Tuesday, 9 July 2024

अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईसाठी लवकरच कायदा

 अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर 

कारवाईसाठी लवकरच कायदा

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 9 : अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            सदस्य सुनील राणे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीराज्यात महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडून सन २०१९ पासून आतापर्यंत ७ हजार ८५ उमेदवारांनी प्रमाणपत्र घेतली आहेत. मुंबईमध्ये सध्या १९७ हॉस्पिटलशी संलग्न ठिकाणी लॅब आहेत. मात्रलॅब सुरू करण्याची आवश्यक परवानगी नसताना ज्या ठिकाणी अनधिकृत लॅब सुरू असेलत्या बंद करण्यात येतील. यासंदर्भात राज्य शासन लवकरच नवा कायदा आणत असल्याचेही त्यांनी सांगितले.

            सध्या राज्यभरात भरारी पथक नेमून अशा बोगस लॅब शोधण्याची कार्यवाही केली जाईल.  नगरविकाससार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाशी निगडित विषय यामध्ये आहेत. त्यामुळे या विभागांची एकत्रित बैठक घेण्यात येईल. कायद्याचा मसुदा तयार आहे. याबाबत अधिकच्या सूचना घेऊन कडक कायदा आणण्यात येईलअशी माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

            यावेळी सदस्य अजय चौधरीआशिष शेलारराजेश टोपेप्रकाश आबिटकरयोगेश सागरनाना पटोले यांनी चर्चेत सहभाग घेतला.

बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत १९ कामांना मंजुरी

 बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती 

सुधार योजनेअंतर्गत १९ कामांना मंजुरी

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. ९ : बीड शहरात नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत पायाभूत सोयी सुविधांची कामे करण्यात येत आहेत. शहरात ५ कोटी ५ लाख ७१ हजार रुपयांची १९ कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे पूर्ण करण्यात येतीलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            याबाबत सदस्य बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

              मंत्री श्री. सामंत म्हणाले कीमागील काळात आचारसंहिता असल्यामुळे बीड शहरातील कामांना कार्यादेश देता आले नव्हते. त्यामुळे कामे सुरू होण्यास उशीर झाला. बीड शहरातील कामे  आराखड्याच्या निर्देशानुसार मंजूर करण्यात आली आहेत.

            कुठे नियमानुसारशासन निर्णयानुसार कामे झाली नसल्यास किंवा निकृष्ट दर्जाची झाली असल्यास,  तेथील कामांची तक्रार द्यावी. तक्रारीवरून या कामांची चौकशी करण्यात येईलअसेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

००००

भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण करणार

 भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे 

काम पूर्ण करणार

- मंत्री उदय सामंत

 

            मुंबईदि. 9 : बोरिवली येथे महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सुरुवातीला या जागेवर निवासी इमारती होत्या. या इमारतींचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर काम सुरू झाले. या रुग्णालय विस्तारीकरणाचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईलअशी माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य असलम शेखसुनील राणे यांनी भाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीरुग्णालय विस्तारीकरण कामाच्या दर्जाबाबत चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल.  विस्तारीकरण कामात एखाद्या मेडिकल स्टोअरला जागा देण्यात आली असल्यास त्याचीही पडताळणी करण्यात येईल. मालाड येथील रुग्णालय सुरू करण्याबाबत सूचना देण्यात येतील. तसेच मुंबई शहरातील, उपनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयभगवती रुग्णालय व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातील समस्या व प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येईलअसेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी

 बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची

फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

           

            मुंबईदि. ९ : बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. ७ ऑक्टोबर२०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

            महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची १०० टक्के फी शासन भरेलअशी घोषणा करुन त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली. त्यानुसार मंत्रीमंडळाच्या बैठकीत रितसर मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची १०० टक्के फी सरकार भरेल, यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक (Non Professional) अभ्यासक्रमांचीही (कलावाणिज्यविज्ञान इ.) १०० टक्के फी शासनाने भरावीअसा मुद्दा उपस्थित केला. त्या अनुषंगाने मंत्री श्री.पाटील यांनी स्पष्टीकरण केले.

            राज्यात मुलींचे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशाचे प्रमाण एकूण विद्यार्थी लोकसंख्येमध्ये ३६ टक्के असून प्रगतीशील राज्यामध्ये हे प्रमाण वाढण्याची आवश्यकता विचारात घेऊन मुलींची शिक्षण फी  १०० टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

00000

अप्रतिम काला पाऊले चालती पंहरीची वाट


 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या दोन वर्षांतील महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता विभागाच्या दोन वर्षांतील

महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

            मुंबईदि. 8 : कौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता  विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व योजनांच्या 'कौशल्ययुक्त महाराष्ट्ररोजगारयुक्त महाराष्ट्रमाहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवीकार्यक्षमसर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विभागातील सर्व अधिकारी यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगार निर्मितीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाछत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रकौशल्य विद्यापीठाची स्थापनास्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल असेही ते म्हणाले.

कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम : मंत्री मंगलप्रभात लोढा

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभागामार्फत गेल्या दोन वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. कौशल्य युक्त व बेरोजगार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. आजचा सक्षम युवा उद्याचा उज्ज्वल महाराष्ट्र घडवणार आहे हे लक्षात घेऊन राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनामुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाछत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रकौशल्य विद्यापीठाची स्थापनास्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

              मंत्री श्री. लोढा म्हणाले कीविभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमबेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य योजनारोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिका-यांना प्रशिक्षण,करिअर विषयक साहित्य, डिजिटल अभ्यासिका व संकेतस्थळ विकास योजनामॉडेल करिअर सेंटर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करारआंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणेआदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी, प्रशिक्षण व मार्गदर्शनराज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा

 भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील

विधानसभा निवडणुकीचा आढावा

 

            मुंबईदि. 8 : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारीमुंबईठाणे महानगरपालिका आयुक्तपोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली.

            या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मावरिष्ठ निवडणूक उपायुक्त नितेश व्यासनिवडणूक उपायुक्त हिर्देशकुमारवरिष्ठ प्रधान सचिव (मतदार यादी) एन.एन.बुटोलियामहाराष्ट्राकरिता नियुक्त  सचिव सुमनकुमार दाससचिव (मतदार यादी) पवन दिवान तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगममुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह ठाणे महानगरपालिकेचे आयुक्तपोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पोलिस आयुक्तअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णीसह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

            आज झालेल्या आढावा बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांसमोर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या सदस्यांद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत सूचनाही केल्या.

            मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उत्तुंग इमारतीमध्ये तसेच 200 पेक्षा जास्त घरे असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मोठ्या शहरांतील उत्तुंग इमारती आणि समूह सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात यावेमतदार यादीतील नावे कमी करणे तसेच नवीन मतदार नावे समाविष्ट करणे यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवावानवीन मतदान केंद्रे उभारणेमतदार यादीत  मतदार कार्डांची छपाई व वितरण त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याच्याही सूचना भारत निवडणूक आयोगाकडून यावेळी करण्यात आल्या. आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळईव्हीएमव्हीव्हीपॅट मशीन आदीबाबतही भारत निवडणूक आयोगाकडून माहिती घेण्यात आली.

            या बैठकीनंतर  भारत निवडणूक आयोगाचे  मुख्य निवडणूक आयुक्त  राजीवकुमारनिवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारडॉ.सुखबीर सिंग संधू यांनी  सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले.

Featured post

Lakshvedhi