      उघडायचा प्रयत्न करत होते. 


••••• ते पाहून अजय म्हणाला, 

      द्या आजोबा मी उघडून देतो. 

••••• तेंव्हा आजोबा म्हणाले

••••• अरे, नको मी उघडतो.

••••• आता आम्हाला प्रत्येक 

      कामात वेळ लागतोच. 

      हे Natural आहे.

 

••••• पण काही हरकत नाही. 

      जो पर्यंत करू शकतो 

      तोपर्यंत काम करायचे. 

      हे मी ठरवलं आहे.


••••• रोज फिरायला जाणे, 

      भाजी आणणे, भाजी चिरणे, 

      Dusting करणे, 

      Washing Machine मधे 

      धुतलेले कपडे वाळत घालणे‌, 

      कपड्यांच्या घड्या घालणे, 

      अशी बऱ्याच कामांची 

      जबाबदारी मी घेतली आहे. 

      तुझ्या आजीला पण मदत होते. 

      व माझा वेळ जातो.

 

      *Something new and different.*

          *I am enjoying it.*

          *And I feel good.*

  

तो तुमचा Actor आहे ना, अक्षय कुमार त्याने एका Advertisement मध्ये म्हंटले आहे.

 

         *" बस, तुम कभी  रुकना मत "* 


अक्षय कुमार ने म्हंटलेले हे वाक्य मला खूप आवडलं. एक छोटंसं वाक्य.


••••• मोजक्या शब्दात 

••••• पण किती अर्थपूर्ण.

••••• जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच 

     त्याचा अर्थ परत दर 

     परत उघडत जातो .

••••• एक छोटासा उपदेश जीवनाला 

     वेगळ्याच दिशेने वाटचाल 

     करायची स्फुर्ती देतो..

••••• विचारांत परिवर्तन  आणतं. 

••••• तो म्हणतो 

••••• कधीही थांबू नका,

••••• चालत रहा. 

••••• म्हणजेच *Active* रहा. 

     *मनाने आणि शरीराने.* 

      

••••• वाहतं पाणी बघताना, 

      एक वेगळीच उर्जा निर्माण होते. 

     *धारा* 

      म्हणजे पुढे पुढे जाणारी, 

      वाहणारी.

••••• तेच जमलेलं पाणी म्हणजे 

     अनेक रोगांचा ऊगम. 

••••• म्हणून आपण पाण्याला 

      जमू देत नाही.

••••• जमलेल्या पाण्यात डास, 

      किडे होतात. शेवाळे तयार होते. 

      पाण्याला वास येतो. 

      डेंग्यू पसरतो.


••••• आयुष्याचे पण तसेच आहे. 

••••• शक्य तेवढ Active राहणे 

     ही प्रत्येकाचीच आवश्यकता 

    असते

••••• जसं जमेल, जे जमेल, 

      जे आवडेल, जे झेपेल, ते 

      करत रहाणे गरजेचे आहे.

       

   *" चलती का नाम ही तो जिंदगी है "*

      

आपल्या पिढीने तरूणपणी आपण एकमेकांचे हात हातात घेतले नाही./नसतील.


••••• पण वयाच्या या टप्प्यावर, 

      एकमेकांचा हात प्रेमाने, 

      काळजीने, विश्वासाने, हातात 

      घेणे ही काळाची गरज आहे. 

      

*कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हे*

   

*इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता है।*

      

*बल्कि इसलिए, की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है"।*

      

    *"ना थके कभी पैर* 

             *ना कभी हिम्मत हारी है।*

      *जज्बा है परिवर्तन का जिंदगी में,*

            *इसलिये सफर जारी है।*

     

*प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा*

  

     बस, तुम कभी रुकना मत।

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 ग्रामीण डाक सेवक पदासाठी

 अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. ३० : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक पदासाठी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

            नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या ५१ जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातोफोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

०००

जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे -

 जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे

सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबईदि.30 : जलजीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावेतअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            जल जीवन मिशनबाबत आढावा बैठक मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाविभागाचे सहसचिव अमन मित्तलमुख्य अभियंता मनीषा पलांडेअतिरिक्त प्रकल्प संचालक सुषमा सातपुतेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग आदी उपस्थित होते.

            पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणालेजलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची होणारी कामे नागरिकांसाठी महत्त्वाची असून यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे. विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादा लक्षात घेऊन कामे करावीत. योजनेतील ज्या कामांमध्ये तांत्रिक कारणास्तव व निविदा प्रक्रिये दरम्यान मूळ अंदाजपत्रकापेक्षा वाढ होऊन पंधरा टक्के जास्त फरक होत आहे. अशा कामांसाठी सुधारित मान्यता गरजेची असून यादृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

            या बैठकीत प्रधान सचिव श्री.दराडेकार्यकारी संचालक श्री. कृष्णाश्री. मित्तलश्रीमती पलांडे यांनी माहिती सादर केली. यावेळी सुधारित मान्यतेसाठी वित्त विभागास सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावावरील अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व कार्यवाही बाबत सूचना देण्यात आल्या.

कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी

 कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी

- राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबईदि. ३० : कराड विमानतळाचे विस्तारीकरण करून सर्व सुविधांनी युक्त विमानतळ करायचे आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमीनीचे संपादन करून विमानतळ विकास कंपनीकडे जमीनीचा ताबा द्यावा. विमानतळ विस्तारीकरणासाठी निधी उपलब्ध असून कालबद्ध कार्यक्रम राबवून कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही पूर्ण करावीअसे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

            मंत्रालयातील समिती कक्षात कराड विमानतळ विस्तारीकराबाबत बैठकीचे आयोजन उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेअपर जिल्हाधिकारी तेजूसिंग पवारप्रदीप पाटील उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सहभागी झाले होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले कीविमानतळ विस्तारीकरणासाठी वारूंजी येथील जमीन जवळ आहे. या जमिनीच्या संपादनासाठी खातेदार शेतकऱ्यांची संमती घ्यावी. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने जमिनीचे संपादन करावे. भूसंपादनासाठी शिल्लक असलेल्या जमिनीबाबत 10 ऑगस्टपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी. पुनर्वसन करावयाच्या नागरिकांना सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

            विमानतळ विस्तारीकरणामध्ये येत असलेल्या भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी वळवून घ्यावी. योजनेचे पाणी द्यायचे असून पाणीपुरवठा बंद करू नये. या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध आहे. त्यामुळे योजनेच्या पाईप वळतीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

            विमानतळासाठी 47.27 हेक्टर जमीन संपादनाची आवश्यकता आहे. त्यापैकी 43 हेक्टर जमिनीचा ताबा  विमानतळ कंपनीकडे देण्यात आला आहे.  तसेच 36.90 हेक्टर जमिनीचा मोबदला 861 खातेदार शेतकऱ्यांना देण्यात आला आहेअशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.      

Featured post

Lakshvedhi