Saturday, 20 July 2024

मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ

 मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ

            मुंबईदि. 19 : जगात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. राज्यातही नुकतीच मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली असून कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यात महाराष्ट्र पोलीस दलाला याची जोड मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ होईल.

            राज्य शासनाने कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करुन गुप्तवार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचे पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी राज्यात ‘Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL)’ ‘मार्वल’ ही कंपनी स्थापन केली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून यामुळे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणूनउपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घडू शकतोकुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार आहे.

            ‘मार्वल’ स्थापन करण्याबाबत राज्य शासनभारतीय व्यवस्थापन संस्थानागपूर आणि मे. पिनाका टेक्नॉलॉजीज खाजगी मर्या. यांच्यात दि. 22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय कराराद्वारे शासनाची ही कंपनी अधिनियम 2013 खाली नोंदणीकृत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पोलीस जिमखाना येथे झालेल्या बैठकीत मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव (अतिरिक्त कार्यभार) सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

कृत्रीम बुद्धिमत्तेच्याद्वारे गुन्ह्यांची उकल

            मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

            सद्यस्थितीत शासनाच्या विविध विभागांकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असते. त्याचप्रमाणे पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 16 मार्च 2024 रोजीच्या बैठकीत घेतला.

मार्वलचे कार्यालय नागपूर येथे

            या उपक्रमातील मे. पिनाका टेक्नोलाजीज खासगी मर्या. ही चेन्नई स्थित कंपनी असून त्यांना भारतीय नौदलगुप्तवार्ता विभागआंध्र प्रदेशआयकर विभागसेबी आदी संस्थांना एआय सोल्यूशन्स पुरविण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विशेषज्ञतेचा उपयोग व्हावा या उद्देशाने मार्वल’ चे कार्यालय नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार पिनाका’ एआय सोल्युशन्स पुरवेल तरभारतीय व्यवस्थापन संस्था संशोधन आणि प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणार आहे. नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षकभारतीय व्यवस्थापन संस्थानागपूर चे संचालक हे या कंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि मे.पिनाका टेक्नोलाजीज खासगी मर्या.चे संचालक हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असतील तर नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.

00000

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

               मुंबईदि. १९ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळमुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीयोजनेकरिता २४ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेतअसे आवाहन वैशाली मुडळे, जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर-उपनगर यांनी केले आहे.

            मुंबई शहर,उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व  उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी१२ वीपदवीपदव्युत्तरवैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीयोजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

            ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्रावीण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलाशिधापत्रिकाआधार कार्डशाळेचा दाखलागुणपत्रकदोन फोटोपुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेविकास महामंडळ (मर्या)मुंबई- गृहनिर्माण भवनकलानगरतळमजलारुम नं. ३३बांद्रा (पू)मुंबई-४०००५१ या पत्त्यावर २४ जुलै२०२४ पर्यंत अर्ज  करावेत, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

 मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण संस्थेतर्फे

मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण

            मुंबईदि.19 : दिव्यांग कल्याण आयुक्तालयपुणे व जिल्हा परिषदसांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रमिरज या संस्थेमार्फत सन 2024-2025 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेतअसे अधीक्षकशासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहमिरजता. मिरजजि. सांगली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळमुंबई यांची मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील फिक्की ॲवॉर्ड 1999 हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

            या संस्थेमार्फत किमान आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) आणि किमान नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटार ॲण्ड आर्मेचर रिवायडिंगसबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स ) करिता प्रवेश दिला जातो.

            प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्षे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असून प्रशिक्षण कालावधीत राहण्याचीजेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय राहील. अद्ययावत परिपूर्ण संगणक कार्यशाळाव्यवसायाभिमुख प्रशिक्षणनेटवर्किंग व इंटरनेट आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना समाजकल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यात येईल.

