Saturday, 27 July 2024

बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा

 बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

          मुंबईदि. 26 : मुंबईच्या विकासात बेस्टचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी बेस्ट’ ला बळकट करणे आवश्यक असून यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावाअशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट प्रशासनाला केली. यासाठी शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

 

          बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना उपदान (ग्रॅच्युइटी)कोविड भत्ताकायमस्वरुपी तसेच हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्र आदींच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल श्रमिक उत्कर्ष सभेच्या वतीने धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह आमदार सर्वश्री ॲड. आशिष शेलारप्रवीण दरेकरश्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड, ‘बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते.

 

          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी बेस्ट कामगारांच्या उपदानासाठीचा (ग्रॅच्युइटी) 332 कोटींचा तसेच कोविड भत्त्यापोटीचा 78 कोटींचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे कायमस्वरुपी कामगार आणि हंगामी स्वरुपातील कामगारांना नेमणूक पत्रधाडसी कार्य करणाऱ्या कामगारांचा सत्कारपदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

 

          यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबईने 1873 मधील ट्राम सेवेपासून आजच्या बेस्ट बस पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे परिवर्तन पाहिले आहे. मुंबईकरांना त्यांच्या गंतव्यस्थानाच्या जवळ पोहोचण्यासाठी एकाहून अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याने आता मेट्रोचे जाळे देखील विणले जात आहे. तथापि, ‘बेस्ट सेवेचे महत्त्व अबाधित असून तिला अधिक बळकट केले जाईलअसे त्यांनी सांगितले. बेस्ट कामगारांच्या जुन्या झालेल्या निवासी संकुलांच्या पुनर्विकासाबाबत तसेच बेस्टच्या बळकटीकरणाला मदत होईल, अशा पद्धतीने बस डेपोच्या पुनर्विकासाबाबत देखील आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

 

          प्रारंभी श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष आमदार श्री. लाड यांनी प्रास्ताविकात बेस्ट च्या कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले. आमदार सर्वश्री श्री.  शेलार, श्री. दरेकर यांनी देखील बेस्टच्या कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. महाव्यवस्थापक श्री. डिग्गीकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Friday, 26 July 2024

माशा घालवणे साठी सर्वोत्तम उपाय

 


आदिवासी कुटुंबाच्या परसबागेसाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता

 आदिवासी कुटुंबाच्या परसबागेसाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता

 

          मुंबई दि. 26 : राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2024-25 मध्ये राबविण्यास 40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे

      राज्यातील ठाणेपालघर ,पुणेनाशिकधुळेनंदुरबार, जळगाव, अहमदनगरनांदेडयवतमाळ, गडचिरोलीचंद्रपूर ,अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यासाठी  अर्थसंकल्पित केलेल्या 40 लाख रुपये एवढ्या निधीच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

   आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील 14 जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरवण्यासाठीआदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी "आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पळझाडे व भाजीपाला लागवड" ही योजना राज्यात राबविण्यात येते

0000

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सुनावणी

 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे

प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सुनावणी

 

         मुंबई‍‍दि. 26 : राष्ट्रीय आरक्षण सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आज सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे घेण्यात आली.

             यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमलसचिव आशिष उपाध्यायसल्लागार राजेशकुमारइतर मागास बहुजन कल्याण  विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगलसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,  यांच्यासह विविध जाती समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            राज्यातील लोधलोधालोधीबडगुजरवीरशैव लिंगायतसलमानीकिराड, भोयर पवारसूर्यवंशी गुजरबेलदारझाडेझाडे कुणबी,डांगरीनिषाद मल्लाकुलवंतवाणीकराडीशेगरनेवेवाणीकानोडीकानडी या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन आज करण्यात आले होते. या बैठकीत प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात आयोगाचे अध्यक्ष श्री.अहीर यांनी यावेळी संबंधितांना निर्देश दिले.

0000

Caution savdhan A person brings the e-bike battery into the lift

 *A person brings the e-bike battery into the lift. When the lift closes, the electro-charge of the battery turns the whole lift into a magnetic battery.* 

*Be careful and share with family and friends !!*


गणपती उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखापेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार "आनंदाचा शिधा"

  गणपती उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखापेक्षा जास्त

शिधापत्रिकाधारकांना मिळणार "आनंदाचा शिधा"

 

            मुंबई दि. २६ - यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या  या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवाचणाडाळसाखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. "आनंदाचा शिधा" संच्याचे वाटप दि १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.

             राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हेनागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा मिळणार आहे.

            प्रती शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६२.५१ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.


कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध

 कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

 

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई दि. २६ : कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करताना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचे देखील स्मरण केले. आज २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            मुख्यमंत्री यांनी कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसैनिक कधीही माजी होत नसतो. याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच त्याच्या कल्याणासाठी आम्ही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शासनाने माजी सैनिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. खारघर येथे माजी सैनिकांचे विश्रामगृहही उभे करणार आहोत. मेस्कोचे विविध उपक्रममाजी सैनिकांना रोजगार संधीत्यांच्या वेतनातील तफावत दूर करणार आहोत. मुंबईमध्ये युद्ध संग्रहालय करण्याचा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यातल्या अपशिंगे मिलिटरी गावातील विकास कामांना प्राधान्य देण्याचा शासनाचा मानस आहे. माजी सैनिकांना टोलमधून सवलत आणि असे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

            आजही कुठलीही आपत्ती आली की आपल्याला सैन्य दलातील आपल्या जाँबाज जवानांची आठवण येते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीसीमेचं रक्षण असो की आपल्या परिसरातील गंभीर आपत्ती आपल्या अंतर्गत बचाव पथकांसोबत या जवानांची लष्करहवाई आणि नौदलाची साथ मिळाली की आपल्याला आणखी धीर येतो. इतका विश्वास सैन्य दलातील जवानांवरत्यांच्या हिमंतीवर ठेवतो.

            वीर जवानांच्या कुटुंबांची काळजी घेण्यासाठी येत्या काळात आणखी काही महत्वाचे निर्णयही आपण घेणार आहोत असेही ते म्हणाले. आपला महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. शिवछत्रपतींना देशाला स्वाभिमान आणि धर्म-देव-देवळांच्या रक्षणाचा धडा दिला. हाच वारसा घेऊन आमचे शासन काम करीत आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान आणि त्यांच्या कल्याणासाठी जे-जे काही करता येईल त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत हे आमचं कर्तव्य आहेअशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

0000


Featured post

Lakshvedhi