Tuesday, 9 July 2024

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची

 पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाची

पुनर्रचना ही राज्याच्या हिताची

                                                     - मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

            मुंबई, दि. ९ : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा निर्णय हा राज्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे. यामध्ये कोणाच्या काही शंका असल्यास त्या दूर केल्या जातील, असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

          यासंदर्भात विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले कीपशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना ही राज्याच्या हिताची आहे यामध्ये ज्या संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे त्यांचे मुद्दे देखील मंत्रीमंडळासमोर मांडून त्याला मान्यतेसाठी सादर केले जातील. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेमुळे विभागाचे सक्षमीकरण होवून नवीन पदे निर्माण होतील. यातील लाभधारकांना काही शंका आहेत त्यांच्याशी चर्चा करून व्यापक व सर्वांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.

          या प्रश्नाच्या चर्चेत सर्वश्री अभिजित वंजारी, सतेज पाटील, सुरेश लाड यांनी सहभाग घेतला.

0000

दुष्काळग्रस्तांना निधी वेळेत वाटप करणार

 दुष्काळग्रस्तांना निधी वेळेत वाटप करणार

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

            मुंबई, दि. ९ : दुष्काळग्रस्तांना मंजूर केलेला निधी वाटप करण्यासाठी शासन कार्यवाही करत आहे. दुष्काळग्रस्तांना जी मदत शासनाने जाहीर केली आहे त्या शेतकऱ्यांना हा निधी वेळेत वाटप करणार असल्याचे विधानपरिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

          यासंदर्भात विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना मदत वाटप करण्यासाठी शासनाला आवश्यकता भासल्यास मुदत वाढवली जाईल. आतापर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून ईकेवायसीची मोहीम लवकरात लवकर करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यासाठी दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत त्या भागातील विद्यार्थ्यांना तसेच दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत केली जाईल. एन.डी.व्ही.आय. (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार हे ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. जिरायत, बागायती पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत शासन मदत करत आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद मदतीच्या निकषापेक्षा जास्त मदत दिली जात आहे, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

            या प्रश्नाच्या चर्चेत विराधी पक्षनेते अंबादास दानवेविधानपरिषद सदस्य सतेज पाटीलविधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकसित होवून रोजगाराच्या संधी निर्माण होतील

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून

कौशल्य विकसित होवून रोजगाराच्या संधी निर्माण होतील

- मंत्री चंद्रकात पाटील

            मुंबईदि. ९ :  राज्यातील युवक-युवतींचे  कौशल्य विकसित व्हावे,व्यवसाय करण्याची आवड निर्माण व्हावी  यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना शासन राबवत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            यासंदर्भात विधानपरिषद नियम ९३ अन्वये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सूचना उपस्थित केली होती.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींचे कौशल्य विकसित करणेव्यवसाय करण्याची आवड निर्माण करण्यासाठी ही योजना शासन राबवत आहे. या योजनेसाठी शासनाच्या दहा पॉलिटेक्नीकल इंजिनीअरींग कॉलेजना ५३ कोटी ६६ लाख रूपये मंजूर केले आहेत. सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) देखील तयार करत आहोत. लवकरच ही केंद्र सुरू होईल. प्रत्येक भागाची गरज लक्षात घेवून तसे अभ्यासक्रम तयार केले जातील तसेच उपलब्ध मनुष्यबळाला सुविधायुक्त उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. कुशल मनुष्यबळ तयार होईल आणि त्यांना रोजगार देखील प्राप्त होईल असा या योजनेचा उद्देश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही नवीन कौशल्य विकास निर्माण करणारे अभ्यासक्रम तयार करावे, असेही सांगितले आहे. तसेच शासनाच्या योजनांची माहिती सर्व घटकापर्यंत पोहोचावी यासाठी ५० हजार योजनादूत नेमले जाणार आहेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून देतानाच त्यांतर्गत हे योजनादूत नेमले जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक योजनादूत असेल. हे योजनादूत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिध्दी करतील. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर आदी तरूणांना रोजगार प्राप्त होणार आहेत असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

0000

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारसीचा ठराव संमत

 मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी

केंद्र शासनाकडे शिफारसीचा ठराव संमत

 

            मुंबईदि. ९ : विधानसभेत मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची केंद्र शासनास शिफारस करणारा ठराव मांडला. हा ठराव सभागृहात संमत करण्यात आला.

