Wednesday, 17 July 2024

खरीप हंगाम २०२३ च्या पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर

 खरीप हंगाम २०२३ च्या पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर

 

 

मुंबई, दि. १६  :- राज्यात खरीप हंगाम सन २०२३ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२३ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल  कृषी  आयुक्त  रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे जाहीर करण्यात आले.

 राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्तीमनोबल यामध्ये वाढ होण्यास मदत होते. शेतकरी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळू शकते व त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी चंद्रकांत रघुनाथ म्हातले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच भात आदिवासी गटामध्‍ये श्रीमती शेवंताबाई काशिनाथ कडाळी या महिला शेतकऱ्याने प्रथम क्रमांक मिळविला. बाजरी सर्वसाधारण गटामध्‍ये पुणे जिल्‍ह्याच्‍या श्रीमती ताराबाई दौलत बांदल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सोयाबीन सर्वसाधारण गटामध्‍ये कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील बाळासाहेब पंडितराव खोपकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. 

बक्षीसाचे स्वरूप : १.राज्यस्तरीय प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम रु. ५०,०००/-

                            २. राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ४०,०००/-

                            ३.राज्यस्तरीय तृतीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ३०,०००/-

·       स्पर्धेचा निकाल असा :  उत्पादन क्विंटल / हेक्टरमध्ये देण्यात आलेले  आहे.

 

खरीप हंगाम सन २०२३ राज्यस्तरीय अंतिम निकाल

राज्यातील गुणांनुक्रम

विभाग

स्पर्धक शेतकऱ्याचे नाव

गाव

तालुका

जिल्हा

शेतक-यांचे उत्पादन क्वि./हे.

भात (सर्वसाधारण गट)

ठाणे

 श्री. चंद्रकांत रघुनाथ म्हातले

चंडिका नगर

दापोली

रत्नागिरी

124.37

ठाणे

श्री.गुरुनाथ दत्तात्रेय सांबरे

पोई,

कल्याण

ठाणे

111.55

कोल्हापूर

श्री. विशाल कलगोंडा पार्वते,

सुळकुड

कागल

कोल्हापूर.

111.27

भात (आदिवासी गट)

1

ठाणे

श्रीम.शेवंताबाई काशिनाथ कडाळी

चरगाव

अंबरनाथ

ठाणे

103.38

2

ठाणे

श्री.वामन पदु कडाळी

चरगाव

अंबरनाथ

ठाणे

101.18

3

पुणे

श्री किसन शिवराम चिमटे

बोरवली,

मावळ

पुणे

99.0

खरीप ज्‍वारी (सर्वसाधारण गट)

नाशिक

श्री अशोक दगडू तायडे

रायपूर

रावेर

जळगाव

45.00

नाशिक

श्री कुंदन कुमार अशोक चौधरी

 विवरे खुर्द

रावेर

जळगाव

35.00

पुणे

श्रीमती शंकुतला वसंत साखरे

फोनसळ

उ.सोलापुर

सोलापुर

३२.०७

खरीप ज्‍वारी (आदिवासी गट)

नाशिक

श्री झूजऱ्या साऱ्या पाडवी

कोठार

तळोदा

नंदुरबार

41.81

नाशिक

श्री लक्ष्मण गंगाराम बागुल

काळंबा

नंदुरबार

नंदुरबार

31.00

नाशिक

श्री गणेश शिवाजी वळवी

मालपुर

नंदुरबार

नंदुरबार

30.06


 


खरीप बाजरी (सर्वसाधारण गट)

पुणे

श्रीमती ताराबाई दौलत बांदल

चव्हाणवाडी

शिरूर

पुणे

64.38

पुणे

श्री लक्ष्मण दादा रांधवन

रावणगाव

  दौंड

पुणे

59.96

पुणे

श्री योगेश दत्तात्रेय गाडे

गुनाट

शिरूर

पुणे

58.32

खरीप बाजरी (आदिवासी गट)

नाशिक

श्री तुळशीराम वाधू बहिरम

 विजयनगर

सटाणा

नाशिक

21.49

नाशिक

 श्री बापू ज्ञानदेव महाले

किकवारी खुर्द

सटाणा

नाशिक

20.16

नाशिक

श्री उद्धव देवसिंग सोनवणे

नरकोळ

सटाणा

नाशिक

19.69

मका (सर्वसाधारण गट)

पुणे

श्री माणिक गोविंद काटे

 नवी लोटेवाडी

सांगोला

सोलापूर

175.80

पुणे

श्री नवनाथ ज्योतिबा बंडगर

कटफळ

सांगोला

सोलापूर

172.68

पुणे

श्रीमती मैनाबाई यशवंत कर्चे

पिंपरी

माळशिरस

सोलापूर

160.90

मका (आदिवासी गट)

नाशिक

श्री अरुण गाजऱ्या वसावे

डोगेगाव

नवापूर

नंदुरबार

68.40

नाशिक

श्री वजीर सिंग गेन्या नाईक

अंजने

नवापूर


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील

मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदतजखमींवर मोफत उपचार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            नवी मुंबई, दि. 16 :- डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे 5 लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

            कळंबोली, नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठिशी असल्याचे रुग्णांना सांगितले. जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली.  अतिदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरित करावे लागल्यास तसे करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. 

            खासगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात 46 जखमी आहेत. त्यापैकी 7 वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

            मुख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

००००

Tuesday, 16 July 2024

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर

 

           मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जातात. माहे जून-२०२४ मध्ये दि. ०८/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र सहयाद्रीदि. १४/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेषदि. १९/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरवदि. २१/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनीव दि. २६/०६/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेतअसे  उपसंचालक (वित्त व लेखा),महाराष्ट्र राज्य लॉटरी,वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

             त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2406-A/15221 या श्री.महावीर लॉटरी सेंटरकोल्हापूर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाली आहेत. या सोडतीच्या एकूण २६९७ तिकिटांना एकूण रु.१७,७६,७५०/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र गणेशलक्ष्मी मान्सून विशेष तिकीट क्रमांक GS-04/6625 या जलाराम लॉटरीअकोला यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. २२ लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण १४०५ तिकिटांना एकूण रू.२९,०३,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.

             महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ६१८५ तिकिटांना एकूण रु.८,०८,५००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकिटांमधून एकूण ८६८ तिकिटांना एकूण रु.५,६३,२००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.

            महाराष्ट्र गजराज मालिका तिकीट क्रमांक GJ-01/0959 या श्री. गणेश एंटरप्रायजेसदादर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रू. १४ लाखांचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहेत. या सोडतीच्या एकूण २००५ तिकिटांना एकूण रू.१६,३०,०००/- किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत.

            याशिवाय जून- २०२४ मध्ये साप्ताहिक सोडतीतून ३६७१८ जणांना रू. १,३२,८८,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत. सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावीअसे उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

0

जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्यावी नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा

 जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्यावी

नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील भोकरअर्धापूरमुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्यावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जलजीवन मिशनच्या व वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार अशोक चव्हाण (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णादूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी  अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालउपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीनांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 1234 कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर 28 पाणी पुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकरअर्धापूर व मुदखेड तालुक्यात 122 जिल्हा परिषदेच्या दोन योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरु आहेत. ही सुरु असणारी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करावेत.

जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्यावी नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा

 जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्यावी

नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई दि. 16 :- नांदेड जिल्ह्यातील भोकरअर्धापूरमुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्यावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जलजीवन मिशनच्या व वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार अशोक चव्हाण (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तापाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णादूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी  अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालउपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीनांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 1234 कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तर 28 पाणी पुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबविण्यात येत आहेत. यामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकरअर्धापूर व मुदखेड तालुक्यात 122 जिल्हा परिषदेच्या दोन योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरु आहेत. ही सुरु असणारी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुरु असणाऱ्या कामांच्या सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करावेत.

शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा प्रस्ताव तातडीने सादर करावा

 शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा

प्रस्ताव तातडीने सादर करावा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि. १६ :- शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनींचा पोत सुधारून त्या लागवडी योग्य बनविणे गरजेचे आहे. क्षारपड जमिनी सुधारणा निचरा तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याने यासाठीचा आवश्यक प्रस्ताव तयार करून तो शासन मान्यतेसाठी तातडीने पाठवावा. या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेसह आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

            शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यातील  क्षारपड व पाणथळ क्षेत्र सुधारण्यासाठी प्रस्तावित योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तालाभक्षेत्र विकास सचिव डॉ. संजय बेलसरेकोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणेच्या अधीक्षक अभियंता तथा संचालक वैशाली नारकर आदी उपस्थित होते.

             उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीक्षारपड जमीन सुधारणा काम लोकोपयोगी व शेतकरी हिताचे आहे. या कामातून नापिक जमीन लागवडीखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा निश्चित लाभ होणार आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणेचा प्रस्ताव सादर करताना तो परिपूर्ण सादर करावा. यामध्ये सबंधित शेतकरी हिस्सा १० टक्केसबंधित सहकारी साखर कारखाना १० टक्के हिस्सा याबाबतची संमतीपत्र यांचा समावेश असावा.

            या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यमाननद्यांची पाणी पातळीधरणांमधील पाणी साठा याबाबतचा आढावा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री.येडगे यांच्याकडून घेतला.

 

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

 व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 

            मुंबईदि. १५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले.

               एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल व उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री.आठवले बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील,आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक दिगंबर दळवी यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, कौशल्य विकास विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री.आठवले म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांमध्ये कौशल्य वृध्दीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.त्याच धर्तीवर राज्याचे कौशल्य विकास मंत्री यांनीही राज्याच्या कौशल्य विकासाला गती दिली आहे.उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातील कार्यकुशल मनुष्यबळ तयार केले जावे यासाठी राज्य शासन चांगला प्रयत्न करत आहे.

                        अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

      मंत्री श्री.लोढा म्हणाले की,राज्यात रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभाग,उद्योजक यांच्या समन्वयातून सर्वाधिक रोजगार निर्माण केले जातील. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे आणि विभागाला यशाकडे नेण्यासाठी  सर्वांनी या कामात  उत्स्फुर्त सहभाग घ्यावा.

            कौशल्य विकास विभागाचे सचिव श्री. पाटीलआयुक्त श्रीमती चौधरीमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पालकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभाग आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत सामंजस्य करार झाला. जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाव्दारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल यशस्वी उमेदवारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनांचे (MAPS) पोर्टलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्पर्धेतील विजेत्या संस्थांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी चांदूरबाजारजिल्हा - अमरावती या संस्थेला प्रथम क्रमांकशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदेडजिल्हा- नांदेड संस्थेला व्दितीय क्रमांक तर  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाऔंध. पुणे (मुलींची)जिल्हा-पुणे या संस्थेचा तृतीय क्रमांक आला.

            विभागीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुंबई विभागात फादर अॅग्नेल खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थावाशी, जिल्हा- ठाणेपुणे विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरुरजिल्हा-पुणे,नाशिक विभागात औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकळवणजिल्हा नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड जिल्हा जालना विभाग,अमरावती विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदगाव खंडेश्वरजिल्हा अमरावती,नागपूर विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थावर्धाजिल्हा वर्धा यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

                                                            ००००

संध्या गरवारे/विसंअ


Featured post

Lakshvedhi