प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखलादिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्रउत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

            प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अधीक्षकशासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहटाकळी रोडम्हेत्रे मळागोदड मळ्याजवळता. मिरजजि. सांगली- 416410 (दूरध्वनी क्रमांक 0233-222290899225 - 7756195956-67936) येथे संपर्क साधावा. जास्तीत जास्त दिव्यांगानी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून विशाळगड येथील घटनेचा आढावा

 मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून

विशाळगड येथील घटनेचा आढावा

            मुंबईदि. १९ :- कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये याची कोल्हापूर जिल्हा व पोलिस प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच विशाळगड घटनेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण करावाअशा सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफपणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिल्या.

            विशाळगड येथील घटना व सद्यपरिस्थितीबाबत मंत्री श्री. सत्तार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्याकडून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतून माहिती घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी या सूचना दिल्या.

            बैठकीस प्रधान सचिव रिचा बागलावक्फ बोर्डाचे मुख्य अधिकारी श्री. जुनेदकोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री. येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (दूरदृश्य संवाद  प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

            मंत्री श्री. सत्तार यांनी सुरवातीस विशाळगड घटनेमुळे मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी मध्ये झालेल्या घरांच्या व प्रार्थनास्थळाच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री.येडगे यांनी सांगितले कीबाधित झालेल्या कुटुंबास  तातडीची मदत म्हणून  25-25 हजार रुपये असे 50 हजार रुपये मदत केलेली आहे.  आणखी मदतीसाठी कोटी 85 लाख रुपयांचा नुकसान भरपाई प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्री. पंडित यांनी पोलीस विभागामार्फत दोषींवर करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली.

            मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले कीविशाळगड घटनेमुळे  वातावरण दूषित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. समाजकंटकांवर पोलीस विभागाने तातडीने कारवाई करावी.  याठिकाणी असलेली घरेव्यावसायिक दुकानेप्रार्थना स्थळांच्या नोंदी तपासाव्यात. विशाळगड येथील अतिक्रमणे काढताना लोकांना विश्वासात घेऊन काढावीतअशा सूचना त्यांनी दिल्या.

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद

 मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद

-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबईदि.१९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारण्यासाठी भरीव उपाययोजना करिता  सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)  १०१२ कोटीअनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत  ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

            मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते.

            या बैठकीस खासदार संजय दिना पाटीलआमदार प्रवीण दरेकरआमदार मनीषा चौधरी,  आमदार विद्या ठाकूरआमदार डॉ. भारती लव्हेकरआमदार अतुल भातखळकरआमदार नवाब मलिकआमदार रमेश कोरगांवकरआमदार ऋतुजा लटकेआमदार दिलीप लांडेआमदार प्रकाश फातर्पेकरआमदार मंगेश कुडाळकरआमदार झिशान सिद्धिकीजिल्हा नियोजन समिती सदस्यमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले कीनियोजन विभागाकडून आज अखेर सन २०२४-२५ साठी ३३७.३९ कोटी असा एकूण निधी उपलब्ध करुन  देण्यात आला आहे. सन २०२४-२५ मध्ये आज अखेर १९.९० कोटी रक्कमेच्या नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून सन २०२३-२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांचा उर्वरित निधी (Spill Over) रुपये १८५.५६ कोटी वितरीत करण्यात आला आहे. प्राप्त निधीपैकी ५१% निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाच्या बाबतीत मुंबई उपनगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

            झोपडपट्टी भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्वसाधारणपणे ४६% लोकसंख्या ही झोपटपट्टी भागात रहात असून या झोपटपट्ट्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर मूलभूत नागरी सुविधांची कमतरता  दूर करण्यासाठी सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उपलब्ध निधीपैकी जास्तीत जास्त निधी झोपडपट्टीवासियांच्या सार्वजनिक जीवनमानात सुधारणा करणेसाठी खर्च करणेबाबत सुचित केले आहे.  या अंतर्गत रस्तेड्रेनेज सिस्टीमपाणी पुरवठाविद्युत व्यवस्थासार्वजनिक जमिनीवर खेळाची मैदानेअंगणवाड्यांची स्थापनाउद्यानांची निर्मितीअशा प्रकारच्या कामे तसेच झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकासआरोग्य सुविधांचा विकास इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात येतील.

             नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा रु.५७४.७८ कोटीझोपडपट्टीवासियांचे स्थलांतर व पुनर्वसन योजनेंतर्गत संरक्षक भिंत बांधकामे रु. ११५.०० कोटीकौशल्य विकास कार्यक्रम रु.६.०० कोटीदलितवस्ती सुधार योजना - रु. ६५.४८ कोटीमहिला व बाल विकास ३ टक्के निधी मध्ये (रु. १२.४४ कोटी) मध्ये चेंबुर येथील चिल्ड्रन एड सोसायटीच्या मोकळ्या जागेवर महिला व बाल भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे.महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय संस्थांचे बळकटीकरण,विविध शासकीय कार्यालयेसार्वजनिक गर्दीची ठिकाणे येथे हिरकणी कक्ष उभारणे पर्यटन विकासासाठी मुलभूत सुविधांकरीता अनुदान (रु. ५०.०० कोटी) मध्ये भांडूप येथे फ्लेंमिगो पार्क विकसित करुन पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविणेपूर्व उपनगरातील खाडी किना-यांवर पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा पुरविणे,आरेगोरेगाव येथील छोटा काश्मीर तलाव येथे पर्यटन विकासासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पोलिस व तुरुंग यांच्यासाठी विविध आस्थापनांकरिता पायाभूत सुविधा पुरविणे (रु.१२.४४ कोटी)व्यायाम शाळा व क्रीडांगणांचा विकास (रु. १५.०० कोटी)गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण (रु. ४.५० कोटी)या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

            सन २०२३-२४ मध्ये सर्वसाधारण योजनेंतर्गत रु. ९२०.०० कोटी प्राप्त निधीपैकी १००%अनुसूचित जाती उपयोजनेखाली रु. ५१.०० कोटी प्राप्त निधीपैकी १००% तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेखाली रु. ५.७७ कोटी प्राप्त निधीपैकी रु. २.९० कोटी म्हणजेच ५०.२४% टक्के निधी खर्च झाला आहे. सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यास एकूण प्राप्त रु. ९७६.७७ कोटी पैकी रु. ९७३.९० कोटी म्हणजे ९९.७ % निधी खर्च झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी दिली.

            जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये प्राप्त निधी आणि झालेला खर्च या बाबींचा योजनानिहाय आढावासन २०२४-२५ मधील अर्थसंकल्पित निधीच्या अनुषंगाने प्राप्त प्रस्ताव तसेच करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर चर्चा झाली.

            जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (महिला व बालविकास विभाग)मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (कौशल्य विकास विभाग),मतदार पुनरीक्षण कार्यक्रम याची माहिती यावेळी सादर करण्यात आली.

0000

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा

 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा

            मुंबईदि. १९ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-२०२४ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना तसेच राजकीय पक्षांकडून प्राप्त सूचना विचारात घेऊन मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात विविध सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

            या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या निकषानुसार एका मतदान केंद्रावर १५०० पर्यंत मतदार ठेवण्याबाबत सूचना असल्याने जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची विभागणी करुन नवीन मतदान केंद्र तयार करावे. नवीन मतदान केंद्र त्याच इमारतीमध्ये असणे आवश्यक आहेत. ज्या इमारतीमध्ये एका पेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील व अशा मतदान केंद्रांची संबंधित मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असमान असेलअशा प्रकरणी वाढीव मतदार असलेल्या मतदान केंद्राचे वाढीव मतदार स्थलांतरित करताना विशेष दक्षता घ्यावी. तेथे नवीन मतदान केंद्र तयार करावे किंवा वाढीव मतदार त्याच इमारतीतील अन्य केंद्रांमध्ये स्थलांतरित करावे. वाढीव मतदार दुस-या इमारतीतील कोणत्याही मतदान केंद्रास जोडू नयेत. तसेच असे स्थलांतरण करताना सर्वसाधारणतः वस्ती/मोहल्लामधील मतदार एकत्र राहतील तसेच कुटुंब विभागले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. भौगोलिक सलगता कायम राहील याचीही दक्षता घ्यावी.