       ठरावानुसार मुंबई शहरातील मध्य रेल्वे मार्गावरील ‘करी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव  बदलून ‘लालबाग’ रेल्वे स्थानक‘सॅंडहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘डोंगरी’ रेल्वे स्थानकपश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मरीन लाईन्स’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘मुंबा देवी’ रेल्वे स्थानक‘चर्नी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘गिरगाव’ रेल्वे स्थानकहार्बर रेल्वे मार्गावरील ‘कॉटन ग्रीन’ चे ‘काळा चौकी’ रेल्वे स्थानक‘डॉकयार्ड रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘माझगाव’ रेल्वे स्थानक‘किंग्ज सर्कल’ स्थानकाचे नाव ‘तीर्थंकर पार्श्वनाथ’ रेल्वे स्थानक करण्याबाबत केंद्र शासनास शिफारस करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला.

*

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत

 मुंबईतील रेल्वे स्थानकांची

नावे बदलण्याचा ठराव विधानपरिषदेत संमत

            मुंबईदि. ९ : विधानपरिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मांडला.

           मध्य रेल्वे मार्गावरील करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव  बदलून लालबाग रेल्वे स्थानक, सॅंडहॅर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून  डोंगरी रेल्वे स्थानक, पश्चिम मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबा देवी रेल्वे स्थानकचर्नी रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गिरगाव रेल्वे स्थानकहार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन  ग्रीन चे काळी चौकी रेल्वे स्थानक, डॉक यार्ड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून माझगाव रेल्वे स्थानककिंग्ज सर्कल स्थानकाचे नाव तिर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक याप्रमाणे बदलण्यात यावेत, अशी शिफारस महाराष्ट्र  विधानपरिषद  केंद्र शासनास करीत आहे, असा ठराव संमत करण्यात आला.


शिक्षक मतदारसंघातून निवड झालेल्या सदस्यांचा शपथविधी संपन्न

 शिक्षक मतदारसंघातून

       निवड झालेल्या सदस्यांचा शपथविधी संपन्न

 

            मुंबई, दि.  : विधानपरिषद द्वैवार्षिक निवडणूक २०२४ मध्ये विधानपरिषदच्या पदवीधर मतदारसंघातून निवड झालेले ॲड. अनिल परब तसेच शिक्षक मतदारसंघातून निवड झालेले किशोर दराडे यांनी आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांची ओळख यावेळी करून दिली.

0000

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात चार हजार युवक युवतींनी नोंदवला सहभाग

 पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात

चार हजार युवक युवतींनी नोंदवला सहभाग

 

            मुंबई, दि. ९ : जिल्हा कौशल्य विकास रोजगारउद्योजकता मार्गदर्शन केंदमुंबई उपनगर आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुलुंड यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ०९ जुलै२०२४ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुलुंड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

            या मेळाव्यात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), पे टीएममहिन्द्रा एन्ड महिन्द्रा प्रा.लि., हिताची केश मॅनेजमेंट सर्व्हिसेसरॅण्डस्टॅड इंडिया प्रा.लि.शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या विविध क्षेत्रातील २२ उद्योजक /प्लेसमेंट एजन्सी यांनी सहभाग घेतला. उद्योजकांनी टेक्नीकलमेकॅनिकलइलेक्ट्रीशीयनटेलीकॉलींगबॅकऑफीसअप्रेंटीसमशिन ऑपरेटरडिजीटल मार्केटिंगडिजीटल ऑपरेटरआय टी इंजीनियरफायनान्शीयल ॲडव्हायजरसुपरवायझर या सारख्या १८४७ पदाकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यातसेच उपस्थित ५ शासकीय महामंडळानी स्वयंरोजगारासाठी सहाय्य करणाऱ्या योजनांची माहिती उमेदवारांना दिली.या मेळाव्यात ३८० उमेदवारांनी सहभाग घेतला असूनउद्योजकांकडून ३२ उमेदवारांची प्राथमिक निवड आणि ५ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

                या  मेळाव्यास जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्रीमती शंभरकरप्राचार्य श्री. संजय गोरेमुंबई उपनगरचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे उपस्थित होते.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

Featured post

Lakshvedhi