Wednesday, 17 July 2024

मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरू

 मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय चारचाकी वाहनांच्या

नोंदणीसाठी नविन मालिका सुरू

 

  मुंबईदि. 17: प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) येथे चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरीता असलेली MH-01-EN ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यामुळे या संवर्गातील वाहनांसाठी MH-01-ER ही आगाऊ स्वरूपात असलेली मालिका नियमित होईल. या नोंदणी क्रमाकांच्या मालिकेतील वाहन क्रमांक चारचाकी संवर्गातील परिवहनेत्तर वाहनांकरीता आरक्षीत करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतर्गत विहीत शुल्क आकारले जाणार आहे.

      ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांसाठी या नविन क्रमाकांच्या मालिकेतून आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्ष‍ित करावयाचा असेलत्यांना विहीत नमुन्यातील अर्जपत्त्याचा पुरावाछायाचित्र ओळखपत्रपॅनकार्डवाहन खरेदीची पावती आणि पसंतीच्या क्रमांकासाठीच्या REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI (CENTRAL) किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारीमुंबई (मध्य)  यांच्या नावे काढलेल्या विहीत शुल्काचा धनाकर्षासह 18 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) येथे सादर करावा. विहीत शुल्क भरून नमुन्यातील अर्ज  खिडकी क्रमांक ई- 18 वर मंगेश मोरे यांचेकडून प्राप्त करून घेता येईल.  

      एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीचा त्याच दिवशी दुपारी वाजता अवलंब करून नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल. सदर आरक्षीत केलेल्या वाहनक्रमांकाची वैधता 30 दिवसांकरीता असते. सदर क्रमांकावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. वाहन क्रमांक आरक्षित केल्याच्या पावतीची नोंद वाहनाच्या डेटा एंट्रीच्या वेळी वाहन 4.0 प्रणालीमध्ये घेतल्यास त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्राप्त होतोअसे प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य)चे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 

 

००००

 

 

 

 

 

मागील आषाढी वारीच्या तुलनेत

 मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30 टक्के वारकरी संख्या वाढलेली आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये  तिपटीने वाढ केलेली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

         विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंदिर समितीचा एमटीडीसीसोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

        आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्यावतीने चार ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आतापर्यंत लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. तसेच 15 लाख  नागरिक या आरोग्य सुविधांच्या लाभ घेतीलअशी अपेक्षा आहे. तसेच पंढरपूर येथे देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी लवकरच एक हजार खाटांची  क्षमता असलेले नवीन रुग्णालय उभारण्यात  येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मानाचे वारकऱ्यांचा सन्मान

          शेतकरी श्री. बाळू शंकर अहिरेवय 55 वर्षेसौ. आशाबाई बाळू अहिरे वय 50 वर्षे. (मु. पो. अंबासनता. सटाणा जि. नाशिक) यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहेत.

श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देण्यात आले. संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळादेहू यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना 75 हजार रुपयांचा द्वितीय  पुरस्कार  तर  श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाइंदापूर यांना 50 हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.

आरोग्यदूतचे प्रकाशन-

        श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्यदुत या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी मेगडंबरीसाठी दोन कोटी 45 लाख रुपयाचे चांदी दान करणाऱ्या उद्योजक सुनील मोरगे यांचाही  मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

       प्रारंभी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा पार पडली.

बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे... मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

  

बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेवकष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे... मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे



आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते  महापूजा.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी.

पंढरपूर येथे होणार एक हजार खाटांचे रूग्णालय.

पंढरपूरदिनांक 17- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले आहे सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा... विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेवकष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ देप्रत्येकाचे दुःख दूर कर,असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.

         आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटीलमहसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलग्रामविकास मंत्री गिरीश महाजनआरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंतशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवखासदार श्रीकांत शिंदेआमदार सर्वश्री समाधान आवतडे, सचिन कल्याणशेट्टी, भरत गोगावलेजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादपोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेमंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे, की राज्यातील शेतकरीकामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाबेरोजगार तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आदी योजनांच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'संवाद वारी' हा उपक्रम महत्त्वाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘संवाद वारी’ सारख्या उपक्रमातून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी मा

 शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'संवाद वारीहा उपक्रम महत्त्वाचा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘संवाद वारी’ सारख्या उपक्रमातून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची

 मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले

            सोलापूरदि. १६ (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी 'संवाद वारीहा उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेची ही प्रचार प्रसिद्धी चांगल्या प्रकारे होत आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संवाद वारी’ सारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

           आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आयोजित 'संवाद वारीया शासकीय योजनेच्या प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन योजनांची प्रसिद्धी कशा पद्धतीने केली जात आहे याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटीलमाजी आमदार प्रशांत परिचारकपुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते.