            विविध सूचना विचारात घेऊन तयार केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मतदान नोंदणी अधिकारी यांच्यास्तरावर राजकीय पक्षांची बैठक तत्काळ घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत करुन आवश्यकतेनुसार प्रस्ताव तयार करावेत/सुधारित करावेतअशा सूचना यावेळी देण्यात आल्याचे प्रशांत नावगेअवर सचिवमुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय,  मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ

 मार्वल’ च्या माध्यमातून पोलीस दलाला मिळणार कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ

            मुंबईदि. 19 : जगात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. राज्यातही नुकतीच मार्वल’ कंपनीची स्थापना करण्यात आली असून कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यात महाराष्ट्र पोलीस दलाला याची जोड मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ होईल.

            राज्य शासनाने कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करुन गुप्तवार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचे पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढविण्यासाठी तसेच राज्य पोलीस दलास कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे यासाठी राज्यात ‘Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement (MARVEL)’ ‘मार्वल’ ही कंपनी स्थापन केली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून यामुळे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणूनउपलब्ध माहितीचे विश्लेषण करून कुठे गुन्हा घडू शकतोकुठे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येऊ शकणार आहे.

            ‘मार्वल’ स्थापन करण्याबाबत राज्य शासनभारतीय व्यवस्थापन संस्थानागपूर आणि मे. पिनाका टेक्नॉलॉजीज खाजगी मर्या. यांच्यात दि. 22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय कराराद्वारे शासनाची ही कंपनी अधिनियम 2013 खाली नोंदणीकृत करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील पोलीस जिमखाना येथे झालेल्या बैठकीत मुख्य सचिव तथा गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव (अतिरिक्त कार्यभार) सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

कृत्रीम बुद्धिमत्तेच्याद्वारे गुन्ह्यांची उकल

            मानवी आकलनशक्ती आणि तर्कावर आधारित निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर जटील समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर केला जाऊ लागला आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस दलाला याचा मोठा लाभ होऊ शकणार आहे.

            सद्यस्थितीत शासनाच्या विविध विभागांकडे प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध असते. त्याचप्रमाणे पोलीस दलाकडे गुन्हे आणि गुन्हेगारांसंबंधी माहिती मोठ्या प्रमाणावर येत असते. सायबर आणि आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांच्या संख्येतही मोठी वाढ होत असून नागरिकांच्या फसवणुकीचे नवनवीन मार्ग अवलंबिले जात आहेत. या माहितीचा वापर करून विश्लेषण करायला आणि मनुष्याप्रमाणे निर्णय घ्यायला आधुनिक संगणकालाच शिकविले तर याचा मोठा लाभ होऊ शकतो. हाच धागा पकडून महाराष्ट्र पोलीस दलात एआयचा वापर करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 16 मार्च 2024 रोजीच्या बैठकीत घेतला.

मार्वलचे कार्यालय नागपूर येथे

            या उपक्रमातील मे. पिनाका टेक्नोलाजीज खासगी मर्या. ही चेन्नई स्थित कंपनी असून त्यांना भारतीय नौदलगुप्तवार्ता विभागआंध्र प्रदेशआयकर विभागसेबी आदी संस्थांना एआय सोल्यूशन्स पुरविण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या विशेषज्ञतेचा उपयोग व्हावा या उद्देशाने मार्वल’ चे कार्यालय नागपूर येथे भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार पिनाका’ एआय सोल्युशन्स पुरवेल तरभारतीय व्यवस्थापन संस्था संशोधन आणि प्रशिक्षणामध्ये सहकार्य करणार आहे. नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षकभारतीय व्यवस्थापन संस्थानागपूर चे संचालक हे या कंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि मे.पिनाका टेक्नोलाजीज खासगी मर्या.चे संचालक हे या कंपनीच्या संचालक मंडळावर असतील तर नागपूर (ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.

00000

Featured post

Lakshvedhi