Friday, 12 July 2024

डीएननगरच्या ‘हाय फ्रिक्वेंसी ट्रान्स्मीटर’बाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागासमवेत बैठक

 डीएननगरच्या हाय फ्रिक्वेंसी ट्रान्स्मीटरबाबत

केंद्रीय नागरी उड्डाण विभागासमवेत बैठक

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 11 : अंधेरी (पश्चिम) डीएननगर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर परिघातील इमारतींचा पुनर्विकास करणेगोराई येथील जागा प्राधिकरणाला देणे व डीएन नगर येथील जागा महानगरपालिकेला देण्याबाबत यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली आहे. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागाला पत्रही देण्यात आले आहे. लवकरच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येईलअसे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

               याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीभारतीय विमानतळ प्राधिकरण व महानगरपालिका यांच्या संयुक्त सभेमध्ये गोराई येथील महानगरपालिकेच्या जागेवर ट्रान्स्मीटर स्थलांतरित करून डीएननगर येथील प्राधिकरणाच्या जागेवर महापालिका उद्यानाचा विकास करणार आहे. या निर्णयामुळे भविष्यात विमानतळाच्या  हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर परिघाच्या आत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करता येईल. याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण विभागासोबत बैठक घेवून चर्चा करण्यात येईल.

००००

मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पुणेकरांना निकषानुसार मदत करण्यात येणार

 मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या

पुणेकरांना निकषानुसार मदत करण्यात येणार

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 11 : पुणे शहरातील धानोरी कालवडयेरवडा व लोहगाव परिसरात 4 जून 2024 रोजी ढगफुटीसदृश पाऊस झाला. धानोरी रस्त्यावरून पावसाचे पाणी काही नागरिकांची घरे व दुकानांमध्ये शिरले. या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात येईलअसे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            याबाबत सदस्य सुनील टिंगरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सदस्य भीमराव तापकीरअशोक पवार यांनीही भाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीपुणे शहरातील धानोरी कालवडयेरवडा व लोहगाव परिसरातील नुकसानाबाबत पुन्हा सर्वेक्षणाच्या आयुक्तांना सूचना देण्यात येतील. पुणे शहरात भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास पूर येवून होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल. याबाबत पुणे शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

००००

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु; इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन

 तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु;

इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन

संचालक डॉ. प्रमोद नाईक यांची 'दिलखुलासव 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. 11 : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील युवकांना चांगले करिअर घडविण्याची आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणी करावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

            महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने अलिकडच्या काळात कौशल्य विकास उपक्रमांवर विशेष भर दिला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच युवकांना चांगले करिअर आणि  व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकारचे अभ्यासक्रमप्रवेश प्रक्रिया,अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध रोजगाराच्या संधी अशा विविध विषयांवर संचालक डॉ. नाईक यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखतशुक्रवार दि. 12 आणि शनिवार दि. 13 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून ही  मुलाखत शुक्रवार दि. 12 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR  

0000

शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

 शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने

देऊ इच्छिणाऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

 

              मुंबईदि. ११ : मुंबई उपनगर जिल्ह्यात इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता १०० मुलींची क्षमता आणि १०० मुलांची क्षमता असलेले प्रत्येकी एक वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात दहा हजार चौरस फूट स्वतंत्र क्षेत्रफळाची जागा असलेल्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या म्हाडासिडकोबृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इमारत मालकबांधकाम विकासक यांनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मुंबई उपनगर यांनी केले आहे.

               खाजगी इमारत मुंबई उपनगर परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट असावे. या इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह व १० स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा.

            इमारत भाडे कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार इमारत मालक देण्यास तयार असल्याबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील.

            प्रत्येक वसतिगृहाकरिता स्वतंत्र दोन इमारती आवश्यक असतील. म्हाडासिडकोबृहन्मुंबई महानगरपालिका तसेच इमारत मालकबांधकाम विकासक यांनी सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरआर. सी. चेंबूरकर मार्गप्रशासकीय इमारत४ था मजलाचेंबूर (पू.)मुंबई-७१ या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीसाठी 02225222023 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****

कचरा डेपोच्या ठिकाणी होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजनेच्या सूचना

 कचरा डेपोच्या ठिकाणी होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी

तत्काळ उपाययोजनेच्या सूचना

 मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 11 : कांजूरमार्ग येथील कचरा डेपोवर (डम्पिंग ग्राऊंड) टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात निर्माण होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेला सूचना दिल्या जातील. तसेचमुंबईतील डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नाच्या अनुषंगाने संबंधित लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाहीच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांना दिल्या जातीलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. दरम्यानकचरा विलगीकरण आणि विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प राबवूनही स्थानिक नागरिकांना दुर्गंधीच्या त्रास होत असल्याने संबंधित प्रकल्प राबविणाऱ्या संस्थेची चौकशी करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

            सदस्य सुनील राऊत यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीमुंबईत जमा होणाऱ्या एकूण 6400 टन कचऱ्यापैकी 5800 टन कचरा कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर जमा करण्यात येतो. मात्रया परिसरात दुर्गंधी पसरत असल्याच्या आणि त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे कचरा दुर्गंधी पसरू नयेयासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवायहे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्याच्या पर्यायावर विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी सदस्य सुनील प्रभूॲड. आशिष शेलारसुनील राणेरमेश कोरगावकर आदी सदस्यांनीही लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सहभाग घेतला.

0000

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ११ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात सन २०२४-२५ या वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापकशासकीय वसतिगृह, बोरिवली यांनी केले आहे.

              या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास प्रवर्गविशेष मागास प्रवर्गअनाथ या प्रवर्गातील असाव्यात. तसेच अर्जदार महिलेचे मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी  कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्तसमाजकल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर. सी. मार्गचेंबूरमुंबई-७१ येथे संपर्क साधावाअसे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ११ : राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणमुंबई उपनगर यांनी केले आहे.

            राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्वअशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करणेकरितातसेच मनः स्वास्थ केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना" राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

             सन २०२४-२५ या वर्षापासून वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी या https://tinyurl.com/uedsc  लिंकवर जाऊन अर्जाची प्रिंट काढून दिलेली माहिती भरुन  अर्ज कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर.सी.मार्गचेंबूर (पू.)मुंबई-७१ या कार्यालयात  करावा.

            या योजनेसाठी लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत, योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील जेष्ठ नागरीक, ज्या नागरिकांनी दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतीलअसे नागरिक, पात्र समजण्यात येतील. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेलआणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतीलतर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न  २ लाखाच्या आत असावे. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स हे निकष अर्जदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Featured post

Lakshvedhi