         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संवाद वारी हा उपक्रम पुणे येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी यांच्या समवेत शासकीय योजनांची प्रसिद्धी करत इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळे या पालख्या समवेतच्या प्रवासातील विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गात येणाऱ्या विविध गावातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यास मदत झालेली आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ही अशा प्रसिद्धीमुळेच तळागाळापर्यंत पोहोचत आहे. माहिती विभागाचे प्रचार प्रसिद्धीचे कामही चांगले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी माहिती उपसंचालक श्री पाटोदकर यांनी माहिती विभागाच्या संवादवारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली तसेच या प्रदर्शन स्टॉलमध्ये लावण्यात आलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली.

       प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद वारी उपक्रमातील विविध योजनांची पाहणी केली व ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सर्वदूर पोहोचवून एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत योग्य नियोजन करावेअसेही त्यांनी सूचित केले.

शेतकऱ्याने आषाढी एकादशी च्या निमित्ताने आपल्या शेतीमध्ये भातरोपात श्री विठ्ठल माऊलींचे दर्शन साऱ्या जगाला घडवले

 पुण्यातील मुळशी गावात एका शिंदे नामक इंजिनीयर शेतकऱ्याने आषाढी एकादशी च्या निमित्ताने आपल्या शेतीमध्ये भातरोपात श्री विठ्ठल माऊलींचे  दर्शन साऱ्या जगाला घडवले आहे.120 फूट उंच 60 फूट रुंद अशी हि कला त्यांनी साकार केली आहे. पहा


विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांना तपशील दुरुस्तीची संधी

 विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत

मतदारांना तपशील दुरुस्तीची संधी

-डॉ.किरण कुलकर्णी

'दिलखुलासव 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात विशेष मुलाखत

 

            मुंबईदि. १६ : राज्यात मतदार याद्यांचा १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकाच्या आधारावर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा) राबविण्यात येत आहे. या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नावपत्तावय व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील दुरुस्त करुन घ्यावाअसे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात केले आहे.

            भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा) राज्यात २५ जुलै ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादी तयार करणेमतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणेआयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे तसेचतुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणेकंट्रोल टेबल अद्ययावत करणेनमुना १-८ तयार करणेअर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार करणे आदी कामे प्रामुख्याने करण्यात येत आहेत. मतदानाच्या दिवशी आपले मतदार यादीत नाव नाहीअसे होऊ नयेयासाठी पात्र नागरिकांनी या कालावधीमध्ये त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीतअसे आवाहनही  डॉ. कुलकर्णी यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून केले आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखतगुरुवार दि. 18शुक्रवार दि. 19शनिवार दि. 20 आणि सोमवार दि. 22 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे, तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, 19 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR  

सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेवून राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्याची ताकद आम्हाला दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडे

 सर्व जातीधर्मपंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेवून

राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्याची ताकद आम्हाला दे

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पांडुरंगचरणी साकडे

 

            मुंबईदि. १६ :- बा पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींच्या तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून राज्यात पाऊसपाणी चांगले होऊदेशेतकऱ्यांच्या शेतात पिकांचीघरात धनधान्याचीदुधदुभत्याची सुबत्ता येऊ देराज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ देसमाजातील एकजूटबंधुत्वाची भावना कायम राहू देमहाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असे साकडेही त्यांनी बा पांडुरंगाला घातले.

            आषाढी एकादशीनिमित्ताने जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात कीपांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अध्यात्मिकभक्तीपरंपरा आहे. सर्व जातीधर्मपंथांच्या वारकरी माऊलींना एकत्र आणणारीस्त्री-पुरुष समानतेचे दर्शन घडवणारीमहाराष्ट्राच्या मातीला एकतासमताबंधुतेचा विचार देणारीसांस्कृतिकवैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीचीआषाढीवारीची  पताका अशीच डौलाने उंच फडकत राहू दे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Featured post

Lakshvedhi